Author: editor desk

जयपूर : वृत्तसंस्था राजस्थानचे नवे मुख्यमंत्री होण्यास सचिन पायलट यांच्या नावाला गेहलोत समर्थक असलेल्या जवळपास ९२ आमदारांनी विरोध दर्शवत आपला राजीनामा देण्याची तयारी केली आहे. त्यामुळे आता राजस्थान काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. तर आपले मुख्यमंत्रीपद वाचवण्यासाठी अशोक गेहलोत शिंदे पॅटर्न वापरत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी मोर्चेबांधणी केली असून येत्या १७ ऑक्टोबर रोजी ही निवडणूक होणार आहे. त्यामुळे त्यांना आपले मुख्यमंत्रीपद सोडावे लागणार आहे. त्यामुळे राजस्थानमध्ये सचिन पायलट यांच्या नावाची चर्चा होती पण गेहलोत यांनी आपले मुख्यमंत्रीपद वाचवण्यासाठी नवी खेळी खेळली असल्याची चर्चा आहे. अशोक गेहलोत यांना समर्थन…

Read More

नंदुरबार : वृत्तसंस्था तालुक्यातील शहादा– प्रकाशा रस्त्यावर लांबोळा गावानजीक शहादाकडे जात असलेल्या बैलगाडीस्वारास मागून येणाऱ्या कंटेनर ने जोरदार धडक दिली. यात बैलगाडीस्वार शेतकरी जागीच ठार झाला असून बैल देखील ठार झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शिनी दिली आहे. सदरील घटना आज दि २५ रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. लांबोडा येथील शेतकरी हरसिंग सरदार सिंग गिरासे (वय 50) हे आपल्या शेतात कल्टीवेटर करण्यासाठी बैलगाडीने जात होते. या दरम्‍यान नंदुरबारकडून शहाद्याच्या दिशेने भरधाव वेगाने जात असलेल्या कंटेनरने दालमिल समोर जोरदार धडक दिली. या अपघातात बैलगाडीस्वार हरसिंग सरदारसिंग गिरासे (रा. लांबोळा) हे शेतकरी जागीच ठार झाले. याशिवाय अपघातात एक बैल देखील ठार झाला असून दुसरा…

Read More

परभणी : वृत्तसंस्था शिवसेनेचे शिंदे गटातले नेते आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कार्यकर्त्यांना एक अजब सल्ला दिला आहे. कोणी एक मारली तर चार मारा असं विधान त्यांनी केलंय. तसंच कोणी अरे केलं तर त्याला कारे करा, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं आहे. याच भाषणात त्यांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला आहे. अब्दुल सत्तार हे परभणीमध्ये बोलत होते. यावेळी ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, येणाऱ्या काळात आमच्याकडे चार-पाच आमदार आणि दोन तीन खासदारही येणार आहेत. शिवाय शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना कोणी धमकावत असेल, तर त्याच्या अरेला कारे करा. त्याने एक मारली तर चार मारा. अधिकारी जर सामान्य शिवसैनिकांचं काम करत असतील तर…

Read More

पुणे : वृत्तसंस्था शुक्रवारी पुण्यात पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कालपासून हा व्हिडिओ व्हायरल होत असून पोलिसांकडून असा प्रकार घडला नसल्याचं सांगितलं जात आहे. यानंतर वातावरण पेटलं असून शिवसेनेने पुण्यात आंदोलन सुरू केलं आहे. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या निदर्शनावेळी PFIच्या कार्यकर्त्यांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’, ‘अल्लाहू अकबर’ अशा घोषणा दिल्यामुळे शिवसेनेने पुण्यातीलच जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केले. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा ध्वज पायदळी तुडवत, लाथाबुक्क्या मारत फाडला. हिंदुस्तान जिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या तर सुरक्षेची आणि सुव्यवस्थेची जबाबदारी घेत याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला…

Read More

जळगाव : प्रतिनिधी आज दि २५ रोजी सकाळी शहरातील बजरंग बोगदा येथे मालवाहू गाडी अमृत योजनेच्या खड्ड्यामध्ये अडकल्याने सुदैवाने यात चालकाला कोणतीही दुखापत झाली नाही. परतू या भोंगळ कारभाराविरोधात आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते दुर्गेश दुर्गेश निंबाळकर यांनी मनपा प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर रेखोट्या ओढल्या आहे. शहरात गेल्या कित्येक दिवसापासून अमृत योजनेचे पाईप लाईनचे काम सुरु आहे. परंतु ज्या ठिकाणी काम झाले त्यठिकाणी पडलेले खड्डे मात्र व्यवस्थित बुजले जात नसल्याने दुचाकी व मालवाहू गाडी फसत आहे. आज दि २५ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास शहरातील प्रेम नगर जवळील बजरंग बोगदा येथे एक मालवाहू गाडी या खड्ड्यात फसली सुदैवाने यात चालकाला कोणतीही दुखापत…

