Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या १५ दिवसांतच सोने २ हजार ५०० तर चांदीच्या दरात ७ हजार रुपयांनी घसरण झाली. अनंत चतुर्दशीनंतर सोने खरेदीचा मुहूर्त थेट ५ ऑक्टाेबरला दसऱ्याच्या दिवशीच आहे. त्यामुळे ग्राहकांची पावले सुवर्णपेढ्यांकडे वळली. पक्ष पंधरवडा संपला की साेन्याच्या दरात वाढ हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या वर्षी दसऱ्याच्या दिवशी ५५ हजार रुपये एक ताेळा (१० ग्रॅम) या दराने साेने विकले गेले. यंदा त्याहूनही पुढे जाण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. त्यामुळे गणेशाेत्सव काळातच साेन्या-चांदीची ही खरेदी सुरू झाली. सोने : ५३ हजारांवरून ५१ हजार (प्रतिकिलोचा हा दर आहे) १३ ऑगस्ट : ५३ हजार २०० १६ ऑगस्ट : ५२ हजार…

Read More

जळगाव : प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जनसंवाद आणि पत्रकारिता विभागात ‘डिप्लोमा इन जर्नालिझम’ आणि एम.ए. एम.सी.जे. (जनसंवाद आणि पत्रकारिता) या कौशल्य आधारित व रोजगारभिमुख पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.ऑनलाईन प्रवेशाची अंतिम मुदत दि. 15 सप्टेंबर 2022 आहे. डिप्लोमा इन जर्नालिझम’ हा बारावी नंतरचा एक वर्षीय अभ्यासक्रम विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागात यावर्षी पासून प्रथमच सुरु करण्यात आला आहे. ‘डिप्लोमा इन जर्नालिझम’ ला प्रवेश घेण्यासाठी इयत्ता बारावीत किमान 40 टक्क्यांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.तसेच ‘एम.ए. एम.सी.जे. (जनसंवाद आणि पत्रकारिता)’ हा दोन वर्षीय पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमात ऑडिटकोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना इतरही अधिकचे कौशल्य शिकता येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना…

Read More

पातोंडा ता. अमळनेर (प्रतिनिधी) चाळीसगाव येथे आयोजित विज्ञात प्रदर्शनात राष्ट्रीय विद्यालय संचलित माध्यमिक विद्यालय पातोंडा शाळेच्या ‘जलविद्युत निर्मिती’ प्रकल्पाला तालुकास्तरावर पहिला क्रमांक मिळाला व जिल्ह्यावर निवड झाल्यामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. ’49 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन”च्या निमित्ताने गुड शेफर्ड अकॅडमी चाळीसगाव येथे आयोजित विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातुन शेकडो नवनवीन संकल्पना असलेले प्रोजेक्ट, मॉडेल, विद्यार्थ्यांनी मांडले होते. ह्यासोबतच माध्यमिक विद्यालय पातोंडा मा. मुख्याध्यापक एम.बी.विसपुते(अण्णा)ह्यांच्या मार्गदशनाखाली शाळेने 6 वी ते 8वी माध्यमिक गटातून व 9वी ते 12 वी उच्चमाध्यमिक गटातून प्रत्येकी 2 मॉडेल्स ठेवले होते. त्यापैकी मोठ्या गटातून इयत्ता 10 च्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या “जलविद्युत निर्मिती” प्रकल्पाला तालुकास्तरावर पहिला क्रमांक…

Read More

औरंगाबाद : वृत्तसंस्था घरा शेजारील महिला, तिचा पती, मुलगा सतत त्रास द्यायचे. त्यांना जाब विचारणे सोडून पती शेजारच्या महिलेची बाजू घेऊन आपल्या बायकोलाच त्रास द्यायचा. या सर्वांच्या जाचाला कंटाळून ३४ वर्षीय सविता दीपक काळे या महिलेने गुरुवारी थेट पोलिस आयुक्तालयात जाऊन पेटवून घेतले. आज दि २ रोजी उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. ७० टक्के भाजल्याने तिची प्रकृती गंभीर होती. सविस्तर वृत्त असे की, ‘माझा नवरा माझी बाजू घेत नाही. तो शेजारच्यांची बाजू घेत हाेता. पोलिस कर्मचाऱ्याची धमकी देऊन तो माझ्यावर दबाव आणत होता. त्यामुळे मी कंटाळले आहे. पोलिसांनी समजूत घालूनही माझा नवरा सुधारला नाही. त्यामुळे मला जगायचाच कंटाळा आलाय. त्यामुळे…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था कोची येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज भारताची पहिली स्वदेशी युद्धनौका INS विक्रांत भारतीय नौदलात सामील करण्यात आली. यावेळी नरेंद्र मोदी यांनी भारतीय नौदलाच्या नवीन ध्वजाचे अनावरण केले. त्यावेळी त्यांनी हा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित केला आहे. नवीन ध्वजाचं छत्रपती शिवाजी महाराजांशी एक खास कनेक्शन आहे. स्वराज्याच्या राजमुद्रेतून प्रेरणा घेत नव्या चिन्हाच अनावरण करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोचीमध्ये नौदलाच्या नव्या ध्वजाचं अनावरण केलं. हे करत असताना त्यांनी हा नवा ध्वज नौसेनेचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित केला आहे. सध्याच्या ध्वजामध्ये सेंट जॉर्जचा क्रॉस लावण्यात आला होता. तसंच एका कोपऱ्यामध्ये तिरंगाही लावण्यात आला…

