Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि प्रभाग क्रमांक १६ मधील नागरी समस्या कायमस्वरूपी सोडवण्याचा निर्धार करत, अपक्ष उमेदवार इच्छा दीपक अत्तरदे यांनी प्रभाग १६ (क) मधून निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे. ‘ट्रक’ हे निवडणूक चिन्ह घेऊन रिंगणात उतरलेल्या इच्छा अत्तरदे यांच्या प्रचाराचा प्रारंभ अत्यंत जलोषात झाला असून, ठिकठिकाणी त्यांना नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. ​महिलांकडून औक्षण, फुलांची उधळण ​प्रचारादरम्यान प्रभागातील गल्लोगल्ली इच्छा अत्तरदे यांचे जंगी स्वागत केले जात आहे. विशेषतः महिला वर्गामध्ये त्यांच्याबद्दल मोठा उत्साह दिसून येत असून, ठिकठिकाणी त्यांचे औक्षण करून आणि फुलांची उधळण करून स्वागत केले जात आहे. त्यांना मिळणारा हा वाढता जनसामान्यांचा प्रतिसाद पाहून विरोधकांचे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची सर्वत्र धडाकेबाज सुरुवात झाली असून प्रभाग ७ ‘ड’ मधील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांच्या प्रचारासाठी आज सकाळी भव्य रॅली काढण्यात आली. गणेश कॉलनीसह परिसरातील विविध भागांतून काढण्यात आलेल्या या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. निवडणुकीचे वारे वाहू लागताच शहरातील राजकीय वातावरण तापू लागले असून प्रचारादरम्यान उमेदवारांनी विविध भागांत जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला. विकासकामे, मूलभूत सुविधा आणि प्रलंबित प्रश्नांवर भर देत भाजपच्या माध्यमातून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधला जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या रॅलीत प्रभाग ७ मधील भाजपचे उमेदवार दीपमाला काळे, अंकिता पाटील, विशाल भोळे, चंद्रशेखर अत्तरदे यांच्यासह…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ चा रणसंग्राम आता खऱ्या अर्थाने पेटला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक ६ मधील अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ आज मोठ्या उत्साहात पार पडला. छत्रपती शाहू महाराज नगरातील तपस्वी हनुमान मंदिर येथे नारळ फोडून प्रचाराची अधिकृत सुरुवात करण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात आणि महिलांच्या औक्षणाने स्वागत पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस एजाज मलीक यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि ढोल-ताशांच्या कडकडाटात प्रचाराला सुरुवात झाली. आज पहिल्याच दिवशी उमेदवारांनी छत्रपती शाहू महाराज नगर, हौसिंग सोसायटी, दत्त कॉलनी, इंदिरा नगर आणि खान्देश मील कॉलनी परिसरात झंझावाती पदयात्रा काढली. यावेळी परिसरात चैतन्याचे वातावरण दिसून आले. अनेक…

Read More

जळगाव : प्रतिनिधी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न करताना लाखो रुपयांच्या नोटा जळून खाक झाल्याची खळबळजनक घटना जळगावातील एमआयडीसी परिसरात घडली. शनिवारी (३ जानेवारी) पहाटे चार ते पाच वाजेच्या सुमारास जळगाव–अजिंठा रस्त्यावरील एमआयडीसी येथील जकात नाक्याजवळ असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम केंद्रात हा प्रकार घडला. मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन कापून त्यातून रोकड चोरण्याचा प्रयत्न केला. मशीनचा मोठा भाग कापण्यात आल्यानंतर आत असलेल्या नोटांनी अचानक पेट घेतला. आग लागल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. ही संपूर्ण घटना एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, फुटेजमध्ये कारमधून आलेले चार जण एटीएम फोडण्याचा प्रयत्न करत…

Read More

आजचे राशिभविष्य दि.४ जानेवारी २०२५   मेष राशी कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल. त्यांच्या मनात नाविन्यपूर्ण कल्पना येऊ शकतात. बेरोजगारांना आज नोकरी मिळण्याची शक्यता आहे. वृषभ राशी आज तुम्हाला व्यवसायासाठी परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. सरकारी कार्यालयात काम करणाऱ्यांना आज पदोन्नती मिळू शकते. जवळच्या नातेवाईकाच्या आगमनाने तुमच्या घरात आनंददायी वातावरण येईल. मिथुन राशी आज तुम्ही जवळच्या मित्रांसोबत बाहेर फिरण्याचा आनंद घ्याल. तुमच्या करिअरबद्दल तुम्हाला थोडी काळजी वाटू शकते. करिअरबद्दल तुमच्या गुरूचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. कर्क राशी आज, तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवाल आणि तुमच्या पालकांना त्यांच्या आवडीच्या जवळच्या ठिकाणी घेऊन जाल. घरी स्वादिष्ट पदार्थ बनवून खाण्याचा आनंद घ्याल.…

