Author: editor desk

आजचे राशिभविष्य दि.३१ डिसेंबर २०२५ मेष राशी जर तुम्ही तुमच्या कामाच्या पद्धती बदलल्या आणि व्यवस्थित राहिलात तर तुमची कामे जलद पूर्ण होतील. आज तुम्ही अनुभवी आणि जाणकार व्यक्तीच्या मदतीने तुमच्या मुलाच्या करिअरच्या समस्या सोडवू शकाल. वृषभ राशी आज तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये खूप गंभीर आणि विचारपूर्वक निर्णय घेण्याची गरज आहे. तुमच्या बिझनेस वाढवण्याच्या योजनांचा पुनर्विचार करा. मोठे किंवा छोटे, कोणतेही निर्णय घेताना तज्ञांचा सल्ला घ्या, मगच पुढे जा. मिथुन राशी ऑफिसमधील काम नेहमीपेक्षा चांगले होईल. नवविाहीत असाल तर तुमचा जोडीदार तुमची खूप प्रशंसा करेल, पण छोट्याशा गोष्टीने रुसणं टाळा. संध्याकाळी पाहुण्यांचे आगमन घरात आनंददायी वातावरण आणेल. कर्क राशी व्यवसायानिमित्त तुम्हाला परदेशात…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था नगरपालिका निवडणुकांमध्ये एका कुटुंबातील अनेक सदस्यांना संधी देणाऱ्या भारतीय जनता पक्षाने महापालिका निवडणुकांसाठी मात्र आपली रणनीती पूर्णपणे बदलली आहे. “पक्षासाठी सातत्याने काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळावा,” या उद्देशाने विद्यमान आमदार, खासदार व मंत्र्यांच्या पत्नी किंवा मुलांना उमेदवारी न देण्याचा धोरणात्मक निर्णय भाजपने घेतला आहे. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेत आज स्पष्टपणे दिसून आली. मुंबई महापालिकेसह राज्यातील २९ महापालिकांसाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, दुसऱ्या दिवशी निकाल जाहीर होणार आहेत. उद्या उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. भाजपच्या या नव्या धोरणामुळे आज अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी राज्यातील अनेक आमदार व खासदारांच्या…

Read More

सांगोला : वृत्तसंस्था शिवसेना शिंदे गटाचे नेते आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोल्यात झालेल्या सभेत वादग्रस्त वक्तव्य करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. शिवसेनेला मतदान करणारे थेट स्वर्गात जाणार असल्याचे विधान त्यांनी यावेळी केले. “ज्यांनी धनुष्यबाणाचे बटन दाबले, त्यांना स्वर्गातच जागा आहे,” असेही पाटील म्हणाले. सभेत बोलताना शहाजीबापू पाटील म्हणाले, “मी खात्रीने सांगतो, ज्यांनी धनुष्यबाण दाबले त्यांना स्वर्गातच जागा आहे. देव त्यांना नरकात जाऊ देत नाही. मात्र, ज्यांनी विरोधकांची बटणे दाबली, त्यांच्यात राम उरलेला नाही,” असे म्हणत त्यांनी विरोधकांवर टीका केली. यावेळी त्यांनी विधानसभेतील पराभवावरून माजी आमदार दीपक साळुंखे यांच्यावरही निशाणा साधला. “मी भाकरीत साप पाळला, म्हणूनच मला विधानसभेत पराभवाचा फटका…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील योगेश्वर नगर परिसरात भाडेतत्त्वावर घेतलेल्या घरात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी व शनिपेठ पोलिसांनी सोमवारी सायंकाळी धडक कारवाई करत छापा टाकला. या कारवाईत देहविक्रीस भाग पाडल्या जात असलेल्या दोन महिलांची सुटका करण्यात आली असून कुंटणखाना चालवणाऱ्या मुख्य आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. सविस्तर वृत्त असे कि, योगेश्वर नगर भागात भाड्याच्या घरात अवैध कुंटणखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शनिपेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने सापळा रचला. माहितीची खातरजमा करण्यासाठी एका बनावट ग्राहकाला संबंधित घरात पाठविण्यात आले. तेथे पंधराशे रुपयांत सौदा ठरल्याची खात्री झाल्यानंतर पंटरने बाहेर दबा…

Read More

आजचे राशिभविष्य दि.३० डिसेंबर २०२५  मेष राशी मेष राशीसाठी आजचा दिवस सामान्यतः कठीण असू शकतो. तुमची ऊर्जा आणि उत्साह कमी असू शकतो, ज्यामुळे तुमच्या आजूबाजूचा परिसर थोडासा त्रासदायक वाटेल. वृषभ राशी वृषभ राशीसाठी आजचा दिवस आव्हानात्मक असू शकतो. तुमच्या नातेसंबंधांमध्ये काही मतभेद जाणवू शकतात. तुम्हाला तुमच्या प्रियजनांपासून थोडे दूर वाटू शकते, ज्यामुळे तुम्हाला काही त्रास होऊ शकतो. मिथुन राशी मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विशेषतः शुभ असेल. तुम्ही तुमच्या सभोवतालच्या लोकांशी प्रेमळ आणि मैत्रीपूर्ण पद्धतीने संवाद साधाल. तुमचे संवाद कौशल्य त्यांच्या शिखरावर असेल. कर्क राशी कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस एकंदरीत चांगला असेल. तुम्हाला तुमच्या सभोवतालच्या लोकांकडून सकारात्मक ऊर्जा आणि…

