Author: editor desk

पुणे : वृत्तसंस्था  पुण्यातील कोंढवा येथील लुल्लानगर चौकातील मार्वल विस्टा बिल्डिंगला (पीएनजी ब्रदर्स) आज सकाळी सव्वा आठच्या सुमारास भीषण आग लागली. इमारतीचा सातवा फ्लोअर पुर्णपणे आगीच्या विळख्यात सापडला. आगीबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाची सहा वाहने घटनास्थळी दाखल झाले. आता आग आटोक्यात आल्याची माहिती आहे. सध्या कुलिंगचे काम सुरू आहे. दरम्यान, या घटनेत कोणीतीही जीवितहानी झाली नाही तसेच कोणीही जखमी झाले नाही, अशी माहिती अग्निशमन विभागाकडून देण्यात आली आहे. आग लागलेल्या इमारतीत अनेक दुकाने, ऑफिस, आणि सोन्याची दुकाने आहेत. त्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. अग्निशामक दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी हॉटेलच्या आतमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न करत…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील दूध फेडरेशन परिसरातील रहिवासी लखन अशोक खुळे (वय ३२) या तरुणाने राहत्या घरी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून, याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. लखन याने गळफास घेतल्याचे कुटुंबियांच्या निदर्शनास आल्यावर त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. प्राथमिक तपास सहायक फौजदार उल्हास चहाटे व विलास पवार करीत आहेत.

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  दिवाळी नुकतीच होवून गेली आहे सर्वात आता लग्नाची तयारी झाली असून सर्वत्र लग्नाची धामधुम पहायला मिळणार आहे. बॉलिवूडमध्येही लग्नाची धामधुम पहायला मिळणार आहे. सिंगर पलक मुच्छालही लवकरच प्रियकर मिथूनसोबत लग्न बंधनात अडकणार आहे त्याच्या पाठोपाठ सिद्धार्थ आणि कियारा, आथिया के.एल.राहुल यांच्यासुद्धा लग्नाची चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यातच आता चित्रपटसृष्टीतील अजून एक अभिनेत्री लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती समोर आली आहे. ती माहिती दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री हंसिका मोटवानीच्या लग्नाची आहे. बॉलिवुड अभिनेत्री हंसिका मोटवानी एका महिन्याच्या कालावधीच्या आतच विवाहबंधनात अडकणार आहे. हंसिका ४ डिसेंबरला लग्न करणार आहे. लग्नविधी 2 डिसेंबर ते 4 डिसेंबर दरम्यान आयोजित केला जाणार…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील मोठ मोठे उद्योग गुजरात येथे जात असल्याचे चित्र काही दिवसापासून दिसत असल्यावर मनसेनेही भाजपला चांगले फटकारले आहे. प्रत्येक प्रकल्प गुजरातला का जातोय, जर प्रकल्प आसामला गेला असता तर वाईट वाटले नसते. मी मागे पण म्हणालो होतो की, पंतप्रधान संपूर्ण देशाचे हवे, गुजरातचे नाही, नरेंद्र मोदी यांनी त्यांवर लक्ष द्यावे, असे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातमध्ये जात असल्याचे प्रकरणी म्हटले आहे. राज ठाकरे म्हणाले की, प्रकल्प बाहेर गेला म्हणजे कुठे गेला गुजरातला गेला. पंतप्रधानासाठी प्रत्येक राज्य समान मुलांसारखे असायला हवे. जर महाराष्ट्रातील प्रकल्प आसामला गेला असता तर वाईट वाटले नसते. मात्र सर्वच प्रकल्प गुजरातला…

Read More

दिवाळीनंतर राज्यात थंडी वाढू लागत असते, या दिवसामध्ये चहा पिण्याचे प्रमाण अधिक वाढत असते, बहुतेक लोकांना त्यांच्या दिवसाची सुरुवात चहाने करायला आवडते. कारण चहा तुमच्या शरीराला आणि मनाला नवी ऊर्जा देतो. हे प्रामुख्याने चहामध्ये आढळणाऱ्या कॅफिनमुळे होते. जरी बहुतेक लोक त्यांच्या दिवसाची सुरुवात दुधाच्या चहाने करतात. पण गुलाबी थंडीसाठी या ठिकाणी आम्ही तुम्हाला दोन चहाचे प्रकार सांगणार आहोत. जे तुमचा थंडीत होणाऱ्या व्हायरलपासूनदेखील तुमचे संरक्षण करण्यास मदत करतील. हळूहळू हिवाळा ऋतूला सुरुवात झाली आहे. या दरम्यान वातावरणात अनेक बदल होताना दिसतात. त्याचबरोबर शरीरात देखील अनेक समस्या निर्माण होतात. मात्र, हिवाळ्यापूर्वी वातावरणात वाहू लागतात ते गुलाबी थंडीचे वारे. गुलाबी थंडी म्हणजे…

