मुंबई : वृत्तसंस्था ठाकरे व शिंदे गटाचा वाद आता पुन्हा वाढत असल्याचे चिन्ह दिसून येत आहे. त्यातच उद्धव ठाकरे यांची बुलडाणा येथे झालेल्या सभेनंतर खासदार प्रतापराव जाधव यांनी तर बुलढाण्यातून लोकसभेची निवडणूक लढण्याचंच आव्हान दिलं आहे. बुलढाण्याचे शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनीच आता, थेट उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिलं आहे. हिंमत असेल तर उद्धव ठाकरे यांनी माझ्याविरोधात बुलढाण्यातून निवडणूक लढवावी असं खुलं आव्हान त्यांना देण्यात आलं आहे. प्रतापराव जाधव एवढे आक्रमक का झाले? याचे नेमके कारण आहे ते म्हणजे 2 दिवसांआधीच उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्यातल्या चिखलीमध्ये सभा घेतली होती आणि प्रतापरावांना गद्दार खासदार म्हणत भाजपच्या तिकीटावर लढणार नाही हे…
Author: editor desk
गेल्या काही दिवसापासून सोने चांदीच्या दरात स्थिरता दिसून येत होती. मात्र आज सोन्याच्या दरात घसरण दिसून येत असून चांदीचे दर मात्र स्थिर आहे. सोन्याच्या दरातील घसरणीमुळे सोने खरेदीकडे लोकांचा कल दिसून येईल. आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 48,460 तर 24 कॅरेट साठी 52,880 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 614 रुपये आहे. देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या. चेन्नई – 53,630 रुपये दिल्ली – 53,040 रुपये हैदराबाद – 52,880 रुपये कोलकत्ता – 52,880 रुपये लखनऊ – 53,040 रुपये मुंबई – 52,880 रुपये नागपूर – 52,880 रुपये पुणे – 52,880 रुपये…
मुंबई : वृत्तसंस्था स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेते पडलेल्या फुटीनंतर उद्धव ठाकरे गट आणि वंचित एकत्र येणार आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर हे काही दिवसांपूर्वी एका मंचावर आले होते, त्यानंतर युतीच्या चर्चांना उधाण आले होते. भाजपविरोधात ठाकरे गटासोबत वंचित बहुजन आघाडी युती करणार असून वंचितकडून यासाठी होकार देण्यात आल्याची माहिती वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी दिली आहे. शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी हे एकत्र येण्याच्या भूमिकेमध्ये एकमतावर आले आहेत, आम्ही सकारात्मक आहोत. बोलणी पुढे गेली असून वंचितच्या तीन प्रतिनिधींची सुभाष देसांईंसोबत दोन बैठका घेतल्या आहेत. बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली आहे. सुभाष देसाई दोन वेळा प्रकाश आंबेडकर यांना भेटले आहेत, त्यांच्यात…
मुंबई : वृत्तसंस्था गोव्यात सुरू असलेल्या ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’चे ज्युरी प्रमुख नदाव लॅपिड यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ या सिनेमावर भाष्य केलं. इस्रायली चित्रपट निर्माते नदाव यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ला असभ्य आणि प्रचारकी चित्रपट असं म्हटलं. त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत.यावर देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, ‘द काश्मीर फाइल्स’ सिनेमात वास्तव दाखवलं गेलंय. काश्मिरी पंडितांवरील अन्यायावर या सिनेमातून भाषिय करण्यात आलंय. या सिनेमासाठी रिसर्च केला गेला आहे. अभ्यास करून ‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमा तयार केला गेलाय. ‘द काश्मीर फाइल्स’ सिनेमावरून सध्या जोरदार दावेप्रतिदावे सुरु आहेत. काश्मीरी पंडितांच्या जीवनावर आधारित असणाऱ्या या सिनेमावरून…
मुंबई : वृत्तसंस्था पोलीस भरतीत इच्छुक उमेदवारांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरताना सर्व्हर डाऊन असल्याने राज्यातील अनेक उमेदवारांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे राज्य सरकारने अर्ज भरण्याची मुदत 15 दिवसांनी वाढवली आहे. उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात नुकतीच माहिती दिली आहे. https://twitter.com/Devendra_Office/status/1597524539009007616?