केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला ढाल-तलवार तर ठाकरे गटाला मशाल हे नवं निवडणूक चिन्ह अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलं आहे. धनुष्यबाण हे शिवसेनेचं मूळ निवडणूक चिन्ह आणि पक्षाचं नाव तात्पुरत्या स्वरुपात गोठवण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. या निर्णयानंतर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ आणि उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव आयोगाने मंजूर केलं आहे. आयोगाच्या या निर्णयावर बोलताना मुख्यमंत्री शिंदेंनी आमच्याकडे बहुमत असून ‘धनुष्यबाण’ चिन्ह आम्हाला मिळायला हवं होतं असं विधान केलं आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांना एका मुलाखतीमध्ये ‘धनुष्यबाण’ आणि ‘शिवसेना’ हे नाव दोन्ही शिंदे गटाला मिळालं तर काय असा प्रश्न विचारण्यात आला.…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी राज्यात शिंदे गटाने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. शिंदे यांनी नवीन गट स्थापन केल्यापासून अनेक चर्चेन उत आला आहे. तर दुसरीकडे नुकतेच शिंदे व ठाकरे गटाला नवीन नाव व चिन्ह मिळाल्याने आप आपले कार्यकर्ते मोठ्या जल्लोषात आनंद व्यक्त करत असताना जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या एका माजी जिल्हाध्यक्षांनी रात्री उशिरा फेसबुकवर धनुष्यबाण व ‘जय श्री राम’ चा नारा दिल्याने जिल्हात एकच राजकीय खळबळ उडाली आहे. काय आहे फेसबुकवरील पोस्ट? गेल्या दोन दिवसात शिंदे व ठाकरे गटाला चिन्ह मिळाले त्याआधी धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाने गोठविल्यानंतर हे आता पक्षचिन्ह कुणाचे एकाचे सध्या तरी नाही, त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे माजी…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात शिवसेनेत उभी फुट पडल्याचे संपूर्ण राज्याने पाहिली हि इतकी मोठे फुट होती की राज्यातील भरपूर परीवारामध्येही फुट पडायला लागली आहे. एका कार्यक्रमादरम्यान बोलताना नाना पाटेकर यांनी शिवसेनेत झालेल्या गटबाजीबाबत भाष्य केलं आहे. ‘एकनाथराव, राष्ट्रवादी, समाजवादी, काँग्रेस सगळे वेगळे पक्ष. पण, शिवसेना विभागली गेल्यानंतर आमची घरंही विभागली गेली. माझे वडील किंवा भावंड, मुलं यांच्यामध्ये दोन गट पडले आहेत. हे प्रकरण आता तुमच्यापर्यंत मर्यादित न राहता ते वाढत गेलं आहे. त्याचं काय करायचं आम्ही? तुमच्यातली भांडणं कदाचित उद्या मिटतील आमच्यातल्या भांडणांचं काय? तळागाळात, गावागावात ही भांडणं सुरुयेत, पण आमच्यातल्या भांडणांचं काय करायचं?’, हा भाबडा प्रश्न नानांनी एक सर्वसामान्य…
पुणे : वृत्तसंस्था नाशिकमधील बस दुर्घटनेची घटना ताजी असतानाच पुण्यातील हि घटना समोर आली आहे. प्रवाशांनी भरलेली एक खासगी बस पेटली. या बसमधून २६ प्रवासी प्रवास करत होते. या आगीमध्ये ही बस पूर्णपणे जळून खाक झाली असून सुदैवाने या घटनेमध्ये कोणताही जीवितहानी झाली नाही. मात्र भरस्त्यातच या बसने पेट घेतल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. हि घटना बस पुणे जिल्ह्यात घडली असल्याचे समजते. MH 05 DK 9699 क्रमांकांची ही बस होती. घोडेगाव जवळ पिंपळगाव घोडे गावच्या हद्दीत भिवंडी येथून श्री क्षेत्र भीमाशंकरकडे निघालेल्या महिलांच्या बसला आग लागून संपूर्ण बस खाक झाली. भिवंडी पाये गावातील 26 महिला रात्री अकरा वाजता भीमाशंकरकडे…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी सौरव गांगुलीच्या जागी १९८३ च्या ऐतिहासिक विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे सदस्य रॉजर बिन्नी यांची वर्णी लागल्याची शक्यता आहे. १८ ऑक्टोबरला ‘बीसीसीआय’ची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार असून त्याच दिवशी मंडळाची निवडणूक पार पडणार आहे. यादरम्यान तृणमूल काँग्रेसने मात्र गंभीर आरोप केला आहे. पक्षात प्रवेश केला नसल्यानेच भाजपा सौरव गांगुलीचा अपमान करत असल्याचा त्यांचा दावा आहे. तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी म्हटलं आहे की “भाजपाने गतवर्षी विधानसभा निवडणुकीदरम्यान सौरव गांगुली पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगवली होती”. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे चिरंजीव जय शाह ‘बीसीसीआय’च्या सचिवपदी सलग दुसऱ्यांदा कायम राहण्याची…
