Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी मैत्री म्हणून बोलणे असलेल्या तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून १८ वर्षीय तरुणावर चॉपरने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. ३१ डिसेंबर) दुपारी साडे दोन वाजेच्या सुमारास गोलाणी मार्केट परिसरात घडली. या हल्ल्यात जय उर्फ साई गणेश गोराडे (वय १८, रा. दशरथनगर) या तरुणाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या प्रकरणी शुभम रवींद्र सोनवणे (वय २५, रा. चौघुले प्लॉट) याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. जय गोराडे हा दशरथनगर येथील रहिवासी असून तो देवकर महाविद्यालयात डिप्लोमा द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. त्याच्या वर्गातील एका विद्यार्थिनीसोबत जयची मैत्री होती. मात्र, तिचे व…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी जुना सातारा परिसरातील हंबर्डीकर चाळ येथे मंगळवारी रात्री सुमारे ११ वाजेच्या सुमारास किरकोळ वादाचे रूपांतर गंभीर घटनेत झाले. गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार करण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले. या प्रकरणी भुसावळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी दोघे अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले. संदीप मनोहर कोळेकर (रा. हंबर्डीकर चाळ) यांचा चंद्रकांत उर्फ बाबा विनोद बेंगट व त्याच्या मित्रांसोबत हॉटेलमध्ये जेवण करताना वाद झाला होता. या वादाची कुरापत काढत बाबा बेंगट, कुंदन अनिल पठाडे व अन्य दोघांनी संदीप कोळेकर यांच्या परिसरात येऊन गोंधळ घातला. यावेळी चौघांपैकी एकाने गावठी बंदुकीतून हवेत…

Read More

जळगाव : प्रतिनिधीपिंपळगाव हरेश्वर (ता. पाचोरा) येथील सामाजिक कार्यकर्ते शालिग्राम ओंकार मालकर यांची शिवसेनेच्या माळी क्रांती सेनेच्या प्रदेश उपाध्यक्ष तसेच उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पदी निवड जाहीर करण्यात आली आहे. माळी समाजासाठी गेल्या २५ वर्षांपासून सातत्याने केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत ही निवड करण्यात आली आहे. शिवसेनेचे कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या शिफारशीवरून शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी ही नियुक्ती जाहीर केली. यावेळी माळी क्रांती सेनेचे प्रदेशाध्यक्ष रमेश बारस्कर उपस्थित होते. ठाणे येथे अधिकृत नियुक्तीपत्र देऊन ही निवड जाहीर करण्यात आली. निवडीनंतर बोलताना शालिग्राम मालकर यांनी सांगितले की, आगामी काळात माळी समाजात जनजागृती करून जास्तीत जास्त समाजबांधवांना…

Read More

आजचे राशीभविष्य दि.१ जानेवारी २०२५ मेष राशी तुमचा कल अध्यात्माकडे अधिक असेल. नववर्षाच्या सुरूवातील तुम्ही तुमच्या कुटुंबासह धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता. या राशीच्या विवाहित लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. सर्जनशील कामामुळे तुम्हाला आर्थिक फायदा होईल. वृषभ राशी बऱ्याच दिवसांपासून विचार करत होता त्या नियोजित कामाची आज सुरूवात कराल. तुमच्या मुलाच्या यशामुळे आनंद मिळेल. तुमचे वैवाहिक जीवन सुखाने भरलेले असेल. आज एका खास नातेवाईकाची भेट होईल.वर्षाच पहिला दिवस आनंदात जाईल. मिथुन राशी आजचा दिवस तुमच्यासाठी आनंद घेऊन येईल. तुम्हाला उर्जेने परिपूर्ण वाटेल. आज तुम्ही हाती घेतलेले कोणतेही काम वेळेपूर्वी पूर्ण होईल. तुम्ही वैवाहिक संघर्ष सोडवण्याचा प्रयत्न कराल. कर्क राशी…

Read More

सौ. प्रतिभाताई चव्हाण यांनी स्विकारला पदभार; आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ‘द बेस्ट चाळीसगाव’ साकारण्याचा केला निर्धार चाळीसगाव | प्रतिनिधी  चाळीसगाव नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक व विक्रमी विजय मिळवत स्पष्ट बहुमत प्राप्त केले. जनतेच्या आशीर्वादाने भाजपाचे लोकनियुक्त नगराध्यक्षासह २४ नगरसेवक मोठ्या मताधिक्याने निवडून आले. या पार्श्वभूमीवर भागवत एकादशीचा मुहूर्त साधत दि.३१ डिसेंबर २०२५ रोजी चाळीसगाव नगरपरिषदेत लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. प्रतिभाताई मंगेश चव्हाण यांचा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास आमदार श्री. मंगेशदादा चव्हाण, मुख्याधिकारी श्री.सौरभ जोशी यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक, भारतीय जनता पक्षाचे आजी माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शिवरायांच्या…

