Author: editor desk

पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील आडगाव येथील मुदाने येथे वाळूची चोरटी वाहतूक करीत असेलेल टॅक्टर व चालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील आडगाव शिवारातील मुंदाणे गावाजवळील हॉटेल गरुड जवळ दि ६ रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास चोरटी वाळूची वाहतूक करणारे टॅक्टर पोलीस पथकाने गस्तीवर असताना थांबविले असता त्याला विचारपूस केली असता, चालकाने उडवा उडवीची उत्तरे दिल्याने संशयित आरोपी चालक विशाल लक्ष्मण शिंदे व मालक शरद काळे यांच्या विरोधात पो.कॉ.प्रशांत पगारे यांनी पारोळा पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या ताब्यातील स्वराज कंपनीचे एम.एच.१९.बि.जे.२७४८. टॅक्टर २ लाख किमतीचे व ट्रालीमधील वाळू सुमारे…

Read More

पुणे : वृत्तसंस्था चंद्रकांत पाटलांनी आपल्याला संपवल्यांची भाषा केलीय, अशी खंत राजू शेट्टी यांनी एका केंद्रीय नेत्यापुढे केली होती. ते पुढे म्हणाले होते की, तुम्ही चंद्रकांत पाटलांना आई -वडिलांवरून शिव्या द्या त्यांना काही वाटणार नाही. मात्र, मोदी आणि शहांना काही बोलल्याचे त्यांना चालणार नाही. हा किस्सा पुण्यातील सत्कार समारंभात स्वतः मंत्री चंद्रकांत पाटीलांनी सांगितला आहे. पाटलांनी एकप्रकारे तुम्ही आई-वडिलांना शिवा द्या, पण आमच्या वरिष्ठ नेत्यांबद्दल काही बोलू नका, असा इशारा दिल्याची चर्चा सुरू आहे. काय म्हणाले पाटील? राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा पुणे भाजपकडून सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना पाटलांनी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांबद्दल मोठे वक्तव्य केले.…

Read More

चंद्रपूर : वृत्तसंस्था जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील पोटच्या मुलीने भावजयीची मदत घेत आपल्याच आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या हत्येप्रकरणी पोलिसांनी मुलीसह भावजयीलाही अटक केली आहे. सध्या त्यांची कसून चौकशी केली जातेय. विशेष म्हणजे आई बेपत्ता असल्याची तक्रार दुसऱ्या मुलीने दिल्यानंतर हे सगळं प्रकरण उघडकीस आलंय. पोलिसांनी केलेल्या तपासानंतर या हत्याकांडाचा खळबळजनक घटनाक्रमही उघडकीस आलाय. सिंदेवाही तालुक्यात नलेश्वर इथं तानाबाई सावसागडे ही 65 वर्षांची महिला राहत होती. आपली आई बेपत्ता असल्याची तक्रार या महिलेच्या मुलीने पोलिसात दिली होती. रंजना सोनावणे असं तक्रारदार महिलेचं नाव आहे. त्या आपली आई तानाबाई सावसागडे यांच्या शोधात होत्या. पण आई बेपत्ता असल्यानं त्यांनी सिंदेवाही पोलीस…

Read More

जळगाव : प्रतिनिधी रात्रीच्या सुमारास शतपावली करण्यासाठी गेलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला हत्यार दाखवीत सोन्याची चैन लांबविल्याची घटना ७ रोजी उघडकीस आली आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्ण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, शहरातील महिला पोलीस आरती मोतीलाल कुमावत (वय ३२, रा.पोलीस सोसायटी, पोलीस मुख्यालय) ह्या दि ६ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास पोलीस मुख्यालयातील परेड ग्राऊडवर शतपावली करण्यासाठी गेले होते. यावेळी कुणी तरी अनोळखी व्यक्तीने त्यांच्या जवळ येत अंधाराचा फायदा घेत त्यांना चाकू सारखे हत्यार दाखवून बळजबरीने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून पळून गेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलीस महिला यांनी तत्काळ जिल्हापेठ पोलीस स्थानक गाठत…

Read More

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील एका १६ वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना दि ६ रोजी घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी दि ६ रोजी सकाळी शाळेत जावून ११ वाजता येते असे सांगून गेली होती, परंतु घरी परत न आल्याने मुलीच्या वडिलांनी सर्व ठिकाणी शोधले असता मिळून न आल्याने कुणी तरी अनोळखीने फूस लावून पळवून नेले असल्याची तक्रार एमआयडीसी पोलिसात पालकांनी केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एपीआय अमोल मोरे करीत आहेत.

