Author: editor desk

राज्यात प्रदूषण दिवसेंदिवस वाढतच चालल आहे. प्रदूषणाने भयंकर रूप धारण केल आहे आणि त्याचे दुष्परिणाम दिसून येता आहेत. प्रदूषणाचा मोठा फटका बसतो तो आपल्या डोळ्यांवर. प्रदूषणामुळे डोळ्यांना खूप गंभीर दुखापतही होऊ शकते.प्रदूषणाचा त्रास नेहमीच असतो. पण ऑक्टोबर महिन्यापासून पुढे हवेची गुणवत्ता खालावू लागते. जणू काही आभाळाने प्रदूषणाची चादर पांघरली आहे. प्रदूषणामुळे श्वास घेतांना त्रास होण, डोळ्यात जळजळ होण अशा आरोग्याशी संबंधित अनेक तक्रारी सुरू होतात. हवेच्या प्रदूषणामुळे आजकाल प्रत्येकाच्या डोळ्यांना जळजळ जाणवते आहे. 1. डोळे थंड पाण्याने धुवा : डोळ्यांना काही त्रास होत असेल तर डोळे थंड पाण्याने धुवावेत. प्रदूषणामुळे तुम्हाला जळजळ होत असेल तर तुम्ही तुमचे डोळे वारंवार थंड…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरातील महिलेची तब्बल ५० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील वाघ नगरातील ३५ वर्षीय महिलेस दि १५ रोजी अनोळखी मोबाईल नंबरहून फोन आला समोरील महिलेने एका बँकेचे कर्मचारी असल्याचे भासवत क्रेडीट कार्डचे मागील चार अंक विचारून महिलेची समती न घेता परस्पर खात्यातून ५० हजार ७७४ रुपये काढल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी ३५ वर्षीय महिलेने सायबर पोलिसात धाव घेत संशयित आरोपीचा मोबाईल नंबर ८४४८४६९४१४ याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पो.नी.लीलाधर कानडे हे करीत आहेत.

Read More

धरणगाव : प्रतिनिधी  तालुक्यातील एका खेडेगावात दारूच्या नशेत दिराने आपल्या वहिनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने या आधी एका प्रकरणात दोन्ही दिरांविरोधात पोलिस तक्रार केली होती. ती तक्रार मागे घेण्यासाठी दोघांनीही तिला धमकी दिली आणि विनयभंग केला. पीडित महिलेने आपल्या दोन्ही दिरांविरुद्ध यापूर्वी पोलिसात तक्रार दिली होती. याचा राग मनात धरून काही दिवसांपूर्वी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास दारूच्या नशेत घरात प्रवेश केला आणि तक्रार मागे घेण्याची धमकी दिली, तसेच मुलीचे अपहरण करण्याची धमकीही दिली. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा पहाटेच्या सुमारास दुसऱ्या दिराने महिलेला…

Read More

अहमदनगर : वृत्तसंस्था  अहमदनगर -औरंगाबाद महामार्गावर भरधाव वेगात येणाऱ्या दोन कारची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला. गंगापूर कायगाव रोडवर हा कार अपघात झाला. या अपघातात 3 जण जखमी झाल्याचेही वृत्त आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी कसेबसे गाडीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढले आणि जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याआधी गुरुवारी रात्री उशिरा मुंबई-पुणे महामार्गावर कारची ट्रकला धडक बसली, यात 5 जणांचा मृत्यू झाला, तर 4 जण जखमी झाले. अपघातातील स्विफ्ट कारमधील मृत व्यक्ती बजाजनगर येथील आहे. सुधीर पाटील, रावसाहेब मोटे, रतन बेडवाल व अन्य 1 अशा चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर वॅगनार कारधील 3 जखमी…

Read More

आपल्या आहारात मिठला खूप महत्व दिले आहे. त्यामुळे आपल्या अन्नाची चव समजते पण हेच मीठ आपल्या आहारात जास्त प्रमाणात झाले तर आपले आरोग्यावर त्याचा परिणाम होवू शकतो. कार्डिओव्हस्कुलर रिसर्चमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, शास्त्रज्ञांना आढळून आले आहे की जास्त मिठाच्या सेवनामुळे स्ट्रेस हार्मोनची पातळी 75 टक्क्यांनी वाढते. मिठाचं अधिक सेवन केल्याने हृदय, रक्तवाहिन्या आणि मूत्रपिंडांचं नुकसान होते, हे बहुतेकांना ठाऊक असेल. पण यामुळे तणावही वाढतो हे आता अभ्यासातून समोर आलं आहे. अधिक मीठ सेवन केल्यामुळे तणावाची पातळी वाढते एडिनबर्गच्या युनिव्हर्सिटी ऑफ कार्डिओव्हस्कुलर सायन्स सेंटरमधील रेनल फिजिओलॉजीचे प्राध्यापक मॅथ्यू बेली यांनी म्हटलं आहे की, आपण जे अन्न खातो त्यामध्ये असलेले मीठ…

