अहमदाबाद : वृत्तसंस्था गुजरातमधील मोरबीमध्ये काल सायंकाळी एक मोठी दुर्घटना घडली. मोरबी जिल्ह्यातील मच्छू नदीवरील झुलता पूल अचानक कोसळला. या दुर्घटनेत 140 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 100हून अधिक जण जखमी झाले आहेत. सुमारे 400 हून अधिक लोक नदीत कोसळल्याची भीती व्यक्त होत आहे. बचावासाठी एनडीआरएफ आणि गरूड कमांडोंकडून घटनास्थळी युद्धपातळीवर मदतकार्य सुरु आहे. दरम्यान, 5 दिवसांपुर्वीच हा पूल दुरुस्त करण्यात आला होता. मोरबीमध्ये मच्छू नदीवरील झुलता पूल कोसळल्यानं आतापर्यंत १४० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. प्रशासनाकडून मदतकार्य युद्ध पातळीवर सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या पुलाची क्षमता केवळ 100 लोकांचीच आहे. मात्र दुर्घटना घडली त्यावेळी या पुलावर…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मोठे मोठे प्रकल्प राज्यातून बाहेर जाताना दिसत आहे, त्यातच राज्यातील तरुणांना अजूनही नोकरी नाही, मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळे नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. EXIM बँक, टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई येथे विविध पदांच्या जागांसाठी भरती सुरू आहे. त्यासाठी काय पात्रता आहे, अर्ज कसा आणि कुठे करायचा याबद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे, EXIM बँक पोस्ट – व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, व्यवस्थापक. शैक्षणिक पात्रता – पदवीधर, B.E., B.Tech, MBA एकूण जागा – 45 अर्ज करण्याची शेवटची…
मुंबई : वृत्तसंस्था आधी वेंदाता, मग बालक ड्रग पार्क आणि आता टाटा एअर बसचा प्रोजेक्ट महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यांनतर विरोधकांनी शिंदे फडणवीस सरकारला धारेवर धरलंय. अशातच महाराष्ट्र देखील गुजरात मध्ये विलीन करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्लॅन असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. अशातच आणखी एक प्रकल्प राज्याबाहेर गेला आहे. महाराष्ट्रातून हा प्रकल्प हैदराबादला गेला आहे. जमीन मिळण्यास दिरंगाई झाल्यामुळे हा प्रकल्प बाहेर गेला आहे. 1115 कोटींची प्राथमिक गुंतवणूक असणारा हा पकल्प हैदराबादला गेला. सॅफ्रन कंपनीचा हा प्रकल्प होता. विमान आणि रॉकेट यांचं इंजिन बनवणारी ही कंपनी होती. या प्रकल्पाच्या जाण्यामुळे राज्यातील 500 ते 600 कामगारांचा रोजगार बुडाला आहे. विमान आणि रॉकेटचे इंजन बनवणारी फ्रान्सची…
जळगाव : प्रतिनिधी शिंदे गटाचा एक मंत्री आणि एक आमदार यांच्यात दोन दिवसापासून चांगलीच जुगलबंदी रंगली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये मानापमान नाट्यावरून जोरदार हल्लाबोल सुरू आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दोन्ही नेत्यांशी फोनवरून संपर्क साधून त्यांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला असल्या तरीही हे नेते एकमेकांवर तोंडसुख घेताना दिसत आहेत. एकाच जिल्ह्यातील या नेत्यांमधील वादामुळे मुख्यमंत्र्यांची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. वाद सुरू असलेल्या एक मंत्री म्हणजे गुलाबराव पाटील आणि आमदार म्हणजे चिमणराव पाटील या दोन्ही नेत्यांमध्ये सध्या शाब्दिक युद्ध सुरू आहे. तर दुसरीकडे नेते शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील यांनी नुकतेच आ.चिमणराव पाटील यांच्यावर टीका केली आहे, ते म्हणाले…
मुंबई : वृत्तसंस्था देशात सुरु असलेल्या महागाईने दिवाळीत डोकेवर काढले होते, पंरतु आज जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत काहीशी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. शनिवारी ब्रेंट क्रूड 1.19 डॉलर्स (1.23 टक्के) खाली 95.77 डॉलर प्रति बॅरल आणि WTI 1.18 डॉलर (1.32 टक्के) प्रति बॅरल 87.90 डॉलर्सनी विकलं जात आहे. देशातील सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. देशातील अनेक राज्यांमध्ये इंधनाच्या किमतीत काहीसा बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर गेल्या पाच महिन्यांहून अधिक काळ समान पातळीवर कायम आहेत. शनिवारी सकाळी डब्ल्यूटीआय क्रूड प्रति बॅरल 87.46 डॉलरवर घसरल्याचं पाहायला मिळालं. तर ब्रेंट…