भोपाळ : वृत्तसंस्था आतापर्यत कोणताच गुन्हा लपून राहत नाही, तो कधी तरी त्याचा शोध लागून पोलीस आरोपीला शोधून काढण्यात यशस्वी होत असतात, परंतु एका व्यक्तीने आपल्या पत्नीची व मुलीची हत्या करून जंगलात गळा दाबून दोघाची हत्या केली होती. तो आरोपी तब्बल २ वर्ष मोकाट फिरला त्याचा कुणालाही संशय आला नसल्याने त्याने चक्क दोन वर्षांनी आपल्या मित्राला भेट एका बियर बार मध्ये बियर पीत असताना आपण त्या गुन्हातून कसे वाचलो याची कहाणी सांगत असताना पोलिसांनी त्याला अटक केली आहे. शिवराज उर्फ राजा चव्हाण असे आरोपीचे नाव आहे. शिवराज एका बियर बारमध्ये मित्रासोबत बियर प्यायला होता. यावेळी त्याने दोन वर्षापूर्वी आपल्या पत्नी…
एरंडोल : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील तरुणीला माझ्याशी लग्न कर अन्यथा मी आत्महत्या करुन तुझ्या नावाची चिठ्ठी लिहून ठेवेल, अशी धमकी देऊन १७ वर्षीय मुलीवर औरंगाबाद येथे नेऊन लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील एका गावातील तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत नोंदवण्यात आली होती. बेपत्ता असलेली तरुणी व एक युवक औरंगाबाद येथील जोगेश्वरी नगरात असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. एरंडोल पोलिसांचे पथक औरंगाबाद येथे गेले असता त्यांना पीडीत युवती व संशयित दिनेश बाबूलाल पवार आढळले. त्यावेळी पीडीतेने पोलिसांना आपबिती सांगितली. ३ रोजी संशयिताने पीडीतेस धमकावून औरंगाबाद येथे नेले. जोगेश्वरी नगरात भाड्याने खोली घेऊन त्याने तिच्यावर अत्याचार केला.…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पिक विमा व अतिवृष्टी वंचित महसूल मंडळांना अनुदान मिळण्याच्या मागणीसाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, सन २०२१-२२ या खरीप हंगामात झालेल्या अति पर्जन्यवृष्टीमुळे महसूल मंडळ सोनवद व इतर मंडळांना अतिवृष्टीचा फटका बसला शासनाने अतिवृष्टी तसेच पिक विमा देण्याचे जाहीर केले होते परंतु धरणगाव तालुक्यातील काही महसूल मंडळांना अद्याप लाभलेला नाही, हा तालुक्यातील शेतकन्यांवर अन्याय झालेला आहे व त्या सोबत किंचित शेतकऱ्यांना तोंडाला पाने पुसणे या सारखा अल्प असा पिक विम्याचा लाभ मिळालेला आहे. हे विषय प्रदिर्घ दिवसांपासून प्रलंबित असून लवकरात लवकर शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा. संततधार पावसाने शेतकऱ्यांचे पार कंबरडे…
धरणगाव : प्रतिनिधी धरणगाव शहरातील शिवसेनेच्या ठाकरे गटातर्फे आज दि ११ ऑक्टोबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ दुपारी ११ वाजता निवडणूक आयोगाचा निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, उद्धवसाहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशा कार्यकर्त्यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. या आंदोलनाचे नेतृत्व माजी नगराध्यक्ष तथा युवा सेना जिल्हा प्रमुख निलेश चौधरी यांनी केले. ४० गदारांच्या खांद्ययावर बंदूक ठेवून केद्र सरकार निवडणूक आयोगाचा वापर करून शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्ह गोठविले आहे, तुम्ही धनुष्यबाण गोठवू शकतात शिवसेना नाव गोठवू शकतात पण स्व.बाळासाहेबांनी जे जनतेच्या मनामध्ये कोरलेले नाव आहे ते मिटवू शकत नाही अशी विनंती वाघ…
मुंबई : वृत्तसंस्था तरुणाकडे पात्रता असेल तर तात्काळ अर्ज करा.IRCTC मध्ये नोकची मोठी संधी उपलब्ध झालेली आहे. IRCTC ने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर 80 शिकाऊ प्रशिक्षणार्थी पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. येथे IRCTC भर्ती 2022 अर्ज प्रक्रिया, वयोमर्यादा, पात्रता आणि इतर तपशील देण्यात आला आहेत. जर तुम्ही वेगवेगळ्या ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्रासह मॅट्रिक पास असाल तर तुम्हाला रेल्वे जॉब्स अंतर्गत जारी केलेल्या संधीचा लाभ घेण्याची संधी आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडने संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंटमध्ये अप्रेंटिसशिप कायदा 1061 अंतर्गत शिकाऊ प्रशिक्षणार्थी अंतर्गत 80 शिकाऊ नोकऱ्यांसाठी अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी 25 ऑक्टोबर 2022पर्यंत…