Read More

जगातील भरपूर लोकांना डोकेदुखी ही एक सामान्य समस्या आहे. प्रत्येकजण आयुष्यात किमान एकदा तरी याचा सामना करतो. तथापि, जगात असे बरेच लोक आहेत ज्यांना नियमितपणे तीव्र डोकेदुखी असते. नुकताच नॉर्वेजियन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या शास्त्रज्ञांनी अशा रुग्णांच्या डेटाबाबत मोठा खुलासा केला आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की जगातील 52% लोकसंख्येला दरवर्षी कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या डोकेदुखीचा त्रास होतो. यामध्ये मायग्रेन, सामान्य डोकेदुखी, चिंताग्रस्त डोकेदुखी इत्यादी या संशोधनासाठी शास्त्रज्ञांनी 1961 ते 2020 पर्यंतच्या संशोधनांचा अभ्यास केला. ज्यामध्ये डोकेदुखीशी संबंधित डेटा उपस्थित होता. 14% लोक मायग्रेनने ग्रस्त आहेत, 26% लोक चिंताग्रस्त डोकेदुखीने ग्रस्त आहेत. शास्त्रज्ञांनी संशोधनात सांगितले आहे की जगातील 14% लोक…

Read More

एरडोल : प्रतिनिधी येथील एका ४५ वर्षीय महिलेचा तिच्या मुलाला मारहाण करीत विनयभंग केल्याची घटना घडली आहे, या प्रकरणी ४ जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील एका परिसरात राहणाऱ्या ४५ वर्षीय महिलेच्या घरी संशयित आरोपी संजय चितामण गायकवाड याने घरात घुसत महिलेला अश्लील शिवीगाळ, मारहाण करीत तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत असतांना तिला सोडवायला तिचा मुलगा आला असता संशयित आरोपी संजय गायकवाड याच्या सोबत असणारे ३ जणांनी महिलेच्या मुलाला पकडून ठेवत मारहाण केल्या प्रकरणी संशयीत आरोपी संजय गायकवाड याच्यासह ३ जणाविरोधात एरंडोल पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  हेमंत क्लासेसमध्ये सुरु असलेला दिवाळीचा ज्ञानोत्सव म्हणजे दिवाळीत प्रत्येकाच्या घरात फराळ बनतो म्हणजेच दरवर्षी प्रत्येक घरात नवनवीन काही तरी तिखट गोड खावून दिवाळी साजरी केली जाते, त्याचप्रमाणे शिक्षणाचेही तसेच आहे. नेहमी अभ्यास तर असतोच पण व्यक्तिमत्व विकासासह प्रत्येक गोष्टीचे ज्ञान हे मुलांना विकसित होण्यासाठी हेमंत क्लासेसचा ज्ञानोत्सव म्हणावा लागेल. https://youtu.be/UlPqKppTbnw गेल्या पाच दिवसापासून जळगाव शहरातील महाबळ परिसरातील हेमंत क्लासेस 10 वीच्या विद्यार्थी व विद्यार्थ्यांसाठी दरवर्षाप्रमाणे यंदाही ज्ञानोत्सव घेण्यात आला यामध्ये पाच दिवस विद्यार्थ्यांना विविध प्राध्यापक, डॉक्टर अशा व्यक्तीमत्वाचे मार्गदर्शनाची मेजवाणी विद्यार्थ्यांसाठी दिली होती जेणेकरून दहावी हा शिक्षणाचा टर्नीग पॉईट असून दहावीत परिक्षा अभ्यासाचा सराव कसा केला…

Read More

जळगाव : प्रतिनिधी धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व विद्यार्थी विकास विभाग यांच्या समन्वयातून भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४७ व्या जयंती दिनानिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राकेश चौधरी यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच सकाळी ७:३० वाजता सरदार वल्लभभाई पटेल बहुद्देशीय संस्था यांच्या सहकार्याने एकता रॅली चे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. निलेश शांताराम चौधरी यांनी राष्ट्रीय एकता दिवस शपथ घेतली या कार्यक्रमास रासोयो स्वंयसेवक, महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन विद्यार्थी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील एका परिसरातून एका अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील एका परिसरातील १७ वर्षीय मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. तिला दि २८ रोजी तिच्या घरातून अनोळखीने पळवून नेल्या प्रकरणी दि ३० रोजी शनिपेठ पोलिसात मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि.प्रदीप चांदेलकर हे करीत आहेत.

Read More