Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव शहरातून कानळदाकडे जाणाऱ्या मुख्य रोडवर उत्कर्ष हॉटेलजवळ समोरुन येणार्‍या दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात प्रशांत कोळी यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा दुचाकीवरील चालक हा गंभीर जखमी झाला. या अपघातात नूतन मराठा महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी प्रशांत भिकनराव कोळी (वय-42, रा. उत्तम नगर,कोल्हे हिल्स) यांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. तसेच धडकेत दुसरा दुचाकीस्वार गंभीर असून त्याच्यावर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहे. शहरातील कोल्हे हिल्स परिसरातील उत्तम पार्क येथे प्रशांत कोळी हे वास्तव्यास असून ते शहरातील नुतन मराठा महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी आहे. गुरूवारी ते दुचाकीने जळगाव तालुक्यातील मूळ गावी नांद्रा…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज जळगाव जिल्हयांत मोटार सायकल चोरीचे गुन्हयांत वाढ झाल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार, व अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांनी सूचना निर्गमीत करुन मार्गदर्शन केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील, यांना दि. १० नोव्हेबर २०२२ रोजी गुप्त माहितीद्वारे बातमी मिळाली आहे की, अडावद ता. चोपडा येथील राहणारा दिपक संजय शेटे व नविद शेख इजाज हे मोटार सायकल चोरी करुन त्याची कमी किंमतीत विक्री करतात अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने किसनराव नजनपाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी त्यांचे अधिनस्त पोहेको गोरखनाथ बागुल, संदिप रमेश पाटील अश्रफ…

Read More

जळगाव : प्रतिनिधी दारू पिऊन पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाड मारून तिचा खून करणाऱ्या चोपडा तालुक्यातील शेवरे बुद्रुक येथील आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. शेवरे बुद्रुक ता चोपडा येथील नारायण केऱ्या भिलाला वय ४० हा २८ मार्च २०२१ रोजी रात्री आपली पत्नी गणुबाई नारायण भिलाला वय ३५ हिच्यासोबत नेहमीप्रमाणे दारू पिऊन भांडण करत होता. व दोन्ही रात्री घरात झोपले होते. त्याची मुले बाहेर झोपली होती. २९ मार्च २१ सकाळी ६ वाजता मोठा मुलगा निलेश हा पाणी प्यायला उठला असताना त्याला त्याची आई खाटेवर झोपलेली दिसली आणि तिच्या नाका तोंडातून रक्त वाहत होते ,तिचा जोरजोरात श्वास सुरू होता. आणि तिच्या…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  जिममध्ये वर्कआऊट करताना सिद्धांत अचानक बेशुद्ध पडला. डॉक्टरांनी जवळपास 45 मिनिटं त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले. प्रसिद्ध टीव्ही अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी याचं निधन झालं. त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. सिद्धांतचं खरं नाव आनंद सूर्यवंशी आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने नाव बदलून सिद्धांत वीर सूर्यवंशी असं केलं होतं. सिद्धांत 46 वर्षांचा होता. झी टीव्हीवरील ‘ममता’ या मालिकेत अक्षयची भूमिका साकारून सिद्धांत प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला. कुसुम या मालिकेतून त्याने टेलिव्हिजन विश्वात पदार्पण केलं होतं. त्यानंतर कृष्णा अर्जुन, कसौटी जिंदगी की, जमीन से आसमां तक, विरुद्ध, भाग्यविधाता, क्या दिल मै है यांसारख्या मालिकेत त्याने भूमिका साकारल्या. स्टार प्लस…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जिल्ह्यातील दुध संघाची निवडनुकीची धामधूम सुरु आहे नुकतीच काल दि १० रोजी उमदेवारी अर्ज दाखल करण्यात आले. आज शुक्रवारी उमेदवार अर्जांची छाननी होणार आहे. गिरीश महाजन राज्याचे मंत्री आहेत, मात्र त्यांनाही जिल्हा दूध संघाची सत्ता खुणावत असल्याने या दूध संघात आहे तरी काय, याची चर्चा आहे. उमेदवारी अर्ज विक्री व भरण्याच्या अखेरच्या दिवशी निवडणूक कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. गुरुवारी १२ अर्जांची विक्री झाली, तर तब्बल १७९ उमेवारी अर्ज दाखल करण्यात आले. शुक्रवारी सकाळी अकरा वाजेपासून उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. दूध संघाच्या संचालकपदासाठी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजपचे आमदार मंगेश चव्हाण, शिंदे गट…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  भारत जोडो यात्रेदरम्यान नांदेडच्या वाटेवर असताना राहुल गांधी यांना दोन मुलांनी सॉफ्टवेयर इंजीनियर व्हायचे बोलून दाखवले पण आपण आजपर्यंत संगणक पाहिला व आपल्या शाळेतही नसल्याचे सांगितले. शाळेत संगणकच नाही तर या मुलाचे स्वप्न कसे पूर्ण होणार हे जाणून राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या मुलाला लॅपटॉप भेट दिला. आता या मुलाच्या स्वप्नाला बळ मिळाले. पण ही एका मुलाची गोष्ट झाली, हिंदुस्थानमधील प्रत्येक मुलाचे स्वप्न साकार करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे राहुल गांधी म्हणाले. नांदेडमधील सर्वेश हाटणे या मुलाला राहुल गांधींनी लॅपटॉप भेट दिला आहे. मोठं होऊन काय बनायचंय असं राहुल गांधींनी विचारल्यावर सर्वेशनं सॉफ्टवेअर…

