मुंबई : वृत्तसंस्था काँग्रेस नेते राहुल गांधी यांची कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रा ७ नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील देगलूरमार्गे महाराष्ट्रात दाखल होत आहे. १० नोव्हेंबर रोजी यात्रेचे नांदेड शहरात आगमन होणार आहे. सायंकाळी नवा मोंढा येथे सभा होणार आहे, अशी माहिती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. चव्हाण म्हणाले, एकता, अखंडता, बंधुभाव आणि लोकशाही टिकवण्यासाठी ही यात्रा काढण्यात येत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून तरुण मुले-मुली, ज्येष्ठ नागरिक आणि महिला भगिनींचा उत्स्फूर्त सहभाग मिळत आहे. बेरोजगारी, महागाई, दडपशाहीसारख्या मुद्द्यांवर लोक स्वतःहून आपल्या व्यथा राहुलजींकडे मांडत आहेत. सर्वसामान्यांत यात्रेबद्दल प्रचंड उत्सुकता, आकर्षण आहे. केवळ काँग्रेसचीच ही यात्रा नाही तर सर्वपक्षीय…
Author: editor desk
रक्तदान केल्याने दुसऱ्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो हे तर आहेच पण जो रक्तदान करतोय त्याचे आरोग्यही उत्तम असते. ‘रक्तदान हे श्रेष्ठदान’ असं म्हटलं जातं. कारण रक्तदानामुळे लाखो लोकांना जीवनदान मिळते, त्यामुळेच रक्तदान हे जीवनदान असे म्हणणे वागवे ठरणार नाही. जेव्हा एखाद्याला व्यक्तीला रक्त दिलं जातं, तेव्हा त्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासारखं आहे. जर तुम्ही नियमीत रक्तदाते असाल तर रक्ताशिवाय त्यामधून आरबीसी आणि प्लाज्मा वेगळं करुन लोकांना दिला जातो. म्हणजे, ज्या पद्धतीचा रुग्ण असेल त्याला ते दिलं जातं. रक्तदानासाठी आपल्या देशात अनेक प्रकाराची जागरुकता अभियान आणि कॅम्पियन राबवली जातात. पण अनेकदा जेव्हा रुग्णाला रक्ताची गरज असते तेव्हा रक्त मिळत नाही. त्याची अनेक…
सध्याच्या काळात तरुणासह सर्वच लोक आपल्या विविध कामामध्ये व्यस्त असतात, त्यांना आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वेळच नसतो अशा परिस्थितीत एकतर आपल्याला व्यायामासाठी वेळ मिळत नाही किंवा आपण त्यापासून दूर पळतो. तुमचीही अशीच परिस्थिती असेल तर अमेरिकेतील सिडनी विद्यापीठाने तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आणली आहे. एका नवीन अभ्यासानुसार, दर आठवड्याला फक्त 10 मिनिटांचा जोमदार व्यायाम तुम्हाला दीर्घ आयुष्य जगण्यास मदत करू शकेल, असा दावा अभ्यासाद्वारे विद्यापीठातील तज्ज्ञांनी केला आहे. संशोधकांच्या टीमने यूके बायोबँकच्या 70 हजारांहून अधिक लोकांच्या डेटाचे विश्लेषण केले. ज्यात त्यांचे वय 40 ते 69 दरम्यान होते. त्यांना कर्करोग, हृदयविकार असा कोणताही आजार नव्हता. अभ्यासातील सर्व सहभागींना अॅक्टिव्हिटी ट्रॅकर घालण्यास…
तरुणांसाठी राज्य सरकारने नुकतीच पोलीस भरती स्थगित केली आहे, पण निराश न होता, आताच एक संधी आहे ती म्हणजे मुंबई मध्य रेल्वे मध्ये काम करण्याची सुवर्णसंधी 2022 मध्ये विविध पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. संबंधित भरतीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, ठिकान, निवड प्रक्रिया, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी सर्व माहिती जाहिरातीत खाली दिलेली आहे, अर्ज करण्याआधी जाहिरात काळजी पूर्वक वाचावी खालील दिलेल्या भरती साठी, अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2022 आहे. पदाचे नाव: कनिष्ठ व्यावसायिक लिपिक आणि तिकीट लिपिक, वरिष्ठ व्यावसायिक लिपिक आणि तिकीट लिपिक, लघुलेखक (इंग्रजी), गुड्स गार्ड,…
दिवाळी म्हंटले कि फक्त धामधूम फराळ आणि फुल मज्जा त्यातच आपण आपल्या शरीराची काळजी घेतो का ? याला तितक या दिवसामध्ये सुट्टीच देवून टाकत असतो, पण सणासुदीच्या काळात विविध पदार्थ आणि मिठाईचा आनंद मनमुराद लुटला जातो. साखर, मैदा आणि मीठ वापरून बनवलेल्या पदार्थांना स्वतःची चव असते यात शंका नाही, परंतु या पदार्थांच्या अतिसेवनामुळे पोटात आणि आतड्यांमध्ये विविध प्रकारचे विषारी पदार्थ साचतात, ज्यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते. समस्या अशी आहे की, सणासुदीच्या काळात बरेच लोक बाहेरचे खाणे पसंत करतात. तसेच तेलकट, गोड पदार्थांवर ताव मारला जातो. सतत बाहेरचे खाल्ल्याने पोटाचे आरोग्य बिघडू शकते. लक्षात ठेवा की, एकदा तुमचे पोट खराब