Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अल्पवयीन मुलीला एरंडोल येथून औरंगाबाद नेले अन अत्याचार
    एरंडोल

    अल्पवयीन मुलीला एरंडोल येथून औरंगाबाद नेले अन अत्याचार

    editor deskBy editor deskOctober 12, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    एरंडोल : प्रतिनिधी

    तालुक्यातील एका गावातील तरुणीला माझ्याशी लग्न कर अन्यथा मी आत्महत्या करुन तुझ्या नावाची चिठ्ठी लिहून ठेवेल, अशी धमकी देऊन १७ वर्षीय मुलीवर औरंगाबाद येथे नेऊन लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    तालुक्यातील एका गावातील तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत नोंदवण्यात आली होती. बेपत्ता असलेली तरुणी व एक युवक औरंगाबाद येथील जोगेश्वरी नगरात असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. एरंडोल पोलिसांचे पथक औरंगाबाद येथे गेले असता त्यांना पीडीत युवती व संशयित दिनेश बाबूलाल पवार आढळले. त्यावेळी पीडीतेने पोलिसांना आपबिती सांगितली. ३ रोजी संशयिताने पीडीतेस धमकावून औरंगाबाद येथे नेले. जोगेश्वरी नगरात भाड्याने खोली घेऊन त्याने तिच्यावर अत्याचार केला. संशयित पवारविरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश आहिरे तपास करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगावातील गुटखा तस्करीवर पोलिसांची मोठी कारवाई !

    June 10, 2026

    अमळनेरच्या डॉ. सुमित पाटील यांचा लखनऊ येथे अपघातात मृत्यू

    June 10, 2026

    लग्नातील किरकोळ वादाचे हिंसक रूप; दोन गटांत तलवारी व लोखंडी पाईपने हल्ला

    June 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.