Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था  तब्बल १०३ दिवसांनंतर जेलमधून बाहेर येणारे शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज पहिल्यांदाच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं ”हो केली मला अटक ईडीने आणि ती बेकायदेशीर होती, असे म्हणत त्यांनी राज ठाकरे यांना हि टोला लगावला आहे. ”जेलमध्ये असतांना मी पेपर वाचायचो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या काळामध्ये काही चांगले निर्णय घेतले आहेत. विशेषतः गरीबांना घर देण्यासंदर्भात आणि ‘म्हाडा’ला अधिकार देण्यासंदर्भात फडणवीस यांनी घेतलेले निर्णय कौतुकास्पद आहेत.” असं म्हणत सध्या राज्याचा कारभार उपमुख्यमंत्रीच चालवतात, असं संजय राऊत म्हणाले. दरम्यान, आपण दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांची भेट घेऊन…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील ७७५१ ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा लवकरच उडणार आहे. आज राज्य निवडणूक आयोगानं राज्यातील ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे ७७५१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. या निवडणुकांसंबंधीत नोटीस ही १८ नोव्हेंबरला संबंधित तालुक्यातील तहसीलदार जारी करतील. दरम्यान १८ डिसेंबरला मतदान होणार असून २० डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागात राजकारण रंगणार आहे, आता येणाऱ्या निवडणुकीत कोणते पक्ष व कोणते गट मोठ्या दमात काम करून आपली सत्ता स्थापन करीत हे येणारा काळच सांगू शकेल.

Read More

धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील बांभोरी प्र.चा. येथे महसूल पथकाने वाळू माफियांचे ट्रॅक्टरवर कारवाई करीत धरणगाव तहसील कार्यालयात वाहन जमा केले आहे. या कारवाईमुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहे. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील बांभोरी प्र. चा. येथे दि ९ रोजी सकाळी 9:45 वाजता अवैध वाळू वाहतूक करणा-या विना क्रमांकाचे महिंद्रा कंपनीच्या ट्रॅक्टरवर महसूल पथकाने तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली मं. अ. पाळधी भागचे अमोल पाटील, भरत पारधी, विरेंद्र सोनकांबळे, गजानन बिंदवाल, अलताब पठाण तलाठी तसेच नारायण सोनवणे,धनराज भोई कोतवाल यांनी कारवाई करीत सदरचे वाहन पंचनामा करून तहसील कार्यालय धरणगाव येथे जमा करण्यात आले.

Read More

धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील हिंगोणे बु येथे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार धरणगाव तालुक्यात प्रारूप मतदार यादीची प्रसिद्धी करण्यात आली.तसेच मौजे हिंगोने बु येथे चुनाव पाठशाळा आयोजित करण्यात आली त्याअनुषंगाने गावातील मतदारांनी यादी बघून दुरुस्ती असल्यास तात्काळ करून घेण्याचे आवाहन तहसीलदार देवरे यांनी कवळेले आहे. तसेच दिनांक 19 व 20 नोव्हेंबर आणि 3 व 4 डिसेंबर रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे,त्याबाबत ज्यांची मतदार नोंदनी अद्याप झालेली नाही त्यांनी करून घ्यावे अशी माहिती देवरे यांनी दिली आहे. तसेच आपले मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेशी सम्पर्क करावा असे आवाहन केले आहे. या प्रसंगी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी सचिन पाटील निवडणूक ऑपरेटर महेंद्र पवार…