Read More

विजय पाटील जळगाव- महापालिकेच्या निवडणुकीत बिनविरोध उमेदवारांच्या शर्यतीत शिवसेनेने आपली ताकद दाखवून दिली आहे. छाननी प्रक्रियेत भाजपच्या उज्वला बेंडाळे या बिनविरोध झाल्यानंतर, अर्ज माघारीच्या टप्प्यात शिवसेनेने आघाडी घेतली. बुधवारपासून सुरू झालेल्या या प्रक्रियेत पक्षाने सलग तीन उमेदवार बिनविरोध करून राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय निर्माण केला आहे. प्रभाग क्रमांक ९ मधून प्रतिभा गजाजन देशमुख यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. त्यांच्या समोर माजी नगरसेविका प्रतिभा पाटील या अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात होत्या. मात्र, त्यांनी माघार घेतल्याने देशमुख यांचा विजय निर्विवाद ठरला. या घडामोडीमुळे पालकमंत्री गुलाबराव पाटील,आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी शिवसेनेचा तिसरा उमेदवार बिनविरोध करून करिश्मा साधला आहे. प्रतिमा देशमुख या दुसऱ्यांदा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  राज्यातील लोकप्रिय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभार्थी महिलांसाठी वर्षाच्या अखेरीस मोठी घडामोड समोर आली आहे. पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यांमध्ये नोव्हेंबर महिन्याचा 1500 रुपयांचा हफ्ता बुधवारी सायंकाळी जमा होण्यास सुरुवात झाली असून, अनेक महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा झाल्याची नोंद आहे. या योजनेअंतर्गत नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे हफ्ते प्रलंबित होते. त्यामुळे वर्षअखेर एकत्रित रक्कम मिळेल, अशी अपेक्षा लाभार्थी महिलांमध्ये होती. नोव्हेंबर-डिसेंबरचे मिळून 3000 रुपये, तर त्यासोबत जानेवारीचा हफ्ता धरून 4500 रुपये मिळतील, अशी चर्चा सुरू होती. मात्र प्रत्यक्षात केवळ नोव्हेंबर महिन्याचाच हफ्ता जमा झाल्याने अनेक महिलांचा अपेक्षाभंग झाला आहे. वर्षाच्या शेवटी महागाईचा ताण…

Read More

पुणे : प्रतिनिधी महानगरपालिका निवडणुकांमध्ये स्वच्छ आणि सक्षम उमेदवार देण्याऐवजी विविध राजकीय पक्षांकडून गुन्हेगारी टोळ्यांशी संबंधित व्यक्तींच्या पत्नींना तसेच सध्या तुरुंगात असलेल्या आरोपींना उमेदवारी दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रवृत्तीचा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तीव्र निषेध करत राजकीय पक्षांवर जोरदार टीका केली आहे. पुण्यातील कुख्यात गुंडांच्या टोळ्यांतील तीन सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून एबी फॉर्म भरून महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल केल्याचे समोर आले आहे. याशिवाय, अपहरण, खंडणी आणि गोळीबार यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचे आरोप असलेल्या गुंडांच्या पत्नींनाही विविध पक्षांकडून उमेदवारी देण्यात आली आहे. या प्रकारामुळे महापालिका निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापण्याची चिन्हे आहेत. अंजली दमानिया यांनी विशेषतः अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर…

Read More

जळगाव : प्रतिनिधी भारताने लोकशाही पद्धती स्वीकारल्यानंतर १८ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. लोकशाही पद्धतीचे संरक्षण आणि प्रत्येक मतदारास मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी लोकप्रतिनिधित्व कायदा, १९५१ च्या परिच्छेद १3५ (बी) नुसार निवडणुकीच्या दिवशी सर्व मतदारांना भरपगारी सुट्टी देणे अनिवार्य असून, जळगाव जिल्हा प्रशासनाने याबाबत निर्देश जारी केले आहेत. राज्य निवडणूक आयोगामार्फत दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या जळगाव शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व मतदारांना मतदानाचा हक्क योग्यरीत्या बजावता यावा, यासाठी आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. निवडणूक क्षेत्रातील मतदार असलेले अधिकारी, कर्मचारी व कामगार, जरी ते कामानिमित्त निवडणूक क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरी, त्यांना मतदानाच्या दिवशी भरपगारी…

Read More

दिव्यांगत्व म्हणजे केवळ शारीरिक, बौद्धिक किंवा संवेदनक्षमतेतील कमतरता नव्हे; तर समाजाची रचना, विचारसरणी, धोरणे आणि पर्यावरण यांमुळे एखाद्या व्यक्तीला येणाऱ्या अडचणींमधून निर्माण होणारी स्थिती आहे. “Normal body” ही संकल्पना समाजाने निर्माण केलेली असून प्रत्यक्षात प्रत्येक व्यक्तीच्या क्षमता, गरजा आणि कार्यक्षमता वेगवेगळी असते. दिव्यांग व्यक्ती म्हणजे समाजापेक्षा वेगळी किंवा कमी दर्जाची व्यक्ती नसून, तीही समाजाची समान, सन्माननीय आणि हक्कधारक घटक आहे. केवळ शरीर, दृष्टी, श्रवण, बोलणे किंवा बौद्धिक क्षमतेतील फरकामुळे एखाद्या व्यक्तीकडे कमीपणाने पाहणे हे सामाजिक अन्यायाचे लक्षण आहे. समाजाने दिव्यांग व्यक्तीकडे सहानुभूतीने नव्हे, तर समानतेच्या आणि हक्कांच्या दृष्टीने पाहणे ही काळाची गरज आहे. दिव्यांगत्वाची कारणे : वैयक्तिक नव्हे, सामाजिक जबाबदारी…

Read More