Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजताच राजकीय वातावरण तापले असून, 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारी 2026 रोजी निकाल जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकत्र निवडणूक लढवण्याची अधिकृत घोषणा केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मुंबईसह राज्यातील सर्व महापालिका निवडणुका उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे संयुक्तपणे लढवणार आहेत. युतीची घोषणा करताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मोठा दावा केला. “मुंबई महापालिकेवर मराठी माणूसच महापौर होईल आणि तो आमचाच असेल,” असे ठामपणे सांगत त्यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी आणला. अनेक वर्षांपासून चर्चेत असलेली ठाकरे बंधूंची युती प्रत्यक्षात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून चौथ्या दिवशी प्रथमच अर्ज दाखलीच्या संख्येत वाढ झाल्याचे चित्र दिसून आले आहे. शनिवारी अनेक भाजप व अपक्ष उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज दाखल केले. भाजपच्या माजी महानगर अध्यक्षा उज्वला बेंडाळे, विरण खडके, सुरेखा तायडे, माजी नगरसेवक नवनाथ दारकुंडे, ज्योती चव्हाण, विश्वनाथ खडके, रंजना वानखेडे, विजय वानखेडे, गौरव ढेकळे, अनिता सुरेश भापसे, मनोज दयाराम चौधरी, मोहीत प्रेमकुमार बालाणी, शेख शाहिद शेख सादीक यांच्यासह अनेक अपक्ष उमेदवारांनी शनिवारी अर्ज दाखल केले. अर्ज भरण्याच्या चौथ्या दिवशी, शनिवार दि. २७ डिसेंबर रोजी शहरातील १९ प्रभागांतून एकूण २३५ उमेदवारी अर्जाची विक्री झाली असून,…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी निंभोरा बुद्रुक, ता. भुसावळ येथे अज्ञात तिघांनी एका तरुणावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची गंभीर घटना गुरूवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार गौतम हरी साळवे (वय ३४, व्यवसाय मजुरी, रा. राम मंदिराच्या मागे, निंभोरा) यांच्या फिर्यादीनुसार, ते घरासमोरील अंगणात असताना अज्ञात आरोपी भरधाव गाडीने रस्त्यावरून येत शिवीगाळ करू लागले. त्यावरून वाद निर्माण झाला. याच वेळी आरोपींपैकी एकाने चाकू काढून गौतम साळवे यांच्यावर वार केले, ज्यात ते गंभीर जखमी झाले. तसेच त्यांच्या वडिलांनाही शिवीगाळ करून धमकावण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. हल्ल्यानंतर जखमी गौतम साळवे…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी प.रा .हायस्कूल सोसायटीचे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय धरणगावच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे दिनांक 25 डिसेंबर 2025 ते 31डिसेंबर 2025 या सात दिवसीय शिबिराचे दत्तक गाव अनोरे या ठिकाणी हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन आज दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी करण्यात आले. या शिबिरांतर्गत रोज स्वयंसेवकांच्या माध्यमातून गावातील विविध कामे रोसयो स्वयंसेवक राबविणार आहेत या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय धरणगाव चे प्राचार्य डॉ. उदय जगताप हे लाभले तर उद्घाटक म्हणून बी जे महाजन विद्यालय अनोरे शाळेचे चेअरमन श्री रमेश खंडू महाजन हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अनोरे गावचे सरपंच श्री स्वप्निल महाजन ,…

