जळगाव : प्रतिनिधी जळके ता.जळगाव येथे दिनांक २५सप्टेंबर रविवारी विठ्ठल मंदिर येथे रमेश आप्पा मित्र परिवार तर्फे रमेश पाटील अध्यक्ष संजय निराधार समिती जळगाव यांच्या वाढदिवसानिमित्त अंध, अपंग, मुकबधीर अशा व्यक्तींसाठी प्रमाणपत्र मिळणेसाठी शिबाराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या शिबिरात अंध, अपंग मुकबधीर अशा व्यक्तींनी येतांना आधार कार्ड झेरॉक्स, रेशनकार्ड झेरॉक्स तसेच अपंगत्वाचे फोटो/पासपोर्ट फोटो सोबत आणावे या शिबिरात आँनलाईन नोंदणी केली जाणार असुन नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांना जळगाव शासकीय रुग्णालय येथे तपासणीसाठी बोलवण्यात येईल त्यानंतर पात्र लाभार्थ्यांना घरपोच अपंगाचे प्रमाणपत्र देण्यात येईल. रमेश पाटील यांचा वाढदिवस १८सप्टेंबर रोजी होता मात्र त्यादिवशी शिवसेना जिल्हा उपप्रमुख रावसाहेब (सदानंद) माधवराव पाटील यांचे…
Author: editor desk
औरंगाबाद : वृत्तसंस्था प्रेमप्रकरणातून आलेले नैराश्य संपवण्यासाठी तरुणाने स्वतःलाच संपवण्याचा निर्णय घेतला. खोलीत जाऊन गळफास घेतला. मात्र, अचानक पोलिस पोहोचले अन् फासावर लटकलेल्या तरुणाला वाचवण्यात आले. ही कोणत्या चित्रपटाची गोष्ट नव्हे, तर औरंगाबाद शहरात घडलेली खरीखुरी घटना आहे. वाढलेली स्पर्धा, बेरोजगारी, कौटुंबिक कलह, प्रेमप्रकरणातून आलेले अपयश यांसारख्या अनेक कारणांमुळे आजकाल आत्महत्या सारख्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. क्षुल्लक कारणांमुळे अल्पवयीन, तरुण आपले मौल्यवान जीवन संपवत आहेत. शहरात यांसारख्या घटनामध्ये मोठी वाढ झाली आहे. मात्र, शहरात नुकत्याच घडलेल्या घटनेने अनेकांना विस्मयित केले आहे. ‘देव तारी त्याला कोण मारी’ याचाच प्रत्यय पडेगाव भागातील या युवकाच्या बाबतीत आला. पडेगावातील सप्तशृंगी कॉलनीत राहणाऱ्या…
जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील हिवरखेडा येथील विवाहितेला माहेरून ५० हजार रुपये आणावे यासाठी सासरच्या मंडळींनी मारहाण केल्याची घटना घडल्याने विवाहितेने जामनेर पोलीस स्थानकात सासरच्या चौघाविरोधात स्त्री अत्याचाराचा गुन्हा नोंद केला आहे. सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील हिवरखेडा येथील एका २८ वर्षीय विवाहितेचा लग्न झाल्यानंतर ४ वर्षापासून माहेरून घर बाधण्यासाठी ५० हजार रुपये आणावे यासाठी पती गजानन गोपाल कोळी, सासरे गोपाल काशिनाथ कोळी, सासू यशोदाबाई गोपाल कोळी, दीर निवृत्ती गोपाल कोळी सर्व रा. हिवरखेडा ता.जामनेर हे विवाहितेचा पैश्यासाठी मानसिक, शारीरिक छळ तर पती हा दारूच्या नशेत मारहाण व शिवीगाळ करीत असल्याचे विवाहितेने दिलेल्या फिर्यादी उल्लेख केला आहे. याप्रकरणी रेखा गजानन कोळी…
धरणगाव : प्रतिनिधी मुले पळविणारी कोणत्याही प्रकारची टोळी नसुन फक्त अफवा पसरल्या जात आहे. तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले की सध्या सोशल मीडियावर मुले पळवणारी टोळीबाबत अफवा पसरविण्यात येत आहे. सदरच्या ह्या अफवा असून कोणतीही टोळी मुले पळवणारी आपल्या पो.स्टे च्या हद्दीत नाही. म्हणून कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. किंवा गावात येणारे भिक्षेकरी साधू, ज्योतिषी व इतर फेरीवाले यांच्यावर अविश्वास दाखवून त्यांना मारहाण करणे, हा कायद्याने गंभीर गुन्हा आहे. अशा प्रकारचे कोणतेही कृत्य कोणीही करू नये. कोणत्याही बाबतीत कोणाचा संशय आल्यास गावातील पोलीस पाटील, सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष यांच्याशी तात्काळ संपर्क साधावा. तसेच आपले बीट अंमलदार पोलीस, बीट अधिकारी व…
नाशिक : वृत्तसंस्था अकरावी प्रवेशासाठी तीन नियमित फेऱ्या व दोन विशेष फेऱ्या पार पडल्यानंतर आता रिक्त जागांवर प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळावी, यासाठी शेवटची फेरी राबविली जात आहे. या फेरी अंतर्गत शुक्रवारी दि. २३ सप्टेंबरला गुणवत्ता यादी जाहीर होईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना २४ सप्टेंबरपर्यंत प्रत्यक्ष महाविद्यालयांत प्रवेशप्रक्रिया पूर्ण करावी लागेल. तर २५ सप्टेंबरला रिक्त जागांचा तपशील जाहीर होईल. अकरावीचे शहरातील ६३ महाविद्यालयांत २६ हजार ४८० जागा उपलब्ध असून आतापर्यंत १६ हजार प्रवेश पूर्ण झाले आहेत.
