जळगाव : प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या बहि:स्थ शिक्षण आणि अध्ययन विभागाच्यावतीने निर्माण होणारे स्वयंअध्ययन साहित्य हे विद्यार्थ्यांची आकलन, अवलोकन आणि विश्लेषण क्षमता अधिक विकसित करणारे असावे अशी अपेक्षा कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांनी व्यक्त केली. विद्यापीठाच्या बहि:स्थ शिक्षण आणि अध्ययन विभागाच्यावतीने शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या स्वयंअध्ययन साहित्य विकसन कार्यशाळेचे उद्घाटन करतांना प्रा.माहेश्वरी बोलत होते. ते म्हणाले की, नवे शैक्षणिक धोरण विद्यार्थी केंद्रीत आहे. यामध्ये बहुविविधतेला महत्व देण्यात आले आहे. या धोरणात उच्च शिक्षणाच्या प्रवाहात विद्यार्थी येण्याचे प्रमाण ५० टक्के निर्धारित करण्यात आले आहे. मात्र त्यासाठीच्या पायाभूत सुविधांचा अभाव लक्षात घेता बहि:स्थ मधून शिक्षण घेण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. या…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था एकनाथ खडसे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जे वृत्त माध्यमांमधून दिले जात आहे, ते पूर्णपणे चुकीचे आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि एकनाथ खडसे यांच्या भेटीची चर्चा आहे, ती भेट झालेली नाही. दोघांमध्ये फोनवर चर्चा झाली आहे. ही भेट घेण्यापूर्वी खडसे यांनी संपूर्ण विषय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेबांना सांगितला होता, अशी माहिती देत पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे हे अमित शहांना भेटणार होते. खडसे एकटे जाणार नव्हते. पवार साहेबांसोबत ते जाणार होते. अजून ती भेट झालेली नाही. त्यामुळे खडसे भाजपमध्ये जाणार, हे…
जामनेर : प्रतिनिधी एका १० वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी जामनेर पोलिसात तरूणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, पिडीत तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे की, दि. २२ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास राजू अर्जुन सुरवाडे याने पिडीत मुलगी व तिच्या मैत्रीणी अशांना प्लॉटवर चला असे सांगुन प्लॉटवर घेऊन गेला. प्लॉटवरून बाहेर निघत असतांना संशयित आरोपी याने पिडीत मुलगीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि. दिलीप राठोड हे करत असून संशयित आरोपी राजू सुरवाडे याला अटक करण्यात आली आहे.
नाशिक : वृत्तसंस्था मुलं पळवणारी टोळी समजून मारहाणीच्या घटना सध्या राज्यात खूप वाढल्या आहेत. तर सोशल मीडियावर मुलं पळवणारी टोळीचा मेसेज व्हायरल होत असल्याने नागरिक प्रत्येकाकडे संशयाच्या नजरेने बघत असल्याचे दिसून येत आहे. यावर पोलीस प्रशासनातर्फे खोटी अफवा असल्याचे आवाहनही करण्यात आली आहे. नाशिकमध्ये आठवडाभरात पाच जणांना मारहाण झाल्याच्या घटना समोर आल्या आहे. प्रेयसीला भेटण्यासाठी बुरखा घालून गेलेल्या तरुणाला नागरिकांनी मुलं चोरणारी टोळी समजून बेदम मारहाण केल्याची घटना नाशिकच्या इंदिरानगर परिसरात घडली आहे. नाशिकच्या गंजमाळ परिसरातील मारहाणीच्या घटनेला काही तास उलटत नाही तोच ही घटना घडल्याने पोलीस दलाची चिंता वाढली आहे. नाशिकच्या येथे इंदिरानगर येथे प्रेयसीला बुरखा घालून भेटण्यासाठी गेलेल्या…
एक महिला मंदिरात दर्शनासाठी गेली होती. देवाचं दर्शन घेतलं. पण देवासमोर दिवा लावताना ती गंभीर जखमी झाली. असं काय घडलं महिलेसोबत चला पाहूयात या व्हिडिओमध्ये पाहा. मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. देवाला हार फुले तेल चढवून भाविक दर्शन घेत आहेत. याच वेळी येथे एक गंभीर प्रकार घडला. हा व्हिडिओ नीट पहा. या महिलेनं तोंडाला मास्क (face mask)लावलाय आणि हातात दोन दिवे घेऊन दर्शनासाठी रांगेत उभी आहे. हातातील दिव्यांनी देवाला ओवाळल्यानंतर हे दिवे ठेवण्यासाठी ही महिला देवासमोर नतमस्तक झाली. उजव्या हातातला दिवा देवाजवळ ठेवत असतानाच डाव्या हातातील दिवा या महिलेच्या केसांना लागला. आणि बघता बघता या महिलेचे केस पेटले. महिलेच्या दोन्ही हातात…