Read More

आजचे राशिभविष्य दि.२८ डिसेंबर २०२५ मेष राशी आज तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. तुम्ही कामावर कठोर परिश्रम कराल आणि तुमच्या कामगिरीचा अभिमान वाटेल. आज तुम्हाला अनेक जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात, ज्या तुम्ही चांगल्या प्रकारे पार पाडाल. वृषभ राशी आजचा दिवस उत्साहाने भरलेला असेल. कोणतेही नियोजित काम पूर्ण होईल. तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या काही अपेक्षा असतील आणि तुम्ही त्या पूर्ण कराल. मिथुन राशी आजचा दिवस तुमच्यासाठी फायदेशीर असेल. तुमच्या कठोर परिश्रमाचे सकारात्मक परिणाम मिळू शकतात. आज तुम्ही स्वतःवर लक्ष केंद्रित कराल. तुम्हाला प्रियजनांकडून काही कामात मदत मिळू शकते. कर्क राशी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला राहणार आहे. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचा ताण जास्त…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था बंगळुरूमध्ये नवविवाहित पत्नीच्या आत्महत्येनंतर निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागपुरात हृदयद्रावक घटना घडली. वर्धा रोडवरील हॉटेल रॉयल वीला येथे आई आणि मुलाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत मुलगा सुरज याचा मृत्यू झाला असून, आई जयंती यांची प्रकृती अत्यवस्थ आहे. जयंती आणि सुरज हे दोघेही मूळचे बंगळुरू येथील रहिवासी आहेत. सुरजचे २६ वर्षीय गानवी उर्फ राशी हिच्याशी २९ ऑक्टोबर २०२५ रोजी लग्न झाले होते. सुरज बंगळुरू येथील बेल लेआऊट, विद्यारण्यपुरा येथे वास्तव्यास होता, तर गानवी राममूर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बी. चन्नासंद्रा येथे आपल्या कुटुंबासोबत राहत होती. मिळालेल्या माहितीनुसार, गानवी हिने बुधवारी (दि. २४) रात्री बंगळुरूमध्ये तिच्या आई-वडिलांच्या…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था नरसाळा घाटाच्या मागील परिसरात एका चिमुकलीचा अत्यंत विदारक अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने शनिवारी (दि. २७) सकाळी खळबळ उडाली. सुमारे ८ ते ९ महिन्यांच्या या मुलीचे शरीर लचके तोडलेल्या अवस्थेत आढळून आले असून, प्राथमिक तपासात वन्यप्राण्याच्या हल्ल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मृत चिमुकलीचे नाव अनुष्का मेढा असे आहे. ही घटना उघडकीस येताच परिसरात भीतीचे वातावरण पसरले. खुल्या जागेत अर्धवट अवस्थेत आढळलेल्या मृतदेहाची माहिती मिळताच हुडकेश्वर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला असून, शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत नागपूरच्या पारडी, दिघोरी, हुडकेश्वर,…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. “आमच्या पक्षाचे नुकसान होत असतानाही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना जागा देण्याची भूमिका घेतली,” असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला आहे. राजकीय तडजोडी करताना केवळ पक्षाचा स्वार्थ न पाहता व्यापक राजकीय हिताचा विचार करण्यात आला, असे स्पष्ट करत राऊत म्हणाले की, “शरद पवार आमच्यासोबत असावेत, ही भावना केवळ शिवसेनेची नाही, तर महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांची आहे.” यासाठी आम्ही आमच्या हक्काच्या आणि आधीपासून अस्तित्वात असलेल्या ‘सीटिंग’ जागादेखील सोडल्या, असेही त्यांनी…

Read More

ठाणे : वृत्तसंस्था भाजपने एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाण्यात आक्रमक प्रचाराला सुरुवात केली असून, यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी थेट एकनाथ शिंदेंना लक्ष्य करत खोचक टिप्पणी केली. “एकनाथ शिंदेंच्या मागे सध्या राहू दोष किंवा शनी दोष आहे का, याची खात्री त्यांनी एखाद्या ज्योतिषाकडे जाऊन करून घेतली पाहिजे,” असा चिमटा वडेट्टीवारांनी काढला. नागपुरात पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, “राहू, केतू यांसारखे ग्रह त्यांना शांतपणे जगू देतील का, त्यांच्या मागे काही अडचणी आहेत का, अशी शंका सध्या निर्माण होत आहे.” भाजपकडून ठाण्यात ‘नमो भारत, नमो ठाणे’ असा प्रचार सुरू असल्यावर त्यांनी उपरोधिक भाष्य करत, “कुणी नमो म्हणो, कुणी सुमो…

Read More

जळगाव : प्रतिनिधी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी महायुतीने ‘मिशन मनपा’साठी अखेर एकत्रित रणनिती निश्चित केल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात झालेल्या गोपनीय चर्चांनंतर जळगाव महापालिका निवडणूक महायुतीच्या माध्यमातून एकत्र लढवण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले असून, जागावाटपाचा ४६-२२-७ असा फार्म्युला ठरल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावात काल भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही पक्षांमध्ये सखोल चर्चा होऊन महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्यावर एकमत झाले. बैठकीस भाजपचे आमदार मंगेश चव्हाण तसेच…

Read More