Author: editor desk

धरणगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत राज्यकर निरीक्षक ह्या पदासाठी २०२१ या वर्षी झालेल्या परीक्षेत, चि.अनुराग सखाराम पाटील.शिरपूर जि.धुळे यांची राज्य कर निरीक्षक या पदासाठी नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात निवड करण्यात आली. शिरपूर तालुक्यातील गरताड येथील चि.अनुराग सखाराम पाटील यांचे वडील सखाराम उत्तम पाटील हे (शिरपूर सहकारी शेतकरी साखर कारखाना येथे) अकाऊंन्टट पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत व आई प्रा.सौ.मंगला पाटील.(आर.सी. पटेल.अध्यापक विद्यालय शिरपूर येथे) प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. चि.अनुराग यास मिळालेल्या यशाचे शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, माजी शिक्षण मंत्री व विद्यमान विधान परिषद आमदार अमरिश पटेल, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या…

Read More

अहमदाबाद : वृत्तसंस्था  देशातील गुजरात राज्यात निवडणुकीची धामधूम सुरु असतांना पोरबंदर जिल्ह्यात जवानांच्या आपापसात झालेल्या चकमकीत भारतीय राखीव बटालियनचे (आरपीएफ) दोन जवान शहीद झाले असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. जवान आपापसात का भिडले हे अद्याप स्पष्ट झालं नाही. पोलिसांनी तताडीने दखल घेत जखमींना रुग्णालयात दाखल केलं. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांच्या प्राथमिक तपासात ज्या सैनिकांमध्ये ही चकमक झाली आणि त्यानंतर गोळीबार झाला, ते सैनिक निवडणूक ड्युटीसाठी आले होते, असे आढळून आले आहे. एका जवानाने आपल्या सहकाऱ्यांवर एके ४७ मधून गोळीबार केला आहे. मात्र,…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  ठाकरे यांनी बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली येथे आज सभा घेतली. यावेळी त्यांनी भाजपवर आयात पक्ष म्हणून जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर प्रखर शब्दांत टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले की, आपल्या छत्रपतींचा अपमान करायचा. महाराष्ट्रत येणारे उद्योगधंदे गुजरातच्या निवडणुकीसाठी गुजरातमध्ये वळवले. कारण गुजरातच्या निवडणुका जिंकायच्यात. कालसुद्धा कर्नाटकचे मुख्यमंत्री बोंबलले. त्यांनी सोलापूर, अक्कलकोटवर हक्क सांगितला. भीती याची वाटते. जसे उद्योग गुजरातला नेले, तसे महाराष्ट्राचे तुकडे करायला हे मागे पुढे पाहणार नाहीत. का? कर्नाटकच्या निवडणुका. आपले मिंदे मुख्यमंत्री शेपूट घालून बसतील. ठाकरे पुढे म्हणाले की, इकडचे…

