Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव शहरात ११ नोव्हेंबर पासून एग्रोवन कृषी प्रदर्शन सुरू झालेले आहे या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबरावजी पाटील यांनी भेट दिली या प्रदर्शनात सुमारे 250 हुन अधिक स्टॉल्स आहेत. सध्या शेतकऱ्यांना मजुरांची टंचाई खूप भासत आहे. जादा मजुरी देऊनही अंग मेहनतीचे कामे असल्याने मजूर मिळत नाही, याला पर्याय म्हणून कमी मजूर लागणारी पिके व मजुराला पर्याय म्हणून यंत्र व अवजारे यांचे स्वतंत्र दालनाला प्रतापराव यांनी भेट दिली. शेती हा बिन भरवशाचा व्यवसाय झालेला असल्यामुळे शेतमालाला भाव मिळेल याची शाश्वती देता येत नाही यामुळे विविध प्रकारच्या फळभाज्या, भाजीपाला, बांबू सुबाभूळ, यांच्या करार शेतीची माहिती देणाऱ्या कंपन्यांकडून त्यांनी…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी  आज १४ नोव्हेंबर म्हणजेच जागतिक बाल दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेतर्फे कु.पार्थ सागर भारुडे या बालकाला मामा च्या गावाला जाऊया..! हा ग्रंथ भेट देण्यात आला.याप्रसंगी सौ.वृषाली सागर भारूडे,कु.आराध्या भारुडे, बाबा रविंद्र गजानन भारुडे, आदी उपस्थित होते. प्रत्येक गोष्ट विकत घेता येते पण बालपण विकत घेता येत नाही..! असे गौरवोद्गार कर्तव्य बहुउद्देशीय संस्थे चे अध्यक्ष मा.सुनिल भाऊ चौधरी यांनी काढले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर भारुडे यांनी केले तर आभार सौ.वृषाली सागर भारुडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीते साठी मनिष चौधरी,गौरव चौधरी,ओम कोळी,अरविंद चौधरी आदीनी केले.

Read More

अमळनेर : प्रतिनिधी  सुरतहून बिहारकडे निघालेल्या महिलेस अचानक प्रसूती कळा सुरू झाल्या आणि धावत्या गाडीत प्रसूती झाली. सुपरफास्ट एक्स्प्रेस थांबवून तिच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले. क्रांतीदेवी (२८) असे या महिलेचे नाव आहे. ती आठ महिन्यांची गर्भवती होती. सुरतहून बरौनी सुपरफास्ट रेल्वेने आपल्या तीन मुलींसोबत बिहारकडे ती निघाली होती. शिंदखेडा – अमळनेरदरम्यान तिला प्रसूतीकळा सुरू झाल्या. त्यामुळे ती अस्वस्थ झाली. रेल्वे अमळनेर स्थानकावर थांबत नाही. जळगाव किंवा भुसावळ जाईपर्यंत खूप उशीर होणार होता. महिलेसोबत कोणीही पुरुष नव्हते फक्त तिच्या तीन मुली सोबत होत्या. अमळनेर स्टेशनवरून गाडी पास होत असतानाच महिलेची डब्यातच प्रसूती झाली. तातडीने रेल्वे गार्ड, आरपीएफ यांच्या मदतीने सुपरफास्ट रेल्वे…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी  तालुक्यातील  फेकरी शिवारातील रेल्वे उड्डाणपुलाजवळ दोन वाहनांचा भीषण अपघात झाला. या अपघातात एक २८ वर्षीय युवक ठार झाला, तर अन्य एकजण जखमी झाला. ही घटना रविवारी सकाळी घडली. फेकरी शिवारातील रेल्वे उड्डाणपुलाजवळ नॅशनल हायवे क्रमांक ५३ वर भुसावळकडून वरणगावकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या जी.जे. ०३- बी.टी- ५७२८ क्रमांकाच्या ट्रकने वरणगावकडून भुसावळकडे येणाऱ्या मालवाहतूक व्हॅन क्रमांक एम.एच.२८ ए. बी. ४३३४ या वाहनास धडक दिली. यात शिवचरण अरुण मानेकर (वय २८ रा. पहूरपुर्णी जिल्हा बुलढाणा) चालक गंभीर जखमी झाला. फेकरी गावचे पोलीस पाटील किशोर बोरोले हे नेहमीप्रमाणे पहाटे फिरायला गेले असताना त्यांना अपघाताबाबत माहिती मिळाली. त्यांनी पोलीस स्टेशनला व हायवे मोबाइल…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  मागील ७२ तासात दोन गुन्हे दाखल करण्यात आल्याने जितेंद्र आव्हाड यांनी तडकाफडकी राजीनामा देण्याचा निर्णय घेतलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा एक व्हिडिओ सादर करत भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याने त्यांच्याविरोधात विनयभंगाचा आरोप केला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नाराजी दर्शवली आहे. सरकार आपल्या अधिकारांचा गैरवापर करतोय, हे अत्यंत दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे. ठाण्यातील वाय ब्रिजच्या उद्घाटन सोहळ्याचा हा व्हिडिओ आहे. याठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड हेही उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यादेखत गर्दीतून वाट काढत असताना आव्हाड यांनी स्वभावाप्रमाणे त्यांचा मार्ग काढला. उलट ते म्हणतायत, तुम्ही गर्दीत कशाला येताय? यात…

