मुरादाबाद : वृत्तसंस्था मुरादाबादेतील आर्यवीर संमेलनात योगगुरू बाबा रामदेव चांगलेच संतापलेले दिसून आले त्यांनी यावेळेस बॉलिवूडमधील शाहरुख खान, आमीर खान पासून अभिनेत्रींचा चांगलाच समाचार यावेळी त्यांनी घेतला योगगुरू बाबा रामदेव म्हणाले की, बॉलिवूडमधील शाहरुखचा मुलगा ड्रग्ज घेताना पकडला गेला. तो तुरुंगात गेला. सलमानही ड्रग घेतो. आमीर घेतो की नाही माहिती नाही बॉलिवूडच ड्रग्जच्या विळख्यात सापडले आहे. अभिनेत्रींचे तर देवच जाणो, असे वादग्रस्त विधान यांनी केले आहे. इस्लाममध्ये कुणी मद्यपान केले तर तो अपवित्र होतो. पण जिन्ना मद्यपान करत होते. ते वारले…चांगले झाले. इस्लाममध्ये मद्यपानाविषयी कठोर नियम आहे. त्यामुळे ते बिडी-सिगारेटची नशा करतात. आज संपूर्ण देशात आर्य समाज हा एकमेव पवित्र…
Author: editor desk
नवी दिल्ली : वृत्तसंस्था एका विद्यार्थिनीला परीक्षेत शिक्षकाने कॉपीच्या संशयावरून कपडे काढण्यास भाग पाडले. यामुळे व्यथीत झालेल्या मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हि घटना झारखंडमधील जमशेदपूर येथे घडली आहे. या घटनेनंतर इयत्ता ९ वीच्या विद्यार्थीनीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या तिची प्रकृती चिंताजनक आहे. पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शिक्षकाला संशय आला की विद्यार्थिनी तिच्या गणवेशात पेपर चिट लपवून ठेवली आहे. विद्यार्थिनीने म्हटलं की, शिक्षकाने तिचा अपमान केला. जोरदार प्रतिकार करूनही कपड्यात चिट लपवल्याचा दावा करत वर्गाशेजारील एका खोलीत तिचे कपडे काढायला लावले. शिक्षकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.
अल्पावधीतच सुपरहिट झालेला चित्रपट म्हणजे संजय लीला भन्साळी दिग्दर्शित आणि आलिया भट्टची प्रमुख भूमिका असलेल्या ‘गंगुबाई काठीयावाडी’ या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली. आलियाने या चित्रपटात स्मगलिंग आणि वेश्या व्यवसाय करणाऱ्या गंगुबाईची भूमिका साकारल्याने तिला ट्रोलही केले गेले. पण चित्रपट पाहून आणि विशेष करून आलियाचा अभिनय पाहून सर्वांचीच बोलती बंद झाली. या चित्रपटाला आणि पर्यायाने आलियाला देखील प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. आता हा चित्रपट घरबसल्या पाहता येणार आहे. आज, १५ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता पाहा ‘गंगुबाई काठियावाडी’चा वर्ल्ड टीव्ही प्रीमिअर ‘झी सिनेमा’वर होणार आहे. त्या निमित्ताने आलियाची बातचीत करण्यात आली. तेव्हा अजूनही मी गंगुबाईला माझ्यापासून वेगळं करू शकले…
मुंबई : वृत्तसंस्था अंधेरी पूर्व येथील पोटनिवडणुकीबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटील अचानक गेल्याने राज्यात एकच राजकीय खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर मनसे भाजप आणि शिंदे गटाच्या युतीला पाठिंबा देणार का याकडे लक्ष असणार आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपकडून मुरजी पटेल आणि ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या निवडणुकीत दुरंगी लढत होणार आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मनसे स्वबळावर लढणार असून भाजपसोबत युती करणार नसल्याचं पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यानंतर आता अंधेरी पोटनिवडणुकीत मनसे कुणाला पाठिंबा देणार याकडे लक्ष लागलेले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर राज ठाकरे त्यांची भेट घेणार…
मुंबई : वृत्तसंस्था गुजरातच्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपले मैदान तयार केले आहे, यात भाजपनेही या लढतीसाठी पूर्ण ताकद पणाला लावली असून, गृहमंत्री अमित शाहांनी शनिवारी अहमदाबाद येथून परदेशात स्थायिक असलेल्या गुजराथी नागरिकांना विशेष आवाहन केले आहे. यावेळी त्यांनी भाजप सरकारने गुजरातच्या विकासासाठी काम केले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातला जागतिक स्तरावर वेगळी ओळख दिली आहे. शहा म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या विजयात परदेशी गुजरातींनी (NRGs) नेहमीच मोलाचे योगदान दिले आहे. गुजरातमधील खेड्यापाड्यातील रहिवासी हे लोक रोल मॉडेल म्हणून ओळखतात हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे परदेशात स्थायिक असलेल्या एनआरआय नागरिकांनी भाजप आणि नरेंद्रभाईंचा संदेश आणि देशाच्या विकासाचा…
