जळगाव (जिमाका) : ‘स्वच्छ भारत अभियान 2. 0’ हे अभियान विविध उपक्रमाद्वारे राबवले जात आहे. हे अभियान सवयीचा भाग होण्याची गरज असून गावांमध्ये स्वच्छतेचे सातत्य कायम राहावे, ग्रामस्थांचे आरोग्य सुधारावे यासाठी गावातील प्रत्येक कुटुंबाला स्वच्छतेचे महत्व पटणे यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी ग्रामस्थांनी सक्रिय पुढाकार घेतल्यास गावाचा विकास अधिक गतीमान होवू शकतो, असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. पाळधी येथे जिल्हास्तरीय स्वच्छ भारत अभियान 2. 0 च्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते, कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया हे होते. जिल्हयाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते स्वच्छ भारत अभियान २.० चे पोस्टर…
Author: editor desk
धुळे : वृत्तसंस्था धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर महाजन हे पहिल्यांदाच धुळ्यात आले होते. ‘उद्धव ठाकरे हे कधी कोणाला मुख्यमंत्री बनवणार होते तर कधी कोणाला मुख्यमंत्री बनवणार असल्याचं सांगताय. मात्र प्रत्यक्षात उद्धव ठाकरे यांना स्वतःलाच मुख्यमंत्री व्हायचं होतं, त्यामुळे सत्ता गेल्यानंतर ते आता मुख्यमंत्रिपदाच्या नावाने गुदगुल्या करत आहे. सत्ता गेल्यामुळे आता या सर्व गंमतीजमती केल्या जात असल्याची टीका महाजन यांनी केली. ‘खडसेंनी यांनी आधी आत्मपरीक्षण केले पाहिजे. त्यांनी केलेले अनेक पराक्रम आता समोर येत आहेत. पक्षात जाती पातीच्या आधारे नव्हे तर गुणांच्या आधारे संधी दिली जाते, असे सांगत खडसेच्या टिकेला महाजनांनी उत्तर दिले आहे. यावेळी त्यांनी ‘त्या’व्हायरल झालेल्या क्लिपबद्दल स्पष्टीकरण दिलं…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दि १४ रोजी दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत देशातील गुजरात विधानसभा आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुक तर महाराष्ट्रातील मुंबई महानगर पालिका या निवडनुकीची मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी याची घोषणा केली. आयोगाच्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशात ६८ विधानसभा मतदारसंघांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे. यासाठी २५ ऑक्टोबर २०२२ हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटा दिवस असेल. २७ ऑक्टोबरला अर्जांची छाननी होईल, तर २९ ऑक्टोबर हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असेल. त्यानंतर १२ नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार असून ८ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. आयोगाच्या माहितीनुसार, हिमाचर प्रदेशात ६८ विधानसभा मतदारसंघांसाठी ही…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एमआयडीसी परिसरातील एका कॉलनीतून १७ वर्षीय मुलीस पळवून नेल्याप्रकरणी अनोळखी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, शहरातील एका कॉलनीतील १७ वर्षीय युवती १३ वीचे शिक्षण घेत होती. तिला दि १३ रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास युवतीस तिच्या घरातून फूस लावून पळवून नेल्या प्रकरणी युवतीच्या पालकांनी तत्काळ एमआयडीसी पोलिसात धाव घेत दि १३ रोजी पहाटे अनोळखी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोउनी दीपक जगदाडे हे करीत आहेत.
