Author: editor desk

गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात प्रचंड घसरण दिसून येत आहे. मात्र बुधवारी सोने चांदीच्या दरात वाढ दिसून आली होती. आज पुन्हा सोन्याचे दर घसरले असून चांदीच्या दरात तेजी दिसून येत आहे. आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 45,800 रुपये तर 24 कॅरेट साठी 49,960 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 574 रुपये आहे. देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या. चेन्नई – 50,730 रुपये दिल्ली – 50,110 रुपये हैदराबाद – 49,960 रुपये कोलकत्ता – 49,960 रुपये लखनऊ – 50,110 रुपये मुंबई – 49,960 रुपये नागपूर – 49,990 रुपये पूणे – 49,990…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जी.एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्स अभियांत्रिकीच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभागातर्फे, तसेच आयइआय चाप्टर नाशिक, कोग्निडो. एआय, इंडेस व स्पारफिसीएल यांच्या संयुक्त विद्यमाने २३ व २४ सप्टेंबर रोजी ‘एआय राष्ट्रीय परिषदे’चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली. याप्रसंगी अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा उपस्थित होते. राष्ट्रीय परिषदेचा मुख्य विषय ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ हा आहे. पहिल्या सत्रात बीजभाषक म्हणून भूषण पाटील हे ‘एआय न्यू रिटेल मार्केटिंग’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. दुसऱ्या सत्रात ‘कॉम्प्युटर व्हीजन इन एआय व प्रॅक्टिकल स्वरम इन इंटेलिजन्स इन…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी शिक्षणाचा बाजार मांडला आहे की काय असे काही दृश्य बघून वाटत असते, हो तसे खरच होताना जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील प्रताप महाविद्यालय आवारात दि २१ रोजी घडला आहे. महाविद्यालयाच्या प्रांगणात दुचाकीची जाहिरातचा मंडप टाकून महाविद्यालय प्रशासन आपली तिजोरी भरतेय की काय असा सवाल राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्यावतीने येथे उपस्थित केला आहे. अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयात बहुताश तालुक्यातील शेतकरी व कामगार व मजुरांचे मुल शिक्षण घेत असतात. या महाविद्यालयात शिक्षणाच्या जागी येणाऱ्या प्राध्यापक व विध्यार्थाच्या दुचाकी व सायकल लावण्यासाठी प्रशासनाकडून पैसे घेतले जात आहे तर मग विद्यार्थी फी भरतात कशाची? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. तर तालुक्यातील शेतकरी व…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था सामान्य जनतेप्रमाणे पोलिसांनाही सणांचा आनंद लुटता यावा यासाठी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. दसरा- दिवाळीच्या मुहूर्तावर सरकारने पोलिसांना गिफ्ट दिलंय. पोलिसांच्या सुट्ट्या वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आता महाराष्ट्र पोलिसांना एकूण 20 सुट्ट्या मिळणार आहे. याआधी वर्षभरात पोलिसांना केवळ 12 सुट्ट्या मिळत होत्या. राज्य सरकारने पोलिसांना आणखी आठ सुट्ट्या वाढवून दिल्या आहेत. दरम्यान, नुकताच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांसाठी आणखी एक निर्णय जाहीर करण्यात आला होता. यापुढे महाराष्ट्र पोलिसांनी खाकी वर्दी घालून नाचू नये, अशा स्पष्ट सूचना जारी करण्यात आल्या आहेत. गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत अनेक ठिकाणी पोलिसांचे नाचतानाचे व्हिडीओ समोर आले होते. या व्हिडीओवरुन…