धरणगाव : प्रतिनिधी वाचन प्रेरणा दिवस म्हणून लिटल ब्लॉसम शाळेत साजरा करण्यात आला. यावेळी माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम साहेब यांच्या सारखे व्यक्ती पुन्हा होणार नाहीत असे प्रतिपादन श्री.पवार यांनी मनोगत व्यक्त करतांना केले. माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल यांच्या ९१ वी जयंती म्हणजेच वाचन प्रेरणा दिवस म्हणून लिटल ब्लॉसम शाळेत अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित धरणगांव पोलिस स्टेशन चे पि.एस.आय. संतोष पवार साहेब व कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते मा.सुनिल भाऊ चौधरी.,लिटल ब्लॉसम शाळेचे अध्यक्ष मा.दिपक आबा जाधव., शाळेचे प्रिन्सिपल दिपक तावडे.,व महाराष्ट्र न्युज चॅनल चे संचालक व पत्रकार विजय पाटील तसेच सर्व विद्यार्थ्यांना व शाळेचे…
मुंबई : वृत्तसंस्था नुकताच कोजागिरीचा सन उत्साहात पार पडला यावेळी दुधाचे भाव जरी स्थिर असले तरी ऐन दिवाळीच्या तोंडावर अमूल दूध दरात प्रती लिटर दोन रूपयांची वाढ होणार आहे. डाळ, तेल आणि महत्त्वाच्या वस्तूवरील वाढत्या भावाबरोबरच दुधाचेही भाव वाढल्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. सध्या अमूलच्या एका लीटर दुधासाठी ६१ रूपये मोजावे लागत होते. त्यानंतर आता एका लिटर दुधासाठी ६३ रूपये मोजावे लागणार आहेत. तर आजपासून अमूलने ही दरवाढ लागू केली आहे. त्यामुळे ग्राहकांना दिवाळीच्या तोंडावर महागाईच्या झळा सहन कराव्या लागणार आहेत. दरम्यान, डाळी, तेल आणि महत्त्वाच्या खाद्यपदार्थांच्या भावात नुकतीच वाढ झाल्यामुळे ग्राहकांना त्याचा फटका बसणार आहे. तर दिवाळी तोंडावर…
मुंबई : वृत्तसंस्था केवळ कोपरगावच्या 200 प्रतिज्ञापत्रांमध्ये काहीही बेकायदेशीर आढळून आले नाही. उर्वरित ४४८२ प्रतिज्ञापत्रांचा तपास सुरू आहे, मुंबई गुन्हे शाखेने बोगस प्रतित्रापत्रप्रकरणी ठाकरे गटाला क्लिन चीट दिलेले नाही. या प्रकरणाचा तपास सुरू आहे, अशी माहिती मुंबई गुन्हे शाखेतील सुत्रांनी दिली आहे.असे मुंबई गुन्हे शाखेतर्फे सांगण्यात आले आहे. आज काही वृत्तवाहिन्या तसेच वृत्तसंकेतस्थळांवर बोगस प्रतिज्ञापत्रप्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखेने पूर्ण केला असून ठाकरे गटाला पूर्ण क्लिन चीट दिल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, मुंबई गुन्हे शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी याबाबत संपर्क केला असता त्यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. मुंबई गुन्हे शाखेतील अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिसांना मुंबईत 4, 682 बनावट शपथपत्रे आढळून…
चोपडा : प्रतिनिधी धरणगावच्या एका तरुणाची शहरातील महात्मा फुले नगरातील रहिवासी सैयद तनवीर सैयद रहीम यांच्या घरासमोरून क्रुझर चारचाकी चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चोपडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, धरणगावातील गुजराथी गल्लीतील रहिवासी पवन सुरेश कासार यांच्या मालकीची चारचाकी चोपडा शहरातील महात्मा फुले नगरातील सैयद तनवीर सैयद रहीम यांच्या घरासमोरून साधारण पावणे चार लाख रुपये किंमत असलेली क्रुझर ही चारचाकी कुणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना दि ९ रोजी रात्री घडली आहे. याप्रकरणी गाडीचे मालक पवन सुरेश कासार यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना.किरण गाडीलोहार…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एमआयडीसी परिसरातील पंढरपूर नगरातून १४ वर्षीय मुलास अनोळखीने पळवून नेल्याची घटना घडली आहे, या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील एमआयडीसी परिसरातील पंढरपूर नगरातील रहिवासी असलेले परिवारातील १४ वर्षीय मुलगा १० मिनिटात जावून येतो असे सांगून दि १३ रोजी गेला असता त्यानंतर दि १४ पर्यत घरी परत न आल्याने पालकांनी तत्काळ एमआयडीसी पोलिसात धाव घेत अनोळखी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पीएसआय निलेश गोसावी हे करीत आहेत.