Read More

जळगाव : प्रतिनिधी याही वर्षी पूर्ण भरलेल्या गिरणा धरणातून शेती सिंचनासाठी ३ व बिगर सिंचनासाठी २ अशी एकूण ५ आवर्तने जिल्ह्यासाठी सोडण्यात येणार असल्याचा निर्णय आज कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. गिरणा धरणातून दोनच आवर्तने मिळणार असतांना शेतकऱ्यांची वाढती मागणी व गरज लक्षात घेता पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी शेतकरी आणि लाभक्षेत्राच्या परिसरातील जनतेच्या हितासाठी तिसरे आवर्तन सोडण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच सिंचनासाठी अतिरिक्त ४ थे आवर्तना बाबत पाण्याच्या उपलब्धतेनुसार व पाण्याची मागणी नुसार विभागाने निर्णय घेण्याचे ठरले. या अनुषंगाने गिरणा धरणातून अनुक्रमे १५ – २० डिसेंबर, १४ -२० जानेवारी आणि १६- २१ फेब्रुवारी रोजी ३ आवर्तने…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  बीपीपो कर्मचारी असलेल्या मैत्रिणीला तिच्याच बॉयफ्रेंड असलेल्या अमेय दरेकर याने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये ठार मारण्याचा जो प्रयत्न करण्यात आला तो अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक आहे. यामध्ये 15 व्या मजल्यावर असलेल्या पाण्याच्या टाकीवर बसलेल्या गर्लफ्रेंडला तिच्याच बॉयफ्रेंडने मारहाण करत धक्का दिला आहे. त्यात ती सुदैवाने वाचली असली तरी तिचे मनके फ्रॅक्चर झाले आहेत. ज्यामध्ये डॉक्टरांच्या माहितीनुसार 30 महीने तिला रिकव्हर होण्यासाठी लागतील अशी माहिती समोर येत आहे. या प्रकरणी पोलीसांनी पीडित तरुणीचा बॉयफ्रेंड अमेय दरेकर याला अटक केली असून त्याची चौकशी केली जात आहे. त्याच्या एका मित्राला पोलीसांनी जबाबासाठी बोलावले आहे. बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला चक्का…

Read More

नाशिक : प्रतिनिधी  सोशल मिडीयावर तरुणीमध्ये तुफान राडा होण्याचे व्हिडीओ व्हायरल होत असतात तसेच एक प्रकरण नाशिकमध्ये घडले आहे. नाशिकच्या मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक या संस्थेच्या महाविद्यालयातील हा व्हिडिओ असून हाणामारीची जोरदार चर्चा होत आहे. हाणामारीमध्ये मुली एकमेकांच्या केस ओढतांना दिसून येत आहे. हीच फ्री स्टाईल हाणामारी महाविद्यालयातील तरूणांणी आपल्या मोबाईल मध्ये चित्रित करत व्हायरल केली आहे. मुलींसह त्यांच्या पालकांना नाशिकच्या सरकारवाडा पोलीसांनी समज देण्यात आली आहे. महाविद्यालयात प्रशासनाने याबाबत मुलींसह त्यांच्या पालकांकडून लेखी माफी लिहून घेतली जाणार आहे. जेणेकरून पुन्हा असे प्रकार घडणार नाही. नाशिकमधील तरुणी आपापसात भिडण्यामागील कारण अद्याप समोर आले नसले तरी उपहार गृहात सुरुवातीला शाब्दिक…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  केंद्रसरकारच्यावतीने पीएम किसान योजनेच्या माध्यमातून दरवर्षाला शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मिळतात. दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये हप्ता बँकेच्या खात्यात जमा होतो. पीएम किसान योजनेसाठी देशातील 12 कोटीहूं अधिक शेतकरी पात्र ठरलेले होते. 11 वा हप्ता आला तेव्हा 12 कोटीवरून ही संख्या 11 कोटी आणि 19 लाखावर आली आहे. याशिवाय 12 हप्ता म्हणजेच नुकताच नोव्हेंबर महिन्यात जमा झालेला हप्ता आलेली शेतकऱ्यांची संख्या 8 कोटीवर आलेली आहे. जवळपास साडेतीन कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम पोहचली नाही, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली असून पैसे का आले नाही म्हणून संभ्रम निर्माण झाला आहे. यंदाच्या वर्षी कोट्यवधी शेतकरी नव्या यादीपासून…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  भीमा कोरेगांव हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आनंद तेलतुंबडे यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयानं आज शुक्रवार त्यांचा जामीन मंजूर केला. तेलतुंबडे यांना 2020 पासून तळोजा तुरुंगात ठेवण्यात आलं आहे. भीमा – कोरेगाव प्रकरणातील संशयित आनंद तेलतुंबडेंना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 1 लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. एनआयएच्या सुप्रीम कोर्टात अपील करण्याच्या विनंतीवरून उच्च न्यायालयाने आदेशाला एका आठवडयाची स्थगिती दिली आहे. अर्बन नक्षलवाद प्रकरणी आयआयटीचे प्राध्यापक व दलित विचारवंत आनंद तेलतुंबडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. तेलतुंबडे यांचे बंदी घातलेल्या ‘सीपीआय’ (माओवादी) या संघटनेशी संबंध असलेल्या आरोप…

Read More