Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी  आम्ही बंडखोरांच्या परतीचे दोर कापले नसल्याचे सांगत शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मोठा दावा केला आहे. शिंदे गटात काही आमदार नाराज असून काहीजण संपर्कात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शिंदे गटात असलेले आमदार संजय शिरसाट आमच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. सुषमा अंधारे या सध्या ‘महाप्रबोधन यात्रे’निमित्त जळगावात आहेत.त्यानिमित्ताने त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सुषमा अंधारे यांनी म्हटले की, शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि आम्ही संयमित भाषेचा वापर करत आहोत. आम्ही टीका करताना कधीही पातळी सोडणार नसल्याचे म्हटले. बंडखोरांना माघारी परता येईल असे संकेत देताना त्यांनी परतीचे दोर आमच्याकडून कापले गेले नसल्याचे म्हटले. आमदार संजय शिरसाट हे शिंदे…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  दिवाळीत सोन्या-चांदीच्या दरात घट झाल्यानंतर आता मात्र बाजारपेठेत अस्थिरता पाहायला मिळत आहे. आज सोन्या-चांदीच्या किंमतीत थोडा बदल झाला असून बुधवारी सोने चांदीचे दरात घसरण दिसून आली होती तर आज मात्र सोन्याच्या दरात तेजी तर चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. जाणून घ्या आजचे ताजे दर आज सोने 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम – 46,700 रुपये 24 कॅरेट साठी 50,950 रुपये तर 10 ग्रॅम चांदीचा दर 581 रुपये शहर सोने (22k) 1 किलो चांदीचा दर मुंबई 46,700 58100 पुणे 46,730 58100 नाशिक 46,730 58100 नागपूर 46,730 58100 दिल्ली 46,850…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  रवी राणा हे पक्के हनुमान भक्त आहेत. हनुमानाचा भक्त खोटे बोलेल काय? राणा यांचा राम कोण व बोलविता धनी कोण? याचा शोध कडू यांनी घेतला तर सत्याचा पट उलगडला जाईल, असे थेट आवाहनही ठाकरे गटाने बच्चू कडूंना केले आहे. तर रवी राणा हे देवेंद्र फडणवीसांना मानणारे आमदार आहेत. त्यामुळे फडणवीसांची मान्यता घेऊनच राणांनी ५० खोक्यांचे सत्य जाहीर केले, असा थेट निशाणा आज ठाकरे गटाने देवेंद्र फडणवीसांवर साधला. ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये म्हटले आहे की, आता कितीही दिलगिरीचा मुलामा देऊन राणा यांनी माघार घेतली असली तरी या हनुमान भक्ताने आधी जे पन्नास पन्नास खोक्यांचे सत्य जाहीर केले,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जिल्ह्यातील वाळू माफियांनी तोंड वर काढले असून आता जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी जळगाव जिल्ह्याचा कारभार घेतल्यापासून जिल्हाधिकारी ॲक्शन मोडमध्ये दिसून आल्याने वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहे. शहरासह तालुक्यात वाळूची सर्रासपणे अवैध वाहतुक होत असतांनाही तहसीलदारांकडून मात्र कुठलीही कारवाई होत नसल्याने चक्क जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास गिरणा नदीपात्रातून वाळूची अवैध वाहतुक करणारे ट्रॅक्टर आणि डंपर पकडल्याची माहिती समोर आली आहे. जिल्ह्यात वाळू ठेक्याची मुदत संपुष्टात आली असल्याने अवैधपणे सर्रास चोरी होत आहे. ट्रॅक्टर आणि डंपरच्या सहाय्याने गिरणा नदीपात्रातून ही चोरटी वाहतुक होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना मिळाली. त्यानुसार जिल्हाधिकारी मित्तल यांनी मध्यरात्री 2…

Read More

आजच्या धावपळीच्या काळात प्रत्येकालाच फिटनेसकडे खूप लक्ष देणे शक्य नसते. पण ऑफिसचे काम बसून असते. घरीही बरेचदा बसूनच काम होते. त्यामुळे व्यायाम होतोच असं नाही. पण काही काही लोक चुकीचे डायट फॉलो केल्याने मृत्यूही झाला आहे. बॉलिवूड फिल्म इंडस्ट्री असो की साऊथ इंडस्ट्री, सगळीकडून सतत वाईट बातम्या ऐकायला मिळतात. एकामागून एक मृत्यू होत आहेत हे इंडस्ट्रीचे लक्ष कोणी वेधून घेतले माहीत नाही. दाक्षिणात्य अभिनेता भरत कल्याण हा दिवंगत प्रसिद्ध कन्नड, तेलगू, तामिळ अभिनेता कल्याण कुमार यांचा मुलगा आहे. जरी त्यानं सिनेसृष्टीत पदार्पण केले असले तरी तो एक टेलिव्हिजन अभिनेता म्हणून प्रसिद्ध झाला. त्यानं अपूर्व रंगल, वंशम आणि जमीला या मालिकांमध्ये…

