Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी कोकणातील भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेला कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्काराने सन्मानित करुन उत्तर महाराष्ट्रातील विद्यापीठाने दक्षिण भागाला संवादाची साद घातली असून हा संवाद निरंतर वाढीला लागायला हवा असे प्रतिपादन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रथम कुलगुरु प्रा.डॉ.एन.के.ठाकरे यांनी केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे या वर्षाचा दिला जाणारा कवयित्री बहिणाबाई चौधरी राज्यस्तरीय पुरस्कार भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान, मु. पो.झाराप, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग या सामाजिक संस्थेला शुक्रवार दि. ७ ऑक्टोबर रोजी प्रा.ठाकरे यांच्याहस्ते देण्यात आला. या पुरस्कार वितरण सोहळयात ते बोलत होते. कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी अध्यक्षस्थानी होते. याच समारंभात सन २०१९-२० व सन २०२०-२१ या दोन वर्षातील विद्यापीठ कार्यक्षेत्रातील…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस हैदराबादने कनिष्ठ तंत्रज्ञ पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. प्रिंटिंग प्रेसच्या या भरतीद्वारे कनिष्ठ तंत्रज्ञांच्या एकूण ८३ रिक्त जागा भरल्या जातील. या पदांसाठी इच्छुक असलेले सर्व उमेदवार अधिकृत वेबसाइट spphyderabad.spmcil.com ला भेट देऊ शकतात आणि त्यांचा अर्ज सबमिट करू शकतात. या पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज सुरू झाले असून अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर २०२२ आहे. रिक्त जागांचा तपशील एकूण पदे- 83 कनिष्ठ तंत्रज्ञ (मुद्रण) – 68 कनिष्ठ तंत्रज्ञ (फिटर) – ०६ कनिष्ठ तंत्रज्ञ (टर्नर)- ०१ कनिष्ठ तंत्रज्ञ (वेल्डर)- ०१ कनिष्ठ तंत्रज्ञ (इलेक्ट्रिकल) – ०३ कनिष्ठ तंत्रज्ञ (इलेक्ट्रॉनिक्स) – ०३ कनिष्ठ तंत्रज्ञ (फायरमन) -…

Read More

हि कोणत्याही राजे राजवाड्याची गोष्ट नाही किवा कोणत्या आटपाट नगराचीहि नाही मात्र, तरीही काहिशी जादूई आणि सकारात्मक बोध देणारी. ही गोष्ट आहे मुंबईतल्या मध्यमवर्गीय घरातील महिलांची, पन्नास वर्षांपूर्वीची… त्यांच्या लढ्याची आणि खंबीर नेतृत्वाची… देशभर गाजलेल्या आंदोलनाची. लाटण मोर्चाची आणि हा मोर्चा उभा करणाऱ्या लाटणवाल्या बाईंची. लाटणं मोर्चा ही संकल्पना किंवा आंदोलनाची प्रतिमा साकारली ती मुंबईत. महागाई, तुटवडा, काळाबाजार, पाण्याची टंचाई या सगळ्या विरोधात महिलांचं आंदोलन उभं राहिलं. हजारो महिला लाटणं घेऊन मंत्रालयावर चालून गेल्या. चलनवाढ, भारत-पाकिस्तान युद्ध आणि त्यानंतर बांग्लादेशमधील निर्वासितांचे देशात आलेले लोंढे या सगळ्याचा ताण भारताच्या अर्थव्यवस्थेवर आला होता. अन्नधान्याची टंचाई भासू लागली, इंधनाचे दर वाढले, साठेबाजी वाढली.…

Read More

पुरुषाप्रमाणे महिलाही आता सर्वच खेळामध्ये अग्रेसर दिसू लागल्या आहेत. तर प्रो-कबड्डी लीगमुळे कबड्डी घराघरांत पोहचली. एक काळ असा होता की कबड्डी हा खेळ फक्त गल्लीबोळात दिसायचा, पण आता आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकांना ते कळू लागलं आहे. प्रो-कबड्डी लीगबद्दल तुम्ही ऐकलं असेलच. कबड्डीची ही सर्वात मोठी स्पर्धा आहे. यावेळी देशभरातून १२ संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. बरं, तुम्ही लहानपणीच कबड्डी खेळली असेल. तसे पाहिले तर पुरुष सहसा कबड्डी खेळताना दिसतात किंवा मुलीही काही ठिकाणी छंद जोपासत खेळतात, पण साडी नेसून कबड्डी खेळणाऱ्या महिलांना तुम्ही कधी पाहिले आहे का? होय, असाच एक व्हिडिओ आजकाल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एकदम…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी शेतकऱ्यांची व शासनाची तब्बल ५ लाख ८४ हजार ४९५ रुपयात फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वरणगाव पोलिसात ३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील पिंपळगाव बु येथे विना परवाना मुदतबाह्य कीटकनाशक साठवणूक करून विक्री करत असताना शेतकऱ्यांची व शासनाची विना परवानगी परवाना न घेत फसवणूक केली. याप्रकरणी संशयित आरोपी नितीनचद बन्सीलाल जैन (रा.पिंपळगाव ता.भुसावळ), अतुल लढा (मामा चौक, जालना), भिलुलाल रामप्रसाद कासट (ता.सेलू, जि.परभणी) यांच्या विरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनी परशुराम दळवी हे करीत आहेत. दिनांक 7 ऑक्टोबर 2022 रोजी पिंपळगाव बुद्रुक तालुका भुसावळ…

