Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी शहराच्या राजकारणात अनेक चेहरे उदयास आले आणि काळाच्या ओघात अदृश्यही झाले. मात्र, गेल्या काही वर्षांपासून एक नाव सातत्याने चर्चेत राहिले आहे आणि जनतेच्या मनात घर करून बसले आहे – आमदार सुरेश दामू भोळे. संपूर्ण जळगावकर त्यांना प्रेमाने ‘राजू मामा’ या नावाने संबोधतात. निवडणुकीच्या काळापुरते दर्शन देणाऱ्या नेत्यांच्या गर्दीत, बारा महिने आणि २४ तास जनतेच्या सुख-दुःखात सामील होणारा लोकप्रतिनिधी म्हणून राजू मामांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. लोकनेता म्हणून वेगळी छाप राजू मामांच्या लोकप्रियतेचे मूळ त्यांच्या साधेपणात आहे. प्रोटोकॉलच्या चौकटीत अडकून न राहता ते थेट जनतेत मिसळतात. मग तो भव्य विवाहसोहळा असो, धार्मिक उत्सव असो किंवा एखाद्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधीजळगाव शहरात विधानसभा निवडणुकीचे वारे वेग घेत असतानाच प्रभाग ७ मध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार चंद्रशेखर प्रकाश अत्तरदे यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या पदयात्रेला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. बुधवारी शिव कॉलनी परिसरात निघालेल्या या पदयात्रेने पाहता पाहता भव्य जनसागराचे रूप धारण केले होते. पदयात्रेच्या स्वागतासाठी परिसरातील महिलांनी घरासमोर आकर्षक रांगोळ्या काढत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. अनेक ठिकाणी उमेदवारांवर पुष्पवृष्टी करण्यात आली, तर सुवासिनींनी औक्षण करून विजयाचा टिळा लावत शुभेच्छा दिल्या. घराघरांतून झालेल्या या आपुलकीच्या स्वागतामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. या पदयात्रेत प्रभाग ७ मधील महायुतीचे सर्व अधिकृत उमेदवार सहभागी झाले होते.प्रभाग ७ ‘अ’ – दीपमाला मनोज काळे,प्रभाग ७…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहराच्या राजकारणात अनेक नेते आले आणि गेले; मात्र गेल्या काही वर्षांपासून जनतेच्या मनात कायमस्वरूपी स्थान निर्माण करणारे नाव म्हणजे आमदार सुरेश दामू भोळे—संपूर्ण जळगावकरांचे लाडके ‘राजू मामा’. केवळ निवडणुकीपुरते नव्हे, तर वर्षभर जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणारा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. राजू मामांच्या लोकप्रियतेमागील मुख्य कारण म्हणजे त्यांचा साधा, ‘डाउन टू अर्थ’ स्वभाव. लग्नसमारंभ, धार्मिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम असोत किंवा शोकसभा—प्रोटोकॉलच्या चौकटी मोडून ते थेट सामान्य नागरिकांमध्ये मिसळतात. हीच आपुलकी आणि सहजता त्यांच्या जनसंपर्काची खरी ताकद ठरत आहे. त्यांचा जनसंपर्क कोणत्याही एका वयोगटापुरता मर्यादित नाही. लहान मुलांशी संवाद साधण्यापासून ते ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी…

Read More

जळगाव  : प्रतिनिधी महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १३ ड मधून अपक्ष उमेदवार प्रफुल्ल देवकर यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रचार फेरीदरम्यान देवकर यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत विकासकामांना प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांच्या या भूमिकेला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद देत निवडणुकीत त्यांना विजयी करण्याची हमी दिली आहे. प्रभागातील नागरिकांनी गेल्या काही वर्षांतील अपूर्ण राहिलेल्या विकासकामांचा मुद्दा मांडला असून, देवकर यांनी त्यावर ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, तसेच सार्वजनिक सोयीसुविधा या विषयांवर त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पारदर्शक प्रशासन आणि जबाबदार प्रतिनिधित्व हेच आपले ध्येय असल्याचे देवकर यांनी सांगितले. विशेष म्हणजे, प्रभाग…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. १३ मध्ये भाजपा–शिवसेना–राष्ट्रवादी काँग्रेस–रिपाई महायुतीकडून अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उमेदवारी अर्ज माघारीनंतर महायुतीचे कमळ, धनुष्यबाण व घड्याळ चिन्हावरील सर्व अधिकृत उमेदवार जाहीर झाले असून, मतदारांनी कोणत्याही प्रकारच्या भूलथापांना बळी न पडता अधिकृत उमेदवारांनाच मतदान करावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रभाग क्र. १३ मध्ये भारतीय जनता पक्षाचे १३-अ गटातून नितीन प्रभाकर सपके, १३-ब गटातून सौ. सुरेखा नितीन तायडे हे अधिकृत उमेदवार असून १३-क गटातून सौ. वैशाली अमित पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून १३-ड गटातून देवकर प्रफुल्ल गुलाबराव हे अधिकृत उमेदवार आहेत. दरम्यान,…

