भुसावळ : प्रतिनिधी भावजयीच्या अंत्यसंस्काराहून माघारी परतणाऱ्यास बसने धडक दिली. त्यामुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने प्रल्हाद अमृत बाविस्कर (वय ६०, रा. मन्यारखेडा, ता. भुसावळ) हे समोरुन येणाऱ्या कंटेनरखाली येवून चिरडल्या गेल्याने त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. या अपघातात त्यांची पत्नी सुनीताबाई बाविस्कर या गंभीर जखमी झाल्या. ही घटना शनिवार दि. १७ रोजी दुपारच्या सुमारास कंडारी फाट्यावर घडली. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने जप्त केली आहे. भुसावळ तालुक्यातील मन्यारखेडा येथे प्रल्हाद बाविस्कर हे वास्तव्यास होते. त्यांच्या भावजयीचे निधन झाल्याने प्रल्हाद बाविस्कर हे पत्नी सुनीताबाई बाविस्कर यांच्यासोबत विटनेर येथे जाण्यासाठी (एमएच १९, ईडी ९३३९) क्रमांकाच्या दुचाकीने निघाले. अंत्यसंस्कार झाल्यानंतर हे दुचाकीने मन्यारखेडा येथे घरी परतत होते.…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकांच्या निकालांत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे. या निकालांमध्ये भाजप-शिंदेसेना युतीने २४ महापालिकांवर वर्चस्व मिळवले असून, ९ महापालिकांत भाजपने स्वबळावर सत्ता स्थापनेचा आकडा गाठला आहे. या निकालांमुळे भाजप राज्यातील नंबर एकचा पक्ष ठरला आहे. या निकालांत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला मोठा धक्का बसला असून, त्यांच्या बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांत पक्षाचा दारुण पराभव झाला आहे. केवळ अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादीला समाधानकारक यश मिळाले आहे. या पराभवानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी आक्रमक भूमिका घेत, यापुढील सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी केली आहे. सरकार…
जनतेच्या प्रेमातून उमटतोय विश्वासाचा आवाज जळगाव | प्रतिनिधी प्रभाग क्रमांक ९ मध्ये सध्या निवडणूक प्रचाराला भावनिक वळण मिळत असून, महायुतीच्या उमेदवार जयश्री राहुल पाटील यांना नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रेम, विश्वास आणि भावनिक पाठिंबा मिळताना दिसत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांच्या सुख-दुःखात धावून जाणाऱ्या राहुल पाटील यांच्या कार्याची पावती आज जनता स्वतः शब्दांत आणि कृतीतून देताना दिसत आहे. घराघरांत सुरू असलेल्या प्रचारादरम्यान नागरिक पुष्पगुच्छ देत, औक्षण करत आणि विजयासाठी शुभेच्छा व आशीर्वाद देत जयश्री राहुल पाटील यांचे स्वागत करत आहेत. “हे केवळ प्रचार नाही, तर नात्यांची जपणूक आहे,” अशी भावना अनेक नागरिक व्यक्त करत असून, मागील काळात केलेल्या कामांचीच ही पावती…
महायुतीकडून शक्तिप्रदर्शन, दिग्गज नेत्यांची उपस्थिती जळगाव | प्रतिनिधी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक ९ मध्ये राजकीय वातावरण तापू लागले असून, याच अनुषंगाने महायुतीकडून एक भव्य व निर्णायक महा सभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा आगामी निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, या सभेतून प्रभागातील विकासाची दिशा ठरवणारा स्पष्ट संदेश दिला जाणार आहे. या भव्य सभेला महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री व जळगावचे पालकमंत्री आदरणीय श्री. गुलाबराव पाटील साहेब तसेच जळगाव शहराचे लोकप्रिय व कर्तव्यदक्ष आमदार आदरणीय श्री. राजूमामा भोळे हे स्वतः उपस्थित राहणार आहेत. दोन्ही मान्यवर नेते सभेतून नागरिकांशी थेट संवाद साधत, महायुतीची भूमिका,…
जळगाव : विजय पाटील शहराच्या राजकारणात एक नवा अध्याय लिहिला जात आहे. भाजपचे आमदार सुरेश भोळे यांचे सुपुत्र विशाल भोळे यांनी महापालिकेच्या निवडणुकीत प्रथमच उमेदवारी दाखल केली आणि प्रभाग क्रमांक सात मधून त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. ही निवड केवळ एका प्रभागापुरती मर्यादित नाही, तर शहरातील राजकीय समीकरणांना नवा आयाम देणारी ठरत आहे. विशाल भोळे यांची बिनविरोध निवड ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची आणि जनसंपर्काच्या शैलीची पहिली मोठी छाप आहे. जरी ते बिनविरोध झाले असले तरीही त्यांनी निवडणुकीला केवळ औपचारिकता मानली नाही. उलट त्यांनी महायुती व भाजपच्या इतर उमेदवारांसाठी प्रचारात उतरून कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली. त्यांच्या या भूमिकेमुळे पक्षातील एकजूट आणि संघटनशक्ती अधिक…
