पुणे : वृत्तसंस्था पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी आलेल्या एका तरुणीला विवाहाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. पीडित तरुणीने आपल्याला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तरुणीच्या फिर्यादीनंतर रुपेश राजाभाऊ व्हावळे (वय ३५, रा. परळी वैजनाथ) नामक तरुणाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रुपेश आणि पीडित तरुणी दोघेही स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यात आले होते. या दोघांची ओळख अभ्यासिकेत झाली. ओळखीचे रुपांतर आधी मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले. आरोपी रुपेशने विवाहाचे आमिष दाखवत तरुणीला आपल्या जाळ्यात ओढले आणि तिच्यावर बलात्कार केला.…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात २२ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी तिघांविरोधात जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील एका गावात वास्तव्यास असलेल्या २२ वर्षीय तरुणी दि. २७ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात होती. यावेळी संशयित आरोपी विजय दिलीप पाटील याने तरुणीस बोलला की, तू माझ्यासोबत चल आणि माझ्याशी संबध ठेव नाही तर, तूला उचलून नेईल. एवढेच नव्हे तर हात ओढून तरुणीला लज्जा उत्त्पन्न होईल, असे कृत्य केले. या प्रकरणी संशयित आरोपी विजय पाटीलसह दोन तरुणांवर पिडीतेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात शिंदे गटाच्या मंत्रीने केलेल्या वादग्रस्त राष्ट्रवादीने राज्यभर निदर्शने करीत असतनाच विदर्भात ठाकरे गटाला मोठ खिंडार पडल आहे. पूर्व विदर्भात उद्धव ठाकरे यांच्या गटाला मोठं खिंडार पडलं आहे. एकनाथ शिंदे गटाने विदर्भात ठाकरे गट फोडल्याचे दिसून आले आहे. या भागातील युवासेनेचे सात जिल्हाप्रमुख आणि इतर पदाधिकारी आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्र्यांचे विश्वासू किरण पांडव यांनी आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाईं यांच्या युवा सेनेला सुरुंग लावण्याचं काम केलं आहे. पूर्व विदर्भातील म्हणजेच वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील युवा सेनेला मोठा धक्का मानला जात आहे. विदर्भातील तरुण कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत जात असल्यामुळे त्यांची ताकद…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शिंदे गटातील मंत्री एकापाठोपाठ महिलीविषयी चुकीची भाषा वापरताना दिसत आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रीया सुळे यांच्यावर एकदा नव्हे अनेकदा आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे. त्यांच्या या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून सत्तारांनी २४ तासांत माफी मागावी अन्यथा त्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही, असा इशारा त्यांना दिला आला आहे. सुप्रिया सुळे यांनी अब्दुल सत्तारांवर टीका करताना म्हटलं होतं की, पन्नास खोके तुम्हाला पण मिळाले आहेत का? यावर सत्तारांनी उत्तर देताना म्हटलं, ते तुम्हाला हवे आहेत का? य़ावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, तुमच्याकडे खोके आले असतील म्हणूनच तुम्ही ते आम्हाला ऑफर करता आहात. सुप्रिया…
जळगाव : प्रतिनिधी धानवड व परिसर हा आमचा बालेकिल्ला असून प्रतिकूल कालावधीतही या नागरिकांनी मला सदैव साथ दिली आहे. त्यामुळे टिकाकारांना आम्ही विकास कामांच्या माध्यमातून उत्तर देत असतो. धानवड व परिसरातील विविध विकास कामांसाठी निधी अपुरा पडू देणार नसून स्व. रावसाहेब पाटील यांनी गावाच्या विकासाठी दिलेल्या वचनपूर्तीसाठी कटिबद असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले ते धानवड व कुसुंबा येथे सुमारे २ कोटी २५ लक्ष कामांच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते. ना. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, मेहरूण- पांझरपोळ -कुसुंबा – चिंचोली – धानवड -करमाड पर्यंत रस्ता डांबरिकरण करण्यासाठी ३ कोटी ८० लक्ष र एवढा निधी मंजूर केला असून लवकरच प्रत्यक्ष…