Read More

पाचोरा : प्रतिनिधी  तालुक्यातील खडकदेवळा बुद्रुक येथील स्वामी कृषी केंद्रावर बनावट रासायनिक खत आढळले. याप्रकरणी कृषी विभागाच्या पथकाने खताचा साठा जप्त करुन, कृषी केंद्रचालक सुनील प्रभाकर सिनकर याच्याविरुद्ध शेतकऱ्यांची व शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे यांनी तपासणी केली होती. त्यांना कृषी केंद्रात इंडियन पोटॅश लिमिटेड कंपनीचे बनावट खत आढळले होते. त्यांनी खताची विक्री थांबवून त्याचे नमुने खत तपासणी प्रयोगशाळेत पाठवले होते. तसेच इंडियन पोटॅश लिमिटेड कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी शिवाजी ठवरे यांनी, बनावट खताच्या बॅगचे फोटो मुख्यालयात पाठवले होते. ३१ रोजी प्रयोगशाळेच्या अहवाला खतामध्ये अपेक्षित पोटॅशचे प्रमाण ६० टक्केऐवजी फक्त १५.४३ टक्के आढळले…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था  पुण्यात काल शिवशाही बस पेटल्याची घटना घडल्यानंतर आज पुन्हा नाशिकमध्ये भररस्त्यातच शिवशाही बसने पेट घेतला. नाशिकहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसला आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास सिन्नर जवळील माळवाडी शिवारात अचानक आग लागली. बसचालकाला वेळीच आग लागल्याचे निदर्शनास आल्याने त्याने तातडीने बर रस्त्याच्या बाजुला उभी केली व बसमधील सर्व 43 प्रवाशांना बाहेर काढले. त्यामुळे सर्व प्रवासी बालंबाल बचावले. पिंपरी चिंचवड आगाराची शिवशाही बस ही नाशिक सीबीएस येथून सकाळी 7 वाजेच्या सुमारास पुणे (शिवाजीनगर) कडे जाण्यासाठी निघाली होती. सिन्नरच्या माळवाडी शिवारात ही बस आल्यानंतर बसची गती आपोआप मंदावल्याचे चालक अमीत वासुदेव खेडेकर (वय ४१) यांच्या…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  रुपयातील 80 पैसे गुजरातला व 20 पैशांत सारा देश हे गणित ठरले असेल तर गुजरातला सोन्यानेच का मढवीत नाही?, तर महाराष्ट्राच्या नशिबी एक नपुंसक सरकार आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून एकापाठोपाठ एक असे उद्योग पळविले जात आहेत, अशी घणाघाती टीका आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने केली. असा खोचक सवालही शिवसेनेने केला आहे. महाराष्ट्र आपल्या पायावर आणि हिमतीवर उभा आहे व राहील; पण इतर मागास राज्यांना विकासात सहभागी करून घेतले जात नसेल तर ‘सबका साथ, सबका विकास’ या मोदी घोषणेतील फोलपणा समोर येतो, असे म्हणत शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून आज पंतप्रधान मोदी व शिंदे सरकारवर टीकास्त्र सोडण्यात आले आहे. शिवसेनेने म्हटले…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यात सत्तेचा वाद आता नवीन राहिलेला नाही पण आता विविध संघटनेच्या व परिषदेच्या अध्यक्षतेसाठी वाढ विकोपाला जात आहे. महाराष्ट्र केसरीचा आखाडा कोण भरवणार यावरूनच आता कुस्ती संघटनांमध्ये वादाचा फड रंगला असल्याचे दिसून येत आहे. यंदा पुण्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार आहे. यादरम्यान शरद पवार अध्यक्ष असलेली पण बरखास्त केलेली जुनी कुस्तीगीर परिषद आणि भाजप खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त झालेली नवीन कुस्तीगीर परिषद या दोन्ही गटांनी स्पर्धा भरवणार असल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या आयोजनावरून आता हा नवीन वाद सुरू झाला आहे. भारतीय कुस्ती महासंघ आणि राज्यातील संघटना महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे माजी पदाधिकारी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  जवळपास २०० पेक्षा जास्त मोबाईल कंपन्या त्यांचे फोन तयार करत आहेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जगातील सर्वात मोठी मोबाईल फॅक्टरी भारतात आहे, जी फक्त सॅमसंगची आहे. देशात मोबाईलचे उत्पादन होत असले तरी त्याचे सुटे भाग आणि कच्च्या मालासाठी चीन किंवा तैवानवर अवलंबून राहावे लागते. आता टाटा समूह ही साखळी तोडण्याच्या तयारीत आहे. काही महिन्यांपूर्वी अशी बातमी आली होती की टाटा समूह भारतात मोबाईल पार्ट्स तयार करेल आणि आता असे वृत्त आहे की टाटा समूह मोबाईल पार्ट्स फॅक्टरीसाठी 45,000 लोकांची भरती करण्याच्या तयारीत आहे. आयफोनचे पार्ट्स सर्वप्रथम टाटाच्या कारखान्यात तयार केले जातील. तामिळनाडूतील होसूर येथे असलेल्या टाटा…

Read More