जळगाव : प्रतिनिधी प्रभाग क्रमांक ३ ब मध्ये अपक्ष उमेदवार चैताली राहुल ठाकरे यांनी आयोजित केलेल्या कॉर्नर सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या सभेदरम्यान त्यांनी थेट नागरिकांशी संवाद साधत परिसरातील विविध समस्या जाणून घेतल्या. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, तसेच मूलभूत नागरी सुविधांबाबत नागरिकांनी मोकळेपणाने आपली मते मांडली. चैताली राहुल ठाकरे यांनी आपल्या भाषणात प्रभागातील तरुणांसाठी विविध विकासात्मक उपक्रम राबवण्याचे, तसेच महिलांना बचत गटांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे स्पष्ट आश्वासन दिले. यासोबतच प्रभागातील विविध ठिकाणी गार्डन, ओपन जिम, तसेच नागरिकांसाठी विरंगुळ्याच्या सुविधा उभारण्यावर विशेष भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. मागील पंचवार्षिक निवडणुकीत अपयश आले असले तरी यावेळी नागरिकांमध्ये मोठी भावनिक साद…
आमदार राजूमामा भोळे यांचे मतदारांना आवाहन जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १३ मध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ढोल-ताशांच्या गजरात ही रॅली मोठ्या उत्साहात काढण्यात आली. या रॅलीला माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह तरुणाई आणि महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. रॅलीदरम्यान महिलांनी ठिकठिकाणी औक्षण करत पुष्पवृष्टी करून उमेदवारांचे व नेत्यांचे स्वागत केले. यावेळी उपस्थित जनतेला संबोधित करताना आमदार राजू मामा भोळे म्हणाले की, “आम्ही विकासाची अजिंठा घेऊन तुमच्या दारात आलो आहोत. जळगाव शहराचा सर्वांगीण विकास हाच आमचा…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०२६ ही केवळ मतदानापुरती मर्यादित न राहता, शहराच्या भविष्यातील विकासाची दिशा ठरवणारी एक महत्त्वाची आणि ऐतिहासिक संधी ठरणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ (क) मधून समाजकारणाला प्राधान्य देणारे, सेवाभावी वृत्तीचे आणि जनतेशी थेट नातं जपणारे अपक्ष उमेदवार डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्धार केला आहे. डॉ. चंद्रशेखर पाटील हे राजकारणापेक्षा समाजकारणावर अधिक विश्वास ठेवणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी आरोग्य, स्वच्छता, सामाजिक उपक्रम, नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता केलेल्या कामामुळे त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केला असून, याच विश्वासाच्या…
जळगाव : विजय पाटील जळगाव शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ ही केवळ मतदानाची प्रक्रिया नसून, शहराच्या उद्याच्या विकासाची दिशा ठरवणारी एक ऐतिहासिक संधी आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. १६ मधून दोन कर्तव्यदक्ष, सेवाभावी आणि जनतेशी थेट नातं जपणाऱ्या अपक्ष उमेदवारांनी निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे. अत्तरदे इच्छा दीपक या कोणत्याही राजकीय पक्षाच्या आधाराशिवाय, केवळ जनतेच्या विश्वासावर निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. हर्षालीताई मनीष कोल्हे या प्रभाग क्र. १६ ब मधून अ.क्र. २, निशाणी – पुस्तक या चिन्हावर निवडणूक लढवत असून, अत्तरदे इच्छा दीपक या प्रभाग क्र. १६ क मधून अ.क्र. २, निशाणी – ट्रक या चिन्हावर अपक्ष उमेदवार म्हणून मतदारांसमोर उभ्या आहेत.…
घराघरातून मिळणाऱ्या पाठिंब्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असताना प्रभाग क्रमांक ९ मध्ये जयश्री राहुल पाटील यांना मतदारांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रचारादरम्यान नागरिकांकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद, उत्स्फूर्त स्वागत आणि थेट संवादामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे. प्रभागातील विविध भागांत सुरू असलेल्या प्रचार फेऱ्या, घरभेटी आणि कॉर्नर सभांमधून जयश्री राहुल पाटील विकासाचा स्पष्ट अजेंडा मांडत असून, स्थानिक प्रश्नांवर ठोस उपाययोजनांचे आश्वासन देत आहेत. नागरी सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि महिलांसाठी सुरक्षिततेसह सर्वांगीण विकासाचा मुद्दा मतदारांना भावताना दिसत आहे. प्रचाराच्या प्रत्येक टप्प्यावर मतदारांचा वाढता ओढा पाहता, कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास…