Read More

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था  महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजीनगर भाजपमध्ये बंडखोरीचा उद्रेक झाला. अनेक वर्षांपासून पक्षासाठी झटणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याचा आरोप करत संतप्त कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन केले. दुपारी भाजपच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयासमोर शेकडो कार्यकर्त्यांनी आक्रमक निदर्शने करत परिस्थिती चिघळवली. या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्या वाहनाला काळं फासून निषेध नोंदवला, तर डॉ. भागवत कराड यांची गाडी आंदोलकांनी रोखून धरली. संतप्त कार्यकर्त्यांचा रोष इतका तीव्र होता की, दोन्ही नेत्यांना पोलिसांच्या कडक बंदोबस्तात तेथून बाहेर काढावे लागले. आंदोलनादरम्यान एक धक्कादायक प्रकार घडला. उमेदवारी न मिळाल्याने संतप्त झालेल्या एका कार्यकर्त्याने…

Read More

जळगाव :  प्रतिनिधी जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय वातावरण तापले असून अनेक दिग्गज उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. या पार्श्वभूमीवर पत्रकार चेतन वाणी यांच्या पत्नी हेतल महेंद्र पाटील यांनी प्रभाग क्रमांक ६ अ मधून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हेतल पाटील या प्रभागातीलच रहिवासी असून “प्रभागाची लेक” म्हणून त्यांची ओळख आहे. स्थानिक नागरिकांच्या समस्या, दैनंदिन अडचणी आणि मूलभूत प्रश्नांची त्यांना सखोल जाण असल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगितले जात आहे. पत्रकार कुटुंबातील पार्श्वभूमीमुळे जनतेचे प्रश्न, प्रशासनातील त्रुटी आणि लोकशाही मूल्यांची जाण असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. उमेदवारी अर्ज…

Read More

एरंडोल : प्रतिनिधी तालुक्यातील कासोदा येथे  नुकताच पदभार स्विकारल्यानंतर कासोदा पोलीस ठाण्याचे प्रभारी सपोनि श्रीकांत पाटील हे अलर्टमोडवर काम करीत आहे. त्यांच्या पथकाने आडगाव येथे तलवार घेवून फिरणाऱ्या विशाल सुभाष महाजन (वय २२, रा. नागोबा मढी, ता. एरंडोल) याच्या मुसक्या आवळल्या असून त्याच्याकडून तलवार जप्त करण्यात आली. कासोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आडगाव येथे तरुण तलवार घेवून दहशत माजवित असल्याची माहिती प्रभारी सपोनि श्रीकांत पाटील यांना मिळाली. त्यांनी लागलीच पो. हे. कॉ. नंदलाल परदेशी, नितीन सुर्यवंशी, योगेश पाटील यांच्या पथकाला रवाना केले. मात्र तो संशयित पसार झाला होता. दरम्यान, दि. २९ रोजी पोलिसांची गस्त सुरु असतांना संशयित विशाल महाजन हा गावात…

Read More

जळगाव : प्रतिनिधी एका लग्न समारंभात हातात पिस्तुल व तलवार घेवून नाचणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायर झाला आहे. हा व्हिडीओ धरणगाव येथील गॅस गोडावून असल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडीओची तात्काळ गंभीररित्या दखल घेत पोलिसांचे एक पथक संशयिताच्या शोधार्थ बीड येथे रवाना करण्यात आले असून त्याचा कसून शोध घेतला जात आहे. सविस्तर वृत्त असे कि, धरणगाव येथील भारत गॅस गोडावूनजवळ विवाह सोहळा होता. या सोहळ्याला पाहुणे म्हणून आलेल्या तरुणांकडून डिजेवर गाणे लावून नाचत होते. यावेळी पोलिसांसारखा पेहराव असलेल्या एका इसमाने त्याच्याजवळील असलेले पिस्तुल दुसऱ्या तरुणाच्या हातात दिले. त्यानंतर तो तरुण ते पिस्तूल हातातवर करुन जलने वालो को जलने दे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दि.३० रोजी शेवटचा दिवस होता. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांसह ईच्छुक उमेदवार सकाळी ९ वाजेपासून महापालिका परिसरात अर्ज भरण्याकरीता आले होते. यावेळी अनेक उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, म्हणून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून गेल्या पाच दिवसांपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मंगळवार दि. ३० डिसेंबर हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता, त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवारांनी सकाळपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरीता समर्थकांसह महापालिका परिसरात दाखल…

Read More