Author: editor desk

सोने व चांदीचे दर कमी अधिक प्रमाणात होत असल्याने ग्राहक अजूनही खरेदी करण्यासाठी पुढे येत नसल्याचे चित्र बाजार पेठेत दिसू लागले आहे. दरम्यान, अशातच तुम्ही जर सोने चांदी खरेदीची योजना आखात असाल तर जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर किती आहेत? गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सोने चांदीच्या दरात घसरण दिसून आली तर आजही सोने चांदीतही घसरण दिसून आली. आज (11 ऑक्टोबर) 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 47,600 रुपये तर 24 कॅरेट साठी 51,930 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 595 रुपये आहे. देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात राजकीय वारे नको त्या दिशेला वाहिल्याने शिवसेनेच्या नावासह चिन्ह निवडणूक आयोगाने गोठविली, तर दि १० रोजी सांयकाळी ठाकरे गटाला धगधगती मशाल दिल्याने राज्यात ठाकरे गटात एकच जल्लोष करण्यात आला. केंद्रीय निवडणूक आयोगाने १० रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटांना ‘शिवसेना’ नाव तसेच ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह वापरता येणार नाही असं जाहीर केलं आहे. त्यानंतर राज्यात ठाकरे गटाने मिळालेल्या चिन्हाचा वापर करीत जल्लोष केला तर मध्यरात्री उशिरा उद्धव ठाकरे यांच्या व्हॉट्सअप डीपीही बदलविण्यात आला आहे. अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय जाहीर केल्यानंतर दोनच दिवसांनंतर आयोगाने. उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था देशाचे सरन्यायाधीश उदय लळित यांनी पुढील सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या नावाची ११ ऑक्टोबर मंगळवारी शिफारस केली आहे. त्यामुळे लळित यांच्यानंतर सरन्यायाधीशपदावर आणखी एक मराठी व्यक्ती बसणार आहे. सकाळी सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांच्या उपस्थितीत ललीत यांनी चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस करणारं पत्र केंद्र सरकारला पाठवलं. लळित ८ नोव्हेंबरला सरन्यायाधीशपदावरून निवृत्त होत आहेत. केंद्रीय कायदा मंत्रालयाने परंपरेप्रमाणे विद्यमान सरन्यायाधीश लळित यांना पत्र पाठवून त्यांच्या उत्तराधिकाऱ्याच्या नावाची शिफारस करण्यास सांगितलं होतं. यानंतर लळीत यांनी प्रक्रियेनुसार, सर्वोच्च न्यायालयात त्यांच्यानंतर सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्तींची सरन्यायाधीश म्हणून शिफारस केली. धनंजय चंद्रचूड हे सध्या सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती आहेत. ते १० नोव्हेंबर…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था रेल्वे प्रशासनाकडून दिवाळीसाठी चार विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, दरम्यानच्या काळातील गर्दी बघता, गाड्यांमध्ये अधिक वाढ करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. दिवाळी उत्सव पंधरा दिवसावर आहे. कोरोनाच्या दोन वर्षानंतर संपूर्ण देशात दिवाळी मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात येणार. दिवाळीला शाळा, महाविद्यालयाला सुट्ट्या असतात. यामुळे दिवाळीच्या वेळी कामानिमित्त अन्यत्र राहणारे कुटूंब उत्सवासाठी घरी जातात. सुट्ट्यांमध्ये दिवाळीनंतर नातेवाईकांच्या भेटीसाठी, पर्यंटनासाठी नागरिक बाहेर पडतात. प्रवासासाठी नागरिकांची प्राथमिकता रेल्वेला असते. यामुळे दरम्यानच्या काळात रेल्वेवर प्रचंड गर्दी वाढते. हिच बाब लक्षात घेऊन 22 ऑक्टोबरपासून दिवाळीसाठी चार विशेष गाड्या सोडण्यात येणार आहे. अमरावती – जबलपुर दरम्यान नुकतेच गाडीला सुरुवात झाली…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था एकेकाळी कट्टर शिवसैनिक असलेले छगन भुजबळ हे नगरसेवक पदासाठी 1985 साली उभे असताना त्यांना शिवसेनेचे मशाल हे चिन्ह देण्यात आले होते. 2 मार्च 1985 ला विधानसभेची निवडणूक झाली आणि ते शिवसेनेचे एकमेव आमदार झाले. मशाल चिन्हावरतीच छगन भुजबळांनी विजय मिळवला होता. मुंबईतील माझगाव विधानसभा मतदारसंघातून त्यांना निवडणुकीसाठी उभे करण्यात आले होते. त्यानंतर एप्रिलमध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक झाली. 1985 साली दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्वबळावर महापालिका निवडणूक लढविण्याचे ठरविले. त्यावेळीदेखील शिवसेनेचे चिन्ह होते धगधगती मशाल. या चिन्हावर शिवसेनेचे 74 नगरसेवक निवडून आले आणि शिवसेनेची मुंबई महापालिकेत सत्ता आली. मुंबई पालिकेतील या विजयामुळे महाराष्ट्रातील राजकारण पूर्णपणे बदलले व…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी भुसावळ तालुक्यातील बापासह प्रियकराने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना एका खेड्यात घडली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. परिसरातील गावातील सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीची फेसबुकवर एका मुलासोबत ओळख झाली. यातून दोघांमध्ये प्रेम जमले. दोघे जण २९ सप्टेंबर रोजी घरातून पळून गेले. मुलगी उशिरापर्यंत घरी न आल्यामुळे मुलीच्या वडीलांनी पोलिसात तक्रार दिली होती. सपोनि आशिष आडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार नरसिंग चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुजरातमधील सोरटी सोमनाथ येथून या दोघांना ताब्यात घेतले. मुलीला बाल कल्याण समितीकडे सोपविण्यात आले. या समितीकडे मुलीने धक्कादायक जबाब दिला आहे. प्रियकर व वडिलांनी आपल्यावर अत्याचार केल्याचे तिने सांगितले. यावरून वरणगाव पोलिसात प्रियकर व…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था निवडणूक आयोगाने शिंदे गटाची चिन्हे नाकारल्यानंतर शिंदे गटाकडून पुन्हा तीन चिन्हे निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली आहेत. इमेल करून हे तीन पर्याय सादर करण्यात आली आहेत. तळपता सूर्य, ढाल तलवार आणि पिंपळाचे झाड हे तीन पर्याय शिंदे गटाकडून देण्यात आली आहेत. दरम्यान, शिंदे गटाकडून रिक्षा हे चिन्ह सादर करण्यात येणार असल्याची चर्चा होती. दुसरे चिन्ह तुतारी फुंकणारा व्यक्ती आणि तिसरे चिन्ह शंख अशी चर्चा सध्या होत होती पण शिंदे गटाकडून तळपता सूर्य, ढाल तलवार आणि पिंपळाचे झाड हे तीन चिन्ह सादर करण्यात आली आहेत. तर उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने तीन चिन्ह सादर केले होते. त्यामध्ये उगवता सूर्य,…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था निवडणूक आयोगाने शिवसेनेचं ‘धनुष्यबाण’ आणि पक्षाच नाव गोठवलं आहे. त्यामुळे राज्यातील विरोधक ठाकरे गटावर तुटून पडले असल्याचे चित्र सध्या राज्यात पाहायला मिळत आहे. यातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक ट्वीट करत शिवसेनेला टोला लगावला आहे.शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसोबत बंड केल्यानंतर आता पक्षावरच दावा करण्यात आला आहे. हा सर्व वाद आता निवडणूक आयोगाच्या समोर सुरु आहे. अमृता फडणवीस यांनी ट्वीट करत काही सवाल उपस्थित केले आहेत. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का कोणता आहे. पहिला ‘धनुष्यबाण’ चिन्ह गेल्याने, ४० आमदार आणि १२ खासदारांनी साथ सोडली, भाजपाशी असलेले संबंध तुटणे आणि…