उत्राण : प्रतिनिधी येथील शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनीला दोघांसह एका महिलेने बळजबरीने बुंदीच्या लाडूत गोळी देवून गुंगीचे औषध देण्याचा प्रयत्न केला. परंतु, विद्यार्थिनीने प्रसंगावधान राखून आरडाओरड केल्याने हे तिघे गाडीवर बसून पसार झाल्याची घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास उत्राण येथे घडली. उत्राण येथील संजय (दिनकर) प्रभाकर महाजन यांची कन्या प्रांजली महाजन ही एस. बी. संघवी इंटरनॅशनल स्कूलमध्ये सहावीचे शिक्षण घेत आहे. प्रांजली ही २२ रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास स्कूल बसची वाट पाहत उभी होती. या वेळी प्रांजलीजवळ दोन अज्ञात व्यक्तींसह गुलाबी रंगाची साडी परिधान केलेली एक महिला आली. या महिलेने नाकात दोन्ही बाजुला नथ घातलेली होती, तर तिच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीचे…
जळगाव : प्रतिनिधी मेहरूण व मोहाडी फाट्यावरील हॉटेल नेक्स्टमध्ये तरुणीच्या पार्टीसाठी गुरुवारी रात्री शहरातील दोन महाविद्यालयातील १२ तरुण तरुणी जमले होते. रात्री नऊ वाजता यातील एका तरुणाला बाहेर काढून २० ते २५ जणांच्या घोळक्याने बेदम मारहाण केली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत रामानंद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती. शहरातील महाविद्यालयातील पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या मित्र मैत्रिणींचा ग्रुप आहे. यातील एका तरुणीचा गुरुवारी वाढदिवस होता. त्यासाठी हॉटेल गोल्डन नेक्स्ट येथे एक टेबल बुक केला होता. या ठिकाणी मित्र-मैत्रिणी जमले होते. केक कापून झाल्यानंतर मुलं ड्रिंक घेण्यासाठी वरच्या मजल्यावर गेले असता. शोएब हा एकटाच मुलींसोबत बसून होता. या वेळी अचानक २०…
पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे २० रोजी लोटन जयराम कुंभार (वय ३३) हे सकाळी ११ वाजता आपली चारचाकी घेऊन घरी जात होते. या वेळी रस्त्यावर गर्दी असल्याने त्यांनी त्यांचा साथीदार किरण कुंभार यास काय झाले, असे विचारले. या वेळी समोर उभ्या असलेला विश्वनाथ जगन्नाथ लोहार यास राग आल्याने त्याने त्याच्या हातीतील कुऱ्हाडीचा लोटन कुंभार यांच्या डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. परंतु, लोटन कुंभार यांनी हा वार उजव्या हातावर झेलला. याच वेळी मुलगा पंकज लोहार याने लाकडी काठीने लोटन कुंभार यांच्या डोक्यावर वार करुन त्यांना गंभीर जखमी केले. तर लहान मुलगा भावेश याने लोटन कुंभार यांना ठार मारण्याची धमकी…
जळगाव : प्रतिनिधी के.सी. ई. सोसायटी संचालित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जळगाव ही खान्देशातील पहिली एन.बी.ए. अॅक्रीडेटेड MBA Program साठी मॅनेजमेंट संस्था म्हणून मान्यता प्राप्त केली आहे. आपल्या संस्थेकडून के.सी.ई.च्या अमृतमहोत्सवी वर्षानिमीत्त मिळवलेली ही विशेष उपलब्धी आहे. या महत्वपूर्ण यशामागे संस्थेचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे यांची दुरदृष्टी आणि मार्गदर्शन असल्याचे आय. एम. आर. च्या संचालिका प्रा. डॉ. शिल्पा बेंडाळे यांनी नमूद केले. नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रिडेशन हे बोर्ड ए.आय.सी.टी.ई. नवी दिल्ली यांच्या अंतर्गत काम करते. उच्च व तंत्र शिक्षणात उच्च गुणवत्ता आणि दर्जा याचा मापदंड म्हणून या अॅक्रिडेशनला अत्यंत महत्व आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बेस्ट प्रॅक्टीसेस आपल्या संस्थेत आहेत की…
मुंबई : वृत्तसंस्था दादरच्या शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेला परवानगी मिळणार की नाही, याचा निकाल आता लांबणीवर पडला आहे. शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेने हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार होती मात्र, ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. महापालिकेकडून शिवाजी पार्क मैदानाच्या परवानगीसाठी होणाऱ्या विलंबामुळे शिवसेनेने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आता उद्या सुनावणी होणार आहे. मुळे यंदा दसऱ्याला शिवाजी पार्कच्या मैदानावर आवाज कुणाचा असणार? आणि यासंदर्भात हायकोर्ट काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.आज झालेल्या सुनावणीदरम्यान शिंदे गटातर्फे ज्येष्ठ वकील जनक द्वारकादास यांनी बाजू मांडली. तर शिवसेनातर्फे ज्येष्ठ वकील…

