पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील एका शिवारातील शेतामधून हजारो रुपयांच्या कपाशीची चोरी झाल्याची घटना उघडकीस आल्याने पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील दहीगाव संत येथील रहिवासी गोकुळसिंग इंद्रसिंग पाटील(वय ७०) यांच्या मालकीची शेत दहीगाव संत शिवारात आहे, त्यांच्या शेतातील १० क्विंटल कपाशी यासह सोलर बटरी, व शेतात लागणारे उपयुक्त औजारे यांची एकूण किमत ८९ हजार रुपये अनोळखी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना दि १३ रोजी रात्री घडली आहे. या प्रकरणी त्यांनी पाचोरा पोलीस स्थानकात धाव घेत अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोना.सचिन पवार हे करीत आहेत.
Author: editor desk
जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात जबरीचोरी झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील शिंगाईत येथील रहिवासी प्रवीण दिलीप पाटील(वय ३७) यांच्या मालकीचे घरी दि ११ रोजी दुपारी २ पासून तर दि १४ च्या पहाटेपर्यत या कालावधीत अनोळखी काही चोरट्यांनी घरात घुसून कडीकोंडा तोडून घरातील तब्बल १ लाख ८० हजार रुपयाचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना दि १४ रोजी उघडकीस आल्याने त्यांनी तत्काळ जामनेर पोलिसात धाव घेत अनोळखी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोउनी दीपक मोहिते हे करीत आहेत.
चोपडा : प्रतिनिधी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत धान्य खरेदी, विक्री दुकान (नंबर ४) मध्ये दोन चोरट्यांनी एक लाख ४६ हजारांची चोरी केली. त्यांना पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासात जेरबंद केले आहे. सहायक पोलिस निरीक्षक किरण दांडगे व पथकाने ही कारवाई केली असून पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. येथील व्यापारी नितीन लखीचंद दहाड (वय ४८) यांनी यांनी १४ रोजी दुपारी गावातीलच स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतून २ लाख रूपये देण्यासाठी काढून आणले होते. या पैशांमधून त्यांनी ५४ हजार रूपयांचे वाटप केले. त्यानंतर त्यांनी १ लाख ४६ हजार रूपये त्यांच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील दुकानामधील कपाटात ठेवले. त्यानंतर ते दुपारी…
भडगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरातून तरुणाची चारचाकी लांबविल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील विवेकानंद नगरातील रहिवासी महेद्र रविद्र अहिरराव(वय ३४) यांच्या मालकीची चारचाकी गाडी एम.एच.१९.सी.यु.५३०९ हि सुमारे ६ लाख ५० हजार रुपये किमतीची यांनी दि १३ रोजी आपल्या राहत्या घराबाहेर लावलेली असतांना अनोळखी इसमाने लांबविल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी भडगाव पोलिसात महेद्र रविद्र अहिरराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.सचिन वाबळे हे करीत आहेत.
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील उद्योजक डी.डी.बच्छाव सर यांच्या निवासस्थानावर सोमवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास पिस्तुलधारी दरोडेखोरांनी लूट करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. यावेळी डी.डी.बच्छाव हे पत्नीसह लहान मुलाकडे पुण्याला गेले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रिंगरोडकडून आयएमआर महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या अजय कॉलनीतील बंगल्यात जिल्ह्यातील उद्योजक डी.डी.बच्छाव हे परिवारासह राहतात. त्यांचा मोठा मुलगा किरण बच्छाव हे शोरूमला होते तर त्यांची पत्नी व मुलगा घरी होते. रात्री ९ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे बच्छाव यांचा नोकर कुत्र्याला घेऊन फिरायला गेला. नोकर बाहेर पडताच ६ दरोडेखोरांनी रात्री ९ वाजून ५ मिनिटांनी घरावर धडक दिली. किरण बच्छाव यांच्या पत्नीने दरवाजा उघडताच, एकाने ‘आता…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था गुजरात विधानसभा निवडणूक 2022 साठी काँग्रेसने मुकुल वासनिक, मोहन प्रकाश, पृथ्वीराज चव्हाण, बीके हरिप्रसाद आणि केएच मुनियप्पा यांची विभागीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्याचबरोबर 32 नेत्यांना लोकसभा निरीक्षक बनवण्यात आले असून त्यात प्रेमसाई सिंग टेकम आणि अशोक बैरवा यांच्या नावांचा समावेश आहे.