मुंबई : वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आज सकाळीच मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यानंतर आता भुजबळ अॅडमिट झाल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेसचे फायर ब्रँड नेते छगन भुजबळ यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर मुंबईतल्या बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. छगन भुजबळ यांना आज सकाळी मुंबईतल्या बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना व्हायरल इंफेक्शन झाल्याचे समजते. त्यामुळेच त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. उपचार घेतल्यानंतर आज सायंकाळपर्यंतच त्यांना डिस्चार्ज मिळू शकतो, असे समजते. गेल्या आठ दिवसांपासून शरद पवारांची तब्येतही ठीक नाही. त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. या काळात त्यांनी शिर्डीच्या शिबिरालाही हजेरी लावली.…
मुंबई : वृत्तसंस्था शिवकालीन इतिहासावर आधारित चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड केली जात असल्याचा आरोप करत संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली. यासंदर्भात त्यांनी काल पुणे इथे पत्रकार परिषद घेत आक्रमक इशाराही दिला आहे. ‘ऐतिहासिक चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड केली जात आहे. अशा स्वरूपाच्या चित्रपटांमध्ये इतिहासाचा विपर्यास करण्यात येत असून, ‘हर हर महादेव’ आणि ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या दोन चित्रपटांवर आक्षेप आहे,’ असं संभाजीराजे छत्रपती यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले. इतिहासाची मोडतोड कराल तर माझ्याशी गाठ आहे, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला. यावेळी बोलताना संभाजीराजेंनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यासोबतच्या ट्युनिंगवरही भाष्य केलं आहे. ”हर हर महादेव’ चित्रपटामध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात आली…
मुंबई : वृत्तसंस्था पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात २८ प्रवासी जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. जव्हार-सिल्वासा मार्गावर जयसागर डॅमजवळ नाशिक- सिल्वासा आणि जळगाव- सिल्वासा या दोन एसटी बसची समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही एसटी बसचं प्रचंड नुकसान झालं. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, दोन्ही बसमधील २८ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना जव्हार येथील पतंगशाहा कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यातील एक प्रवासी गंभीररित्या जखमी झाल्यामुळे…
मुंबई : वृत्तसंस्था ५ रोजी मुंबईमध्ये पलक आणि मिथुन यांचा लग्नसोहळा पार पडला असून त्यांच्या रिसेप्शन पार्टीला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली. शनिवारी (5 नोव्हेंबर) पलक आणि मिथुन यांचा हळद, मेहंदी आणि संगीत सोहळा पार पडला होता. या सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पलकच्या हळद आणि संगीत सोहळ्याचे फोटो व्हायरल झाले. या फोटोमध्ये पलकचा भाऊ पलाश हा तिला हळद लावताना दिसत आहे. पलकनं 2012 साली प्रदर्शित झालेल्या एक था टायगर या चित्रपटामधील तसेच आशिकी 2 (2013), किक (2014), एक्शन जॅक्सन (2014) प्रेम रतन धन पायो (2015), एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी (2016) काबिल (2017), बाघी 2 (2018)…
मुंबई : वृत्तसंस्था देशात सर्वांनाच मानसिक आरोग्य ही एक मोठी समस्या निर्माण होऊ लागली आहे. पण लोक याबाबत बोलणे टाळत असतात पण हा छोटा आजार जरी असला तरी भविष्यात तो आजार मोठा होवू शकतो त्यामुळे आपल्या डॉक्टराशी याबाबत बोलले पाहिजे.अनेकांना मानसिक आरोग्याशी संबंधित गोष्टी समजत नाहीत. यामुळेच लोक त्यातून पूर्णपणे सावरत नाहीत. किंवा त्यांना त्यातून सावरायला वेळ लागतो. आजही असे बरेच लोक आहेत ज्यांना तणाव (Strees), मूड स्विंग (Mood Swing) आणि चिंता (Anxiety) हे एकच आजार वाटतात. मात्र, यामध्ये बराच फरक आहे. तणाव आणि चिंता एकसारखे नाही अनेकदा लोकांना तणाव आणि चिंता यातील नेमका फरक कळत नाही. कारण या दोन्ही…