Read More

जळगाव: प्रतिनिधी शहरातील कुंभार वाड्यात दि ३१ रोजी मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घराबाहेर उभ्या दुचाकीवर पेट्रोल ओतून पेटवून दिल्याची घटना घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला होता. सविस्तर वृत्त असे की, शहरातील शनिपेठ परिसरात असलेल्या कुंभार वाड्यातील रहिवासी अमीर जावेद खाटीक हे आपल्या परिवारासोबत येथे वास्तव्यास आहेत. मटण-चिकन विक्रीचा व्यवसाय करुन कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालवतात. बुधवारी (ता. ३१) अमीर खाटीक कुटुंबीयांसह बाहेरगावी मध्यप्रदेशात गेले होते. घरबंद असल्याची संधी साधत मध्यरात्री अडीच ते तीन वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तींने त्यांच्या घराबाहेर उभी मोटारसायकल पेटवून दिल्याची घटना घडली. मोटारसायकल पेटवल्याने आगीचा भडका उडून घराचा काही भागही जळाला आहे.सकाळी खाटीक कुटुंबीय परतल्यावर त्यांना…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था शिंदे सरकारच्या पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेस नेत्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेनंतर आता महाराष्ट्र काँग्रेसमध्ये वादळ उठण्याची चिन्हं आहेत. येत्या ऑक्टोबर महिन्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. या विस्तारात काँग्रेसमधील एका गटाला स्थान मिळण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र काँग्रेसमधील खळबळ विधानपरिषद निवडणुकीपासूनच दिसलेली आहे. काँग्रेसमधील काही मंत्र्यांसह आमदारांचा गट फुटण्याची चर्चा विधानपरिषद निवडणुकीच्या निकालापासूनच राजकीय वर्तृळात सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसमधील गट फुटून शिंदे गटात सामिल झाला तर काँग्रेसमधील काही माजी मंत्र्यांना नव्या सरकारमध्ये संधी मिळणार का? याकडे लक्ष आहे. विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची फाटफूट नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसमधील फाटाफूट समोर आली होती. काँग्रेसची मतं…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरु असताना नाशिकमध्ये मात्र मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सिन्नरला ढगफुटी सदस्य पाऊस झाल्याने संपूर्ण गावांची आणि तालुक्यांची दाणादाण उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुसळधार पावसामुळे सर्व जनजीवन विस्कळीत झाले असून जिल्ह्यात रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे. रात्री पाण्याखाली गेलेल्या तालुक्यांमधील पुलांवरून पाणी ओसरण्यास आता सुरुवात झाली आहे. सिन्नरच्या देवपूर रस्त्यावरील देवनदीवरील पूलदेखील वाहून गेल्याची माहिती आहे. मुसळधार पावसामुळे अनेक नागरिकांच्या घरातही पाणी शिरल्याच्या घटना समोर आल्या आहे. पूल वाहून गेल्याने मोठा ट्रक पाण्यात अडकला असल्याची माहिती तर यामुळे वाहतूकही विस्कळीत झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात काही भागांमध्ये पाऊस आहे तर…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून भाजप व मनसे नेत्यांच्या भेतीगाठी मोठ्या प्रमाणात वाढल्याने राज्यात मनसे व भाजप युती होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. त्याबाबत राज्यातील शिंदे गटाचे मुख्यमत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत भाजपचे काही नेत्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावर भेटीगाठी सुरु आहेत. पण आता ५ सप्टेंबर रोजी भाजप नेते अमित शहा सुद्धा मुंबई दौऱ्यावर येत असून भाजप मनसे युतीचे नारळ ५ रोजीच फुटणार असल्याचे चिन्ह आहे. शिंदे-भाजप-मनसे या तीन पक्षांची हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकी होण्याची चिन्हं आहेत. अमित शाह ५ सप्टेंबर रोजी मुंबईत येणार आहेत. यंदा गणेशोत्सवावर कोणतेही निर्बंध नसल्याने ते लालबागचा राजा…

Read More

चोपडा : प्रतिनिधी शहरातील त्र्यंबकनगरातील रहिवासी विद्या प्रल्हाद पाटील (वय ४५, मूळ रा. पिंपळेसिम, ता. धरणगाव) या महिलेने गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास गावाजवळील निमगव्हाण नदीच्या पुलावरून उडी विद्या पाटील मारून आत्महत्या केली. तालुक्यातील वर्डी माध्यमिक शाळेचे क्रीडा शिक्षक प्रल्हाद गोपीचंद पाटील यांच्या त्या पत्नी होत. तांदलवाडी व निमगव्हाणदरम्यान तापी नदीपात्रात शिवरस्त्याजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला. तांदलवाडी गावातील पट्टीच्या पोहणाऱ्यांनी मृतदेह बाहेर काढला. तापी नदी सध्या दुथडी भरून वाहत असल्याने पुलापासून एक किमी अंतरावर मृतदेह आढळला. मृतदेह चोपडा उपजिल्हा रुग्णालयात आणला गेला. आज शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. मृत विद्या पाटील यांना जवळच्या ओळखीच्या एका व्यक्तीने पायी…

Read More