Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था  वि. दा. सावरकरांबद्दल कॉंग्रसे नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यांचे पडसाद राज्यभरात उमटले. अशातच शिवसेनेने त्यांचे मुखपत्र सामनातून आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. राहुल गांधी यांना कोणीतरी समजवा असे शिवसेनेने म्हटले आहे. सावरकर दोन-तीन वर्षे अंदमानच्या तुरुंगात राहिले. त्यानंतर त्यांनी इंग्रजांना माफीनामे पाठवायला सुरुवात केली. नंतरच्या काळात सावरकरांनी वेगळ्या नावाने स्वत:वर पुस्तक लिहले आणि आपण किती शूरवीर होतो, हे सांगितले. सावरकरांना इंग्रजांकडून पेन्शन मिळायची, ते इंग्रजांसाठी काँग्रेस पक्षाविरोधात काम करायचे, असे राहुल गांधी यांनी म्हटले. त्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठल्यानंतर सावरकरांच्या पत्राचा दाखला देत राहुल गांधी यांनी आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे म्हटले. आता यावर शिवसेनेने रोखठोकमधून आपली…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  जर नेहमी अंगदुखी, गुडघेदुखीची समस्या जाणवत असतील तर या समस्या हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात जाणवायला लागतात. बदलता आहार आणि लाईफस्टाईलमुळे गुडघेदुखीची समस्येचा सामना अनेकांना करावा लागतो. ही समस्या वृद्धांमध्येच दिसून येत नाही, तर आता तरुणांमध्येही ही समस्या दिसून येत आहे. अनेक तरुणांना हिवाळ्यात गुडघेदुखीचा त्रास होतो. हिवाळ्यात जर गुडघेदुखी समस्येपासून दूर राहायचं असेल तर या टीप्स तुम्ही फॉलो करु शकता. हळद हळदीला अँटिऑक्सिडंट्सचे पॉवर हाऊस म्हटले जाते. हळदीमध्ये औषधी गुणधर्म असतात. हळदीची पेस्ट गुडघ्यांवर लावल्याने हिवाळ्यात होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळतो. याशिवाय रात्री झोपताना दुधात हळद टाकूनही पिऊ शकता. याचे रोज सेवन केल्याने गुडघेदुखीपासून आराम मिळेल. गुडघेदुखी थंडीमध्ये पायांचा…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  औरंगाबादमध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं. त्यावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. “हे ‘भाज्यपाल’ मराठी माणसाच्या राशीला नकोत!”, असं म्हणत आव्हाडांनी कोश्यारी यांच्या विधानाचा निषेध केलाय. “थोड्या दिवसांपूर्वी स्वतः रस्त्यावर उतरून आंदोलन केलं होत की हे भाज्यपाल मराठी माणसाच्या राशीला नकोत! महात्मा फुले,छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल वाईट बोलले गेले. पुन्हा एकदा संपूर्ण देशाचे आदर्श आहेत अशा महाराजांबद्दल त्यांना जुने आदर्श म्हणून हिणवले. बस झाले आता बोचंक गुंडाळ!”, असं ट्विट आव्हाडांनी केलं आहे. तुम्हा तरूण मुलांना जर कुणी विचारलं तुमचा आयकॉन कोण? तुमचा आवडता नेता…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट सध्या तरी अजय देवगणच्या ‘दृश्यम 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकाच केला आहे. या चित्रपटाची अॅडव्हान्स बुकिंग पाहता पहिल्या दिवशी जवळपास 12 कोटी रुपयांची कमाई होईल असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र दृश्यम 2 ने अपेक्षेपेक्षा जास्त कमाई करत सर्वांनाच चकीत केलं. अजय देवगण आणि अक्षय खन्ना यांचा हा चित्रपट या वर्षभरातील सर्वाधिक कमाईने ओपनिंग करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 15.38 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. जवळपास 50 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दिवशी 15 कोटींपेक्षा जास्त कमाई करणं ही खूप चांगली बाब आहे. मात्र दृश्यम 2 हा…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  गुवाहाटी हे शहर राज्याच्या राजकारणाची मोठी उलथा-पालथ ठरणारी होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा गुवाहाटीला जाणार असल्याची चर्चा राज्यभर सुरु आहे. दरम्यान या दौऱ्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री आणि आमदार, खासदार गुवाहाटीला जाणार आहे. मात्र, दौऱ्यामध्ये बदल करण्यात आला असल्याची माहिती, शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. भूमिपूजन सोहळ्यादरम्यान, गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. गुवाहाटी दौऱ्यामध्ये बदल झाला असल्याचे म्हटले आहे. शिंदे गटातील मंत्री व आमदार यांची 21 तारखेला गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार असल्याची चर्चा आहे मात्र 21 नोव्हेंबर ऐवजी लवकरच नवीन तारीख जाहीर होणार नवीन तारीख…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील रिंगरोडवरील उद्योगपती किरण बच्छाव यांच्या घरी बंदुकीच्या धाक दाखवून दरोडयाचा प्रयत्न झाला होता त्याप्रकरणी पोलीस पथकाने ७ संशयित आरोपी ताब्यात घेतले आहे. १४ रोजी रात्री ९ वा. चे सुमारास किरण बच्छाव यांच्या घरी बंदुकीच्या धाक दाखवून दरोडयाचा प्रयत्न झाला होता. सदर घटनास्थळी पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी व उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावीत यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांनी भेट दिली असता जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राज कुमार यांनी जिल्हापेठ पो.स्टे. व स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना समांतर तपासबाबत आदेश दिले होते. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांनी…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील वाळू माफियाचा धुमाकूळ सुरु होता याला लगाम लावण्यासाठी आता महसूल पथक कारवाईसह नदीपात्रात जाणऱ्या मार्गावरील चोरवाटा आता बंद करण्यात आल्या आहे. बांभोरी येथील नदीपात्रात अवैध वाहतूक करणाऱ्या वाळूमाफियांनी वाहतुकीसाठी चोर वाटा तयार केल्या होत्या याची माहिती महसूल प्रशासनाला मिळताच अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, प्रांत वीनय गोसावी यांचे मार्गदर्शनात मंडळ अधिकारी अमोल पाटील तलाठी गजानन बिंद्वाल व कोतवाल नारायण सोनवणे यांनी जेसीबी द्वारे खड्डे खोदुन या वाटा बंद केल्या आहेत. खड्डे पुन्हा वाळू माफियांनी बुजल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी दिले आहेत.

