जळगाव : प्रतिनिधी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणातून वाचनाची महत्ता अधोरेखीत करतांना आज तंत्रज्ञान हे कितीही अद्ययावत बनलेले असले तरी वाचनाचे महत्व अबाधीत असल्याचे नमूद केले. वाचाल तर वाचाल अशी म्हण असून प्रतिकूल परिस्थितीतही व्यक्ती घडविण्याचे कार्य ग्रंथ आणि ग्रंथालये करीत असतात. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी ग्रंथालय जीवनातील अविभाज्य घटक आहे. ग्रंथ हे महत्वाचे शस्त्र असून ग्रंथालय हेच ज्ञानेचे देवालय असून या देवालयाचे पुस्तक हेच देव आहे. ग्रंथाचे वाचन केल्याने विचार आणि विचाराने आचार तयार होतात . वाचनामुळे विचारांची निर्मिती होते असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ग्रंथोत्सव सन 2022-23 ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी शहरातील दुचाकी चोरी करणारे आरोपीचा शोध घेण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार अपर पोलीस अधीक्षक चंद्रकात गवळी केलेले मागदर्शन व सुचना नुसार पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांनी गुप्त माहितीद्वारे मिळवीली की, जळगाव तालुका पोस्टे कडील सीसीटीनएस गुरनं २८८/२०२२ भा.द.वि कलम ३७९ प्रमाणे सदरचा दाखल गुन्हयात शेतक-यांचे बांधावरील मो.सा चोरी गेली होती तो गुन्हा स्थागुशा जळगाव याचे कडील खालील पथकाने उघड केला होता त्यात १ स्टार सिटी मो.सा हस्तगत करून १ आरोपीतांस अटक करण्यात आली होती. सदर अटक आरोपीताचा साथीदार असलेला रेकॉर्डवरील गुन्हेगार दिपक भास्कर सपकाळे रा. धामणगांव ता.जि. जळगाव हा त्याचे राहते गावी धामणगांव येथे आला…
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून नेहमी वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत आलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पदमुक्त होण्याची शक्यता आहे. तसे संकेत मिळत असून राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या जवळील व्यक्तींकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली असल्याची माहिती मिळाली आहे. कोश्यारी यांनी पुन्हा आपल्या राज्यात जाण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचे म्हटले जात आहे. राज्यपाल भगतसिंह यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वक्तव्य करताना, शिवाजी महाराज हे जुन्या काळातले नायक होते, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर राज्यात त्यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले होते. भाजप वगळता इतर सर्व पक्षांनी त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला होता. शिंदे गटानेही नाराजी व्यक्त केली होती. त्याशिवाय, छत्रपती…
पुणे : वृत्तसंस्था पुण्यातील चार्टर्ड अकाऊंटंट अनिरुद्ध शेठ वर त्याच्या ऑफिसमधील रिसेप्शनिस्ट महिलेवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिसेप्शनिस्ट महिलेला पेस्ट्री आणि कोल्ड्रिंक्समधून गुंगीचे औषध पाजून अनिरुद्धने अत्याचार केल्याचा आणि त्याचा व्हिडीओ तयार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन अनिरुद्ध शेठ आपल्यावर गेल्या काही दिवसांपासून बलात्कार करत होता, असाही त्याच्यावर आरोप आहे. येरवडा पोलीस ठाण्यात अनिरुद्ध शेठवर गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५० वर्षीय महिला सीए असलेल्या अनिरुद्ध शेठ याच्या ऑफिसमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून कार्यरत होती. मागील काही वर्षांपासून त्यांच्यावर सतत लैंगिक अत्याचार सुरु होता, असा…
मुंबई : वृत्तसंस्था ठाणे येथील एका सार्वजानिक कार्यक्रमात बाबा रामदेव उर्फ राम किसन यादव यांनी महिलांसंबंधी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन विधान केले होते. या वक्तव्याची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेत बाबा रामदेव उर्फ राम किसन यादव यांना याबाबतीत आपला खुलासा तीन दिवसाच्या आत सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. याबाबतीत त्यांचा खुलासा राज्य महिला आयोग कार्यालयास प्राप्त झाला असून त्यांनी केलेल्या वक्तव्याबाबत माफी मागितली आहे अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिली आहे. काय होते प्रकरण ? पंतांजली योगपीठचे बाबा रामदेव उर्फ राम किसन यादव यांनी महाराष्ट्रातील ठाणे येथे एका कार्यक्रमा दरम्यान