Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था  कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांना काही सूट देण्यात आल्या होत्या. यामध्ये शाळा तिथं परीक्षा केंद्र, वाढीव वेळ, अभ्यासक्रमामधील कपात याचा समावेश होता. मात्र, यंदा या सवलती रद्द करण्यात येणार आहेत. दहावी, बारावीच्या परीक्षांबाबत शिक्षण मंडळाकडून महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा जुन्या पद्धतीनंच घेतल्या जाणार आहेत, असं महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आलंय. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं गेल्या वर्षी दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्यात आली होती. यंदा परिस्थिती पूर्वपदावर आल्यानं या सवलती रद्द करण्यात आल्या आहेत. यंदाची परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असेल, तर राज्य मंडळाच्या नियोजनानुसार विद्यार्थ्यांना आता…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  पहाडी राज्यात झालेल्या हिमवृष्टीमुळे दिल्लीसह आसपासच्या राज्यांमध्ये थंड हवा पाहायला मिळणार आहे. राजधानी आणि परिसरात तापमानात घसरण सुरूच राहणार आहे. याशिवाय 24 तासांत राज्याच्या तापमानात विशेष बदल होणार नाही. देशातील काही भागात मागील काही महिन्यात पावसाने हाहाकार माजवला होता. आता पुन्हा एकदा हवामान विभागाने मोठा इशारा दिला आहे. या इशाऱ्या नुसार आता देशातील तब्बल 12 राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. १५ नोव्हेंबर रोजी भारतीय हवामानशास्त्र विभागाने केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू या पश्चिमेकडील राज्यांसह 10 राज्यांमध्ये मुसळधार पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी आहे. तर 16 नोव्हेंबरपासून आग्नेय बंगालच्या उपसागरात आणि आसपासच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र…

Read More

शहराचे वाढत असलेले प्रदूषण अन् त्यात तुम्ही जर धूम्रपान करत असला, तर दीर्घकालीन फुफ्फुसांच्या आजारांपासून आताच सावध व्हायला हवे. सीओपीडी अर्थात क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डीसीससाठी धूम्रपान हा सर्वाधिक परिणामकारक घटक असून, बदलत्या जीवनशैलीमुळे या आजाराचा धोका अधिकच वाढत आहे. त्यासाठी जीवनशैलीत बदल करण्याचे आवाहन डॉक्टरांना केले आहे. श्वसनाचा एक दीर्घकालीन आजार, ज्यामध्ये लहान व मध्यम आकाराच्या श्वसननलिकांचा दाह होतो आणि त्यांना सूज येते. यामुळे श्वासनलिका आकुंचन पावतात आणि श्वासोच्छवासात (प्रामुख्याने उच्छवासात) अडथळा निर्माण होतो. अर्थातच फुप्फुसाची ऑक्सिजन आणि कार्बन डायॉक्साईडची देवाणघेवाण करण्याची क्षमता कमी होते. लक्षणे दीर्घकालीन चालणारा खोकला काम केल्यावर धाप लागणे लवकर थकवा येणे परिणाम रुग्णाची कार्यक्षमता कमी…

Read More

भडगाव : प्रतिनिधी  तालुक्यातील एका शेत शिवारातून अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील एका शेतशिवारात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्यास असून परिवार मजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत आहे. तर शेतातून अल्पवयीन मुलीला अनोळखी इसमाने त्याच्या फायद्यासाठी पळवून नेल्याची घटना दि १४ रोजी घडली आहे. या प्रकरणी भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनी गणेश वाघमारे हे करीत आहेत.

Read More

धरणणाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातून दुचाकी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील चांदसर शिवारातील शेतातून गणेश नारायण भंडारकर(वय ५२) यांची दुचाकी एम.एच.१४ बी.एल.१३७८ क्र्माकाची ते शेतात पाहणी करण्यासाठी गेले असता काही अनोळखी इसमाने त्यांची दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अरुण निकुभ हे करीत आहेत.

