मुंबई : वृत्तसंस्था मुंबई महापालिकेचा महापौर कोण होणार, या प्रश्नावरून महायुतीतील अंतर्गत राजकारण तापले असून भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटात उघड रस्सीखेच सुरू झाली आहे. शिंदे गटाने मुंबईत अडीच-अडीच वर्षांचा महापौरपदाचा फॉर्म्युला मांडत भाजपवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला असताना, भाजपने थेट शिंदे गटाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाणे महापालिकेच्या महापौरपदावर दावा सांगून राजकीय पलटवार केला आहे. सध्या ठाणे महापालिकेत शिंदे गटाचे बहुमत असले तरी सत्ता टिकवण्यासाठी भाजपची साथ आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी ठाण्याच्या महापौरपदावर भाजपचा हक्क असल्याचा ठाम दावा केला आहे.डावखरे म्हणाले, “ठाणे महापालिका निवडणुकीत शिंदे गटाला बहुमत मिळाले असले तरी भाजपचा सन्मानही…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था सोने आणि चांदीच्या किमतीत घट होण्याचे सर्व अंदाज व्यर्थ ठरत आहेत. दोन्ही मौल्यवान धातू दररोज विक्रम मोडत आहेत. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, सोमवारी, चांदीने अशी खळबळ उडवून दिली. कारण १ किलो चांदीच्या किमतीने चक्क ३ लाख रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. इतिहासात पहिल्यांदाच चांदीने ही पातळी ओलांडली आहे. दरम्यान, सोन्याच्या किमतीनेही वेगाने वाढ होऊन नवीन विक्रम प्रस्थापित केले. चांदीचे दर थांबताना दिसत नाहीत. सोमवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) उघडताना, चांदीच्या किमती १३,५५३ रुपयांनी वाढल्या आणि पहिल्यांदाच ३ लाख रुपयांचा टप्पा ओलांडला. १ किलो चांदीचा नवीन सार्वकालिक उच्चांक ३,०१,३१५ रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. गेल्या आठवड्याच्या शेवटच्या व्यापार दिवशी, शुक्रवारी,…
जळगाव : प्रतिनिधी भुसावळ तालुक्यातील किन्ही शिरपूर एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या बेकायदा व संशयास्पद इंधन साठवणुकीचा पर्दाफाश करण्यात भुसावळ तालुका पोलीस आणि पुरवठा विभागाला मोठे यश आले आहे. ‘नमो एनर्जी ऑईल’ या कंपनीच्या गोदामावर टाकलेल्या संयुक्त धाडीत तब्बल ३० हजार लिटर डिझेलसदृश ज्वलनशील पदार्थाने भरलेला टँकर जप्त करण्यात आला असून, सुमारे ३६ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील ऑईल माफिया आणि भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत. भुसावळ तालुका पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेला किन्ही एमआयडीसीतील प्लॉट क्रमांक एफ-५०/५१ येथील ‘नमो एनर्जी ऑईल’ कंपनीत संशयास्पद हालचाली सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार तहसीलदारांच्या आदेशाने पुरवठा निरीक्षण…
मुंबई : प्रतिनिधी मुंबई महापौरपदाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच, ‘डॉन’ अरुण गवळी यांची कन्या योगिता गवळी यांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. भाजपचे उमेदवार रोहिदास लोखंडे यांच्याकडून योगिता गवळी पराभूत झाल्या. मात्र, निकालानंतर त्यांचे पती व प्रसिद्ध अभिनेता अक्षय वाघमारे यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत योगिता यांच्या जिद्दीचा, संघर्षाचा आणि जनसेवेचा मनापासून गौरव केला आहे. अक्षय वाघमारे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “प्रिय बायको, सर्वप्रथम तुझे मनापासून आभार आणि मला तुझा प्रचंड अभिमान आहे. प्रेग्नन्सी आणि त्यानंतर अवघ्या एका महिन्याच्या मुलीची आई असताना, एवढी मोठी जबाबदारी खांद्यावर घेऊन तू ज्या धैर्याने निवडणूक लढवलीस, ते खरंच…
अमळनेर : प्रतिनिधी अमळनेर शहरातील ढेकू रोडवर वास्तव्यास असलेले खाजगी शाळेचे शिक्षक सुरेश सिताराम सोये यांचा काल दि.१८ रोजी सकाळी १० वाजता रेल्वे अपघातातात मृत्यू झाल्याची घटना चांदणी कुहे गावाजवळ सती माता मंदिराजवळ घडली. ते न्यु इंग्लिश स्कूल नांदेड येथे माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते. तर त्यांच्या पत्नी श्रीम. प्रमिला मोरे या जि. प.शाळा निपाणे ता. एरंडोल येथे प्राथमिक शिक्षिका आहेत. मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वीी घरातून ते अचानक बेपत्ता झाले होते, कोकणात ते सापडल्याने तेथून त्यांना परत आणले होते. दोन ते तीन दिवस घरीच थांबल्यावर दि.१८ रोजी सकाळी घरातून ते बाहेर पडले आणि सती माता मंदिराजवळ घटनास्थळी पोहोचले तेथे हावडा…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील नशिराबाद येथे रविवारी (दि.