Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी  ग्रामीण खेळाडूंनी क्रिकेटकडे खिलाडू वृत्तीने पाहून खो – खो कबड्डी या खेळाबरोबरच क्रिकेट जगतातही आपले नाव कमवावे व देशाचा अभिमान वाढवावा. त्यांनी तुफान फटकेबाजी केली. यावेळी ते म्हणाले की, क्रिकेटमधील गुण मला राजकारणात कामी आले खेळात आणि राजकारणात कोणाला कसे पाठवायचे हे चांगलेच ठाऊक आहे. जळगाव तालुक्यातील मोहाडी येथे जय मातादी मित्र मंडळ तर्फे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या क्रिकेट स्पर्धांचे उद्घाटन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ना. गुलाबराव पाटील यांनी स्वतः क्रिकेट खेळत जोरदार बॅटिंग केली. मंत्री पाटील यांनी षटकार व चौकार मारल्या नंतर प्रेक्षकांनी देखील…

Read More

पाळधी : प्रतिनिधी  संत गजानन महाराज सेवा समिती शाहूनगर व बांभोरी यांच्यातर्फे सालाबादप्रमाणे यंदाही जळगाव ते श्री क्षेत्र शेगाव पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी बांभोरी येथील महादेव मंदिर येथून दिंडीचे प्रस्थान झाले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आरती व पूजा करण्यात आली. पालखी बांभोरी येथून निघून परिक्रमा करणारे यशवंत वाणी यांनी शाहूनगरातील हनुमान मंदिराजवळ देखील सहभाग घेतला. नारायण टेकावडे, संतोष शेळके, जानकीराम भोई, कैलास तिवारी, शंकर टेकावडे यांच्यातर्फे वारीमध्ये सहभागी माऊली भक्तांना चहापान व नाश्ता देण्यात आला. वारीमध्ये अध्यक्ष विजय वाडकर व मंडळातर्फे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. मोहन सोनवणे, हभप शांताराम…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी  गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कूलच्या १४ वर्षाआतील विद्यार्थ्यांनी तालुकास्तर कबड्डी स्पर्धेत विजय मिळवला आहे. जीपीएस कॅम्पस पाळधी येथे झालेल्या तालुकास्तरिय कबड्डी स्पर्धेत शाळेच्या १४ वर्षा आतील संघाने अंतिम सामन्यात सर्वज्ञ हायस्कूल बोरखेडा या संघावर विजय मिळवला. या सर्व खेळाडूंचा आज शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी क्रीडा शिक्षक अमोल सोनार, जगन गावीत, संघ प्रशिक्षक दीपक बयस (माजी विद्यार्थी) यांचा प्राचार्या चैताली रावतोळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संघाचा कर्णधार मेहुल कोठारी, उपकर्णधार मनिष पाटील, खेळाडू भावेश पाटील, आयुष जनकवार, उमन पटेल, विवेक पाटील, अनिकेत माळी दक्ष महाजन, जुएब शेख, क्रिष्णा पवार, सोहम बाविस्कर, दर्शन महाजन या सर्वांचा…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  महाराष्ट्रातील जनतेची सर्व संकटे दूर व्हावीत, आनंद, सुख-समृद्धी मिळावी, असा नवस कामाख्या देवीच्या चरणी केल्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे सांगतात, पण महाराष्ट्रावरील खरे संकट मुख्यमंत्री व त्यांचा गद्दार मिंधे गट हेच आहेत, कामाख्या देवीचे दर्शन घेऊन शिंदे गट गुवाहाटीहून परतताच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने त्यांच्यावर खोचक टीका केली आहे. कामाख्या देवी खंजीर खुपश्या लोकांना बळ देणार नाही, असा हल्लाबोल ठाकरेंनी केला आहे. तसेच, हे संकट देवी लवकरात लवकर दूर करेल व महाराष्ट्राला सुखाचे, आनंदाचे, स्वाभिमानाचे दिवस आणेल याविषयी आमच्या मनात शंका नाही. देवी एकदम कडक आहे याची प्रचीती येईलच, असे ताशेरेही ठाकरेंनी ओढले आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून…

Read More

मेरठमधील शालेय विद्यार्थ्यांनी शिक्षिकेला ‘आय लव्ह यू’ म्हटले. तसेच तिची वर्गात आणि रस्त्याने ये-जा करताना मुलांकडून छेड काढली जात आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्रस्त झालेल्या शिक्षिकेने अखेर पोलिस ठाण्यात तीन विद्यार्थ्यांविरूद्ध विनयभंग आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ‘I Love You’ इंग्रजी भाषेतील हे तीन शब्द प्रेम व्यक्त करण्यासाठी वापरले जातात. जेव्हा एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीप्रती असलेले प्रेम व्यक्त करायचं असेल तर ती या शब्दांद्वारे व्यक्त होते. पण जर कोणी हे जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न केला तर तो अतिरेक वाटू लागतो. शिक्षिकेचा आरोप आहे की, त्यांच्या शाळेतील बारावीचे विद्यार्थी तिला अनेक दिवसांपासून त्रास देत आहेत. कधी वर्गात,…

