Author: editor desk

कोरोना काळात शेअर बाजारात मोठी उलथापालथ दिसून आली. पण या काळातही काही शेअर्सने गुंतवणुकदारांना चांगली कमाई करुन दिली आहे, असाच एक शेअर म्हणजे टाटा ग्रुपचा टाटा पॉवर (Tata Power) हा शेअर. केवळ 2 वर्षात या शेअरने गुंतवणुकदारांचे पैसे सात पटीने वाढवले. टाटा पॉवरच्या शेअर्समध्ये आणखी तेजी येण्याचे संकेत बाजार तज्ज्ञांच्या वर्तवले आहेत. देशांतर्गत ब्रोकरेज आयसीआयसीआय सिक्युरिटीजने ऑगस्टमध्ये टाटा पॉवरच्या शेअरसाठी 262 रुपयांचे टारगेट निश्चित केले होते. सध्या त्याची बीएसईवर 219 रुपये किंमत आहे. टाटा पॉवरने 2023-27 या आर्थिक वर्षासाठी हरित ऊर्जेवर (Green Energy) आपले लक्ष केंद्रित केले आहे. कंपनी 1 लाख कोटी रुपयांचा भांडवली खर्च करणार आहे आणि त्यातील 80…

Read More

चोपडा : प्रतिनिधी गुप्तांगावर वार करून एका ३० वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळं खळबळ उडाली असून याप्रकरणी चोपडा शहर पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनेश वेरसिंग सस्ते (पावरा) (वय ३०, रा.पिसनाबल ता सेधंवा जि वडवणी ह.मु. अकुलखेडा ता चोपडा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे की, मयताचा भाऊ दिलीप वेरसिंग सस्ते (पावरा) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार दि. २ ऑक्टोंबर २०२२ रोजीचे सांयकाळी ४.३० ते दि. ३ ऑक्टोंबरच्या रोजी सकाळी १०.३० वाजेपूर्वी कोणी कोणत्या तरी कारणावरुन दिनेशचा खून केला आहे. दिनेशचा मृतदेह अकुलखेडा गावाजवळ संकेत हॉटेल समोर असलेल्या…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे संतुलन पूर्ण बिघडले आहे. दसरा मेळाव्याच्या त्यांच्या भाषणातून हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितले, असा घणाघात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी नागपूर येथे केला आहे. नवनीत राणा म्हणाल्या, उद्धव ठाकरे यांच्या कालच्या भाषणात केवळ एकनाथ शिंदेंविरोधातील राग, द्वेष दिसून येत होता. त्यांनी स्पष्टपणे तसे बोलूनही दाखवले. उद्धव ठाकरे अनेक ठिकाणी अडखळत होते. केवळ ‘बाप चोरला, बाप चोरला’, असेच उद्धवजी म्हणत होते. मात्र, उद्धव व आदित्य ठाकरे हे केवळ बाळासाहेब ठाकरेंच्या मालमत्तेचे वारस आहेत. बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आहेत. उद्धव यांनी विचार करावा नवनीत राणा म्हणाल्या, बाळासाहेब ठाकरेंचे विचार हे एकनाथ शिंदेच पुढे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शिंदे गटाचा दसरा मेळावा मुंबई मधील बीकेसी मैदानावर आज मोठ्या उत्साहात पार पडत आहे. तर दि ४ ऑक्टोबर रोजी जळगाव जिल्ह्यातून पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे गटातील जळगाव जिल्ह्यातील १० हजार कार्यकर्ते मुंबई दाखल झाले असल्याची प्रतिक्रिया शंतनू नारखेडे यांनी दिली आहे. दि ४ ऑक्टोबर रोजी जळगाव जिल्ह्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण ऐकण्यासाठी तब्बल १० हजार कार्यकर्ते पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रवाना झाले असून बीकेसी मैदानावर आज होणाऱ्या दसरा मेळाव्यात हे कार्यकर्ते स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सोने लुटणार आहे. यावेळी दिनेश जगताप, शंतनू नारखेडे, जीतेद्र गवळी यांच्यसह हजारो कार्यकर्ते बीकेसी मैदानावर पोहचले आहे.

