Author: editor desk

नाशिक : प्रतिनिधी  राज्यात हिवाळी सुरु असतांना प्रत्येक परिवार गरम पाण्याने अंघोळ करीत असतो पण हेच गरम पाणी घेणे एका परिवारावर बेतले आहे. दहा महिन्यांच्या चिमुकलीवर गरम पाणी सांडलं आणि त्यात ती प्रचंड होरपळली. यातच तिचा जीव जाण्याची घटना घडली आहे. गंभीररीत्या भाजलेल्या दहा महिन्यांच्या कोवळ्या जीवावर तीन दिवस उपचार सुरु होते. पण तिची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरलीय. या चिमुकलीच्या मृत्यूने तिच्या आईवडिलांना मोठा धक्काच बसलाय. चिमुकलीच्या मृत्यूबाबत कळताच तिच्या आईवडिलांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा घटना नाशिकमध्ये घडली आहे. नाशिक येथील गंगापूर नाका भागात ही धक्कादायक घटना घडली. आवेरा शुभम इंगळे ही अवघ्या दहा महिन्यांची चिमुकली. आवेराच्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  येथील शिरसोली रस्त्यावरील श्री गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयात महिलेच्या गर्भाशयावरील अत्यंत गुंतागुंतीची आणि जिकिरीची शस्त्रक्रिया येथील डॉक्टरांनी यशस्वीरित्या पार पडली. विशेष म्हणजे शहरातील इतर खासगी रुग्णालय व जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी महिलेच्या शस्त्रक्रियेसाठी असमर्थता दाखवली होती. याबाबत सविस्तर वृत्त असे की, रवंजे (ता. एरंडोल) येथील ४८ वर्षीय महिलेला दीड वर्षांपासून पोटदुखीचा त्रास सुरू झाला होता. त्यावेळी त्यांनी तात्पुरता उपचार करून घेतला. मात्र आता त्यांना त्रास असह्य होऊ लागल्याने त्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात तपासणी केली. गर्भाशयाची परिस्थिती अत्यंत बिकट झाल्याने शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी उपचारासाठी त्यांना औरंगाबाद जाण्याचा सल्ला दिला. नंतर त्यांच्या नातेवाईकांनी शहरातील एका खासगी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  वीर सावरकरांचा अपमान सहन केला जाणार नाही, कोणत्याही हिंदू विचारवंताचा अपमान महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही, असा इशाराच कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. एका आयोजित कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. महाराष्ट्राचे श्रद्धास्थान स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला गेला. पण काही लोकांनी हे सहन केलं.. असं वक्तव्य करत उद्धव ठाकरेंचं नाव न घेता त्यांनी हा टोमणा मारला. वीर सावरकरांचा अनेकदा अपमान झाला. त्यांना माफीवीर म्हटलं गेलं. वीर सावरकरांचा हा अपमान सहन केला जाणार नाही. कोणत्याही हिंदू विचारवंताचा अपमान महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही, असेही मुख्यमंत्री शिंदे…

Read More

मुक्ताईनगर : प्रतिनिधी  राज्यातील मुख्यमंत्री शिंदे हे त्यांच्या आमदारांना घेवून पुन्हा गुवाहाटीला जाणार असल्याची चर्चा राज्यभर सुरु असतांना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे. प्रेमाच्या आठवणी ताज्या करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या 40 आमदारांना घेऊन जाणार आहेत. एक प्रकारे प्रेयसीच्या आठवणी ताज्या करण्याचाच हा प्रकार आहे, अशी खोचक टीका एकनाथ खडसे यांनी केली आहे. मुक्ताईनगरमध्ये अंतुरली गावात सभेला संबोधित करताना एकनाथ खडसे यांनी ही टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 40 आमदारांना घेऊन पुन्हा गुवाहाटीला जाणार आहेत. प्रेमाच्या आठवणी ताज्या करण्यासाठी शिंदे आपल्या 40 आमदारांना घेऊन गुवाहाटीला जाणार आहेत. प्रेमाची जशी…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील साळवे येथील बाळासाहेबांची शिवसेनेचे विभागिय संपर्क कार्यालयात शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिना निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read More

भडगाव : प्रतिनिधी तालुक्यातील ७५ वर्षीय सेवानिवृत्त वृद्ध बँकेत असतांना अनोळखी इसमाने रोकड लांबविल्या प्रकरणी भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील शिवाजी नगरातील रहिवासी नामदेव शंकर पाटील(वय ७५) हे भडगाव येथील स्टेट बँकेच्या शाखेत गेले असतात त्या ठिकाणाहून अनोळखी व्यक्तीने वृद्धाच्या हातातील पिशवीतून ४५ हजार रुपयांची रोकड उडविल्याची घटना दि १६ रोजी भर दुपारी घडली होती, या प्रकरणी भडगाव पोलिसात धाव घेत तत्काळ अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स.फौ.संजय काळे हे करीत आहेत.