Read More

पुणे : वृत्तसंस्था  गेल्या दोन वर्षापासून मनसेचे पुणे शहरातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर नेहमीच येत असतांना दिसून आला आहे. या वादामुळे जिल्हाध्यक्ष पदावर असलेले वसंत मोरे यांचे पद साईनाथ बाबर यांना देण्यात आले होते. पण पुन्हा आता मनसेचा वाद विकोपाला गेला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुंबईत गटाध्यक्षांचा मेळावा घेऊन मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकणार असतानाच आता मनसेतील नाराजीच्या चर्चा समोर आल्या आहेत. मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे पुन्हा नाराज झाल्याची चर्चा आहे. वसंत मोरे यांना मनसेच्या कार्यक्रमाला बोलावण्यात आलं. पण त्यांना भाषणच करू दिलं नाही. त्यामुळे मोरे नाराज असल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळे पुणे मनसेत सर्व काही अलबेल नसल्याचीही चर्चा…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था  ठाकरे गटाची सुरु असलेली प्रभोधन यात्रा सध्या नाशिक येथे असतांना सुषमा अंधारे हे शिंदे गटातील आमदाराची भेट घेणार असून त्यांना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राज्यात सुरु आहे. शिंदे गटाला ठाकरे गट सुरुंग लावेल का हा प्रश्न लवकर सुटणार आहे ? यावेळी सुषमा अंधारे म्हणाले कि, मी येत्या 16, 17 आणि 19 डिसेंबर रोजी नाशिक, मालेगाव, नांदगावला जाणार आहे. कारण सुहास भाऊ (सुहास कांदे) आहे, दादा भुसे आहेत, या भावांना मी भेटायला येणार आहे. सुहास भाऊला विस्ताराने भेटणार आहे. निश्चित भेटणार आहे. अर्थातच मनमाडच्या सुहासभाऊलाच मी त्यांना भेटणार आहे, असं उपरोधिक विधान ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या उपनेत्या…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  दोन दिवसांचा गुवाहटी दौऱ्यावर शिंदे गटा असतांना आज त्यांचा दौरा मुंबईत होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. खोक्यांच्या मुद्द्यावरुनही शिंदेंनी ठाकरेंना थेट आव्हान दिलं. उद्धव ठाकरेंनी कालच्या बुलडाण्यातील सभेत शिंदे गटातील आमदारांना रेडे, खोके सरकार… असं संबोधल्यानंतर आज एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर नाव घेता टीका केली. त्यांची मानसिकता ढळली आहे. नैराश्येतून ते हे बोलत आहेत. सरकारबद्दल लोकांमधून चांगल्या प्रतिक्रिया येत असल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, असं शिंदे म्हणाले. आमदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुवाहटीमध्ये जात कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. शिवाय आसामच्या मुख्यमंत्र्यांचा पाहुणचार घेतला. यावेळी बोलतांना एकनाथ शिंदे म्हणाले की,…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था  बाळासाहेबांवर थिल्लरपणे टीका करणाऱ्यांच्या हातात शिवबंधन? सांगा कुणी केली गद्दारी? असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे. नितेश राणे यांचं हे ट्विट व्हायरल झाल्याने सुषमा अंधारे प्रचंड संतापल्या असून त्यांनी थेट निलेश राणे आणि नितेश राणे यांचे संस्कारच काढले आहेत. सुषमा अंधारे या प्रबोधन यात्रेनिमित्ताने आज नाशिकमध्ये आल्या आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट राणे कुटुंबावर हल्ला चढवला. आपला नीतू आणि नीलू प्रचंड आगावू आहेत. नारायण राणे यांनी त्यांना चांगले संस्कार दिले नाहीत. तो व्हिडीओ जुना आहे. विचारांचं खंडनमंडन करावं लागतं. राणेंच्या मुलांचा अभ्यास कमी आहे. मी त्यांचा कणकवलीत जाऊन होमवर्क घेतल्याने ते अस्वस्थ झाले आहेत,…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील ३२ वर्षीय तरुणाला मारहाण करीत मोबाईल लांबविल्याची घटना घडली असून या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील पिंप्री येथील दि २५ रोजी रात्रीच्या सुमारास नदीच्या पुलाजवळ एका दुचाकीवर तीन ते चार अनोळखीनी संदीप सुरेश बोरसे(वय ३२) या तरुणाला धक्काबुकी करीत त्याच्या जवळील ९ हजार ८०० रुपये किमतीचा मोबाईल घेवून पळून गेले या प्रकरणी संदीप बोरसे यांनी धरणगाव पोलिसात धाव घेत अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read More