Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील गणेश कॉलनी परिसरातील रहिवाश्याच्या घरात घुसत चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील गणेश कॉलनी परिसरातील शिवसागर बिल्डींगमध्ये तन्मय पदमाकर पिले (वय ४१) आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. ते दि २ रोजी ते घरी नसताना अनोळखी चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाज्याचा कुलूप तोडून घरात प्रवेश करीत गोदरेज कपाटातील ७० हजार रुपये रोकड तर १ लाख ३९ हजार रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने लंपास केले आहे. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउनी गणेश देशमुख हे करीत आहेत.

Read More

चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील २३ तरुणीस बोलवून घेत तिच्याशी अंगलट करीत विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, चोपडा तालुक्यातील एका गावातील २३ वर्षीय तरुणी मजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत असते. तिला संशयित आरोपी जितेंद्र वामन केदाळे याने शेतात कामासाठी जात असतांना तरुणीचा हात पकडून एका नाल्याजवळ नेत तुला ५०० रुपये देतो तुला मजुरी करिता आणले नाही म्हणत तरुणीशी अंगलट करीत असल्याने तरुणीच्या मनास लज्जा उत्पन्न झाली या प्रकरणी तरुणीने दिलेल्या फिर्यादी वरून चोपडा ग्रामीण पोलिसात संशयित आरोपी जीतेद्र वामन केंदाळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात…

Read More

दहावी पास उमेदवारांसाठी ITBP मध्ये नोकरीची संधी आहे. इंडो-तिबेट सीमा सुरक्षा दलात हवालदार पदांसाठी भरती प्रक्रिया 23 नोव्हेंबर 2022 पासून सुरु झाली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना या सुवर्णसंधीचा नक्की लाभ घ्या आणि अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज दाखल करा. इच्छुक उमेदवार recruitment.itbpolice.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करु शकतात. या भरतीसाठीची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2022 आहे. रिक्त पदांचा तपशील एकूण रिक्त पदं : 287 कॉन्स्टेबल टेलर : 18 पदं कॉन्स्टेबल गार्डनर : 16 पदं कॉन्स्टेबल मोची : 31 पदं कॉन्स्टेबल सफाई कर्मचारी 78 : पदं कॉन्स्टेबल वॉशरमन : 89 पदं कॉन्स्टेबल बार्बर : 55 पदं शैश्रणिक पात्रता – इंडो-तिबेट सीमा…