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात परतीच्या पावसाने जोरदार बॅटिंग केली असून विदर्भासह मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. तर शेतकऱ्यांना मोठी चिंता निर्माण झाली असून सोयबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर विदर्भातील काही जिल्हे वगळता राज्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे. तीन ते चार दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने काल यवतमाळ, नांदेड, परभणी या जिल्ह्यांत हजेरी लावली. तर सोयाबीनचे पीक काढायला आल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. या पावसामुळे शेतकरी चिंतेत असून हलक्या सरी बरसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा हे चार जिल्हे वगळता राज्यात येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर हलक्या सरी बरसणार असल्याची शक्यता…

Read More

जळगाव : प्रतिनिधी राज्य शासनाने रेशन कार्ड धारकांना १०० रुपयामध्ये (रवा, चना, डाळ, साखर, पाम तेल) या चार वस्तू देण्याचा निर्णय घेतला आहे. कार्ड धारकांना १२ अंकी नंबर मिळालेला नाही. त्यामुळे रेशन दुकानदाराकडे आलेला माल वितरीत होत नाही. तसेच सर्व लाभार्थी म्हणजे रेशनकार्डवर असलेल्या सर्व नागरिकांना सरसकट लाभ मिळावा या आशयाचे निवेदन राष्ट्रवादी कॉंग्रेसने आज दि ६ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना दिले आहे. निवेदनावर रवींद्र पाटील, अशोक लाडवंजारी , राजू मोरे, सुनील माळी, इब्राहीम तडवी, अशोक सोनवणे, एस.जे.पाटील, संजय पाटील, अमित तडवी यांच्या स्वाक्षर्या आहेत.

Read More

जळगाव : प्रतिनिधी परतीच्या पावसासाठी राज्यात पोषक वातावरण तयार झालं आहे. कालपासून राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झालेली असून आज राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी केला आहे. जळगाव जिल्ह्याला देखील आजपासून तीन दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. खरंतर, जून महिन्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यात दमदार हजेरी लावली. यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालेली पाहायला मिळाले. अशातच आता महाराष्ट्रातून पाच ते दहा ऑक्टोबर दरम्यान मान्सून माघारी फिरणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. त्यामुळे काल दसऱ्याच्या दिवशी राज्यातील अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या होत्या. जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात देखील हलक्या…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था भारतीय दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओच्या JioBook नावाच्या परवडणाऱ्या लॅपटॉपवर काम करत असल्याच्या बातम्या 2021 च्या सुरुवातीला समोर आल्या. आता कंपनीने गूपचूप लॅपटॉप देशात लॉन्च केला आहे. JioBook आधीच गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लसद्वारे (GeM) विक्रीसाठी आहे आणि दिल्लीतील प्रगती मैदानावर चालू असलेल्या इंडिया मोबाइल काँग्रेसमध्ये (IMC 2022)देखील प्रदर्शित केले आहे. चला जाणून घेऊया Reliance JioBook ची किंमत आणि फीचर्स यांनाच खरेदी करण्याची संधी JioBook विशेषत: ज्यांना 20 हजारांखालील लॅपटॉप खरेदी करायचा आहे त्यांच्यासाठी हा कमी बजेटचा लॅपटॉप आहे. सध्या फक्त सरकारी अधिकारीच लॅपटॉप खरेदी करु शकतात. मात्र, लवकरच सर्वसामान्य उपलब्धता होईल. JioBook मध्ये प्लॅस्टिक बॉडी आहे आणि कीबोर्डवरील Windows सोबत…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  २९ वर्षीय विवाहितेचा पतीसोबत वाद झाल्यानंतर याचाच फायदा घेत सोबत काम करणाऱ्या एकाने विवाहितेला आपल्या गावी बिहारमध्ये बोलवत तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, पिडीत विवाहीतेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, विवाहीतेचा पतीसोबत कौटुंबिक वाद झाला. यावेळी पिडीतेसोबत काम करणारा राजेशकुमार जयनारायण पासवान (संतोर, सहरसा, नारायणपूर, बिहार) याने फोनवरून संवाद साधत विश्वास संपादन केला. त्यानंतर राजेशकुमार याने पिडीतेला गावाकडे बोलवून तिच्यावर बलात्कार केला. तसेच सदरची घटना कोणासही सांगू नको, अशी धमकी दिली. याप्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील…

Read More