Author: editor desk

धरणगाव : प्रतिनिधी  तालुक्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांना मदत करा, अशी मागणी विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी  जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील गंगापुरी येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेताची पाहणी केली. जळगांव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातगंगापुरी येथील शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. तसेच यानंतर तहसील कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली यात अंबादास दानवे म्हणाले की, “संकट कितीही मोठं असलं तरीही शिवसेना तुमच्या पाठीशी आणि खांद्याला खांदा लावून उभी आहे. सरकारमध्ये नसल्याने तुम्हाला देण्यासाठी आमच्या हाती काही नाही. ज्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी कर्जमुक्ती केली होती. अनेक शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहचली होती. मात्र आताही तिच परिस्थिती निर्माण झाली…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  तुम्ही जर नेहमी व्हॉट्सअॅपवरून आलेले व्हिडीओ फोन उचलत असतील तर तुम्हाला खूप महागात जावू शकते. अनेकदा आपण सेव्ह नसलेल्या नंबर वरून कॉल आल्यास बहुतांशी इग्नोर करतो. मात्र हाच कॉल व्हॉट्सअॅपवरून आल्यास आपण बरेचदा उचलतो. मात्र हे करतानाही तुम्हाला आता सावध राहाण्याची गरज आहे. मागल्या अनेक दिवसांपासून सेक्स्टॉर्शनचे अनेक प्रकरण उघडकीस आलेत. याच प्रकरणाला बळी पडणाऱ्या एका व्यक्तीची कथा तुम्हाला आणखी थक्क करेल. सेक्स्टॉर्शन हे सध्या चर्चेत असलेलं आणि सोशल मीडियावर खळबळ उडवणारा स्कॅम आहे. स्कॅमच्या अगदी काही सेकंदांनी यूजर्सची झोप उडून जाइल असे काहीसे होते. या स्कॅममध्ये यूजरला एक व्हिडीओ कॉल येतो आणि तिथून खऱ्या स्कॅमला सुरूवात…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव जिल्ह्यातील अंजाळा ता. यावल येथील एका अल्पवयीन मुलाकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २ मोटार सायकली जप्त केल्या आहेत. सविस्अतर वृत्त असे  की, जिल्हयात मोटार सायकल चोरीचे गुन्हयांत वाढ झाल्याने पोलीस अधीक्षक एम. राज कुमार व अपर पोलीस अधीक्षकचंद्रकांत गवळी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांना याबाबत तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार किसन नजनपाटील दि.३ नोव्हेंबर रोजी गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, अंजाळा ता. यावल येथे विधी संघर्षीत बालक याच्याकडे चोरीच्या मोटार सायकली असून त्यांची तो कमी किमतीत विक्री करीत आहेत. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांनी त्यांचे अधिनस्त पोलीस…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  भरपूर लोक आहेत ज्यांना पाळीव प्राण्यांची खूप आवड आहे. ते त्यांच्या पाळीव कुत्र्यांसाठी कोणत्याही मर्यादेपर्यंत जाऊ शकतात. दरम्यान, एका कुटुंबाने पाळीव कुत्रा पाळल्याने त्याचा मृत्यू झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे.पण मेलेल्या कुत्र्याच्या आठवणीत या कुटुंबाने असं काही केलं आहे जे लोकांना अजिबात आवडलं नाही. हा कुत्रा घरातल्या लोकांना खूप प्रिय होता. खरं तर ही घटना ऑस्ट्रेलियातील एका कुटुंबाशी संबंधित आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या कुटुंबाकडे पांढऱ्या रंगाचा कुत्रा होता.हा कुत्रा या लोकांना खूप प्रिय होता, पण अचानक त्या कुत्र्याचा काही आजारामुळे मृत्यू झाला. यानंतर हे कुटुंब अत्यंत दु:खी झालं. या कुत्र्याला दफन करण्याऐवजी त्याची एक आठवण…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राष्ट्रवादीचं शिर्डीतील अधिवेशन संपल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असे वक्तव्य जयंत पाटील यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान, शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील १९९५ सालचा शरद पवार यांच्या वक्तव्याचा दाखला देत जयंत पाटलांचा दावा फेटाळून लावला आहे. या नव्या सरकारला स्थापन होऊन अवघे साडेतीन महिने पूर्ण होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते जयंत पाटील यांनी सरकार पडण्यासंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. शिर्डीत काँग्रेसचं अधिवेशन झाल्यानंतर मविआ सरकार पडलं. आता राष्ट्रवादी काँग्रेसचं शिर्डीतील शिबीर झाल्यानंतर हे सरकार पडेल”, असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलंय. त्यांच्या या वक्तव्यानंतर शहाजीबापू पाटील यांनी पलटवार केला आहे.…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादग्रस्त वक्तव्यावरून चर्चेत राहणारे संभाजी भिडे यांनी नुकतेच मंत्रालयात एका पत्रकार महिलेला कपाळावर टिकली लावली नाही, म्हणून बोलण्यास नकार दिल्यावरून ‘शिवप्रतिष्ठान’चे मनोहर उर्फ संभाजी भिडे यांच्यावर राजकीय स्तरातून मोठ्याप्रमाणात टीका करण्यात येत आहे. संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त विधानावरुन मोठा वाद निर्माण झाला असतानाच आता या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. अमृता फडणवीस कार्तिकी एकादशीनिमित्त पंढपुरात आहेत. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला तेव्हा ही प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या मनात भिडे गुरुजींबद्दल आदर आहे. ते हिंदुत्वाचे स्तंभ आहेत. पण मला असं वाटतं. महिलांनी कसं जगावं हे कोणी सांगू…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरातून दुचाकी लांबविल्याची घटना घडल्याने जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील पारोळा येथील रहिवासी किशोर रामदास ठाकरे(३६) हे जिल्हा सामान्य रुग्णालयात दि२ रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास काही कामानिमित आले असता. त्यांनी दुचाकी क्र.एम.एच.१९.डीएल.०८९१ हि त्यांनी न.१ च्या गेटजवळ पार्क करून गेले असता पुन्हा दुपारी येवून दुचाकी पाहिली असता घटनास्थळाहून दुचाकी न दिसल्याने त्यांनी जिल्हा पेठ पोलिसात धाव घेत अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोना.भारती देशमुख हे करीत आहेत.

