नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात ऐतिहासिक बंड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलं. शिंदे गटाच्या तब्बल 40 आमदारांनी राज्यातील सरकार पाडलं आणि राज्यात शिंदे गट आणि भाजपचं नवं सरकार स्थापन झालं. शिवसेनेत एकोपा नसल्याच्या चर्चा त्यावेळी मोठ्या प्रमाणात होत होत्या. अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडण्यामागील कारणं देखील सांगितली. त्यानंतर आता कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी मोठा खुलासा केला आहे. उध्दव ठाकरे यांच्या सोबत राहिलो असतो तर माझ्या नावापुढे माजी आमदार पाटी लागली असती, ते चालले नसते, मला पुन्हा निवडून यायचं आहे, असा सनसनाटी खुलासा अब्दुल सत्तार यांनी केलाय.महाविकास आघाडी सरकारच्या असताना उद्धव ठाकरे यांची तब्येत बारी नव्हती.…
Author: editor desk
नवी दिल्ली : वृत्तसंस्था उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकराशी लग्न करून पतीची कोट्यवधींची मालमत्ता हडप करण्यासाठी एका विवाहितेने आधी सासऱ्याला आणि नंतर पतीला औषधांचे ओव्हरडोज देऊन मारले. तीन महिन्यांपूर्वी सासर्याला ओव्हरडोज देऊन एवढ्या सफाईने ठार मारले की कोणाला संशयही आला नव्हता. यानंतर महिलेने पतीची हत्या करण्यासाठी प्रियकराला तीन लाखांची सुपारी दिली. या जीवघेण्या हल्ल्यात पती बचावला. 5 दिवस रुग्णालयात दाखल होता, नंतर डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी पोहोचला. तेथे पत्नीने त्याला औषधांचा ओव्हरडोज दिला. दोन दिवसांनी पतीची तब्येत बिघडल्याने त्याला रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याचा मृत्यू झाला. ऋषभ तिवारी असे मृताचे नाव आहे. घटना कल्याणपूरमधील शिवली रोडची…
मुंबई : वृत्तसंस्था राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आल्याने ते प्रचंड संतापले आहेत. त्यांच्यावर शाईफेक झाल्यानंतर त्यांनी प्रचंड आक्रमकपणे आपली भूमिका मांडली. “अरे हिंमत असेल तर समोर या. चला सर्व पोलीस डिपार्टमेंटला बाजूला करु”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. पिंपरीत चंद्रकांत पाटील यांच्यावर समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. पोलिसांनी शाईफेक करणाऱ्यांना ताब्यात घेतलंय. पण या घटनेवर भाजप नेत्यांकडून संताप व्यक्त केला जातोय. “मी कार्यक्रमाला चाललो आहे. मी सगळे कार्यक्रम करणार आहे. मी चळवळीतला माणूस आहे. मी कुणाला घाबरत नाही. अशाप्रकारे पराचा कावळा करणं, त्याचं तीन-तीनवेळा स्पष्टीकरण दिल्यानंतरही, दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही…
मुंबई : वृत्तसंस्था अवघ्या अडीच वर्षांपूर्वी विवाह बंधनात अडकलेले दाम्पत्य बुधवारी सायंकाळी ७ च्या सुमारास मोर्शी- रिद्धपूर-शिरखेड मार्गावर झालेल्या अपघातात घटनास्थळीच ठार झाले. यादरम्यान त्यांच्यासमवेत दुचाकीवर असलेला त्यांचा एक वर्षीय एकुलता एक चिमुकला बचावला. त्याच्यावर अमरावती येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. परतवाडा शहरालगत देवमाळी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या बालाजीनगरमधील छोटू उर्फ पीयूष दिगंबर वाठोडकर (३०) आणि प्रतीक्षा वाठोडकर (२५) हे पती-पत्नी एक वर्षीय श्रीयंश नामक चिमुकल्यासमवेत निंभी या गावी मित्राच्या दुचाकीने गेले होते. तेथे प्रतीक्षाच्या माहेरकडील कार्यक्रमात या दोघांनीही आपली हजेरी लावली. आप्तस्वकीयांच्या भेटीगाठी घेतल्या. सायंकाळी परतीच्या प्रवासाला निघाले तेव्हा त्यांच्या दुचाकीला मध्येच अज्ञात वाहनाने…
मुंबई : वृत्तसंस्था बॉलीवूडचा सुपरस्टार आमिर खान फिल्मी दुनियेत मिस्टर परफेक्शनिस्ट म्हटलं जाते. आमिर खान जितका त्याच्या चित्रपटामूळं कमी आणि त्याच्या लव्ह लाईफमुळेही नेहमी चर्चेत असतो. आमिर खानने दोन लग्नं केली आहेत पण आजच्या काळात तो स्वत:ला सिंगल असल्याचं सांगतोय. मात्र अजूनही तो एका अभिनेत्रीला डेट करत असल्याची चर्चा आहे. सध्या आमिर खान आणि त्याची एक्स वाईफ किरण राव बरोबर त्याच्या प्रॉडक्शनच्या ऑफिसमध्ये कलश पुजा करताना दिसत आहे. त्या कलश पुजेवरून आमिर खान ट्रोल तर होत आहे. त्यातच त्यांचा डिव्होर्स झाला आहे की नाही? हा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला आहे. कारण तो तिच्या सोबत दिसतं आहे. मात्र किरण ही त्यांची एक्स…
जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्रातील महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर अवश्य तोडगा नक्की निघणार आहे. अमित शाह हे देशातील एका मोठ्या राजकीय पक्षाचे दोन वेळा अध्यक्ष राहिले आहेत. त्यामुळे ते काढतील. असे किती बोम्मई त्यांनी पाहिले असतील. मोदी आणि शहा बोम्मईंना सरळ करतील, असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलंय. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज सकाळीच सीमाप्रश्नावरून आक्रमक ट्विट केलं. महाराष्ट्राच्या नेत्यांनी अमित शहांची भेट घेऊन काही फरक पडणार नाही, असं ट्वीट बसवराज बोम्मई यांनी केलं होतं. तर लवकरच कर्नाटकचे शिष्टमंडळही अमित शहांची भेट घेणार असल्याचं बोम्मई म्हणाले. यावर गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हमाले, ‘ अमित शहा यांच्या भेटीनंतरही काही…
विजय पाटील : जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघाच्या संचालक मंडळाच्या निवडीसाठी आज सकाळी आठ वाजेपासून जिल्ह्यातील सात मतदान केंद्रावर मतदानास सकाळपासून प्रारंभ झाला आहे. या निवडणुकीत जरी सहा आमदार चार माजी आमदार निवडणुकीत एकनाथराव खडसे विरुद्ध गिरीश महाजन अशी पाहिजे. जिल्हा दुध संघात आगामी पंचवार्षिक कालावधीसाठीची निवडणूक मोठ्या प्रमाणात गाजली आहे. यात एकूण २० संचालकांची निवड करण्यात येणार असून यात पाचोरा तालुक्यातून माजी आमदार दिलीप वाघ हे आधीच बिनविरोध निवडून गेले आहेत. यामुळे १९ जागांसाठी ३९ उमेदवार रिंगणात आहेत. तर ४४१ मतदार आहे. यात प्रामुख्याने महाविकास आघाडीचे सहकार पॅनल आणि महायुतीचे शेतकरी विकास पॅनल यांच्यात सरळ लढत आहे. सहकार पॅनलची…
हिंदू धर्मात प्रत्येक दिवस विशेष महत्वाचा आहे. त्यामध्ये शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे. या दिवशी शनिदेवाची विधिवत पूजा केली जाते. यामुळे शनिदेव प्रसन्न होतात आणि भक्तांचे सर्व संकट दूर करतात. ज्योतिष शास्त्रात शनिदेवाला कलियुगाचा न्यायाधीश म्हटले जाते. ते लोकांना त्यांच्या कर्माप्रमाणे फळ देतो. त्यामुळे प्रत्येकाला शनिदेवाला प्रसन्न करायचे असते. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी हे उपाय अवश्य करावेत. हे उपाय केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात. जाणून घेऊया या उपायांबद्दल. शनिवारी पिंपळाच्या 11 पानांचा हार बनवावा. आजवळच्या शनि मंदिरात जाऊन शनिदेवाला ही माळा अर्पण करावी. हार अर्पण करताना ‘ओम श्री ह्रीं शाम शनैश्चराय नमः’ या मंत्राचा…
जळगाव : प्रतिनिधी दोन तरुणांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी एकाला अटक केली. विशाल संजय पवार (२१, रा. मेहरुण) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. रामेश्वर कॉलनीमध्ये ४ डिसेंबर रोजी दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला झाला होता. याप्रकरणी तुषार सोनवणे, प्रतीक पांडुळे, दादू सपकाळे, नयन यवले, विशाल सोनवणे यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा झाला होता. शुक्रवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या विजयसिंग पाटील, राजेश मेढे, जितेंद्र पाटील, अक्रम याकुब शेख, सुधाकर अंभोरे, महेश महाजन, अविनाश देवरे, नितीन बाविस्कर यांनी प्राणघातक हल्ल्याप्रकरणी संशयित विशाल पवार याला सापळा रचून अटक केली. त्याला एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात जरी थंडी वाढत असली तरी व्यापार क्षेत्रामध्ये व आंतरराष्ट्रीय बाजारासह, भारतीय वायदे बाजारात मात्र ग्राहकांना थंडीतहि चांगलाच घाम फोडला आहे. शुक्रवार 9 डिसेंबर रोजी सोने आणि चांदीच्या भावात वृद्धी दिसून आली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दरात सुरुवातीच्या सत्रात 0.14 टक्के तेजी दिसून आली. तर वायदे बाजारात चांदीने ही कमाल केली. चांदीच्या भावात आज 0.68 टक्क्यांची वाढ झाली. गुरुवारी सराफा बाजारात सोना आणि चांदीचे दरांनी आगेकूच केली होती. शुक्रवारी वायदे बाजारात 24 कॅरेट शुद्ध सोन्याच्या भावात सकाळी 9:20 वाजता, कालच्या बंद भावानंतर 73 रुपयांची वृद्धी दिसून आली. सोन्याचा भाव 54,060 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. आज सोन्याचा…