Read More

पुणे : वृत्तसंस्था  मराठी चित्रपटामध्ये आपली छाप सोडणारे अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 77 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्च्यात पत्नी वृषाली आणि दोन मुली आहेत. गेल्या 5 नोव्हेंबरपासून त्यांच्यावर मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. गुरुवारपासून त्यांची प्रकृती खालावली होती. शुक्रवारी त्यांच्या प्रकृतीत आश्वासक सुधारणा होत असल्याचे वृत्त होते. मात्र आज सकाळी रुग्णालयाने जारी केलेल्या हेल्थ अपडेटमध्ये त्यांची प्रकृती खालावली होती. मल्टीपल ऑर्गन फेल्युअर झाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. ते व्हेंटिलेटवर होते. विक्रम गोखले यांची महत्त्वाची भूमिका असलेला गोदावरी हा चित्रपट याच महिन्यात प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्यांच्यासह…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  शहिदांच्या अभिवादन कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद लिमये , पोलिस महासंचालक रजनीश सेठ व मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांनी पादत्राणे काढून हुतात्मा स्मारकात शहिदांना अभिवादन केले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि वाद हे समीकरण काही केल्या सुटत नसतानाचे दिसतेय. कोश्यारी आज पुन्हा एकदा वादात सापडलेत. त्यांनी चक्क मुंबई हल्ल्यातील शहिदांना चप्पल घालून अभिवादन केलेय. यामुळे पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यताय. राज्यपाल कोश्यारी,…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  सहा महिन्यांपूर्वी शिंदे यांच्यासह ५० आमदार गुवाहाटीला गेले होते. त्या वेळी शिंदे हे मुख्यमंत्री व्हावे, असा नवस कामाख्या देवीला केला होता. हा नवस पूर्ण झाल्याने तो फेडण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आपल्या सहकाऱ्यांसह निघाले आहेत. विशेष विमानाने आमदार आणि खासदार गुवाहाटीला जात आहेत. एकूण 180 जण विमानात आहेत. हे सर्व जण आज दुपारी साधारण 12 वाजेपर्यंत गुवाहाटीत उतरतील. त्यानंतर दुपारी ते देवीचे दर्शन घेतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या गटातील आमदार, खासदारांना घेऊन आज पुन्हा गुवाहाटीला जात आहेत. गुवाहाटीला हे आमदार, खासदार कुटुंबासह कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहेत. मुंबई विमानतळावरून शिंदे गट रवाना झाला असून थोड्याच वेळात गुवाहाटीला पोहोचण्याची शक्यता…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  या सरकारची जीभ दिल्लीला गहान ठेवलीय का? एवढच मला विचारायचंय असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला. आज सकाळी संजय राऊतांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. राज्यात सध्या संतप्त वातावरण आहे. अशा स्थितीत सरकार आहे कुठं? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांच्या बाबतीत सरकार गप्प. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सोलापूर, सांगली खेचून घेण्याची भाषा केली तरी सरकार गप्प. आता भाजपचे प्रचारक रामदेवबाबांनी महिलांविषयी अपमानकारक वक्तव्य केलं आहे, तरी सरकार गप्प आहे. आज आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी बुलढाण्याला जात आहोत. आजची बुलढाण्यातील सभा ही ऐतिहासीक होणार…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  ठाण्यात झालेल्या एका महिलांच्या कार्यक्रमात योगगुरू रामदेवबाबा यांच्या कथित वक्तव्यावरून वाद निर्माण झाला. दरम्यान, येथे उपस्थित असलेले अपक्ष आमदार रवी राणा यांनी रामदेवबाबांच्या वक्तव्याचा बचाव केला आहे. रामदेवबाबा जे काही बोलले ते मी व्यवस्थित ऐकले आहे. त्यात महिलांचा अवमान होईल, असे काहीही नव्हते. “माझ्यासारखा आपण (महिला) काहीही परिधान केले नाही तरीही चांगले दिसतात!” रामदेवबाबांच्या या क्तव्यावरून शुक्रवारी वाद झाला होता. रामदेव बाबांचे हे विधान आक्षेपार्ह नाही का?, या प्रश्नाला उत्तर देताना आमदार रवी राणा म्हणाले की, रामदेवबाबांचे ते वाक्य आपण विचार करू त्या अर्थाचे ठरू शकते. रामदेव बाबांना म्हणायचे होते की, स्त्रिया हे आई, बहीण आणि देवीचे…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्याच्या राजकारणात काही महिन्यांपूर्वी अनेक घडामोडी घडल्या. राज्यात सत्तांतर झालं आणि त्याचं मुख्य केंद्रस्थान राहिलं ते म्हणजे गुवाहाटी. सत्तांतराच्या केंद्रस्थानी राहिलेल्या या गुवाहाटीचं स्थान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार यांच्यासाठी वेगळंच आहे. दरम्यान राज्यात सत्तांतर व्हावं झाल्यानंतर पुन्हा एकदा एकनाथ शिंदे (बाळासाहेबांची शिवसेना) पक्षाचे आमदार आणि खासदार कुटुंबासह आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गुवाहाटीला जात आहेत. गुवाहाटीमधील प्रसिद्ध कामाख्या देवीच्या दर्शनासाठी हे सगळे याठिकाणी जात आहेत. यावेळी मुंबई विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आमदार आणि खासदारांसह कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहेत. दरम्यान आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी धरणगाव तहसिल कार्यालयात रेशन कार्डसाठी लक्ष्मी नगर परिसरातील रहिवाशी सुनील भालेराव गेले असता त्यांनी तहसीलदार नितीनकुमार देवरे यांची भेट घेऊन रेशनकार्ड मिळण्यासाठी विनंती केली सोबतच एमपीएससी परीक्षेची मी तयारी करत असल्याचे सांगितले. यावेळी तहसीलदार देवरे यांनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करत तात्काळ पुरवठा विभागात रवींद्र म्हसकर लिपिक यांना सूचना करून रेशन कार्ड बनविण्यासाठी सांगितले. यावेळी केवळ अर्ध्या तासात पुरवठा विभागाने सुनील भालेराव यांना तत्परता दाखवत रेशन कार्ड देऊ केले. या अनुभवामुळे सुनील भालेराव यांनी प्रशासनाचे आभार मानले असून यामुळे स्पर्धा परीक्षा करण्यासाठी प्रेरणा मिळाली असल्याचे कथन केले. मी धरणगाव येथे रुजू झाल्यापासून शेतकरी,अपंग,महिला व विद्यार्थी यांची कामे तत्परतेने…

Read More