Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी  राज्यात पसरलेली गोवरची साथ आता जळगाव शहरातही आली आहे. शहरातील एका भागात तब्बल अकरा रुग्ण आढळून आल्याची माहिती महापालिकेच्या दवाखाना विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राम लावलाणी यांनी दिली. मात्र, या रुग्णांची प्रकृती चांगली असून, उपचारानंतर ते घरीच आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. जळगाव महापालिकेत नवनियुक्त आयुक्त देवीदास पवार यांनी बुधवारी दि ३० रोजी महापालिका दवाखाना विभागाची बैठक घेत गोवर साथीबाबत जळगावातील स्थितीची माहिती त्यांनी घेतली. वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी यांनी सांगितले, की शहरात गोवरच अकरा रुग्ण आढळले आहेत. ज्या भागात लसीकरणाला नकार देण्यात येतो, त्या भागातील हे रुग्ण आहेत. रुग्ण आढळून आलेल्या भागात आरोग्‍य विभागातर्फे सर्व्हे…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी मोठी बातमी समोर आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने 9 नोव्हेंबर 2022 रोजी राज्यातील सात हजार 751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार दिनांक 28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 (दुपारी 3 वाजेपर्यंत) या कालावधीत संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशनत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. राज्यभरात ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी इच्छुकांची लगबग सुरू असतानाच, निवडणूक आयोगाची वेबसाईट चालत नसल्याने राज्यभरात गोंधळ उडाला आहे. अशातच, यासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज ऑफलाईन भरण्यास परवानगील देण्यात आली आहे. याबाबत विरोधीपक्षनेते अजित पवार यांना माहिती देण्यात आली आहे. औरंगाबादमधील अनेक ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरताना वेबसाईट…

Read More

पाचोरा : प्रतिनिधी  तालुक्यातील नाचणखेडा शेत शिवारातील विहीरीत पाय घसरून पडल्याने लोहटार येथील २३ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे की, लोहटार ता. पाचोरा येथील जयकिरण संतोष पाटील (वय – २३) हा युवक २९ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास शेतातील पिकांना पाणी भरण्यासाठी गेला होता. दरम्यान जयकिरण हा लघुशंकेसाठी नाचणखेडा शेत शिवारातील विहीरी जवळुन जात असतांना अंधारामुळे अंदाज न आल्याने अचानक जयकिरण याचा पाय घसरून तो विहीरीत पडला. घटनेबाबत ग्रामस्थांना कळताच ग्रामस्थांच्या मदतीने जयकिरण यास विहीरीतुन बाहेर काढुन तात्काळ पाचोरा ग्रामिण रुग्णालयात दाखल केले असता…

Read More

एरंडोल : प्रतिनिधी  तालुक्यातील शेत रस्त्यावरील पाटच्या चारी जवळील कच्च्या रस्त्याने जाणारे ट्रॅक्टर खड्डे चूकवीत असताना ट्रॅक्टर ट्रालीसह पाटाचारीत कोसळल्याने त्यात २० वर्षीय योगेश ज्ञानेश्वर सैदाणे (रा.अंबे तालुका शिरपूर) हा ट्रॅक्टरच्या धुड खाली दाबला जाऊन जागीच ठार झाला. ही घटना ३० नोव्हेंबर २०२२ रोजी १०.१५वाजेच्या सुमारास नागदुली शिवारात निंबा पाटील यांच्या शेताजवळ घडली. या अपघातात ट्रॅक्टर चालक सह ट्राली मध्ये बसलेले दोन मजूर हे किरकोळ जखमी झाले. योगेश सैंदाणे हा ट्रॅक्टरच्या मडगार्ड वर बसला होता. व ट्रॅक्टरचे धूड खाली दाबल्या गेल्याने तो जागीच गतप्राण झाला. लोकांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले व खाजगी गाडीने एरंडोल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जळगाव जिल्हाध्यक्ष रविद्र पाटील यांच्या मान्यतेने जळगाव महानगर युवतीअध्यक्ष पदावर दीपिका प्रकाश भामरे यांची नियुक्ती करण्यात आली असून या निवडीचे पत्र देखील रविद्र पाटील यांनी दीपिकाला दिले आहे. यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी, सुनील माळी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. या निवडीबद्दल सर्व स्तरातून दीपिका भामरे हिचे अभिनंदन होत आहे.