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतात 5G तंत्रज्ञान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १ ऑक्टोबर रोजी लॉन्च करण्यात आलं होतं. सुरुवातीला देशातील काही निवडक मेट्रो शहरांमध्येच ही सेवा उपलब्ध असणार आहे. त्यानंतर सन २०२४ पर्यंत ही सेवा संपूर्ण देशभरात लागू होणार आहे. आपल्या देशात लॉन्च झालेलं हे तंत्रज्ञान इतर देशांतून आयात केलेलं नाही ते संपूर्ण स्वदेशी आहे. त्यामुळं भारतीयांना या कामगिरीसाठी अभिमान वाटला पाहिजे, असंही यावेळी सीतारामण यांनी म्हटलं. अमेरिकेतल्या वॉशिंग्टन इथल्या जॉन्स पॉपकिन्स स्कूल ऑफ अॅडव्हान्स इंटरनॅशनल स्टडीजच्या विद्यार्थ्यांशी गुरुवारी बोलताना त्यांनी हे सूचक विधान केलं. सीतारामण म्हणाल्या, भारतानं लॉन्च केलेल्या 5G तंत्रज्ञानासाठी काही भाग दक्षिण कोरियातून मागवण्यात आले आहेत,…
मुंबई : वृत्तसंस्था अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात निवडणूक होत असून, ऋतुजा लटके आणि मुरजी पटेल यांच्यातच थेट लढत होणार, हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ऋतुजा लटके आज महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थित अर्ज दाखल करणार आहेत. येथे होणाऱ्या महाविकास आघाडीच्या रॅलीमध्ये आदित्य ठाकरेंसह नेते मंडळी आपले शक्तीप्रदर्शन करणार तर दुसरीकडे भाजपच्या उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी आशिष शेलार उपस्थित राहणार आहे. तत्पूर्वी रॅली काढून शक्तीप्रदर्शनही महाविकास आघाडीच्या वतीनं केलं जाणार आहे. दुसरीकडे मुरजी पटेल १३ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार होते. तेही आज अर्ज दाखल करणार आहेत. शिवसेनेतल्या…
जळगाव : प्रतिनिधी नूतन मराठा महाविद्यालय जळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतर महाविद्यालयीन हॉलीबॉल स्पर्धेत लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयातील मुलांच्या संघाने तृतीय क्रमांक प्राप्त केला . सदर संघात भावेश शिंदे, यश जंजाळे, अक्षय सोनार, हर्षद भोसले, चेतन नेमाडे, गणेश बाविस्कर, पियुष त्रिभुवन यांचा समावेश होता. सर्व खेळाडूंना सोमेश आटोळे दर्शन आटोळे व जयंत साबळे यांचे मार्गदर्शन लाभले सर्व खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष माननीय आमदार शिरीषदादा चौधरी, संस्थेचे सचिव प्राचार्य पी. आर. चौधरी सर, संस्थेचे उपाध्यक्ष सुनील पाटील सर, संस्थाचालक सदस्य माननीय विनय पाटील सर, चंदन दादा अत्तरदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राकेश चौधरी सर, क्रीडा समन्वयक प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन व…
मुंबई : वृत्तसंस्था शिवसेनेचे चिन्ह गोठविल्यानंतर पुन्हा ठाकरे गटाचे माजी आमदार अवधूत तटकरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये अवधूत तटकरे भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हा एका उद्धव ठाकरेंना मोठा धक्का म्हणावा लागेल एकीकडे उद्धव ठाकरे आणि इतर पदाधिकाऱ्यांकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला लागलेली गळती रोखण्याचा प्रयत्न सुरू असतानाच दुसरीकडे मात्र, नेत्यांचे शिंदे गट आणि भाजपात प्रवेश सुरू असल्याचं दिसून येत आहे. अवधूत तटकरे हे ठाकरे गटाचे रोहा- श्रीवर्धन मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. त्याचबरोबर ते राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे यांचे पुतणेही आहेत. अवधूत तटकरे आपल्या समर्थकांसोबत आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या…
नाशिक : वृत्तसंस्था टोमॅटोचे भाव आता वाढू लागल्याचे आहेत. पिंपळगाव बाजार समितीत बुधवारी ८८१ प्रति क्रेट्सचा दर देण्यात आला होता. राज्यात काही भागात तीन ते चार दिवसांपासून जोरदार पाऊस पडल्याने टोमॅटोचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता टोमॅटोचे भाव भिडले गगनाला असल्याचे चित्र दिसू लागले आहे पिंपळगाव बाजार समितीत बुधवारी दि १२ रोजी टोमॅटोला चालू हंगामातील सर्वाधिक ८८१ प्रति क्रेट्सचा दर मिळाल्याने उत्पादकांत समाधानाचे वातावरणात दिसून येत आहे. यामुळे आवक घटल्याने पुढील काही काळात दर आणखी वाढणार असल्याचा अंदाज व्यापारी वर्गाने वर्तवला आहे. गत काही दिवसांपूर्वी सुरू असलेल्या पावसामुळे टोमॅटो पिकाचे नुकसान झाले आहे. परिणामी आवकेत घट झाल्याने टोमॅटोला चांगला…
चाळीसगाव : प्रतिनिधी एकमेकाकडे पाहण्याच्या शुल्लक कारणावरून वाद घालत शिवीगाळ करीत लोखंडी रॉडने मारहाण झाल्याने एक १८ वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे.याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथे दि,१२ रोजी एकमेकांकडे बघण्याच्या शुल्लक कारणावरून पाच जणांनी एका तरुणाचा चाकूने खूपसून खून केल्याची घटना घडली आहे. तर घटनेत भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या मयताचा काका देखील जखमी झाला आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेत पाच पैकी काही आरोपींना ताब्यात घेतले. या घटनेनतंर गावात तनावाचे वातावरण असल्यामुळे रात्रीच पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. बुधवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास सय्यद मुसा खाटीक…