महिलांच्या संदर्भात आक्षेपार्य वक्तव्य केले…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात सर्वत्र श्रद्धा वालकर हत्याकांडांचा निषेध करण्यात येत असतानाच दिल्लीत अजून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीची मुलाच्या सहायाने हत्त्या करून फ्रीजमध्ये तुकडे ठेवल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मायलेकाला अटक केली आहे. अंजन दास असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. श्रद्धा हत्याकांडाप्रमाणे अंजन दासची हत्या करण्यात आली. त्यानंतर मायलेकांनी मृतदेहाचे तुकडे एक एक करुन फेकले. दिल्लीतील पांडवनगरमध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पूनम दास असे पत्नीचे तर दीपक दास असे मुलाचे नाव आहे. पूनम दासने पतीला आधी नशेच्या गोळ्या खाऊ घातल्या, त्यानंतर मुलाच्या मदतीने त्याची हत्या केली. अंजन दास याचे…
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे नेहमीच कार्यकर्त्यांच्या सुख दुखत आपली हजेरी लावत असल्याने ते नेहमीच सोशल मिडीयावर चर्चेत असतात. जळगाव ग्रामीण मतदारसंघातील धरणगाव तालुक्यातील साळवा येथील कुणाल इंगळे व नांदेड येथील भरत सैदाने हे धरणगाव येत असतांना त्याची मोटरसायकलचा अपघात झाला असता. त्यांना कुणाल याला जळगाव येथील वर्धमान हॉस्पिटला तर भरत याला आर्किड हॉस्पिटला उपचार साठी आणले असता पालकमंत्री यांना कळताच त्यांनी आपला पुढचा दौरा रद्द करून त्यांनी तात्काळ हॉस्पिटल गाठले आणि कुणाल व भरत यांची तब्येत ची विचारपूस केली. यावेळी सोबत जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, आबा माळी, नवल पाटील, उपस्थित होते.
मुंबई : वृत्तसंस्था ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा एक जुना व्हीडिओ नितेश राणे यांनी ट्विट केला होता. त्यामध्ये सुषमा अंधारे ह्या स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल टीकात्मक बोलत आहेत. त्या व्हीडिओला उत्तर म्हणून सुषमा अंधारे यांनी हे पत्र नितेश यांना लिहिले असून त्यासोबत नितेश राणेंच्या जुन्या-नव्या वक्तव्यांचा व्हीडिओदेखील शेअर केलाय. सुषमा अंधारे यांनी नितेश राणे यांना सोशल मीडियावर एक पत्र लिहिलं आहे. सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्ट करुन लिहिलेलं पत्र जशास तसं… प्रिय नीतू बाळा, तुझा अभ्यास फारच कच्चा आहे. तुला अजून होमवर्क ची गरज आहे. तब्बल वीस वर्षांपूर्वीचा महाविद्यालयीन वाद-विवाद स्पर्धेतला व्हिडिओ शेअर करताना किमान चेहरा पट्टीतील बदल तरी…
भुसावळ : प्रतिनिधी राज्यात गुन्हेगारीमुळे बदनाम असलेल्या भुसावळात पुन्हा खाकीवर हात उचलण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली असून फायटरने केलेल्या हल्ल्यात बाजारपेठ पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार जिजाबराव पाटील जखमी झाले आहेत. याप्रकरणी संशयीताविरोधात भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयीत पसार झाला आहे. शहरात वाढत्या चोऱ्या घरफोड्या वाढल्या असतानाच आता गुन्हेगारांची दिवसागणिक हिंमतही वाढू लागली आहे. जेथे पोलिसही सुरक्षित नाहीत तेथे सर्वसामान्य जनतेचे काय? असा प्रश्न सुज्ञ नागरीक उपस्थित करीत आहेत. शहरातील वसंत टॉकीजजवळील महाराणा प्रताप चौकात बाजारपेठ पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार जिजाबराव पाटील हे सोमवार, 21 रोजी दुचाकी (एम.एच.19 डी. आर. 5675) ने जात असताना दुपारी 12.30…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव दूध महासंघाची ही निवडणूक एकूण २० जागांवर लढवली जाणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण तसेच शिंदे गटाचे आमदार व मंत्री गुलाबराव पाटील यांनी चांगलीच फील्डींग लावल्यामुळे एकनाथ खडसे यांच्यासमोर मोठं आव्हान उभं ठाकलं आहे. जळगाव दूध महासंघाच्या निवडणुकीत एकनाथ खडसे पूर्णपणे घेरले गेले आहेत. मी एकनाथ खडसे यांच्या सावलीतही उभा राहणार नाही, बिनविरोध निवडणुकीचा प्रश्नच येत नाही, अशी भूमिका चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी घेतली आहे. शिंदे गटाचे गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते एकनाथ खडसे याच्याकडून ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते, अशी वक्तव्ये आल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या होत्या.…

