सध्या राज्यात प्रत्येक शहरातील सर्वच पोलीस स्थानकामध्ये जर जास्तीत जास्त गुन्हे घडत असतील तर ते आहे चोरीचे व त्या चोरीच्या गुन्ह्यातहि मोबाईल चोरीचे प्रमाण सध्याच्या ५ जी च्या युगात भरपूर प्रमाणात वाढलेले आहे. त्यामुळे चोरून नेलेला फोन आपल्या काही महत्वाची माहिती आधीच आपण सुरक्षित ठेवली पाहिजे अन्यथा आपल्या नाहक त्रास होवू शकतो. परंतु, बहुतेक प्रकरणांमध्ये हरवलेला फोन सापडत नाही. अशा स्थितीत फोनचा डेटा तुमच्या बाजूने डिलीट करणे आवश्यक आहे. फोन हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास त्वरित काही पावले उचलावीत अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते. सिम कार्ड ब्लॉक तुमचा फोन हरवल्यास, तुम्हाला सर्वप्रथम सिम ब्लॉक करणे आवश्यक आहे. जेणेकरून कोणीही तुमच्या नंबरचा…
Author: editor desk
नवी दिल्ली : वृत्तसंस्था 26 सप्टेंबरपासून गुरुग्राममधील मेदांता हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा समाजवादी पक्षाचे नेते ८२ वर्षीय मुलायम सिंह यादव यांचे सोमवारी निधन झाले. यादव यांना युरिन इन्फेक्शन झाल्यामुळे बऱ्याच दिवसापासून ते उपचासाथी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखिलेश यादव यांनी समाजवादी पक्षाच्या ट्विटर हँडलवर मुलायम यांच्या निधनाची माहिती दिली. मुलायम यांच्या पार्थिवावर मंगळवारी सैफई येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयामध्ये रुग्णालयात उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे (सपा) संस्थापक मुलायम सिंह यादव यांचं ८२ वर्षांचे असताना मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. या उपचारांदरम्यान त्यांच निधन झालं आहे. मुलायमसिह यादव…
मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात शिंदे गटाने आपला दबदबा आणून राजकीय समीकरण बदलवून टाकले आहेत. अशातच निवडणूक आयोगाने देखील शिवसेना पक्षाचं चिन्ह असलेला धनुष्यबाण गोठवला आहे. यावेळी मातोश्रीवर प्लॅनिंग सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांना प्रमुख विरोधक बनवण्याचं प्लॅनिंग सुरु असल्याचं समोर आलं आले आहे. उद्धव ठाकरे यांना शपातळीवर विरोधक म्हणून ठेवण्याचं प्लॅनिंग – शरद पवार , ममता बॅनर्जी यांसारख्या नेत्यांच्या रांगेत उद्धव ठाकरेंना देशपातळीवर विरोधक म्हणून ठेवण्याचं प्लॅनिंग मातोश्रीवर सुरु असल्याचं म्हटलं जातं आहे. उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रातील जनतेची साहनुभूती मिळेल आणि ज्याप्रमाणे मुघलांच्या काळात मराठ्यांनी दिल्लीचं तख्त हादरवलं होतं, तसेच आव्हान आताच्या दिल्लीलाही मिळेल, असा दावा…
पारोळा : प्रतिनिधी शहरातील एका परिसरातील १७ वर्षीय युवतीस पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, शहरातील एका परिसरात १७ वर्षीय युवती आपल्या आई, वडील व भावासोबत वास्तव्यास आहे. युवती दि ८ रोजी सायंकाळी ५ वाजता दुकानात जावून येते असे सांगून गेल्यावर रात्री ८ वाजेपर्यंत घरी परत न आल्याने वडिलांनी परिसरात विविध ठिकाणी शोध घेतला असता परंतु मिळून न आल्याने वडिलांनी लागलीच पारोळा पोलिसात धाव घेत कुणीतरी अनोळखी विरोधात गुन्हा दाखल करण्या आला आहे. पुढील तपास रविद्र बागुल हे करीत आहेत.