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज ४ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात दाखल झाले. यावेळी, फडणवीसांनी सपत्नीक श्री विठ्ठल – रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. तर ५० वर्षांपासून औरंगाबादेतील गुलाबराव साळुंखे-कलावती साळुंखे या वारकरी जोडप्याला पूजेचा मान मिळाला. शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी आपण विठूमाऊलीकडे साकडं मागितल्याचं यावेळी फडणवीस म्हणाले. तर, कार्तिकी एकादशीच्या पूजेचा मान मिळाल्याने फडणवीसांनी पांडुरंगाचेच आभार मानले कार्तिकी वारी यात्रेच्या शासकीय महापूजेनिमित्त गुरुवारी उपमुख्यमंत्री फडणवीस व अमृता फडणवीस पंढरीत आले होते. आज पहाटे मानाचे वारकरी उत्तमराव साळुंखे व सौ. कलावती साळुंखे यांच्यासह त्यांनी विठ्ठलाची महापुजा केली. त्यांच्यासोबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत उपस्थित होते. महाराष्ट्र…

Read More

पाराेळा : प्रतिनिधी  दिवाळीची सुटी आटाेपून कर्तव्यावर जात असताना पाराेळा तालुक्यातील तरवाडे खुर्द येथील सीआरपीएफचे जवान यांचा रायपूर येथे प्रकृती खराब असल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना १ राेजी घडली. तरवाडे खुर्द येथील संतोष महाजन हे झारखंड राज्यातील रांची येथे सीआरपीएफचे जवान म्हणून कार्यरत होते. दिवाळीच्या सुट्टीत ते घरी आले हाेते. सुटी संपल्यानंतर संताेष महाजन हे कर्तव्यावर जात असताना अचानक त्याची रायपूर येथे प्रकृती बिघडली. त्यामुळे छत्तीसगढ राज्यातील रायपूर येथील जिंदाल हाॅस्पिटलमध्ये ३१ ऑक्टोबर रोजी त्यांना उपचारार्थ दाखल केले हाेते. उपचार घेत असताना १ नोव्हेंबरला रात्री १ वाजता त्यांचा मृत्यू झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यात प्रसिद्ध असलेला वडापाव सुद्धा आता महागणार असल्याचे चिन्ह दिसू लागले आहे. महाराष्ट्र असो की मुंबई प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा वडापाव आता महागणार असल्याची दाट शक्यता आहे. मुंबईच्या लोकांचा जर सर्वांत जास्त आवडता खाद्यपदार्थ कुठला असेल तर तो नक्कीच वडापाव हे नाव समोर येणार. साधारणतः १० रुपयांपासून विकल्या जाणाऱ्या आणि भुकेला साथ देणाऱ्या वडापाव मुंबईकरांच्या रोजच्या जीवनाचा भाग बनलाय. सध्या हाच वडापाव एका वेगळ्या कारणाने चर्चेत आलाय, ते कारण म्हणजे वडापाव महागणार. वडापाव महागण्यामागे एक मोठं कारण समोर आलंय. पावाच्या दरात वाढ झाल्याने आता वडापावचा भाव वाढणार आहे. पावसाठी आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. पाव बनवण्यासाठी लागलेला कच्चा…

Read More