Author: editor desk

सर्वांचा आवडता ऋतू म्हणजे हिवाळा. हिवाळा हा आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. हिवाळ्यात अनेक लोक व्यायाम नियमित करीत असतात तर काही जिममध्ये जावून आपली शरीर बनवीत असतात, हिवाळ्याच्या दिवसात रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवणे आवश्यक आहे. जेणेकरून वातावरणात झालेल्या बदलांमुळे आरोग्याच्या संबंधित तक्रारींशी लढता येईल. हिवाळ्याच्या दिवसात काही उपाय केल्यास हंगामी आजारांना दूर ठेवता येणे शक्य आहे. जाणून घेऊया या उपायांबद्दल सकस आहार घ्या: रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी निरोगी आहाराचे पालन करणे खूप महत्वाचे आहे. आपल्याला आवश्यक असलेली पोषकतत्त्वे प्रथिनेयुक्त आणि कमी कार्बोहायड्रेड आहारातून येतात. निरोगु आरोग्य राखण्यासाठी हिवाळ्याच्या दिवसात उपलब्ध असलेल्या भाज्या, फळे, कडधान्य खाणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते रोगप्रतिकारक…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  अनेक जिल्ह्यांत तलाठी पदे रिक्त असून, अनेक गावांचा अतिरिक्त प्रभार असल्याने जनतेच्या कामांना अडचणी येतात. एकाच तलाठ्याकडे अनेक गावे सोपवविण्यात आली आहेत. रिक्त पदांसह नव्याने पुनर्रचित सजा वाढ झाल्याने राज्यात चार हजार १२२ पदांची भरती करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. राज्यात १२ हजार ६२६ तलाठी पदे मंजूर असून, त्यातील आठ हजार ५७४ पदे स्थायी असून, चार हजार ६२ पदे अस्थायी स्वरूपाची आहेत. ग्रामपातळीवर प्रत्येक व्यक्तीचा तलाठ्याशी संबंध येत असतो. सात-बारा, उत्पन्न, शेतीविषयक दाखले यासाठी नियमितपणे तलाठ्यांच्या संपर्कात राहावे लागते. सध्या तलाठ्यांकडे तीन ते चार गावांचा पदभार असल्याने गावोगावी जावे लागते. दोन वर्षांपूर्वीची एक हजार १२ पदे रिक्त…

Read More

मेष: आजचा दिवस चांगला असेल. मोठ्यांचा सन्मान करा. त्यांचा सल्ला घ्या. घरातील जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या दिशेने काही नवीन निर्णय घेऊ शकता. व्यवसाय, नोकरीसाठी दिवस चांगला आहे. कामाच्या ठिकाणी सहकार्य मिळेल. दिवस व्यस्त असला तरी आरोग्याची काळजी घ्या. वृषभ: नात्यात कटूपणा येऊ देवू नका. स्वतःच्या वाणीवर आणि रागावर नियंत्रण ठेवा. वडिलांचं मत समजून घ्या. या राशीच्या व्यक्ती आपलं कौशल्य आणि समजूदारपणाने चांगल्या प्रकारे काम मार्गी लावतील. मिथुन: आजचा दिवस या राशीच्या लोकांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. व्यापारामध्ये चांगला नफा होईल. भविष्याचा विचार करून तुम्ही गुंतवणूक करू शकता. नोकरीत यश मिळेल. कोणत्याही जबाबदारीच्या कामात निष्काळजी राहू नका. कर्क: या राशीच्या लोकांसाठी शुक्रवार…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  वैद्य प्र.ता. जोशी यांच्या समृतीपित्यर्थ संपूर्ण महाराष्ट्र “प्रभा आयुर्वेद रथयात्रेचे” आयोजन करण्यात येत आहे. ही रथयात्रा २ डिसेंबर रोजी तुळजापूर येथून सुरु होऊन ५ जानेवारी रोजी धुळे येथे समारोप होणार आहे. दरम्यान ही रथयात्रा १४ डिसेंबर रोजी जळगाव येथे पोहोचून मुक्काम करेल, व १५ डिसेंबर रोजी जळगाव शहरात ही रथयात्रा अनेक ठिकाणी जाणार आहे. जळगाव येथे जिल्हा आयुर्वेद समूह या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करणार असल्याचे वैद्य नरेंद्र गुजराथी, जयंत जहागीरदार, जयदीपसिंग छाबडा, उदय तल्हार, विकास चौधरी, गणेश पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. त्याच बरोबर या यात्रेत जिल्ह्यातील सर्व वैद्य सहपरिवार सहभागी होतील. यावेळी ही रथ यात्रा १५…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील विरोधी पक्षाचे नेते नेहमी सत्ताधाऱ्यावर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडत असतातच. पण थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गंभीर आरोप केला आहे. एकनाथ शिंदे हे भ्रष्टाचार करुन मुख्यमंत्री झाले आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे. पटोले यांच्या या विधानावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. पटोले म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भाजपचे लोक वारंवार वादग्रस्त विधानं करत आहेत. त्यामुळं महाराजांच्या विचारांनी प्रेरित असलेले आणि भाजपला पाठिंबा देणारे किंवा भाजपत असलेले खासदार आणि आमदार यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या पदाचा राजीनामा देणार नाहीत कारण ते मोठ्या भय आणि भ्रष्टाचार करुन मुख्यमंत्री…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरात गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या चोऱ्याचे सत्र सुरु आहे. याचा शोध पोलीस घेत असतांना रामानंद नगर पोलीस स्थानकात घडलेल्या गुन्ह्यातील एक सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. जळगाव शहरातील होणा-या घरफोडी चोरीच्या घटना वाढल्याने घरफोडी चोरी करणारे आरोपीचा शोध घेण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकात गवळी अशांनी केलेले मागदर्शन व सुचना नुसार पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार रामानंदनगर पोस्टे सीसीटीएनएस गुरंन ३२९ / २०२२ भा.द.वि कलम ४५४, ४५७,३८० प्रमाणे सदरचा गुन्हा हा अज्ञात आरोपी विरूद्ध दाखल होता. या गुन्हयात फिर्यादी यांचे राहते घराचे गोडावून चे कडी कोंडा…