Read More

मुंबई (वृत्तसंस्था) : पत्राचाळ घोटाळा प्रकरणात पीएमएलए न्यायालयाकडून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच, या प्रकरणात प्रविण राऊत यांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तसेच, या प्रकरणात प्रविण राऊत यांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. गेल्या 100 दिवसांपासून संजय राऊत कोठडीत आहेत. आज त्यांना जामीन मंजूर झाल्याने ठाकरे गटाने जल्लोष केला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची तोफ बाहेर येऊन पुन्हा धडाडणार, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या नेत्यांनी दिली आहे. गोरेगावच्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीने 31 जुलै रोजी राऊत यांना अटक केली होती. सुरुवातीला पोलिस कोठडी व त्यानंतर दोनदा त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ झाली होती. त्यामुळे आज राऊत यांना जामीन मिळण्याची शक्यता…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था   राज्याचे राजकारण हे रात्री अपरात्री भेटून शिंदे सरकार आले असल्याची विरोधक नेहमी टीका करीत असतांना दिसून आले आहे, पण आता ठाकरे गटाचे आमदार व खासदार मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेत असल्याचा गोप्यस्फोट शिंदे गटाचे बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे. शिवसेनेमध्ये फूट पडली. त्यामुळे राज्यात सत्तांतर झाले. त्यानंतर पुन्हा आता अनेक आमदार, खासदार, नेते मुख्यमंत्र्यांना भेटत असल्यामुळे पुन्हा नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. खासदार प्रतापराव जाधव म्हणाले की, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदारच नाही, तर अनेक खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटतात. भाजप – शिवसेना युती सरकारमधले आमचे शिवसेनेचे अनेक मंत्री, त्यांचे आमदार-खासदारही रात्री मुख्यमंत्री एकनाथ…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  पुढील 3 दिवसांत आपण अधिकृतरित्या शिंदे गटात प्रवेश करू, अशी घोषणा दीपाली सय्यद यांनी केली आहे. दिपाली सय्यद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी ‘वर्षा’ बंगल्यावर दाखल झाल्या आहेत. त्यापुर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंसह रश्मी ठाकरे, संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. संजय राऊत यांना त्यांच्या पापाची शिक्षा मिळाली, असे दिपाली सय्यद म्हणाल्या. दिपाली सय्यद म्हणाल्या, शनिवारपर्यंत माझा शिंदे गटात प्रवेश होईल. तो कसा होईल, कुठे होईल, याची चर्चा करण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत आहेत. मुख्यमंत्री शिंदे माझ्यावर जी जबाबदारी देतील, ती स्वीकारण्यास मी पुर्णपणे तयार आहे.

Read More

जळगाव : प्रतिनिधी  गिरणा नदीपात्रातून वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरोधात तालुका पोलिसांनी मंगळवारी दुपारी निमखेडी शिवार, खेडी खुर्द शिवार, आव्हाणे फाटा परिसरात धडक कारवाई मोहीम राबवली. यात पाेलिसांनी चार ट्रॅक्टर जप्त केली असून, दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गिरणा नदीत सध्या पाणी आहे. तसेच वाळूच्या एकाही गटाचा लिलाव झालेला नाही. तरी गिरणा नदीपात्रातून निमखेडीसह खेडी खु. मार्गे वाळूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना मंगळवारी दुपारी १२ वाजता मिळाली हाेती. त्यानुसार दुपारी २ वाजता निमखेडी शिवारातून खोटेनगर, गुजराल पेट्रोल पंपाजवळील हॉटेल क्रिष्णा व आव्हाणे फाट्याकडून जळगावकडे तर खेडी खु. शिवारातून विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरने वाळूची अवैध…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  राज्यात ‘हर हर महादेव’ चित्रपटावरून जो वाद निर्माण झाला आहे. त्यावरुन आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने थिएटरला जावून शो बंद करण्याची मागणी केली होती त्यानंतर हा चित्रपट जळगाव शहरात प्रदर्शित केला नाही. जळगाव शहरातील एका थिएटरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महानगराध्यक्ष विनोद शिंदे, उपाध्यक्ष आशिष सपकाळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी थिएटरमध्ये जात ‘हर हर महादेव’ चित्रपट प्रदर्शित करावा अशी मागणी करीत थिएटरमध्ये मॅनजरसोबत मोठी खडाजंगी झाली. त्यानंतर थिएटर मॅनेजरांनी सांगितले की, उद्या हा शो सुरु करण्यात येणार आहे. यावेळी दिपक राठोड, राजु डोंगरे, राहुल चव्हाण, हरी सुर्यवंशी, प्रशांत बाविस्कर, किरण सपकाळे, दिपक भालेराव यांच्यासह आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील सराफ बाजारातील मनीष ज्वेलर्सच्या शटर्सच्या पट्ट्या व लोखंडी गेटचे कुलूप तोडून चोरट्यांनी २ लाख १० हजार रुपयांचे दागिने तसेच २० हजाराची रोकड असा एकूण २ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना आज (मंगळवार) सकाळी घडकीस आली. याप्रकरणी शनी पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सराफ बाजारात भवानी मंदिराच्या पुढे ललीत घीसुलाल वर्मा (वय ३६,रा.गणपती नगर, जळगाव) यांच्या मालकीचे मनीष ज्वेलर्स नावाचे सराफ दुकान आहे. सोमवारी रात्री दुकान बंद केल्यावर नेहमीप्रमाणे सर्व जण घरी गेले. मंगळवारी सकाळी साडे सात वाजता शेजारील कमल ज्वेलर्सचे मालक कमल शर्मा यांनी ललीत यांना फोन करुन दुकान उघडे व…

Read More