Read More

पाचोरा : प्रतिनिधी शहरातील गजानन नगरातील माहेर असलेल्या विवाहितेचा ३ लाखासाठी सासरचे मंडळी छळ करीत असल्याचा गुन्हा दि ४ रोजी पाचोरा पोलिसात विवाहितेने दाखल केला आहे. सविस्तर वृत्त असे की, शहरातील गजानन नगरातील माहेर असलेली विवाहिता अनिता दीपक जाधव (वय २८) हिला चाळीसगाव तालुक्यातील टाकळी प्र.चा. येथील सासर आहे. वर्ष २०१२ ते २०१८ पर्यंत विवाहितेला माहेरून ३ लाख रुपये वाहन खरेदीसाठी आणावे म्हणत तीचा छळ करून मारून टाकण्याची हि धमकी पती दीपक सुकदेव जाधव, सासरे सुकदेव दगा जाधव, सासू प्रमिला सुकदेव जाधव, जेठ मुकेश जाधव, जेठानी योगिता जाधव, नणद पूनम मराठे सर्व रा. मोठ्या विहिरीजवळ टाकळी प्र.चा. याच्या विरोधात पाचोरा…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था दसरा मेळाव्यासाठी शिवसेना आणि शिंदे गटाकडून जोरदार तयारी केली जात असून दोन्ही गटाचे कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने बसने तर काही आप आपल्या खर्चाने जात असताना दोन्ही गटातील नेते मात्र विमानाने प्रवास करत असल्याचे दिसून आले. यावेळी दोन्ही गटातील नेते विमानात ‘हम साथ साथ है’… हेच म्हणताना दिसत आहे. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांचा एकाच विमानातून प्रवास बुधवारी औरंगाबाद-मुंबई विमानात शिवसेना आणि शिंदे गटाचे नेते एकत्र आल्याचे चित्र बघायला मिळाले. औरंगाबाद-मुंबई विमानातील एक व्हिडिओ समोर आला आहे. यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आंबादास दानवे, मंत्री संदिपान भूमरेंसह दोन्ही गटाचे नेते कार्यकर्ते दिसतात. कार्यकर्ते मुंबईला रवाना दरम्यान, दसरा मेळाव्यासाठी दोन्ही गटाकडून मोठ्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरात एका परिसरातील एका दुर्गोत्सव मंडळात आयोजित गरबा कार्यक्रमात फॅन्सी ड्रेस स्पर्धेत सर्वधर्म समभाव संदेश दर्शविण्यासाठी तरुणांनी परिधान केलेल्या वस्त्रांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वस्त्र परिधान करणाऱ्या चौघांसह अध्यक्ष, उपाध्यक्ष अशा सहा जणांविरुध्द धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहाडी रस्त्यावरील नेहरु नगरात आयोजित दुर्गोत्सव मंडळात सोमवारी रात्री दोन पुरुषांची दुसऱ्या धर्मातील महिलांचे वस्त्र परिधान करुन नृत्य केले. तर दोघांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला होता. या प्रकारामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याची तक्रार एका तरुणाने एमआयडीसी पोलिसात केली. त्यानुसार मंगळवारी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला. दरम्यान, या व्हिडीओच्या माध्यमातून समाजात चुकीचा संदेश पसरवला जात आहे.…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था सध्या सणासुदीच्या हंगामात अनेकजण सोन्याची खरेदी करतात. जगामध्ये डिजिटल क्रांती होण्याआधी सर्वजण पारंपारिक पद्धतीनेच भौतिक स्वरुपात सोनं खरेदी करत असतं. पण आता सोनं खरेदी करण्याची पद्धत बदलली आहे. डिजिटल काळात सोन्याची खरेदी देखील डिजिटल स्वरुपात करता येते. यामध्ये तुम्ही 24 कॅरेटचं शुद्ध सोनं देखील ऑनलाईन खरेदी करु शकता. पेटीएम, गूगल पे, फोनपे, MMTC यांसारख्या अनेक प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून डिजिटल सोनं खरेदी करता येतं. आज आम्ही तुम्हाला डिजिटल गोल्ड (Digital Gold) खरेदी करण्याचे फायदे आणि तोटे यांबद्दल सांगणार आहोत. तुम्ही अगदी एक रुपयाचंसुद्धा डिजिटल सोनं खरेदी करू शकता. त्यातसुद्धा 24 कॅरेटची शुद्धता असते. यामध्ये तुम्हाला सोनं सोबत ठेवण्याची किंवा…

Read More

लातूर : वृत्तसंस्था उदगीर मार्गावरील लोहारा गावाजवळ भीषण अपघात झाला. एसटी बस आणि कारमध्ये भीषण अपघात झालाय. या अपघातात कारमधील 5 जणांचा जागीच मृत्यू झालाय. तर बसमधील 10 प्रवासी जखमी झालेत. ठार झालेले हे कारमधील प्रवासी आहेत. एका गंभीर जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली. उदगीर येथून कुटुंब कारने सकाळी निघाले होतं. कारमधून सहा जण तुळजापुरला दर्शनासाठी निघाले होते. लातूर- उदगीर मार्गावर हैबतपुर जवळील पेट्रोल पंपाजवळ रस्त्यावर कुत्र्यांना वाचवताना चालकाने कार वळवली आणि त्याचवेळी समोरुन येणाऱ्या एसटी बसवर जाऊन जोरदार धडकली. यात कारचा चेंदामेंदा झाला. अपघातग्रस्त बस ही उदगीरहून चाकूरला जात…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी शहरातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा गेल्या ४ ते ५ महिन्यापासून पाठलाग करीत विनयभंग केल्याची घटना दि ३० रोजी उघडकीस आली आहे. याबाबत चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, शहरातील एका परिसर राहणाऱ्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा गेल्या ४ ते ५ महिन्यापासून शाळेत जाताना नेहमी पाठलाग करून तू मला आवडतेस माझ्यावर प्रेम करशील का ? असे म्हणत नेहमी मुलीस लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करीत व मुलीच्या भावाने संशयिताला समजविण्यासाठी गेला असता भावाला फायटरने मारहाण केल्या प्रकरणी संशयित आरोपी शुभम संजय पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील…

Read More