Read More

जळगाव : प्रतिनिधी  ‘असेल दृष्टी तर पाहू सृष्टी’ या उक्तीप्रमाणे हेरंब नेत्रालय जळगांव व नेरी येथील अनमोल परिवार च्या वतीने गावतील नागरिकांसाठी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. सुंदर सृष्टी पहायची असेल तर दृष्टी चांगली असणे आवश्यक आहे,निरोगी डोळे असणे हा सर्वांचा अधिकार आहे अन् हाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा नेरी बू.गावातील ११२ नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला अशी माहिती अनमोल परिवाराचे सदस्य किशोर आप्पा खोडपे,विवेक कुमावत,पवन वाघ यांनी दिली कार्यक्रम स्थळी उपस्थित माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे सर,सरपंच कल्पनाताई पाटील,उपसरपंच निलेश खोडपे,ज्येष्ठ नेते रमेश बापू पाटील,अशोक महाराज पाटील,राष्ट्रवादी पदवीधर चे तालुकाध्क्ष आशिष…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील पिंप्राळा परिसरात पोलिसांनी गुटख्याची कारवाई करीत तब्बल ६ गोण्याभारून गुटखा जप्त केला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील पिंप्राळा परिसरातील सोमाणी मार्कटजवळील सावरकर नगरातून ६ गोणी गुटखा ज्याची एकूण किमत २ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. संशयित आरोपी वसिम चंगा शहा (वय ३०) याच्या दुकानातील गोडावून मधून हा माल ताब्यात घेण्यात आला असून पुढील कार्यवाही सरू होती. हि कारवाई जळगाव विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप गावित यांच्या पथकाने हि कारवाई केली आहे. या कारवाईत पीएसआय सनिल पाटील, महेश महाले, रविद्र मोतीराया, मिनल साकळीकर, विजय काळे, कैलास सोनवणे यांच्यासह रामानंद पोलीस स्थानकाचे पीएसआय शांताराम पाटील, विकास महाजन,…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  ठाकरे गटातील संजय राऊतांवर आरोप करत अनेक बड्या नेत्यांनी शिवसेनेला रामराम ठोकला.अशातच आता शिवसेनेची यंग ब्रिगेडही नाराज असल्याचं आता उघड झालं आहे. कारण युवतीसेनेच्या 35 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. युवती सेना सहसचिव शर्मिला येवले यांनी आपल्या समर्थकांसह युवती सेनेचा राजीनामा दिला आहे. मागच्या काही दिवसात पक्षात जे सुरु आहे. त्यावर युवती सेनेच्या पदाधिकारी नाराज आहेत. अडचणीच्या काळात पक्ष सोडणं योग्या नाही पण पदाधिकारी राजीनामा देण्यावर ठाम आहेत. 35 पदाधिकारी युवतीसेना पदाचा राजीनामा देत आहोत, असं शर्मिला येवले यांनी यावेळी सांगितलं. युवती सेनेच्या पदाधिकाऱ्यांना वरुण सरदेसांचा फोन आला होता. त्यांनी फोन करून मुंबईत भेटीसाठी बोलावलं आहे. युवती सेनेच्या…

Read More