मुंबई : वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना विनयभंग प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आली आहे. आव्हाड यांना 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. ठाणे पोलिसांनी विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. भारतीय दंड विधान 354 नुसार दाखल झालेला गुन्हा हा अजामीनपात्र गुन्हा असतो. अटकेची कारवाई टाळण्यासाठी आव्हाड यांनी कोर्टात धाव घेतली होती. कोर्टाने अंतरिम आदेश देताना सुनावणी पूर्ण होईपर्यंत अटक न करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. त्यानंतर आज, सकाळी ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली.
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील दुध संघातील वाद आता वाढत चालला असून या प्रकरणी आ.एकनाथराव खडसे यांनी आज दि १५ रोजी जळगावात पत्रकार परिषद घेतली. यावेळी आ.खडसे म्हणाले कि, जिल्हा दुध संघात सध्या दबावतंत्राचा वापर करण्यात येत असला तरी आम्ही याला घाबरणार नाही आणि भीकही घालणार नाही. अशा शब्दांमध्ये आमदार एकनाथ खडसे यांनी जोरदार टीका केली आहे. जिल्हा दुध संघाचे एमडी स्वत: तक्रारदार असतांना त्यांना अटक करण्यात आली. तर निवडणुकीत आम्हीच विजय मिळवणार असल्याने हे प्रकार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दुध संघाच्या निवडणूकासाठी नियम बदलले गेले आहे. राजकिय दबावाखाली हे नियम बदलले जाताय. सत्तेचा दुरूपयोग होत आहे. निवडणूकीत लढायचे असेल तर…
जळगाव : प्रतिनिधी दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनच्या संचालक मंडळ निवडणुकीत जळगाव जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांची नाशिक विभागातून बिनविरोध निवड झाली आहे. त्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती, माजी खासदार वसंतराव मोरे, माजी आमदार दिलीप वाघ, राष्ट्रवादी सहकार विभागाचे जिल्हाध्यक्ष वाल्मीक पाटील, संजय गरुड आदींनी श्री देवकर यांच्या निवासस्थानी त्यांचा सत्कार केला. राज्य सहकारी बँक असोसिएशनच्या संचालक मंडळासाठी 21 पैकी दहा संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित जागांसाठी 22 नोव्हेंबरला मतदान, तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मतदार संघातून नाशिक विभागाकडून जळगाव जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांची…
पारोळा : प्रतिनिधी येथील आय.डि.एल इंग्लिश मीडियम स्कूल येथे पारोळा तालुका शिक्षकेतर कर्मचारी संघटने कडून 15 नोव्हेंबर हा शिक्षकेतर दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ पंकज पाटील हे होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमात तालुक्यातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या शाल श्रीफळ देऊन येथे सत्कार करण्यात आला सत्काराला उत्तर देताना शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडे दुर्लक्षितकेले जाते त्यामुळे आपण आपली संघटना बळकट करून संघटित होण्याची गरज असल्याचे सांगितले तसेच जिल्हा सचिव गोरख पाटील यांनी 15 नोव्हेंबर 1967 साली महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षक इतर संघटना महामंडळ स्थापन झाल्याने त्या दिवसाचे औचित्य…
औरंगाबाद : वृत्तसंस्था कामानिमित दुसऱ्या जिल्ह्यात विटभट्टीवर मोलमजुरी करून आपल्या परिवाराचे उदरनिर्वाह करण्यासाठी आलेल्या पवार कुटुंबियांच्या परिवारावर आज दुखाचा डोंगर कोसळला आहे. दोन सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यात घडली आहे. एकाच वेळी दोघी बहिणींचं निधन झाल्यानं कुटुंबावर दुखःचा डोंगर कोसळला आहे. तर, गावातही हळहळ व्यक्त केली जात आहे. धुळे जिल्ह्यातील परशुराम पवार हे कामानिमित्त औरंगाबाद जिल्ह्यात आले होते. ते गोरख पवार यांच्या विटभट्टीवर मोलमजुरी करून मुली व परिवारासह राहत होते. सकाळी साडेअकरा ते बारा वाजेच्या सुमारास काजल आणी मीनाक्षी दोघी बहिणी सायगव्हाण येथील छोट्या पाझर तलावात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. कपडे धुण्यासाठी पाझर तलावात गेल्या असताना दोन…