Read More

शहर हद्दीतील जुने जळगाव परिसरातील श्रीकृष्ण नगर, गोपाळ पुरा या परिसरातील नागरिकांच्या वीज बिलासह विविध घरावर धाडी टाकल्याप्रकरणी आज परिसरातील संतप्त नागरिकांनी महावितरण कार्यालय गाठत आपल्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत आंतरराष्ट्रीय मानवाधिकार परिषदेचे अध्यक्ष सुरज नारखेडे यांच्या नेतृत्वात हे निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे कि, श्रीकृष्ण नगर परिसरातील नागरिकांच्या घरामध्ये अतिशय क्रूर पद्धतीने घुसून त्यांच्याशी अमानुषपणे वागणूक देण्यात आली त्यात मुखतः परिसरातील प्रत्येकाच्या घरात जाऊन मीटर मध्ये कोणताही दोष नसताना याबाबत त्यानी सक्तीची वसुली यापद्धतीने त्याच्यावर कार्यवाही करण्याचा अतिशय निंदनीय प्रकार उघडकीस आलेला आहे कारण यामध्ये मुखतः जे पथक यासंदर्भात आलेले होते यांनी हा प्रकार अतिशय चुकीच्या पद्धतीने नागरिकांशी संपर्क साधला…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  मध्य प्रदेशातील श्योपूरमध्ये राहणाऱ्या एका महिला शिक्षिकेने केला आहे. या महिला शिक्षिकेने आपली सुमारे एक कोटी रुपयांची संपत्ती हनुमान मंदिराच्या नावावर दान केली आहे. त्याने प्रथम आपल्या मालमत्तेचा अधिकृत हिस्सा आपल्या दोन्ही मुलांना दिला. यानंतर आपल्या वाट्याला आलेली मालमत्ता दान करण्याचा निर्णय घेतला. समाजात अशा काही घटना घडतात की, नाईलाजाने कठोर पाऊल उचलावे लागते. अशीच एक घटना घडलेय की, त्यामुळे पती आणि मुलांना चांगलाच धडा मिळाला आहे. या दोघांच्या त्रासाने मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. यातून महिला शिक्षकेने मंदिराला आपली संपत्तीच दान करुन टाकली. शिव कुमारी जदौन नावाच्या महिला शिक्षिकेने तिच्या 2 मुलांना तिचा हिस्सा…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  प्राथमिक शिक्षक, टीजीटी, पीजीटी आणि संगीत शिक्षक, प्राचार्य आणि उपमुख्याध्यापक या पदांसाठी केंद्रीय विद्यालय संघटनाने अध्यापन आणि अशैक्षणिक पदांसाठी 13,404 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. या विविध पदांसाठी 11 हजार 744 जागा रिक्त आहेत. उर्वरित भरती शिक्षकेतर कर्मचारी वर्गाच्या पदांसाठी आहे. त्यासाठी अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेअंतर्गत सहाय्यक आयुक्त, प्राचार्य, उपप्राचार्य, TGT,PGT,PRT,ग्रंथपाल, सहाय्यक अभियंता, सहाय्यक, हिंदी अनुवादक आणि लघुलेखक या पदांसाठी उमेदवारांची भरती केली जाईल. उमेदवार अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. तुम्ही केंद्रीय विद्यालय संघटना भरती 2022 साठी 5 डिसेंबर 2022 ते…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था  राज्यातील शिवसेना सोडून गेलेल्या 40 आमदार आणि 12 खासदारांची पोरं हातावर मेरा बाप चोर हे लिहितील, असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले आहे. नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत असताना त्यांनी शिंदे गटावर जहरी टीका केली आहे. शिवसेनेचे 40 आमदार आणि 12 खासदार गेले, मात्र शिवसेना पक्ष तिथेच आहे. स्थानिक स्वराज्य संघटनेच्या निवडणुका राज्य सरकार टाळते आहे, ते केवळ भीतीपोटी टाळत आहे, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधला आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी नाशिकमध्ये पत्रकारपरिषद घेत शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र डागले आहे. निवणुकीला चिन्ह नवे असले मशाल असले तरी जनता शिवसेनच्या उमेदवारांनाच निवडून…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज ठाकरेंनी शरद पवारांवर केलेले आरोप हे धादांत खोटे आहेत. शरद पवारांना सारा महाराष्ट्र ओळखतो. त्यांनी कायम शाहू, फुले यांचे विचार डोळ्यासमोर ठेवून सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाण्याचे काम केले आहे,राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी जोरदार पलटवार केला आहे. अजित पवार पुढे म्हणाले की, बातम्या होतात म्हणून राज ठाकरे हे शरद पवारांवर टीका करतात. हेच राज ठाकरेंनी पवारांची मुलाखत घेतली होती. तेव्हा ते काय बोलत होते. असे दुटप्पी वागणे बरे नाही. शरद पवारांना संपुर्ण महाराष्ट्र 55 वर्षांपासून ओळखतो. राज ठाकरेंनी अशा प्रकारचे आरोप करणे हे हास्यपद आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील मौजे चांदसर भागातील गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा होत असलेबाबत गुप्त माहिती मिळाल्यावरून धरणगाव तालुक्याचे तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून दिनांक १ डिसेंबर रोजी संध्याकाळी सुमारे 5:15 वाजता मौजे चांदसर-कवठळ रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर पथकाने पकडले. सदर पथकात श्री डी. एस. पाटील, श्री राहूल एस. ढेरंगे, श्री आरीफ शेख, श्री विरेंद्र सोनकांबळे सर्वजण तलाठी यांचा समावेश होता. सदरचे वाहन पंचनामा करून तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. यावेळी पोलीस विभागाचे अधिकारी श्री बुवा साहेब यांनी विशेष सहकार्य केले. सदर टीमची दोन महिन्यातली ही चौथी कारवाई असल्याने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.

Read More

धरणगाव : प्रतिनिधी शहरातील एका टायर शॉपीजवळून एक मालवाहू गाडी सह जुने टायर चोरून नेल्या प्रकरणी दोन जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील चोपडा रोडवर उमा टायर पंक्चर दुकान हे इम्रान शाह याकुब शाह (वय २६) यांच्या मालकीचे आहे दि ३० रोजी दुपारी दुकानासमोरून एक मालवाहू गाडी क्र.एम.एच.१८.एए.४५५७ हि ४० हजार रुपये किमतीचे व जुने ८ टायर १६ हजार रुपये किमतीचे असे एकूण ५६ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केल्या प्रकरणी संशयित आरोपी दिनेश कांतीलाल बडगुजर याच्यासोबत एक इसमाविरोधात धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.उमेश पाटील हे करीत आहेत.

Read More