Read More

हिवाळ्यात सर्दी खोकला यासह विविध होणारे आजार हे व्हायरल असून ते तुम्हाला तुमचा मूळ आजार उद्ब्विणार असल्याची जाणीव करून देत असतात. हिवाळ्यात कुठलाही आरोग्याबाबत त्रास होत असल्यास लागलीच डॉक्टरांना दाखवावे कारण तुमच्या या प्राथमिक व्हायरल हे तुमच्या मुळ आजारापर्यत जावू शकतो तसेच हिवाळ्यात सर्वात धोकादायक हृदयविकाराचा झटका असतो. याचा धोका हिवाळ्यात जास्त वाढतो. या धोक्यातून वाचण्यासाठी काही उपाय सांगत आहोत. या लोकांना असतो सर्वाधिक धोका एका संशोधनानुसार ज्या लोकांचं वजन जास्त आहे, ज्यांना उच्च रक्तदाब आहे अशा लोकांना हिवाळ्यात ३० पट हृदयविकाराचा धोका वाढतो. थंडीत आपल्या नसा आकुंचन पावल्याने दबाव वाढतो. यामुळे ब्लड प्रेशर वाढू लागतं. बीपी वाढल्यामुळे हृदयविकाराचा झटका…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धरणगावतर्फे पदाधीकाऱ्यांची धावडा पंपिंग स्टेशनं येथे भेट देण्यात आली. तसेच धरणगावातील वेगवेगळ्या समस्या जसे पाणी समस्या, रस्त्याचा लाईट च्या बाबतीत धरणगाव न पा तील मुख्याधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले. तसेच धरणगाव तहसीलदार साहेब यांना पाटाचे पाणी सोडण्या बाबत निवेदन देण्यात आले. निवेदनात शेतकऱ्यांसाठी रगबी हंगाम च्या पिकांना पाणी 15 नोव्हेंबर च्या आत पाणी सोडावे जेणे करून शेतकरी बांधवांना वेळेवर पीक घेण्याचे लाभ मिळावे व असे नमूद करण्यात आले आहे. निवेदन देताना राष्ट्रवादीचे नेते ज्ञानेश्वर महाजन, मोहन पाटील, जिल्हा उपाध्यक्ष दीपक वाघमारे, ता कार्याध्यक्ष अरविंद देवरे, तालुका अध्यक्ष धनराज माळी, शहर अध्यक्ष निलेश चौधरी,…

Read More

यंदाच्या हिवाळ्यात तुम्हाला आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे असेल त्यासाठी योग्य आहार घेणे आवश्यक आहे. विशेषत: हिवाळ्यात फळे खाणे खूप आवश्यक आहे. कारण फळांमुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. अनेकजणांना हिवाळ्यात कोणती फळे खावीत? असा प्रश्न पडतो. आज आम्ही तुम्हाला हिवाळ्यात खाणारी काही खास फळे सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. सफरचंद- सफरचंद खरं तर बाराही महिने मार्केटमध्ये असते पण त्याचा खरा हंगाम हा हिवाळ्यात असतो. असं म्हणतात की दररोजचे एक सफरचंद खाल्ल्याने आपण डॉक्टरांपासून दूर राहतो. हे खरंय आहे. सफरचंद खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि त्यातील फायबर, व्हिटीमिन्स C आणि K आपल्या शरिराला मुबलक उर्जा देतात. पेरू- पेरू हा खरं तर…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  ‘द कश्मिर फाइल्स’च्या मोठ्या यशानंतर विवेक रंजन अग्निहोत्री कोणता चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार याची उत्सुकता होती. आता ही उत्सुकता ताणून न धरता विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘द व्हॅक्सिन वॉर’ हे त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. अग्निहोत्री यांनी अलीकडेच सोशल मीडियावर चित्रपटाबद्दल एक पोस्ट शेअर करत शीर्षकावरुन उत्सुकता निर्माण केली होती. ‘द व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट पुढील वर्षी 15 ऑगस्ट 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. तब्बल 11 भाषांमध्ये तो रिलीज केला जाणार आहे. हिंदी, इंग्रजी, तेलुगू, तामिळ, मल्याळम, कन्नड, भोजपुरी, पंजाबी, गुजराती, मराठी आणि बंगालीमध्ये तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. https://twitter.com/vivekagnihotri/status/1590575858422779904?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1590575858422779904%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=about%3Asrcdoc …

Read More