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1597524539009007616%7Ctwgr%5Eabb71c7f500ff12c22e16ac47d79c494388f8f29%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.tv9marathi.com%2Fcareer%2Fpolice-recruitment-2022-home-minister-devendra-fadnavis-informed-15-days-extension-for-online-application-au122-834467.html देवेंद्र फडणवीस म्हणाले, पोलीस भरतीसाठी आमच्याकडे आतापर्यंत 11 लाख 80 हजार अर्ज आले आहेत. मात्र काही ठिकाणाहून उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे अर्ज भरण्याची मुदत आम्ही १५ दिवसांनी वाढवून देत आहतो. उर्वरीत तक्रारी दूर करण्यासाठी हे जास्तीचे १५ दिवस देत आहोत, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना भडकाऊ भाषण केले म्हणून कर्नाटक न्यायालयाने समन्स बजावले आहे. त्याकरिता संजय राऊत हे कर्नाटकमध्ये जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी माझ्यावर हल्ला होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली होती. त्यावर राष्ट्रावादी कॉँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. भुजबळ म्हणाले, संजय राऊत यांच्या वर हल्ला चढविण्यासाठी बोलावलं जातं ही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राऊत यांच्या जीवाला धोका असल्याचे बोलले जात आहे. छगन भुजबळ यांनी देखील सीमा प्रश्नाच्या संदर्भात यापूर्वी अनेक आंदोलन केले आहे, त्याप्रकरणी त्यांच्यावर पोलीसांनी कारवाई देखील केली होती. भुजबळ यांनी वेशभूषा बदलून बेळगावमधून प्रवेश केला…
मुंबई : वृत्तसंस्था बॉलिवूडसारखी भोजपुरी इंडस्ट्रीही बरीच चर्चेत असते. सध्या भोजपुरी सलमान खान म्हणून ओळखला जाणारा अभिनेता पवन सिंह आणि खेसारी लाल यादव यांच्यातील वाद चर्चेचा विषय ठरला आहे. खेसारीने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत त्याने नाव न घेता पवन सिंहवर आरोप केले आहेत. खेसारी लालने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्याने म्हटलंय की तो इंडस्ट्रीतील एका व्यक्तीच्या निशाण्यावर आहे आणि बरेच लोक त्याची साथ देत आहेत. माझी अवस्था सुशांत सिंह राजपूतसारखी होऊ शकते, असंही धक्कादायक वक्तव्य त्याने या व्हिडीओत केलं आहे. https://www.instagram.com/tv/Clap93IIoYl/?utm_source=ig_web_copy_link युट्यूबवरून डिलिट झाली खेसारीची गाणी…
चोपडा : प्रतिनिधी एका दुचाकी दोन तरुण चोपड्याहून गलंगीकडे जात असतांना हातेड – गलंगी रस्त्यावरील पाटचारीजवळ त्यांना भरधाव वेगात येणाऱ्या मोठ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने ते रस्त्याच्या बाजूला फेकले गेले तर समोरून येणाऱ्या मजुराच्या ट्रॅक्टर चालकाने जागीच ब्रेक लावल्याने ट्रॉली देखील पलटी होत त्यातील मजूर जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. सविस्तर वृत्त असे की, घोडगाव येथील सुरेश कमलसिंग बारेला(वय २६) व कुसुंबा येथील गोलू बारेला(वय १७) हे दोन्ही आपली मोटार सायकल क्रमांक एम.एच.१९.बी.पी.४९४० हिने चोपड्याहून गलंगीकडे जात असताना हातेड – गलंगी रस्त्यावरील पाटचारीजवळ त्यांना मागून ट्रकने धडक दिल्याने ते रस्त्याच्या बाजूला फेकले गेले व त्यांची मोटार सायकल रस्त्यात पडल्याने समोरून…
पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील शेतकरी एका जागेत गुरे चारत असतांना एकाने शेतकऱ्याला शिवीगाळ करीत मारहाण केल्या प्रकरणी पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, तालक्यातील मोंढाळे शिवारातील पडीत जागेत रामदास कौतिक माळी(वय ५६) हे शेतकरी आपले गुरे चारत असतांना संशयित आरोपी आत्माराम साहेबराव पाटील हे त्या ठिकाणी येत माळी यांना म्हणाले कि, अश्लील शिवीगाळ करीत तुला इथे गुरे चारण्यास मनाई केली असता तु येथे गुरे का चारत आहे. असे बोलून फिर्यादी रामदास माळी यांना दि २८ रोजी दुपारच्या सुमारास मारहाण केली या प्रकरणी पारोळा पोलिसात रामदास कौतिक माळी यांनी धाव घेत गुन्हा दाखल केला आहे.
चाळीसगाव : प्रतिनिधी शहरातील एका मंगल कार्यालय परीसातून तरुणाची दुचाको चोरी झाल्याची घटना घडल्याने चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील वैभव मंगल कार्यालय येथे दि २७ रोजी दुपारच्या सुमारास अनोळखी व्यक्तीने अजय यशवंत पाटील(वय २४) यांच्या मालकीची दुचाकी क्र.एम.एच.१९.डीजी.१०८७ हि अनोळखी चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडल्याने चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.महेद्र पाटील हे करीत आहेत.