१८) दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत एकूण १६ जण जखमी झाले असून, त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये अल्पवयीन मुले व महिलांचाही समावेश आहे. या घटनेदरम्यान दगडफेक करण्यात आल्याने काही घरांच्या खिडक्यांच्या काचाही फुटल्या असल्याची माहिती जखमींनी रुग्णालयात दिली. सविस्तर वृत्त असे की, नशिराबाद येथील इस्लामपुरा भागात राहणारे आरीफ अली यांच्या घरी रविवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारच्या सुमारास जुन्या वादाच्या कारणावरून दुसऱ्या गटाने अचानक दगडफेक करत लोखंडी पाइप, लाठ्याकाठ्या व कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात शेख अमीन शेख बाबू (४५), अब्दुल महेमूद अब्दुल गनी (५६), मोईल…
जळगाव : प्रतिनिधी राज्यातील १२ जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची घोषणा झाली असली, तरी जळगाव जिल्हा परिषदेची निवडणूक मात्र अद्याप रखडलेलीच आहे. राखीव जागांच्या आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा अधिक झाल्याने निर्माण झालेल्या वादावर २१ जानेवारी रोजी न्यायालयात सुनावणी होणार असून, त्याकडे जळगाव जिल्ह्यातील राजकीय वर्तुळासह इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे. जळगाव जिल्हा परिषदेची शेवटची निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये झाली होती. त्यानंतर मार्च २०२२ मध्ये सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर गेली चार वर्षांहून अधिक काळ जिल्हा परिषदेवर प्रशासकाची नियुक्ती आहे. सन २०२२ मध्ये निवडणुकीसाठी सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण झाली होती. मात्र, ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्यावरून ही प्रक्रिया ऐनवेळी स्थगित करण्यात आली. या…
आजचे राशिभविष्य दि.१९ जानेवारी २०२६ मेष राशी मेष राशीसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा असेल. ज्यामुळे तुम्हाला मोठा आनंद मिळू शकतो. मात्र, स्वभाव काहीसा चिडचिडा होईल. त्यामुळे अनावश्यक राग टाळणे हिताचे ठरेल. कुटुंबातील सदस्यांशी वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बोलताना संयम ठेवा. घराचे नूतनीकरण किंवा वैयक्तिक गरजांवर खर्च होऊ शकतो. कुटुंबात एकजुटीचे वातावरण राहील. वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस छंद जोपासण्यासाठी आणि आनंदासाठी खरेदी करण्याचा आहे. बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. मित्राकडून एखादी चांगली बातमी मिळेल. तुमची हरवलेली प्रिय वस्तू आज सापडण्याची शक्यता आहे. प्रेमात असलेले व्यक्ती जोडीदारासोबत प्रवासाचा बेत आखू शकतात. कामाच्या ठिकाणी…
मुंबई : वृत्तसंस्था महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर मुंबईच्या महापौरपदावरून सुरू झालेल्या चर्चेत आता भाजप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उडी घेतली आहे. उद्धव ठाकरे यांच्या सूचक विधानावर जोरदार टीका करताना राणे यांनी, “ज्यांच्याकडे संख्याबळ नाही, त्यांचा महापौर काय आकाशातून पडणार का?” असा खोचक सवाल उपस्थित केला आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. दुसरीकडे ठाकरे बंधूंना केवळ ७२ जागांवर समाधान मानावे लागले. मात्र महापौरपदाबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी, “देवाच्या मनात असेल तर आमचाच महापौर होईल” असे सूचक विधान केले होते. यावरूनच राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटले आहे. या विधानावर प्रतिक्रिया…
पुणे : वृत्तसंस्था पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय वातावरण तापलेले असतानाच थेरगाव परिसरात जाणीवपूर्वक कार जाळण्याची धक्कादायक घटना घडली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर मध्यरात्री उभ्या असलेल्या एका कारला ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावण्यात आल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्यामुळे शहरातील राजकीय तणाव अधिकच वाढला आहे. ही कार आकाश बारणे यांच्या मालकीची असून, ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पराभूत उमेदवाराचे चुलत भाऊ आहेत. प्रभाग क्रमांक २३ मधील थेरगाव परिसरात ही घटना घडली. निवडणूक निकालानंतर काही तासांतच ही घटना घडल्याने, हा प्रकार राजकीय आकसातून झाला का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक अज्ञात व्यक्ती बाटलीतून…