Read More

ठाणे : वृत्तसंस्था  एका महिलेने मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेताच ठाण्यातील आ.जितेंद्र आव्हाड यांनी माझ्या आमदारकीचा राजीनामा देत असल्याचे चर्चा राज्याच्या राजकारणात सुरु आहे. आता यावर मुख्यमंत्री काय बोलतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर एका महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या सगळ्यामुळे व्यथित झालेल्या आव्हाड यांनी आपल्या आमदारकीचाच राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता ठाण्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे. संबंधित महिला ही भाजपची पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे. कळवा येथील पूलाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावेळी हा सारा प्रकार घडला. मात्र, त्यावेळी या प्रकाराची इतकी वाच्यता झाली नाही. संबंधित…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील एका परिसरातील अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी शनीपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील एका परिसरात आपल्या परिवारासह वास्तव्यास असलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी दि १० रोजी दुपारी ४ वाजता घरातून अनोळखी व्यक्तीने पळवून नेल्याची घटना घडली आहे. या बाबत परिवाराने नातेवाईक व ओळखीच्याकडे तपास केला असता मिळून न आल्याने त्यांनी तत्काळ शनी पेठ पोलिसात गुन्हा दखल केला आहे. पुढील पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातीर हे करीत आहे.

Read More

रावेर : प्रतिनिधी रावेर तालुक्यातील शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमण धारकांची घरे वाचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी फैजपूर प्रांत कार्यालय दिनांक १५ मंगळवार रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या जमीन याचीकेत क्र 2/ 2022 दि 06 ऑक्टोबर 2022 रोजी दिलेल्या निर्णयानुसार जिल्हाभरात गायरान शासकीय जमिनीवरील अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण काढणे संबंधीची कार्यवाही जिल्हाभरात सुरू झाली असून याच कारवाईचे आदेश रावेर तालुका जिल्हा जळगाव येथील 9 गावांमधील 620 अतिक्रमण धारकांना तहसीलदाराच्यावतीने जागा खाली करण्यासाठी नोटीस देण्यात आली असून पंधरा दिवसाचा कालावधी दिला आहे . सदर अतिक्रमण धारक हे मागील अनेक पिढ्यांपासून त्या ठिकाणी राहतात यातील 70% अतिक्रमण धारक आपल्या कुटुंबासोबत…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील होणा-या घरफोडी चोरीच्या घटना वाढल्याने घरफोडी चोरी करणारे आरोपीताचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक एम.राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकात गवळी अशांनी केलेले मागदर्शन व सुचना नुसार पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांनी गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळवीली की जिल्हापेठ पोस्टे सीसीटीएनएस गुरंन ६०४ / २०२२ भा.द.वि कलम ४५७, ३८० प्रमाणे सदरचा गुन्हा हा अज्ञात आरोपी विरूध्द दाखल होता, सदर गुन्हयात फिर्यादी यांचे राहते घराचे खालील गोडावून चे कडीकोंडा तोडुन सोन्याचे दागिणे चोरी झालेले असुन ती चोरी त्याचा नातेवाईक जावाई तुषार विजय जाधव (पाटील) रा. रामेश्वर कॉलनी जळगाव येथे राहणारा याने त्याचे साथीदारांसह केली आहे. अशी गुप्त बातमीदारा मार्फत…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी ठाकरे गटाला दूर करत शिंदे गट स्थापन करून राज्यात सत्तास्थापन झाल्यानंतर त्यांनी राज्यातील ठाकरे गटातील नेते व कार्यकर्ते आपल्या गटात सामील करून घेतले होते. तर उद्या म्हणजेच सोमवारी पिंपरी चिंचवडमध्ये ठाकरे गटाला मोठे खिंडार पडणार असल्याचं दिसून येत आहे. भारतीय कामगार सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष इरफ़ान सय्यद यांच्यासह १ हजार कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान ठाकरे गटातील ज्येष्ठ नेत्यांपासून ते तळागाळातील कार्यकर्ते शिंदे गटात सामील होत आहेत. आता पिंपरी चिंचवडमध्येही शिंदे गटाने मोठं खिंडार पाडलं आहे. शिवसेनेचे भारतीय कामगार सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष इरफान सय्यद कार्यकर्तेसह शिंदे गटात प्रवेश…

Read More