Read More

जळगाव : प्रतिनिधी मराठा समाजाबद्दल अक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या एलसीबीच्या तत्कालिन पीआय किरणकुमार बकाले प्रकरणाचा तपासी अधिकारी महिन्याभरात बदलण्यात आला आहे. एसपी डाॅ. प्रविण मुंढे यांनी आता या प्रकरणाचा तपास हाेम डीवायएसपी संदीप गावीत यांच्याकडे साेपविला आहे. त्यांनी बकाले यांना शाेधणे व अटकेसाठी चार नवे पथक निर्माण केले आहेत. पीआय बकाले यांची ऑडिओ क्लीप १५ सप्टेंबर राेजी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. या प्रकरणाचा तपास जिल्हा पेठ पाेलिस ठाण्याचे निरीक्षक अरुण धनवडे यांच्याकडे हाेता. जिल्हापेठ पाेलिसांच्या तीन पथकांनी दाेन वेळा ठाणे व एकदा नाशिक येथे बकाले यांचा शाेध घेतला परंतु अपयश आले. अटकपूर्व अर्ज न्यायालयाने फेटाळून दहाबारा दिवस…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था नाशिक ते औरंगाबाद मार्गावर हॉटेल मिरचीजवळ एका खासगी बसचा मोठा अपघात झाला. या अपघातात 10 प्रवाशांचा मृत्यू झालाय तर 38 प्रवासी गंभीर जखमी झाले असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. दरम्यान, पूर्ण बस पेटलेली असताना प्रवासी खिडक्यांमधून उड्या मारून जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते. शनिवारी पहाटे 4 वाजून 20 मिनिटांनी हा अपघात झाला आहे. चिंतामणी ट्रॅव्हल्सची ही बस यवतमाळहून मुंबईच्या दिशेने निघाली होती. प्राथमिक माहितीनुसार ही खासगी बस आणि एका आयशर टेम्पोमध्ये अपघात झाला. प्राथमिक तपासानुसार, बस आणि ट्रकमध्ये 90 अंशाच्या कोनात धडक झाली. चौक ओलांडत असताना धावत्या बसची समोरून येणाऱ्या ट्रकला धडक बसली. त्यामुळे बसच्या डिझेल टँकचा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जिल्हा नियोजन समितीच्या कामांवरील स्थगिती उठली असल्याने तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी सर्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून कामांचे प्रस्ताव तातडीने सादर करून प्रशासकीय मान्यता घ्यावी, अचूक नियोजन व सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी समन्वय ठेऊन उत्तरदायित्व स्वीकारून जबाबदारीने मुदतीत कामे पूर्ण करा असे निर्देश पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिले. या बैठकीत सन 2021-22 या वर्षातील 536.06 कोटी रूपयांच्या निधीचा आढावा घेण्यात आला तर सन 2022-23 या वर्षासाठी सुमारे 599.51 कोटी रूपये निधी अर्थसंकल्पीत करण्यात आला असून माहे सप्टेंबर 2022 अखेर झालेल्या कामांचा आढावा देखील घेण्यात आला. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या विविध कामांचे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील गोलाणी मार्केट परिसरातून एका तरुणाची दुचाकी लांबविल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, शहरातील गोलाणी मार्केट परिसरातील मुख्य रस्त्यावरून दि ३ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास २७ वर्षीय तरुण अंकुश दल्लू राठोड याची क्र.एम.एच.२०.एफ.के.२३२० दुचाकी २० हजार रुपये किमतीची लांबविल्याची घटना घडली आहे. त्याने तत्काळ जळगाव शहर पोलीस स्थानकात धाव घेत अनोळखी इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्ण्यात आला आहे. पुढील तपास पोना.किशोर निकुंम करीत आहेत.

Read More

पारोळा : प्रतिनिधी शेतकऱ्याला जगाचा पोशिदा म्हणले जाते पण या एका विर्कुत माणसाने एका शेतकऱ्याचा कापूस चोरून नेला आहे. तालुक्यातील उत्रळ येथील एका शेतकऱ्याचा ३० किलो वजनाची कापसाची गोनी चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील उत्रळ येथील शेतकरी पांडुरंग ईश्वर पाटील(वय ४२) धंदा शेती, रा.हिरापूर ता.पारोळा यांच्या जवळील ३० किलो वजनाचा कापुसाची गोणी संशयित आरोपी जगदीश बापू पाटील याने दि २९ रोजी दुपारी ३ ते ४ वाजेच्या दरम्यान चोरली. त्याविरोधात पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.प्रवीण पाटील हे करीत आहेत.

Read More