झाले…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात दिवाळीपूर्वीच महागाईत मोठी वाढ होताना दिसत असतांना या महिन्याच्या पहिल्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल अपेक्षित होता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. दरम्यान लवकरच तेलाच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांपर्यंत घट होणार असून ही कपात हळूहळू लागू केली जाईल, असेही बोलले जात होते. पण तेल कंपन्यांनी 1 नोव्हेंबर, आज सकाळी जारी केलेल्या दरात कोणताही बदल झालेला नाही. चारही महानगरांमध्ये पेट्रोलचे दर राष्ट्रीय राजधानीत पेट्रोलचा दर 96.72 रुपये, कोलकात्यात 106.03 रुपये, मुंबईत 106.31 रुपये आणि चेन्नईमध्ये 102.63 रुपये इतका राहिला. मात्र, दुसरीकडे आंतरराष्ट्रीय…
मुंबई : वृत्तसंस्था बॉलीवूडचा भाईजान सलमान खानच्या सुरक्षेमध्ये आता आणखी वाढ करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्याला आलेल्या जीवे मारण्याच्या धमक्यांमुळे हा पोलीस प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. यापुढे सलमान खानला मुंबई पोलिसांकडून वाय प्लस दर्जाची सुरक्षा दिली जाईल. असे सांगण्यात आले आहे. एएनआयनं केलेल्या ट्विटमध्ये यांसंबंधीची अधिक माहिती देण्यात आली आहे. त्यात सलमानला यापुढील काळात वाय प्लस सुरक्षा देणार असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. सिद्धु मुसेवाला प्रकरणातील आरोपी बिष्णोईकडून सलमानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. सुरुवातीला एक निनावी पत्र सलमान आणि त्याचे वडील सलीम खान यांच्या नावानं आले होते. यानंतर सलमाननं त्याविषयी मुंबई पोलिसांना…
जळगाव : प्रतिनिधी राज्यात शिंदे सरकार व काही मंत्र्यांमध्ये सुरु असलेले राजकीय धुमाकूळ पाहता राज्यातील काही मंत्र्यांनी आपापली भूमिका मांडलेली आहे. यावेळी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी हि एका कार्यक्रमात शेरोशायरी करीत हास्यकल्लोळ निर्माण केला आहे. खोके अर्थात पैसे घेतल्याचे आरोप करण्यासाठी, आम्हाला बदनाम करण्यासाठी काही लोक आमच्यावर सोडण्यात आले आहेत, असा आरोप पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. जळगावात एका कार्यक्रमात भाषण करताना त्यांनी यावर तुफान शेरेबाजी केली. ते म्हणाले, “बदनाम जो होते है जो बदनामी से डरते है हम तो व बदनाम है बदनामी हमसे डरती है.” मात्र तीन-चार महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून इकडे आलेले लोक आमच्यावर…
*धरणगाव / जळगाव ( प्रतिनिधी ) : प्रत्येक गावाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असून विकासकामांमध्ये कुणीही राजकारण आणू नका. गावात एकोप्याने कामे करा. पाणीपुरवठा योजनेचे काम मुदतीत पूर्ण करून ग्रामपंचायत व अधिकाऱ्यांनी गावाची तहान भागवा. उखळवाडी ते अहिरे या गावांच्या दरम्यान धरणी पुलासाठी तब्बल ४.५० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आलेल्या पुलाचे काम पुढील महिन्यात सुरू करणार आहे. गावासाठी ( जय गुरुदेव भक्तांसाठी) सामाजिक सभागृह व अद्यावत ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम मंजूर करणार असल्याचे प्रतिपादन केले. धरणगाव तालुक्यातील खर्दे येथे ६८ लाखाच्या पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका प्रमुख गजानन पाटील हे होते. यावेळी तालुका प्रमुख गजानन पाटील,…
जळगाव : प्रतिनिधी पोलीस स्थानकामध्ये नेहमी कोणते ना कोणते गुन्हे दाखल होत असतात पण प्रत्येक गुन्हे दाखल झाल्यावर संशयित आरोपीला अटक करणे म्हत्वाचे असते, पण जिल्हातील एका पोलीस स्थानकात अपहार प्रकरणातील आरोपींना अटक न करण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या सपोनि तसेच उपनिरिक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने रंगेहात अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे. मिळालेली माहिती अशी की, शहरातील एका दाखल झालेल्या गुन्ह्यातील संशयित आरोपीला अटक न करण्यासाठी सावदा पोलीस स्थानकाचे सपोनि देवीदास इंगोले आणि उपनिरिक्षक समाधान गायकवाड यांनी ६० हजार रूपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर १५ हजार इतक्या रूपये देण्याचे ठरले. दरम्यान, या संदर्भात संबंधीत व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली…