Read More

पुणे : वृत्तसंस्था एका शेतकऱ्याला सोन्याचे अंडी देणारी कोंबडी सापडते. तिच्याकडून मिळणारी अंडी घेऊन तो शेतकरी मालामाल होतो. ही गोष्ट आपण सर्वांना तोंडपाठ असेल. ही काल्पनिक गोष्ट खरी झाली आहे. या गोष्टीप्रमाणे एक शेतकरी १० पैशाच्या माशांमुळे करोडपती बनला आहे. निहाल सिंग असे या शेतकऱ्याचे नाव असून ते मत्स्यपालनाचा व्यवसाय करतात. ते राजस्थानमधील कामा तालुक्यातील उंधन या गावी राहतात. वयाच्या ३५ व्या वर्षापासून ते मत्स्यपालन व्यवसाय करत आहेत. या 20 वर्षांत त्यांनी यातून करोडपती झाले आहेत.निहाल सिंग हे शेतकरी कुटुंबातील असून ते लहानपणापासून शेती करतात. मला दोन भाऊ असून आमच्या जेव्हा मालमत्तेच्या वाटण्या झाल्या तेव्हा तेव्हा 5 एकर जमीन मला…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था टी20 आशिया चषक संपल्यानंतर आशियाई क्रिकेट परिषदेने महिला टी20 आशिया कपचे वेळापत्रक जाहीर केले आहे. महिला टी-20 आशिया चषक 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे आणि 15 ऑक्टोबरला संपणार आहे. आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांनी मंगळवारी महिला टी-20 आशिया कपचे वेळापत्रक जाहीर केले. यावेळी पुरुषांपाठोपाठ महिला आशिया चषक स्पर्धेत भारताचा पाकिस्तान विरुद्ध 7 ऑक्टोबरला सामना होणार आहे. बांगलादेश मध्ये पुढील महिन्यापासून महिला टी-20 आशिया चषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. आशिया कपमध्ये भारताचा सामना ७ ऑक्टोबरला पाकिस्तानशी होणार आहे. ही स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने आयोजित केली जाईल. ज्या अंतर्गत अव्वल चार क्रमांकावर असलेले संघ उपांत्य फेरीसाठी पात्र…

Read More

एरंडोल : प्रतिनिधी विटांनी भरलेल्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने एरंडोल येथील मजूर ठार झाला. फरकांडे रस्त्यावरील भवानी जीनिग समोर २० रोजी हा भीषण अपघात झाला एरंडोल येथील राहुल दत्तू कुंभार (वय २२) हा युवक, विटांच्या ट्रॅक्टरवर मजूर म्हणून कामास होता. विटांनी भरलेले ट्रॅक्टर (क्र.एम.एच.१९ सी.वाय हे १६०९) हे एरंडोलहून फरकांडेकडे जात होते. भवानी जिनिंग जवळ ट्रॅक्टरमधील दोरी लोंबकळत असल्याने ती दोरी वर ओढण्याच्या प्रयत्न करत होता. तोल गेल्याने तो चाकाखाली आल्याने त्यास गंभीर दुखापत झाली. ट्रॅक्टर चालक विनोद कुंभार याला घटना दिसताच त्याने १०८ या रुग्णवाहिकेला फोन करून बोलावले. जखमीला एरंडोल ग्रामीण रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी राहुल यास मृत घोषित…

Read More

जळगाव : प्रतिनिधी मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे स्थानिक गुन्हे शाखेचे निलंबित पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मंगळवारी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. न्यायालयाने याबाबत पोलिसांचा खुलासा मागवला असून, या अर्जावर बुधवारी आज सुनावणी होणार आहे. दरम्यान, त्यांच्यावर दाखल असलेला गुन्हा हा अजामीनपात्र आहे. त्यात अटक होण्याची भीती असल्याने त्यांनी अटकपूर्वसाठी अर्ज दाखल केला. गेल्या आठवड्यात पोलिस निरीक्षक बकाले यांनी मराठा समाजाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह संवादाची क्लिप मोठ्या प्रमाणात जिल्हाभरात समाजमाध्यमांवर व्हायरल झाली होती. त्याची दखल घेऊन व कायदा सुव्यवस्थेचा विचार करून जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी सुरुवातीला बकालेंची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली केली होती. मात्र,…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं निधन झालं आहे. वयाच्या 59 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. 10 ऑगस्ट रोजी सकाळी व्यायाम करत असताना ते ट्रेड मिलवर कोसळले. यावेळी त्यांना तत्काळ एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. एम्स रुग्णालयातील आयसीयू डिपार्टमेंटमधील व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं होतं. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी ही शस्त्रक्रिया पार पडली होती. राजू श्रीवास्तव यांनी त्यांच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आता त्यांच्या निधनानं मनोरंजनसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे. मालिका आणि चित्रपटांमध्ये केलं काम 1989 मध्ये रिलीज झालेल्या मौने प्यार किया या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली. राजू श्रीवास्तव हे…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात प्रचंड घसरण दिसून आली होती मात्र आज सोने चांदी दराच्या घसरणीला ब्रेक लागला असून तेजी दिसून येत आहे. आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 45,950 रुपये तर 24 कॅरेट साठी 50,130 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 572 रुपये आहे. शातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या. चेन्नई – 50,510 रुपये दिल्ली – 50,290 रुपये हैदराबाद – 50,130 रुपये कोलकत्ता – 50,020 रुपये लखनऊ – 50,290 रुपये मुंबई – 50,130 रुपये नागपूर – 50,130 रुपये पूणे – 50,130 रुपये 22 आणि 24…

Read More