जळगाव : प्रतिनिधी शहरातील शिवतीर्थ मैदान परिसरात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोन गटात वाद झाला. वादातून काही तरुणांनी २ राउंड गोळ्या झाडल्या. यानंतर रात्री पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. या मैदानावर क्रिकेट स्पर्धेचा रविवारी अंतिम सामना संपल्यावर तरुणांचा मोठा जमाव बाहेर पडला. नेमके याच वेळी दोन गटात वाद झाला. त्यात एकाकडून गोळीबार झाल्याचे सांगण्यात आले. या वेळी तिघांनी जीव वाचावीत पळ काढल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित, पोलिस निरीक्षक दिलीप भागवत आणि कर्मचारी पोहचले. घटनास्थळी एक ट्यूब लाईट फोडलेली आढळून आली.
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या बाबत केलेल्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला. त्या पार्श्वभूमीवर कोश्यारींनी पहिल्यांदाच सविस्तर भूमिका स्पष्ट केली आहे. आपल्या वक्तव्याबाबतची वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे. शिवनेरी, सिंहगड, रायगड, प्रतापगड, सिंदखेडराजासारख्या पवित्र स्थळांवरील प्रवासाचा दाखलाही त्यांनी दिलाय. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलंय. “महापुरुषांच्या अनादराची स्वप्नातही कल्पना करू शकत नाही”, असं कोश्यारी यांनी पत्रात म्हटलंय. महापुरुषांच्या अनादराची स्वप्नातही कल्पना करू शकत नाही! वर्तमानातील कर्तव्यशील व्यक्तींचा आदर्श सांगणं म्हणजे महापुरुषांचा अपमान नव्हे!, असं पत्र कोश्यारींनी अमित शाहांना लिहिलं आहे.
जळगाव : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व नार्थं महाराष्ट्र नॉलेज सिटी इंजिनिअरींग कॉलेज, बांभोरी जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगार तरूणांसाठी भव्य रोजगार मेळावा आयोजित केला असुन या मेळाव्यास विधानसभेचे माजी अध्यक्ष श्री अरुणभाई गुजराथी, आ. एकनाथराव खडसे जिल्हा बँकेचे चेअरमन श्री गुलाबराव देवकर, जेडीसीसी संचालक डॉ. सतिष पाटील, आ.श्री अनिल भाईदास पाटील, जिल्हाध्यक्ष अॅड. श्री रविद्रभैय्या पाटील यांच्यासह प्रमुख नेते व जिल्हा पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. यात इ.१० वी, १२ वी, आयटीआय, डिप्लोमा, इंजिनिअरींग तसेच सर्व शाखेतील पदवीधर विद्याथ्र्यांसाठी देशभरातील नामांकीत कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी…
जळगाव : प्रतिनिधी जिल्हा दूध संघाची निवडणूक अत्यंत चुरशीची पाहण्यास मिळाली. राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांचा दूध संघातील विजयी रथ भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी थांबविला. या निवडणुकीत सहकार पॅनलचा धुवा उडविला. जिल्हा दूध संघाची निवडणूक गेल्या महिनाभरापासून चांगलीच चर्चेत होती. या निवडणुकीत भाजप व शिंदे गटांची शेतकरी विकास पॅनल तर महाविकास आघाडीचे सहकार पॅनल अशी सरळ लढत होती. भाजप व शिंदे गटाच्या पॅनलचे नेतृत्व आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे होते. तर महाविकास आघाडी पॅनलचे नेतृत्व राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांच्याकडे होते. निवडणुकीपूर्वी एकमेकांवर आरोपांची मोठी चिखल फेक पाण्यास मिळाली. यात दूध संघातील भ्रष्टाचार, वैयक्तिक, कुटुंबातील मृत सदस्यापर्यंत आरोप हे पाहण्यास…
जळगाव : प्रतिनिधी गेल्या काही महिन्यापासून सुरु असलेली राजकीय वादात आ.चव्हाण यांनी सातत्याने आ.खडसे यांच्या विरोधात भूमिका घेत त्यांना जिल्हा दुध संघात राहू न देण्याचा जसा विडाच उचलला होता. व निवडनुकीच्या निकालात झालेही तसेच समजा आ.मंगेश चव्हाण यांनी आ.खडसे यांच्या पत्नी मंदाकिनीताई खडसे यांचा दारूण पराभव केल्याचे चित्र समोर आले आहे. जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकित दोन्ही पॅनलमध्ये चुरस वाढत असून आता मुक्ताईनगर मतदार संघातून समोरा समोर उभे असलेले उमेदवार आ.मंगेश चव्हाण यांच्या विरुद्ध दुध संघाच्या माजी संचालिका मंदाकिनीताई खडसे यांच्यात मोठी चुरस या निवडणुकीत दिसून आली. सातत्याने जिल्हातील सहकार क्षेत्रात आपला दबदबा ठेवणारे आ.खडसे यांना जिल्ह्यातील…
जळगाव : प्रतिनिधी जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकित दोन्ही पॅनलमध्ये चुरस वाढत असून आता महिला राखीवसाठी असणाऱ्या दोन जागांमध्ये सहकार पॅनल व शेतकरी पॅनलला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे.या निवडणुकीत माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे यांच्या पत्नी मंदाकिनीताई खडसे व आ.मंगेश चव्हाण यांच्यातील लढत हि तगडी असल्याने या जागेसाठी चांगलीच चुरस वाढत आहे. आज सकाळ ७ वाजेपासून जिल्हा दुध संघाची मोजणी सुरू झाली असून यात महिला राखीवमधून शेतकरी विकास पॅनलच्या पूनम प्रशांत पाटील आणि छायाताई गुलाबराव देवकर यांचा विजय झाला आहे. याच विजयाने पाटील व देवकर परिवारातील सदस्यांनी जिल्हा दुध संघात प्रवेश केला आहे.