जामनेर : प्रतिनिधी आज दि.२३ रोजी शिवतीर्थ मैदानावर दसरा मेळावा शिवसेना साजरा करणार की शिंदे गटा करणार याबाबत न्यायालयाकडून निकाल आला की शिवतीर्थ मैदानावर दसरा मेळावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाच होईल. या निकाल येताच जामनेर तालुका शिवसेना पक्षाने जामनेर येथील नगरपालिका चौकात आणि पहुर येथील बसस्थानक परिसरात फटाके फोडुन आणि मिठाईभरवत आनंदोत्सव साजरा केला. प्रसंगी युवासेना उपजिल्हा युवा अधिकारी विश्वजितराजे मनोहर पाटील,तालुका युवा अधिकारी विशाल लामखेडे, शिवसेना जामनेर शहर प्रमुख ज्ञानेश्वर जंजाळ, उपतालुकाप्रमुख अशोक जाधव, उपतालुका संघटक सुधाकर सराफ युवासेना सोशल मिडीया तालुकाप्रमुख मुकेश जाधव शिवसेना तोंडापूर फत्तेपूर गट प्रमुख तुकाराम गोपाळ ,उपशहर प्रमुख दिपक माळी,पहुर शहर प्रमुख संजय…
जळगाव :प्रतिनिधी शहरातील नवीन बी.जे.मार्केट परिसरातील तळमजल्यावर एका बांधकाम कामगाराचा मृतदेह आढळून आल्याने जळगावात एकच खळबळ उडाली आहे. पुढील तपास जिल्हापेठ पोलीस करीत आहेत. घटनास्थळाहून मिळालेल्या माहितीनुसार, आज दि २४ रोजीच्या सकाळी ८ ते ९ वाजेच्या सुमारास शहरातील दुचाकीचे रिपेअरींग्चे मार्केट म्हणून परिचित असलेल्या नवीन बि.जे.मार्केट परिसरातील तळमजल्यावर जिन्या जवळ एका बाधकाम कामगाराचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या कामगाराला परिसरातील लोक ओळखत नाहीत. थोड्या वेळाने एकाने मृदेहाची ओळख पटविली. त्यानुसार तो कामगार अश्विनी नितीन मोरे उर्फ विठ्ठल कान्या असे असल्याचे सांगितले आहे. हा व्यक्ती या ठिकाणी दारू पिवून येवून पडला असल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. घटनास्थळी…
मुंबई : वृत्तसंस्था दसरा मेळाव्यावरून शिंदे गट आणि ठाकरे गटातील वाद आता संपला असून काल (शुक्रवारी) मुंबई हायकोर्टाने ठाकरे गटाला शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली. त्यानंतर आता शिवसेनेच्या नेत्यांकडून आनंद व्यक्त केला जात असून शिंदे गट याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यानंतर मनसेच्या संदीप देशपांडे यांनी यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दसरा मेळाव्याची परवानगी मिळाल्यावर उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सूचना दिल्या असून ‘‘दसरा मेळावा ही आपली परंपरा आहे. शिवसैनिक आणि शिवसेनेवर प्रेम करणाऱ्या सर्वांनी दसरा मेळाव्यासाठी उत्साहात, गुलाल उधळत वाजत गाजत या’’ असं ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांना म्हणाले आहेत. तर ‘वारसा मैदानाचा नसतो विचाराचा…
जळगाव : प्रतिनिधी मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या तरुणाला लव्ह जिहादच्या संशयावरून आठ ते दहा जणांनी बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास मोहाडी येथील एका हॉटेल मध्ये घडली होती . याप्रकरणी वीस वर्षीय तरुणीच्या फिर्यादीवरून शोभा चौधरी यांच्यासह आठ ते दहा जणांविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले आहे.
अमळनेर : प्रतिनिधी शिरपूरकडे जाणाऱ्या बुलेटला भरधाव वेगाने येणाऱ्या बसने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात बुलेटवरील डॉक्टर असलेले दोन्ही मित्रांचा जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना अमळनेर जवळील बेटावद रस्त्यावरील हॉटेल माधवी जवळ घडली आहे. यात डॉ. महेंद्र शांतीलाल बोरसे (वय-३९) रा. पाडसे ता. अमळनेर व त्यांचा मित्र डॉ. अरूण नथ्थू साळुंखे (वय-३८) रा. हिंगोण खुर्द ता. अमळनेर असे मयत झालेल्या दोन्ही डॉक्टारांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, डॉ. महेंद्र बोरसे आणि डॉ. अरूण नथ्थू साळुंखे हे शुक्रवारी २३ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास बुलेट क्रमांक (एमएच १८ एव्ही ३११) ने अमळनेर- बेटावद रस्त्याने शिरपूरकडे जात होते.…