Read More

औरंगाबाद : वृत्तसंस्था  शेतकऱ्यांना करण्यात आलेली वीजबिलाची सक्ती व पीक विमा कंपन्यांविरोधात ठाकरे गटाने औरंगाबादेत ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन पुकारले आहे. आंदोलनादरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. औरंगाबाद-नगर रोडवर ईसारवाडी फाट्याजवळ अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 10 वाजेपासून चक्का जाम आंदोलन पुकारण्यात आले होते. ठाकरे गटाच्या कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले. पुण्याकडे जाणारा हा महत्त्वाचा रस्ता असल्याने आंदोलनामुळे येथे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी हस्तक्षेप करत अंबादास दानवेंची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंबादास दानवे आंदोलनावर ठाम होते. त्यामुळे अखेर पोलिसांनी अंबादास दानवेंसह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी अंबादास दानवे म्हणाले की, यंदा पाऊस…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील राजकारणातील काही नेत्याच्यामागे ईडी कारवाई लागली होती पण नुकतेच प्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडा हा देखील ईडीच्या जाळ्यात अडकला आहे. त्याची बारा तास चौकशी ईडीकडून करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यासगळ्या प्रकरणावर विजयनं भावूक होत प्रतिक्रिया दिली असून ती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. असं काय झालं की, लायगर फेम विजय देवरकोंडाला ईडीनं चौकशीसाठी बोलावलं, असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना आणि नेटकऱ्यांना पडला होता. त्या चित्रपटावरुनच त्याला ईडीनं ताब्यात घेतल्याचे बोलले जात आहे. यासगळ्यात मात्र विजयला प्रचंड मानसिक त्रास झाल्याचे त्यानं सांगितले आहे. त्याच्या चाहत्यांना देखील या प्रकरणामुळे मोठा धक्का बसला आहे. लायगरमध्ये त्याच्यासोबत प्रसिद्ध अभिनेत्री अनन्या…

Read More

आज १ डिसेंबर पासून सुरु होत आहे. अनेक नवीन नियम लागू होणार आहेत. ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. प्रत्येक महिन्याप्रमाणे 1 डिसेंबरपासून एलपीजी, पीएनजी आणि सीएनजीच्या किमतीत बदल होऊ शकतो, तर अनेक पेन्शनधारकांनी 30 नोव्हेंबरपर्यंत जीवन प्रमाणपत्र सादर न केल्यास अडचणी येऊ शकतात. 1 डिसेंबरपासून कोणते नियम बदलणार आहेत आणि त्यांचा तुमच्यावर कसा परिणाम होऊ शकतो हे जाणून घ्या. LPG, CNG, PNG किमतीत बदल गॅस सिलिंडरची किंमत गेल्या दर महिन्याच्या 1 तारखेला बदलते. गेल्या महिन्यात व्यावसायिक सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. अशा परिस्थितीत 1डिसेंबरपासून एलपीजी सिलिंडर स्वस्त (LPG cylinder cheap) होण्याची शक्यता आहे. पेन्शनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र पेन्शनधारकांसाठी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यात महाविकास आघाडी सरकार असतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर जात खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हनुमान चालिसा पठण केली होती. या आंदोलनानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. खार ठाण्यात गुन्हा आणि अटकेनंतर राणा दाम्पत्याची जामिनावर सुटका झाली. हनुमान चालिसा पठण प्रकरणी राणा दाम्पत्याला मुंबई सत्र न्यायालयाने वॉरंट जारी केलं आहे. त्यामुळे राणांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी राणा दाम्पत्य हजर राहात नसल्याचं दिसून येतंय. येत्या ११ नोव्हेंबर रोजी ठरलेल्या सुनावणीसाठी राणा हजर राहिले नव्हते. त्यामुळे कोर्टाने त्यांना वॉरंट जारी केलं आहे. हे वॉरंट जामीनपात्र आहे. ५ हजारांच्या जामिनावर त्यांची सुटका होईल.…

Read More