Read More

चोपडा : प्रतीनिधी महाराष्ट्र राज्य वाहतूक परिवहन महामंडळ चोपडा आगार येथे एन.एस.यू.आय.च्या वतीने माजी जिल्हाध्यक्ष काँग्रेस आय पक्ष जळगाव ॲड. संदीप सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली , माजी जिल्हा सरचिटणीस अजबराव पाटील व तालुकाध्यक्ष काँग्रेस चोपडा प्रा.प्रदीप पाटील व परिवहन सेल उत्तर महाराष्ट्र देवकांत चौधरी यांच्या उपस्थितीत प्रदेश सचिव एन एस यु.आय. काँग्रेस महाराष्ट्र राज्य चेतन बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. चोपडा बस स्थानकात अत्यंत अस्वच्छता दिसून येत आहे या अस्वच्छतेमुळे प्रवाशांना व एस.टी. कर्मचाऱ्यांना अत्यंत त्रास होत असल्याने या अस्वच्छतेमुळे रोगराई पसरण्याची भीती नाकारता येऊ शकत नाही, तरी आपण याकडे लक्ष देऊन योग्य ती उपाययोजना करावी आणि महाविद्यालय व…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगरच्या मागील बाजूस असलेले धनाजी काळे नगरात एक कॅटरिंगचे गोडावून आहे. याठिकाणी अज्ञात व्यक्तीने चोरी केल्याची घटना घडली आहे. याबाबत शहर पोलिसात गुन्हा दाखल करून एकास ताब्यात घेण्यात आले आहे. सविस्तर वृत्त असे की, शहरातील धनाजी काळे नगरात पुरुषोत्तम मांगो चिमणकर (वय ३२) रा.पिप्राळा यांचे कॅटरिंगचे गोडावून आहे. या ठिकाणी दि २३ ते दि. २४ रोजी संशयित आरोपी राजकुमार विश्वकर्मा (वय २४) याला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गोडावूनचे दरवाज्याचे कडी कोयडा तोडून गोडावून मधून चोरी केल्याची घटना दि २४ रोजी उघडकीस आली. या गोडावून मधील सुमारे ६३ हजार रुपये किमतीचे स्टीलचे भांडे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून काही व्हिडीओ व्हायरल होत आहे ती फक्त अफवा असून याबाबत कुणीहि गैरसमज पसरू नये असे आवाहन जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून केलेले आहे. जळगाव जिल्हयांतील सर्व नागरिकांना आम्ही पोलीस अधीक्षक, जळगाव आव्हान करतो की, मागील ५/६ दिवसा पासुन जळगाव जिल्हयांत लहान मुले/ मुली यांना पळविणारी टोळी असुन ती लहान मुले / मुली एकटे दिसल्यावर त्यांना पळवून घेवून जातात या संदर्भात मोबाईल Whataap वर पोस्ट टाकण्यात आल्याने सामान्य नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे. जळगाव जिल्हयांत लहान मुले/मुली पळविणारी अशी कोणतीही घटना घडलेली नाही किंवा अशी कोणतीही गंग (टोळी) सर्किय नाही. ही केवळ अफवा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी दि. २४ सप्टेंबर रोजी “फार्मासिस्ट डे” व “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” या उपक्रमांतर्गत शासकीय तंत्रनिकेतन जळगाव या संस्थेमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी जळगाव जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक मा. चंद्रकांत गवळी यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली. या कार्यक्रमासाठी विजयेंद्र फाउंडेशनच्या डॉ. पराग चौधरी (हृदय रोग तज्ञ) व डॉ. जयंती चौधरी (स्त्री रोग तज्ञ) यांनी अशोकाची झाडे व औषधी झाडे संस्थेस वृक्षारोपणासाठी भेट दिली. याप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी शासकीय निवासस्थानी किमान १०० झाडे लावून जगवण्याचा संकल्प, ओसाड जागी पोलीस बांधवांच्या मदतीने वृक्षारोपण करण्याचा संकल्प अशा प्रकारच्या त्यांनी केलेल्या कामाची माहिती याप्रसंगी विद्यार्थ्यांना…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणाऱ्या शिक्षकांच्या मागण्या रास्त असून, या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्यातर्फे राज्य शासनाकडे विधिमंडळात शिक्षकांची कैफियत मांडली जाईल, असे आश्वासन जिल्हा बँकेचे चेअरमन तथा माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी शिक्षकांना दिले. आपल्या विविध मागण्यांसाठी शिक्षकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्री. देवकर, काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी व जळगावच्या महापौर जयश्री महाजन यांनी भेट देऊन शिक्षकांशी चर्चा केली. यावेळी शिक्षकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन श्री. देवकर यांच्याकडे सोपविले. निवेदनात शिक्षकांनी म्हटले आहे, की आम्हाला शैक्षणिक कामकाज करू द्या, शालेय उपक्रमांचा शिक्षकांवर होत…

Read More