Read More

चाळीसगाव : प्रतीनिधी  चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथील एका परिसरात बंद घर पाहून चोरट्यांनी मध्यरात्री घरफोडी करीत घरातील तब्बल २ लाख रुपयांचा मुद्देमाल घेत पोबारा केला आहे. या प्रकरणी मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील मेहुणबारे येथील नवेगावातील रहिवासी विमलबाई पुंडलिक निकम हे गावी गेले असतांना अनोळखी इसमांनी दि १४ रोजी मध्यरात्री घरातील लोखंडी दरवाजाचे कडी कोयडा तोडून घरातील गोदरेज कपाटातील १ लाख ५० हजार रुपये रोख तर ५६ हजार रुपयाचे सोने व चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सुरेश अभिमन काकनदे यांच्या फिर्यादीवरून मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील…

Read More

चोपडा : प्रतिनिधी  शहरातून धुळेकडे भरधाव वेगात जाणाऱ्या चारचाकी ओमनी गाडीने धरणगावकडून चोपड्याकडे येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दोघे जण जागीच ठार झाले तर ओमनी गाडीतील बसलेले सहा प्रवाशी गंभीर जखमी झाल्याची घटना आज दि.१५ नोव्हेंबर रोजी रात्री ९ ते १० वाजेच्या सुमारास मजरेहोळ फाट्याजवळ घडली. गंभीर जखमीपैकी एकाला जळगावला हलविण्यात आले आहे. तर दुचाकी वरील दोन्ही मयत चोपडा शहरातील रहिवाशी आहेत. ओमनी गाडी क्रमांक-एमएच-१८डब्ल्यू ७९८७ ही सहा प्रवाशांना घेऊन रात्री ८:४५ वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने चोपडयाकडून धुळेकडे जात होती. यावेळी कॉन्ट्रॅक्टर असलेले अकसर इरफान काझी (४८) रा. दर्गाअळी चोपडा शेख अनिस शेख जुहूर (४६) रा. मण्यारअळी चोपडा हे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव वाहन क्षेत्रातील व्यावसायिक किरण बच्छाव यांच्या घरात सशस्त्र दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या दरोडेखोरांचा जिल्हापेठ पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून शोध सुरू आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दरोडेखोर कैद झाले आहेत. हे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. त्या आधारावर दरोडेखोरांच्या शोधार्थ जिल्ह्यात पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. सोमवारी रात्री ९ वाजता अजय कॉलनीतील रहिवासी किरण बच्छाव यांच्या घरात सहा ते सात दरोडेखोरांनी बळजबरीने प्रवेश केला. त्यानंतर बंदूक आणि चाकूचा धाक दाखवून बच्छाव दाम्पत्याला लुटण्याचा प्रयत्न केला; मात्र आरडा-ओरड झाल्यानंतर दरोडेखोरांनी बच्छाव यांच्या पत्नी वेदांती यांचा ५० हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून पळ काढला. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर त्यांना…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  बॉलीवूडमध्ये सध्या अभिनेत्री गरोदर होत असतानाचे सर्वच फोटो व्हायरल होत आहे, तर त्यांची डिलिव्हरी कशी झाली काय झाली हि चाहत्यांना उस्तुकता लागून असते, पण सोनम कपूर आणि पती आनंद आहुजा यांनी नुकतच पहिला मुलगा वायू ला २० ऑगस्ट रोजी जन्म दिला. जिथे बहुतांश अभिनेत्रींची सी. सेक्शनने डिलिव्हरी झाली तिथे सोनमची नॉर्मल डिलेव्हरी कशी झाली? असा अनेकांना प्रश्न पडतो. या प्रश्नाचं उत्तर स्वतः सोनमने सोशल मीडियावर दिलं आहे. सोनमने आपल्या संपूर्ण प्रेग्नंसीचा एक्सपिरीयन्स सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यात तिनं सांगितलं की, तिला मुल नैसर्गिक पद्धतीने जन्माला घालायचं होतं. म्हणून तिच्या डॉक्टर गौरी मोथा यांच्या मार्गदर्शनात तिनं ‘जेंटल…

Read More

जळगाव : प्रतिनिधी हिवाळयाचे दिवस असून धरणगावातील नागरिकांना २२ ते २४ दिवसांपर्यंत पाणी मिळत नाहीय. तसेच गावात आरोग्याचे प्रश्नदेखील उद्भवत आहेत. पाणी समस्या व मुलभूत नागरी समस्या ताबडतोब सोडवाव्यात, अन्यथा धरणगावकर नागरिक तसेच शिवसेना पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आज शिवसेनेने (ठाकरे गट) जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी आम्ही कोणतेही बाबा म्हणायला तयार, पण धरणगावकरांना पाणी द्या, अशा शब्दात पालकमंत्र्यांवर टीका केली आहे. तर धरणगावचे मुख्याधिकारी कधी नव्हे ते आताच दबावाखाली काम करत असल्याचा आरोप माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी केला आहे. यावेळी रमेश पाटील, शरद माळी, धीरेंद्र पुरभे, राजेंद्र ठाकरे,…

Read More