मुंबई : वृत्तसंस्था राज्याचा मंत्रीमंडळ विस्तार बाकी असतांनाच मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांची मध्यरात्री वर्षा निवासस्थानी काळ खलबत झाली. यामुळे राज्यातील मंत्री पदासाठी नंबरमध्ये असलेले आमदाराची झोप उडाली होती. राज्याच्या हिवाळी अधिवेशनापूर्वीच शिंदे-फडणवीसांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. काल, सोमवारी रात्री उशीरा मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात बैठक झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल रात्री मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान वर्षावर दाखल झाले. या दोघांमध्ये तब्बल सव्वा तास चर्चा झाली. ही चर्चा मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्र्यांचा विस्ताराबाबत झाली असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील प्रमुख डॉन म्हणून ज्याची ख्याती आहे, असा गुन्हेगार अरुण गवळी हा नागपूर कारागृहात कैदी म्हणून आहे तर त्याच्या मुलाचे लग्न ठरले असून या महिन्यात त्याचा विवाह होत असल्याने गवळी याला पॅरोल मंजूर झाला आहे. मुलाच्या लग्नासाठी अरुण गवळी बाहेर येणार आहे. मुलाच्या लग्नासाठी बाहेर येणार आहे. 17 नोव्हेंबरला अरुण गवळीच्या मुलाचं लग्न आहे. त्यासाठी पॅरोलची मागणी केली होती. चार दिवसांचा पॅरोल मंजूर झाला आहे. पोलिसांच्या संरक्षणासह गवळीने मुंबईला जावं अशी अट कारागृह प्रशासनाने घातली होती. मात्र याचा खर्चही अरुण गवळीला करावा लागेल अशी अट घालण्यात आली होती. या विरोधात अरुण गवळीने न्यायालयात दाद मागितली होती. आता…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील नांद्रा बु. येथे क्रांतिवीर लहुजी साळवे यांच्या जयंती उत्सव साजरा करण्यात आला,. त्या निमित्ताने कानडदा – भोकर जि. प. गटातील वीस गावांतील मातंग समाजाचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर हे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते क्रांतिवीर लहुजी साळवे आणि सर्व महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी मातंग समाजाचे राजेंद्र चव्हाण गुरुजी, गणेश सपकाळे, कैलास जाधव, संजय बाविस्कर, निखिलभाऊ सपकाळे, सोमा वैराडे, नानाभाऊ सपकाळे, पांडुरंग मोरे, सुरेंद्र गायकवाड, छोटु अवचिते, प्रकाश सोनवणे, यशवंत सोनवणे आदी उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जयराम सोनवणे,…
मुंबई : वृत्तसंस्था दोन दिवसापासून जागतिक बाजारपेठमध्ये कच्च्या तेलाच्या किमतीत प्रंचड वाढ झाली असली तरी देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींवर कोणताही बदल झालेला नाही. सरकारी तेल कंपन्यांनी मंगळवारी सकाळी पेट्रोल-डिझेलचे देशातील नवे जाहीर केले आहेत. आजही देशातील चारही महानगरांमध्ये तेलाच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. जर कच्च्या तेलाबद्दल बोलायचं झालं तर गेल्या 24 तासांत त्याच्या किंमतीही बदलल्या आहेत. ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 93.14 डॉलरपर्यंत वाढली आहे. तसेच, डब्ल्यूटीआयचा दर एका उडीसह प्रति बॅरल 85.26 डॉलरवर विकलं जात आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीतील शेवटचा बदल 22 मे रोजी झाला होता. पाच महिन्यांहून अधिक काळ पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहण्याची ही पहिलीच वेळ आहे.…
एंरडोल : प्रतिनिधी तालुक्यातील एक बस चालक आपले कर्तव्य बजावीत असतांना त्यास एकाने शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कासोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील विखरण येथील रहिवासी असलेले साहेबराव महाजन(वय ४३, नोकरी – बसचालक) हे एंरडोल ते उत्राण येथे बसने प्रवासी वाहतूक करीत असतांना दि १४ रोजी दुपारी एस.टी.बस.क्रमाक एम.एच.०६.एस.८६२३ याने ते भातखेडा बसस्थानकावर आले असता त्यांच्या बसमागून येत बसचालक महाजन यांना संशयित आरोपी गोसावी याने खाली उतरवीत माझ्या दुचाकीस कट कसा मारला असा जाब विचारत असताना त्यांना शिवीगाळ व मारहाण केल्याने बसचालक महाजन यांच्या फिर्यादीवरून कासोदा पोलिसात सरकारी कर्मचारीस…