मुंबई : प्रतिनिधी राज्यात शिंदे सरकारच्या काळात एक नव्हे तर दोन प्रकल्प गेले असून यातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. शिंदे-फडणवीस सरकारचं एक इंजिन फेल झाल्याने राज्यातील गुंतवणूक बाहेर जात असल्याचं ठाकरे म्हणाले आहेत. शेतकऱ्यांचे हाल होत असताना वेदांता फॉक्सकॉन हातातून गेल्यानंतर आता टाटा एअरबसच्या पाठीमागे लागा असे सांगितले होते, तो प्रकल्प तरी महाराष्ट्रात आणा असं सांगितलं होतं. पण उद्योग जगातील चौथा मोठा प्रकल्प महाराष्ट्रतून निघून गेला आहे. पहिला प्रकल्प म्हणजे वेदांता फॉक्सकॉन, यासाठी ऑगस्ट पर्यंत बैठका चालल्या सप्टेबंरमध्ये हा प्रकल्प गुजरातला गेला, दुसरा बल्क ड्रग पार्क…
धुळे : प्रतिनिधी जिल्ह्यातील धरणगाव येथील दाम्पत धुळे येथे भाऊबीजेसाठी गेले होते, भाऊबीज झाल्यानंतर माघारी येत असतांना अचानक रस्त्यावर गर्दी दिसते आणि ते थांबून विचारपूस करीत तेथे एका गरोदर माता आपल्या बाळाला जन्म देण्यासाठी पोटात कळ काढत असतांना दिसताच क्षणी विसावे दाम्पत्यांनी ‘त्या’ महिलेला आधार देत आपली सामजिक भान जोपासून महिलेसह नवजात शिशुचे प्राण वाचविल्याने आज धुळ्यासह जळगाव जिल्ह्यात त्या दाम्प्ताचे कौतुक होत आहे. काय आहे नेमकी घटना ? औरंगाबाद येथील वैजापूरहून दुचाकीवर मुकेश पवार हे आपल्या गरोदर पत्नी व दोन मुलासोबत सेंधवा येथे निघाले होते. ते धुळे एमआयडीसी ते अवधान गावाच्यामधील मुख्य रस्त्यावर असतांना त्यांच्या गरोदर पत्नीला पोटात कळा…
मुंबई : प्रतिनिधी येत्या महिन्यामध्ये १४ हजार ९५६ जागांसाठी राज्यात भरती प्रक्रिया राबवण्यात येणार होती. पण पोलिस भरती पुढे ढकलल्याची माहिती आहे. प्रशासकीय कारणास्तव पोलिस भरती पुढे ढकलली असल्याचं सांगण्यात येतंय. आता पोलिस भरतीसंदर्भातली नवी जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आज पोलिस महासंचालक कार्यालयाकडून एक पत्रक जारी करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये भरती प्रक्रिया प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलल्याचं सांगण्यात आलेलं आहे. दरम्यान, कालच राज्याच्या पोलिस मुख्यालयातून प्रवर्गनिहाय आरक्षण जाहीर केले होते. रिक्त १४ हजार ९५६ जागांमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी १ हजार ८११ जागा, अनुसूचित जमातीसाठी १ हजार ३५० जगा, विमुक्त जाती (अ) या प्रवर्गासाठी ४२६ जागा, भटक्या जमाती (ब)साठी ३७४…
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील खंडवा मार्गावरील रेल्वे यार्डात अमृतसरच्या तरुणाचा गळा चिरून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या प्रकरणी मयताच्या चार मित्रांविरोधात भुसावळ लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. मनमीतसिंग गुरूप्रीत सिंग (वय १९, रा. अमृतसर, पंजाब) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार असे की,, मनमीतसिंग आपल्या पाच मित्रांसह बुधवार, २६ रोजी नांदेड-अमृतसर एक्स्प्रेसने अमृतसरकडे निघाला होता मात्र डी – २ डब्यात पाच तरुणांचा एका प्रवाशाशी वाद झाल्यानंतर त्यांनी संबंधितास मारहाण केली मात्र संबंधिताने सुरक्षा यंत्रणांशी संपर्क साधल्यानंतर पाचही तरुण खंडवा मार्गावरील रेल्वे यार्डात उतरले व गुरुवारी सकाळच्या सुमारास मनमीतसिंगचा मृतदेह…
रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील शेमळदा गावातील एका २७ वर्षीय विवाहितेला सासरचे मंडळी छळ करीत असल्यामुळे रावेर पोलिसात विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील शेमळदे येथील २७ वर्षीय विवाहिता भाग्यश्री गौरव पाटील यांचा विवाह पुणे येथे विवाह झाला असून येथील सासरचे मंडळी विवाहितेला माहेरून २० लाख रुपये आणावे, तर विवाहितेच्या पतीचे दुसऱ्या मुलीसोबत प्रेम संबध असल्यावर देखील मुलाच्या वडिलांनी त्याचा विवाह २७ वर्षीय तरुणीसोबत करून दिला, तर पुणे येथे विवाहिता संसार करण्यासाठी गेली असता तिला शिवीगाळ मारहाण व जीवे ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी संशयित आरोपी पती गौरव सोपान पाटील, सोपान भिका पाटील, प्रतिभा…