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यात चोरीच्या घटना दिवसेदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तरुणाने आपल्या प्रेयसीला खुश ठेवण्यासाठी चोरी करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी अटक केलेल्या बहादूर सिंग असं आरोपी चोराचं नाव असून तो ATM मधून पैसे चोरण्यामध्ये तरबेज होता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या चोरलेल्या पैशांचं तरुण काय करायचा हे वाचून तुम्हालाही धक्का बसेल. या पैशांना तो मुंबईत असलेल्या त्याच्या प्रेयसीवर उधळायचा. तिच्यासोबत मौज करण्यासाठी तो चोरीही करायचा. मिळालेल्या माहितीनुसार, बजरंग बहादूर हा त्याचे साथीदार राजेश सिंग आणि नरसिंग यांच्या मदतीने चोरीच्या घटना घडवून आणायचा. पोलिसांनी सांगितले की, बजरंग बहादूर…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  राज्यात गाजलेले घरकुल घोटाळ्याप्रकरणी वैद्यकीय कारणास्तव अंतरीम जामिनावर असलेले माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना आज मुंबई खंडपीठाने जामीन मंजूर केला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. ऑगस्ट २०१८ मध्ये माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्यासह अनेक नगरसेवक यांना धुळे जिल्हा न्यायालयाने शिक्षा आणि दंड ठोठावला होता. यानंतर बहुतांश संशयितांची नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली होती. यातील काही अपवाद वगळता इतरांना जामीन मंजूर करण्यात आला होता. तथापि, प्रमुख संशयित सुरेशदादा जैन यांना दिलासा मिळाला नव्हता. माजी सुरेशदादा जैन यांच्या जामिनासाठी अनेकदा प्रयत्न करण्यात आले तरीही त्यांना जामीन मिळालेला नव्हता. २०१९ मध्ये प्रकृतीच्या कारणास्तव जैन यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता.…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  इयत्ता 9 वी आणि दहावीत शिकणाऱ्या पाच अल्पवयीन मुलांना अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी हयातनगर पोलिसांनी मंगळवारी अटक केली. ही घटना ऑगस्टमध्ये घडली होती. परंतु, काही दिवसांपूर्वी कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर सोमवारी तक्रार दाखल केली. पाच मुलांपैकी तीनजण 15 वर्षांचे आहेत. एकजण दहावीच्या वर्गातील विद्यार्थी आहे, तर इतर दोघे 14 वर्षांचे आहेत. पीडित मुलगी 17 वर्षांची असून ती दहावीची विद्यार्थिनी आहे. पोलिसांनी सांगितलं की, आरोपी मुलांना पॉर्न व्हिडिओ बघण्याची सवय होती. शाळा सुटल्यानंतर अनेकदा ते त्यांच्या मोबाईलवर असे व्हिडिओ पाहायचे. ही सर्व रोजंदारी मजुरांची मुलं आहेत. पीडित मुलगी या मुलांना ओळखत होती. तिच्यावर ऑगस्ट महिन्यात 10 दिवसांच्या कालावधीत…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  शिवप्रताप दिनानिमित्त किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याचा मुख्यमंत्री शिंदे यांना अधिकार नाही, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. आज पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, शिवप्रताप दिनानिमित्त राज्यात जल्लोष नेहमीच होता. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांचा मुख्यमंत्र्यांनी धिक्कार केला असता तर त्यांच्या अभिवादनाचे महत्तव नक्कीच वाढले असते. राज्यपाल व त्रिवेदींचा धिक्कार करणे तर सोडाच उलट सरकार त्यांचे समर्थन करत आहेत. त्यामुळे आज गडावर जाऊन शिवरायांना अभिवादन करण्याचा त्यांना अधिकार आहे का?, हा प्रश्न समस्त महाराष्ट्रातील जनता विचारत आहे. या मुद्द्यावर खासदार उदयनराजेंचे अश्रू आम्ही पाहले आहेत. ते केवळ…

Read More

एरंडोल : प्रतिनिधी तालुक्यातील आडगाव येथील श्री संत सावता माळी मंगल कार्यालयाच्या जवळ राहणारे युवराज सुखदेव महाजन यांच्या घरात दिवसा घरफोडी झाली असून घरातील कपाटाचे लॉक तोडून सोन्याचे व चांदीचे दागिने मिळून 56 हजार रुपये किमतीचे दागिन्यांची चोरी झाली आहे. युवराज महाजन हे पत्नीसह बाहेरगावी गेले होते व मुलगा पत्नीसह शेतात कापूस वेचण्यासाठी गेला होता. त्यांच्या पश्चात ही चोरी झाली आहे. युवराज सुखदेव महाजन व त्यांच्या पत्नी हे दरेगाव येथे धार्मिक कार्यक्रमासाठी गेले. त्यानंतर मुलगा व सून सकाळी शेतात कापूस वेचण्यासाठी गेले. घर बंद पाहून चोरट्यांनी संधी साधत घरातील कपाटाचे लॉक तोडून, त्यातील सोन्याची सोनसाखळी, सोन्याच्या बाह्या ,लहान मुलांसाठीच्या सोन्याच्या…

Read More