अमळनेर : प्रतिनिधी दुचाकीवरील तरुणांनी घोषणाबाजी केल्याने शहरातील झामी चौकात शनिवारी रात्री दोन गटात दंगल उसळली. यावेळी दगडफेकीत दोन जण जखमी झाले तर ५० जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. घोषणाबाजी करणाऱ्यांना सचिन अशोक महाजन (२५) यांच्यासह काही जणांनी हटकले असता दगडफेक करत शिवीगाळ करण्यात आली. यात सचिन महाजन व मनोज महाजन हे जखमी झाले. तर मध्यस्थी करण्यासाठी आलेल्यांना दगडांचा मार बसला. यातून महिलाही सुटल्या नाहीत. सचिन महाजन यांच्या फिर्यादीवरुन नावीद शेख, नईम पठाण, गुलाब नबी, साहील आणि अन्य ३० ते ३५ जण (सर्व रा. झामी चौक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या गटातर्फे इम्रान अन्सारी याच्या फिर्यादीवरुन…
मुंबई : वृत्तसंस्था देशात लवकरच लागू होणाऱ्या कामगार कायद्यात संघटित आणि बिगर संघटित क्षेत्रातील कामगारांसाठी अनेक तरतुदी समाविष्ट करण्यात आल्या आहेत. त्या कामगारांसाठी फायदेशीर ठरतील. कायदा लागू झाल्यावर एक वर्ष काम केले की कर्मचाऱ्याला ग्रॅच्युइटीचा हक्क लागू होईल. सध्या ग्रॅच्युइटीसाठी किमान ५ वर्षे नोकरीची गरज आहे. निश्चित वेळेपेक्षा १५ मिनिटेही जास्त काम घेतल्यास कर्मचाऱ्यांना ओव्हरटाइम मिळेल. कामगार मंत्रालयाच्या माहितीनुसार, ३१ पेक्षा जास्त राज्यांनी हा कायदा स्वीकारला आहे. नव्या तरतुदी लवकरच लागू होतील. नव्या तरतुदीअंतर्गत आता आठवड्यात ४८ तासांपेक्षा जास्त काम घेतले जाऊ शकत नाही. नियोक्ता आणि कर्मचाऱ्यांच्या सहमतीने कर्मचारी आठवड्यात ४८ तासांचे काम चार दिवसांतही पूर्ण करू शकतील. इतर दिवस…
मुंबई : वृत्तसंस्था निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मोठा दणका दिली आहे. शिवसेनेचे धनुष्यबाण हे राखीव चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतल्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवे चिन्हाचा शोध घेत आहेत. तर दुसरीकडे शिंदे सरकारच्या मदतीला बडनेराचे आमदार रवी राणा धावून आले आहेत. रवी राणा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट मोठी ऑफर दिलीये.. गरज भासल्यास युवा स्वाभिमान पक्ष तुम्ही घ्या अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलंय. अमरावती लोकसभा मतदार संघात नवनीत राणा या पाना हे चिन्ह घेऊन निवडून लढत आल्या आहेत. सभी नटो का एक ही पाना असे रवी राणा यांना म्हटलं…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील मुख्य बाजार असलेले पोलन पेठ परिसरातील एका दुकानातून फटाक्याच्या दुकानातून २ लाख ५४ हजार रुपये लांबविल्याची घटना उघडकीस आल्याने जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी की, शहरातील मुख्य बाजार पेठेतील पोलन पेठेतील महाराष्ट्र फटाका या दुकानातून दि ५ रोजी संध्याकाळी ते दि ६ रोजीच्या सकाळच्या दरम्यान कुणीतरी अनोळखी व्यक्तीने दुकानातील कापडी पिशवीत असलेले २ लाख ५४ हजार रुपये चोरून नेल्याची घटना उघडकीस आल्याने दुकान मालक शब्बीर इलियास अमरेली यांनी दि ८ रोजी जळगाव शहर पोलीसात धाव घेत अनोळखी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोना. विजय निकुंभ हे करीत…
मुंबई : वृत्तसंस्था निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह गोठवलं. या निर्णयामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देण्यात आल्याची चर्चा आहे. यानंतर आता उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला पत्र लिहीत काही नावे आणि काही चिन्हांचा प्रस्ताव ठेवला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेसाठी संभावित चिन्हे कोणती? त्रिशूळ उगवता सूर्य मशाल ठाकरेंनी मागितलेली नावे कोणती? शिवसेना बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रबोधनकार ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दरम्यान, शिंदे गटापुढे तलवार या निवडणूक चिन्हाचा पर्याय असल्याचं सांगितलं जात आहे. तसंच शिंदे गटानेही शिवसेना बाळासाहेब ठाकरे या नावावर दावा सांगितला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा दोन्ही गटांमध्ये वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या…
यावल : प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून तरुणीसोबत शारिरिक संबंध ठेऊन नंतर जबरदस्ती तीचा गर्भपात केल्याची संतापजनक घटना तालुक्यातील एका गावात उघडकीस आली आहे. याप्रकरणी एकाविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश पंढरीनाथ पाटील असे संशयित आरोपीचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे की, २२ वर्षीय पिडीत तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २०२१ ते जुन २०२२ पावेतो वेळोवेळी संशयित आरोपी निलेश पाटील याने पिडीत तरुणीस लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी आजीच्या राहते घरी तसेच संशयित आरोपी निलेश याच्या मालकीच्या खळ्यामध्ये शारिरिक संबंध ठेवले. यातून पिडीत तरुणीला गर्भधारणा झाली. यानंतर निलेश याने पिडीत तरुणीच्या इच्छेविरुध्द गोळ्या-औषधी देऊन तीचा गर्भपात केला. या…