Read More

दसरा मेळाव्यापासून शिंदे गटातील मंत्र्यासह नेत्यांनीही आमचा दसरा मेळाव्यास किती गर्दी होती त्यावर टीका टिपणी करत ठाकरे गटाला कमकुवत ठरविण्यात पुढाकार घेतला होता. पंरतु ठाकरे गटाची सदस्याची संख्या बघता शिंदे गटातील सदस्य सख्या कमी असल्याचा दावा होत आहे. आता निवडणूक आयोगाला निर्णय घेणे सोपे जाणार आहे. संघटनेत दोनतृतीयांश फूट पडली आहे का?, ठाकरेंसोबत १० लाख सदस्य १२ लाख प्राथमिक सदस्यांपैकी १० लाख प्राथमिक सदस्य आपल्यासोबत असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या दस्तऐवजात उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे १४ आमदार, १२ विधान परिषद सदस्य, ७ खासदार आणि ३ राज्यसभा सदस्य आपल्यासोबत असल्याचाही दावा केला आहे.…

Read More

केंद्रीय लोकसेवा आयोगने वरिष्ठ डिझाईन अधिकारी ग्रेड-I, वैज्ञानिक ‘B’, कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, सहाय्यक वास्तुविशारद, सहाय्यक प्राध्यापक आणि औषध निरीक्षक पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे सर्व उमेदवार अधिकृत वेबसाइट upsconline.nic.in ला भेट देऊ शकतात आणि त्यांचा फॉर्म भरू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 ऑक्टोबर 2022 आहे. एकूण पदे- ५० शैक्षणिक पात्रता वरिष्ठ डिझाईन अधिकारी ग्रेड-I अर्ज करणार्‍या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून मेकॅनिकल किंवा मरीन इंजिनिअरिंगची पदवी असणे आवश्यक आहे. शास्त्रज्ञ ‘बी’ उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून तीन वर्षांच्या विज्ञान शाखेत रसायनशास्त्र किंवा भौतिकशास्त्र किंवा न्यायवैद्यकशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली असावी. कनिष्ठ वैज्ञानिक…

Read More