Read More

यावल : प्रतिनिधी यावल शहरात भुसावळकडून येणाऱ्या रस्त्यावर भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने रस्ता ओलांडणाऱ्या एका वृद्धाला जबर धडक दिल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात वृद्ध गंभीर जखमी झाले असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमसिंग मोतीलाल सिसोदिया हा तरुण कंटेनर (एम.एच. ४० सी.एम. १४४२) घेऊन भुसावळकडून यावलच्या दिशेने येत होता. यावेळी साने गुरुजी शाळेजवळ रस्ता ओलांडत असलेले दत्तात्रय पांडुरंग जाधव (वय ६९, रा. साने गुरुजी शाळेजवळ, यावल) यांना कंटेनरने जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांच्या डोक्याला, हाताला व पायाला गंभीर दुखापती झाल्या आणि ते जागीच ठार झाले. अपघातानंतर जखमी अवस्थेत दत्तात्रय जाधव यांना…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित यानेक्स सनराइज् जी एच रायसोनी मेमोरियल फाउंडेशन प्रायोजित जळगाव ओपन या बॅडमिंटन स्पर्धेत आज अंतिम सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. अंतिम सामन्यानंतर लगेचच बक्षीस वितरण करण्यात आले बक्षीस वितरण समारंभासाठी जळगाव जिल्हा क्रीडा संघाचे अध्यक्ष रजनीकांत कोठारी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या समवेत या स्पर्धेचे मुख्य पंच ब्रिजेश गौर जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव विनीत जोशी सदस्य चंद्रशेखर जाखटे सहसचिव तनुज शर्मा जैन इरिगेशनचे अरविंद देशपांडे यांची उपस्थिती होती अंतिम सामन्यांचे उपविजयी व विजयी खेळाडू खालील प्रमाणे पुरुष एकेरी उपविजेता शुभम पाटील जळगाव विजेता तेजम केशव…

Read More

जळगाव : प्रतिनिधी ड्रग्स प्रकरणात पोलिस कोठडीत असलेला शेख अबरार शेख मुक्तार उर्फ अबरार जिलानी हा राजस्थान, गुजरातच्या सीमावर्ती भागासह मध्य प्रदेशातून एमडी ड्रग्स आणून जळगाव शहरात त्याची विक्री करत असल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे या प्रकरणातील ड्रग्स पुरवठादार आणि मोठ्या माफियांपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांनी तपासाचा आवाका वाढवला आहे. शाहू नगर परिसरात शहर पोलिसांनी छापा टाकून साडेपाच लाख रुपयांचे एमडी ड्रग्स जप्त केले होते. या प्रकरणात दहा महिन्यांपासून पसार असलेला शेख अबरार जिलानी याला २४ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली असून सध्या तो पोलिस कोठडीत आहे. अटकेनंतर पोलिसांनी तपास अधिक वेगाने सुरू केला आहे. दरम्यान, मालेगाव येथे झालेल्या कारवाईत…

Read More

आजचे राशिभविष्य दि.२९ डिसेंबर २०२५ मेष राशी मेष राशीसाठी आजचा दिवस प्रगतीचा आणि आर्थिक लाभाचा ठरेल. तुमच्या व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील, ज्यामुळे उत्पन्नाचे स्रोत वाढतील. कौटुंबिक जीवनात सुख-शांती नांदेल. एखादे शुभ कार्य करु शकता. वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत उत्साही असणार आहे. तुम्ही नवीन उपक्रम किंवा व्यवसाय सुरु करण्यासाठी पावले उचलल्यास त्यात यश मिळण्याची दाट शक्यता आहे. मिथुन राशी मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मानसिक शांतता देणारा ठरेल. तुमचे मन प्रसन्न असल्याने तुम्ही कठीण कामेही सहजपणे पूर्ण करु शकाल. तुमच्या बोलण्याच्या कौशल्यामुळे समाजात तुमचा मान वाढेल कर्क राशी कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी निर्णायक ठरू…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत महाविकास आघाडीने आपली रणनीती स्पष्ट करत जागावाटपाचा महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष ३८ जागांवर, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष ३७ जागांवर निवडणूक लढविणार आहे. माजी आमदार संतोष चौधरी यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत या युतीची अधिकृत घोषणा केली. काही दिवसांपूर्वी दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचे संकेत देत होते. मात्र भाजप–शिवसेना महायुतीला थेट आव्हान देण्यासाठी अखेर दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. माजी आमदार संतोष चौधरी यांनी शिवसेना (उबाठा) नेतृत्वाशी सविस्तर चर्चा करून जळगाव मनपेसाठी ‘३८–३७’ असा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केल्याचे सांगितले. जळगाव महानगरपालिकेच्या एकूण…

Read More