Read More

धरणगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरातून सेटिंगच्या प्लेटा चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहातील स्वामी समर्थ नगरातील सुरु असलेल्या मंदिराचे बाधकाम ठिकाणाहून गणेश महाजन यांच्या मालकीच्या सेटिंगच्या प्लेटा ४४ नग किमान १७ हजार ५०० रुपये किमतीच्या अनोळखी इसमांनी चोरून नेल्याची घटना दि २० सप्टेबर २०२२ रोजी घडली. या प्रकरणी गणेश महाजन यांनी धरणगाव पोलिसात फिर्याद देत अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.प्रमोद पाटील हे करीत आहेत.

Read More

जळगाव : प्रतिनिधी  वाढदिवशी अनेक लोक वेगवेगळे संकल्प करीत असतात तर काही लोक वृक्ष लागवडीचा संकल्प करतात तर काही त्यांना जगविण्याचा करीत असतात तर जळगाव शहरातील योगेश वराडे यांच्या १२ वर्षाच्या कन्येने आपल्या वाढदिवसाला वृक्ष लागवड करण्याचा संकल्प करून यंदा तिने तिसऱ्यांदा वृक्ष लागवड केली आहे. जळगावातील मेहरून तलावाकाठी रमेश पहलानी करा ओके म्युझिकल ग्रूपसोबत झाडे लागवड केली. अक्षराच्या रूपाने सामाजिक कार्यात आज नाही तर गेल्या १ रोजी दिवसापासून म्हणजेच तिच्या ३ वाढदिवसापासून सुरुवात झाली. ती थेट अक्षरा अभ्यासिका पळासखेडे बू!! तालुका जामनेर जिल्हा जळगाव, येथून ती वाटचाल करत असताना अनेक चांगले वाईट अनुभव आले,बरीच मुलं त्याच अभ्यासिकेत बसून शासकीय…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी धरणगाव : आर.सी.पटेल फार्मसी महाविद्यालयाच्या एम.फार्मसी विभागाचा निकाल लागला. द्वितीय वर्ष फार्माकोग्नोसी शाखेतून धरणगावातील ऐश्वर्या शाम काबरा 9.93 सीजीपीए गुण प्राप्त करून विद्यापीठात प्रथम आली. धरणगाव पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पी.आय.राहुलजी खताळ यांनी नेताजी रोड येथे ऐश्वर्या च्या निवासस्थानी जाऊन भेट दिली व तिच्या पाठीवर शाबासकीची थाप देऊन विद्येची देवता सावित्रीमाई फुले यांची प्रतिमा भेट दिली. सोबत कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुनील भाऊ चौधरी, पी.एस.आय अमोल गुंजाळ, गोपनीय अधिकारी मिलिंद जी सोनार, समाधान भागवत, आजोबा रमेश काबरा, वडील श्याम काबरा, आई डॉ.अर्चना काबरा, गोकुळ काबरा, लकी काबरा, इच्छेश काबरा आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन इच्छेश काबरा यांनी केले…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  दोन महिन्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालकाना शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघात प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मेटे यांच्या अपघात प्रकरणी सीआयडीने चौकशी केली आहे. त्यानुसार त्यांनी मोठी कारवाई केली आहे. विनायक मेटे यांच्या गाडीच्या चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकनाथ कदम असे चालकाचे नाव आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर हा अपघात झाला होता. घटना घडली त्यावेळी घटनेत चालकाची चुकी असल्याचंही बोललं जात होते. वेगाने गाडी चालवत असताना अंदाज न आल्याने गाडी समोर जात असलेल्या ट्रकवर आदळली होती. ‘विविध सीसीटीव्हीचे फुटेज पाहण्यात आले आहेत,’ त्यावरुन सीआयडीने ही…

Read More