याशिवाय शकील अहमद खान, शिवाजी राव मोगे, कांतीलाल भुरिया, राजेश लिलोथिया आणि जय किशन यांना इतर निरीक्षक करण्यात आले आहेत. गुजरात विधानसभा निवडणूक 2022 संदर्भात आज ‘टास्क फोर्स-2024’ ची बैठक होणार आहे, ज्यामध्ये निवडणूक रणनीतीवर चर्चा केली जाणार आहे. काँग्रेसचे संपर्क प्रभारी सरचिटणीस जयराम रमेश, पक्षाचे खासदार दिग्विजय सिंह, राजस्थानचे आमदार सचिन पायलट आणि…
पुणे : वृत्तसंस्था राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे संविधानाला मानणारे आपण आहोत. काही दिवसापासून काही जण गळा घोटण्याचा प्रकार करत आहेत. आपल्याकडून असे काम होणार नाही, लोकशाहीला धब्बा लागणार नाही याची काळजी घ्यावी, अशा शब्दात विधानसभेचे माजी विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी भाजपवर अप्रत्यक्ष टीका केली. आद्यक्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे स्मारक समितीच्या वतीने क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी पवार बोलत होते पवार म्हणाले, लहूजी वस्ताद साळवे यांचे स्मारक गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून रखडलेले होते. या स्मारकाचे काम करण्याची संधी आम्हाला मिळाली. राज्य सरकारने ८७ कोटी ११ लाख रुपयांचा धनादेश महापालिकेला दिला. महाविकास आघाडी सरकार असताना मुख्यमंत्री…
सध्या सोशल मिडीयावर विचित्र फॅशनमुळे चर्चेत असणारी उर्फी व शिवराळ भाषेमुळे प्रसिद्ध झालेला हिंदुस्तानी भाऊ यांच्यात जोरदार खडाजंगी झाली आहे. उर्फीच्या कपड्यांवर तिला कडक भाषेत समज देणाऱ्या हिंदुस्तानी भाऊला उर्फीनेही कडक शब्दात प्रत्युत्तर दिले आहे. त्याचा हा वाद सोशल मिडियावर चांगलाच राडा घालत आहे. फॅशन जगतात रोज तिच्या कपड्यांवर प्रयोग करणारी उर्फी जावेद सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. उर्फी तिच्या फॅशन सेन्स आणि स्टाइलसाठी ओळखली जाते. ती तिच्या लूकने सोशल मीडियावर दहशत निर्माण करते. प्रत्येक वेळी तिची नवीन स्टाईल लोकाना वेड लावते. अत्यंत तोकड्या कपड्या ती कायम समोर येत असते. त्यामुळे अनेकदा ती ट्रोल देखील झाली आहे. पण ‘आता तू…
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतीच अक्षय कुमार यांचा पृथ्वीराज चौहान हा सिनेमा पाहण्यासाठी हजेरी लावली होती. तर अक्षयने अनेकदा पंतप्रधान मोदींच्या समर्थनार्थ पोस्टने देखील लक्ष वेधून घेतले आहे. तर आता आलेला फोटो देखील अक्षय व भाजपचे मैत्रीचे नाते दिसल्याचे दिसून येत आहे. अक्षयनं सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. ज्या फोटोला निरखून पाहिलं तर अक्षयच्या समोर दूरवर ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ दिसत आहे. अर्थात यावरनं स्पष्ट होतंय अक्षय गुजरातच्या भूमीत आहे,मोदींच्या राज्यात. त्यानं ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ जवळचा निसर्ग आपल्या कॅमेऱ्यात टीपत फोटोला कॅप्शन दिलं आहे की,”मी एकता नगर मध्ये आहे. ‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’, जगातल्या सर्वात उंच स्टॅच्यूजवळ आहे. इथे…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्हयांत अग्निशस्त्र बाळगणान्यावर कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, रमेश चोपडे, सहा.पोलीस अधीक्षक ऋषिकेश राऊले यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना त्याप्रमाणे सुचना व मार्गदर्शन केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील, यांना गुप्त बातमीदार बातमी मिळाली की, शिडी जि. अहमदनगर येथील काही इसम हे उमटी (मध्यप्रदेश) येथे गावठी पिस्तोल जिवंत काडतुस विकत घेण्यासाठी हुंडाई कंपनीची बहन पांडया रंगाची चारचाकी गाडी तिच्या मागच्या नंबर प्लेटवर अध्यक्ष टायगर ग्रुप श्रीरामपुर असे असून क्र.MH-१५/DM७७७८ अशा गाडीने आलेले आहेत. ते चोपडा कडून सिड जि. अहमदनगर येथे जाणार आहेत अशी खात्रीशिर बातमी मिळाली…