जळगाव : प्रतिनिधी जिल्हा दूध संघ निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलची विजयी घोडदौड सुरू असतांनाच ओबीसी मतदारसंघातून पराग मोरे यांच्या रूपाने सहकार पॅनलने खाते उघडले आहे. तसेच माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या पत्नी छाया देवकर यांचा देखील विजयी झालेला आहे. जिल्हा दुध संघ निवडणुकीत सहकार पॅनल व शेतकरी विकास पॅनल यांच्यात चांगली चुरस आहे. मतमोजणीच्या सुरुवातीला शेतकरी विकास पॅनलचे एससी सवर्गातून आमदार संजय सावकारे विजयी झाले. एनटी संवर्गातून गिरीश महाजन यांचे गिरीश महाजन यांचे विश्वासू अरविंद देशमुख हे विजय झाले आहे. तर ओबीसी मतदारसंघातून पराग मोरे यांची लढत शेतकरी विकास पॅनलच्या गोपाळ भंगाळे यांच्यासोबत होती. या लढतीत मोरे यांनी बाजी मारली…
जळगाव : प्रतिनिधी जिल्हा दुध संघाच्या निवडणुकीत माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या पत्नी छाया गुलाबराव देवकर यांनी दणदणीत विजय मिळवत सहकार पॅनलचे ते उमेदवार आहे. जिल्हा दुध संघाच्या निवडणुकीत महिला राखीव या प्रवर्गातून सहकार पॅनलमधून छाया गुलाबराव देवकर यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. त्यांच्या समोर पूनम पाटील व सुनिता पाटील यांनी उमेदवारी केली होती. रविवारी सकाळी मतमोजणी सुरू झाली. यात महिला राखीव प्रवर्गातून निकाल लागला. यात छाया देवकर यांना तब्बल २३५ इतक्या मताधिक्याने विजयी पताका फडकवली आहे.
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील महत्वाची मानली जाणारी जिल्हा दुध संघाची निवडणुकीचे मतदान आज झाले. या निवडणुकीसाठी गेल्या महिनाभरापासून सर्वच पक्षाच्या नेत्यांनी रणशिंग फुकले होते. या निवडणुकीचे शंभर टक्के मतदान झाले असून उमेदवारांची भवितव्य या मतपेट्यामध्ये बंद झालेले आहे. जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत जिल्ह्यातील नेत्यांनी व आमदारांनी एकमेकावर आरोप – प्रत्यारोप करून जिल्ह्यातील राजकिय वातावरण ढवळून निघाले होते. या निवडणुकीत आमचाच विजय होईल असे दोन्ही पॅनलचे नेते दावा करीत आहेत. पण मतदारानी कुणाच्या पारड्यात मतदान केले आहे हे मात्र दि. ११ रोजी सकाळी समजणार आहे. मतपेट्याच्या सुरक्षेसाठी सुनील महाजन ठाण मांडून जिल्हा दूध संघाची निवडणूक ही अत्यंत अटीतटीची होत…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या १९ जागांसाठी शनिवारी १०० टक्के मतदान झाले. जिल्ह्यातील सर्व सातही केंद्रांवर दूध संघाच्या मतदानासाठी मोठ्या प्रमाणात मतदारांचा उत्साह दिसत होता. ही निवडणूक राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे विरुद्ध भाजपच्या नेत्यांमध्ये अटीतटीची होत आहे. त्यामुळे आता या निवडणुकीचा काय निकाल लागणार याकडे लक्ष लागले आहे. जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी गेल्या महिन्याभरापासून सुरू होती. यात महाविकास आघाडी प्रणित सहकार पॅनल तर भाजपा- शिंदे गट प्रणित शेतकरी विकास अशी लढत होती. आज १९ जागांसाठी आज जिल्ह्यातील सात केंद्रांवर मतदान प्रक्रिया झाली. सकाळी ८ वाजता मतदानाला सुरूवात झाली सकाळी मतदानाचा टक्का जरा…