Read More

जळगाव : प्रवीण पाटील  जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणाऱ्या घडामोडीत माजी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती प्रभाकर अप्पा सोनवणे यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. सन 2019 व 2024 च्या विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करूनही भाजपाने त्यांना मध्यरात्री प्रवेश दिल्यामुळे राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय ठरलेला आहे निष्ठावंतांना पुन्हा एक धक्का दिला जात आहे या प्रवेशामुळे. या प्रवेशप्रसंगी राज्याचे माजी मंत्री व ज्येष्ठ नेते मा. ना. गिरीष भाऊ महाजन, मंत्री संजय सावकारे, आमदार राजुमामा भोळे आणि आमदार मंगेश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभाकर अप्पा सोनवणे यांच्या राजकीय इतिहास…

Read More

जळगाव : प्रतिनिधी हट्टा येथील एस व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य प्रा. डॉ. उमेश जाधव यांना नुकतीच इंदोर येथील ओरिएंटल विद्यापीठातर्फे पीएच.डी प्रदान करण्यात आली. त्यांनी औषधनिर्माण शाखेतून ‘डेव्हलपमेंट अँड इव्हाल्युएशन ऑफ हर्बल इथोझोम्स ऑफ पॅसिफ्लोरा फोइटिडा लिन फॉर ट्रीटमेंट ऑफ सोरायसिस’ या विषयावर आपले शोधप्रबंध सादर केले. त्यांना जळगाव येथील प्रा. डॉ. हर्षल तारे यांचे मार्गदर्शन लाभले. पीएच.डी पदवी प्रदान झाल्याने त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदन होत आहे. आपल्या संशोधन कार्यकाळात त्यांनी २ पुस्तके, १०५ शोधनिबंध आणि २ पेटंट्स प्रकाशित केले. संशोधन क्षेत्रात केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल त्यांना गौरविण्यात आले. पीएच.डी कार्यकाळात केलेल्या सखोल संशोधनाबद्दल ओरिएंटल विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी कळंब येथील जगदंबा इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च चे प्राचार्य प्रा. डॉ. राहुल बिजवार यांना नुकतीच इंदोर येथील ओरिएंटल विद्यापीठातर्फे पीएच.डी प्रदान करण्यात आली. त्यांनी औषधनिर्माण या शाखेतून ‘फॉर्मुलेशन अँड इव्हाल्युएशन ऑफ पोलीमेरिक ड्रग डिलिव्हरी सिस्टिम ऑफ अँटी-मलेरिअल ड्रग फॉर पेडियाट्रीक यूझ’ याविषयावर आपले शोधप्रबंध सादर केले. त्यांना जळगाव येथील प्रा. डॉ. हर्षल तारे यांचे मार्गदर्शन लाभले. पीएच.डी पदवी प्रदान झाल्याने त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदन होत आहे. आपल्या संशोधन कार्यकाळात त्यांनी ७ पुस्तके, ७० शोधनिबंध आणि ११ पेटंट्स प्रकाशित केले. संशोधन क्षेत्रात केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल त्यांना गौरविण्यात आले. पीएच.डी कार्यकाळात केलेल्या सखोल संशोधनाबद्दल ओरिएंटल विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.…

Read More

​जळगाव  : प्रतिनिधी  महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक ०३ (ब) मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, अनुसूचित जमाती महिला राखीव गटातील उमेदवार सौ. चैताली राहुल (मोगली बाबा) ठाकरे यांच्या प्रचाराने मोठी गती घेतली आहे. ‘बॅट’ हे निवडणूक चिन्ह घेऊन मैदानात उतरलेल्या चैताली ठाकरे यांनी प्रभागातील घराघरांत पोहोचून मतदारांशी संवाद साधण्यास सुरुवात केली असून, त्यांना नागरिकांचा, विशेषतः तरुणांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. ​’मोगली बाबां’च्या जनसंपर्काचा फायदा ​प्रभागात ‘मोगली बाबा’ म्हणून परिचित असलेले राहुल ठाकरे यांच्या दांडग्या जनसंपर्काचा फायदा सौ. चैताली ठाकरे यांना होताना दिसत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या कुटुंबाने सामाजिक कार्यात घेतलेला पुढाकार आणि स्थानिकांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध यामुळे मतदारांमध्ये…

Read More

पत्रकार आणि पोलिस बांधवांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन  धरणगाव : प्रतिनिधी धरणगाव रोटरी क्लब च्या वतीने आज दर्पणकार आचार्य बाळशास्री जांभेकर जयंती निमित्त पत्रकार दिनाचे औचित्य साधत पत्रकार आणि पोलिस बांधवांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन धरणगांव पोलिस स्थानक येथे करण्यात आले. या विशेष उपक्रमात ब्लड प्रेशर, व शुगरची तपासणी, थायरॉईड तपासणी, ईसीजी व हृदयरोग तपासणी, दंत तपासणी इत्यादी आरोग्य तपासण्या करण्यात आल्यात. शिबिरात डॉ. धीरल महाजन (MD Medicine): संचालक, फोर्टिस हॉस्पिटल, जळगाव, डॉ. अतुल शिंदे: संचालक, शिंदे क्लिनिक, धरणगाव, डॉ. मनोज अमृतकर: संचालक, सिद्धी क्लिनिक, धरणगाव, डॉ. सचिन पेंढारे: वेदांत दंत क्लिनिक, धरणगाव, डॉ. अभिजीत पाटील: श्री दंत क्लिनिक, धरणगाव…

Read More