भुसावळ : प्रतिनिधी भुसावळ शहरात सुरू असलेल्या अवैध सट्टा व जुगारप्रकरणी पोलीस प्रशासनाने तात्काळ धडक कारवाई केली आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील जामनेर रोडवरील हॉटेल प्रीमियमजवळ सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्ती अवैधरित्या जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकत त्यांना रंगेहाथ पकडले. या कारवाईत रवींद्र रामचंद्र दांईजे (रा. जाम मोहल्ला, भुसावळ) आणि योगेश शंकर जाधव (रा. बद्री प्लॉट, भुसावळ) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून २ हजार २४० रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, शहरातील अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांनी यापूर्वी पोलीस प्रशासनाला निवेदन दिले होते. २६ जानेवारीपर्यंत कारवाई न…
Author: editor desk
आजचे राशिभविष्य दि.३१ जानेवारी २०२६ मेष राशी आज, तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील चालू समस्या सोडवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुमच्या कौटुंबिक जीवनात आनंद राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला लक्षणीय यश मिळेल. सरकारी नोकरी करणाऱ्यांना नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. वृषभ राशी तुमच्या योजना यशस्वी होतील. उत्पन्नाच्या संधी निर्माण होतील. तुमच्या मुलांच्या बाबतीत तुम्हाला सकारात्मक परिणाम दिसतील. कौटुंबिक जीवन चांगले राहील. मिथुन राशी नोकरीत बदली होण्याची शक्यता आहे. आज तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल. तुम्ही तुमच्या कुटुंबासह सुंदर ठिकाणी प्रवास करू शकता. तुमच्या जोडीदारासोबत तुमचे नाते चांगले राहील. कर्क राशी कामात आज तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी…
मुंबई : वृत्तसंस्था महिलांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देत महाराष्ट्र सरकारने एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये व शहरी भागांमध्ये देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू करण्यात आले असून, असा उपक्रम राबवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभिनव उपक्रम राबवण्यात येत असून, राज्यभरातील महिलांकडून या निर्णयाचे स्वागत होत आहे. रजोनिवृत्ती हा महिलांच्या आयुष्यातील एक नैसर्गिक पण संवेदनशील टप्पा असून, या काळात होणारे शारीरिक बदल, हार्मोनल असंतुलन, मानसिक तणाव, हाडांचे विकार, निद्रानाश व नैराश्य याकडे अनेकदा दुर्लक्ष होते. ही गरज लक्षात घेऊन महिलांना विशेष वैद्यकीय…
वाराणसी : वृत्तसंस्था वाराणसीचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद आणि उत्तरप्रदेश सरकार यांच्यातील वाद अधिक तीव्र होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर जोरदार निशाणा साधला. शंकराचार्य पदाच्या दर्जाबाबत पुरावे मागितल्याच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. पत्रकार परिषदेत बोलताना अविमुक्तेश्वरानंद म्हणाले की, “आम्हाला आमच्या शंकराचार्य दर्जाचे पुरावे मागितले गेले आणि ते २४ तासांच्या आत सादर करण्यास सांगण्यात आले. तसेच आम्हाला मेळ्यात प्रवेश का नाकारला जाऊ नये, असा सवालही करण्यात आला. आम्ही त्यावर उत्तर दिले असून, अद्याप आमचा प्रतिसाद नाकारण्यात आलेला नाही. याचा अर्थ आमचा युक्तिवाद सरकारलाही योग्य वाटतो.”…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज दिवंगत उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या बारामती येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमवेत आमदार सुरेश भोळे, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार चंद्रकांत पाटील तसेच आमदार किशोर आप्पा पाटील उपस्थित होते. सर्व उपस्थित मान्यवरांनी दिवंगत नेत्याच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिवंगत अजित पवार यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे राज्याच्या राजकारणात तसेच सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. अजित पवार यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत…
मुंबई : वृत्तसंस्था उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात होऊन त्यात त्यांचे दुर्दैवी निधन झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. गुरुवारी शोकाकुल वातावरणात अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनानंतर आता राज्याच्या राजकारणात नवा उपमुख्यमंत्री कोण असणार, याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या उपमुख्यमंत्रिपदासाठी सुनेत्रा पवार यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रिपदावर सुनेत्रा पवार यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या गोटात हालचालींना वेग आला असून, राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उद्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांना…
नालासोपारा : वृत्तसंस्था सोशल मीडियावर राजकीय नेत्यांबद्दल आक्षेपार्ह, अपमानास्पद आणि अश्लील भाषा वापरणे एका तरुणाला चांगलेच महागात पडल्याची खळबळजनक घटना नालासोपारा परिसरात घडली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याबद्दल एकेरी उल्लेख करत अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अपशब्द वापरून पोस्ट करणाऱ्या तरुणाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेतील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यामुळे राजकीय वर्तुळासह नागरिकांमध्येही तीव्र चर्चा सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सूरज महेंद्र शिर्के असे संबंधित तरुणाचे नाव असून, तो गेल्या काही दिवसांपासून फेसबुकसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर राजकीय नेत्यांविरोधात सातत्याने आक्षेपार्ह पोस्ट करत होता. विशेषतः मनसे अध्यक्ष…
मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्र सरकारने प्रशासनावर वाढत चाललेल्या आर्थिक भाराला आळा घालण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आर्थिक शिस्त अधिक काटेकोरपणे पाळण्यासाठी 2025-26 या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पातील निधी वितरणावर मर्यादा आणण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, यासंदर्भात वित्त विभागाने परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार सर्व प्रशासकीय विभागांना खर्च करताना विशेष दक्षता घेण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. दरवर्षी अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आलेला संपूर्ण निधी प्रत्यक्षात खर्च होत नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे अनावश्यक तरतुदी टाळून आधीच नियोजनबद्ध खर्च करण्यावर सरकारने भर दिला आहे. निधी मागणी करताना प्रत्यक्ष गरज, खर्चाची क्षमता आणि कामाची अंमलबजावणी होण्याची शक्यता लक्षात घेणे बंधनकारक करण्यात आले…
चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील उमर्टी येथे एक हृदयद्रावक घटना घडली असून २८ वर्षीय आदिवासी विवाहित महिलेने तिच्या दोन चिमुकल्या मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करीत आहे. या घटनेत पमिता डोंगरसिंग पावरा (वय २८), अडीच वर्षांचा मुलगा विरेन आणि १५ दिवसांचे बाळ अशा तिघांचा मृत्यू झाला आहे. पमिता पावरा ही तिच्या दोन्ही मुलांसह मंगळवारपासून बेपत्ता होती. बुधवारी सकाळी सुमारे ११ वाजेच्या सुमारास त्यांच्या स्वतःच्या विहिरीत तिघांचे मृतदेह तरंगताना आढळून आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढले. तिघांचे शवविच्छेदन चोपडा उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले. त्यानंतर…
जळगाव : प्रतिनिधी लहान मुलांच्या भांडणावरुन शेख खलील अहमद सलीम मणियार (वय ३७, रा. मणियार मोहल्ला वाडा, नशिराबाद, ता. जळगाव) यांना तिघांनी लोखंडी रॉडने मारहाण करीत जखमी केले. ही घटना दि. २५ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मणियार मोहल्ल्यात घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नशिराबाद येथील मणियार मोहल्ला परिसरात शेख खलील अहमद सलीम मणियार हे वास्तव्यास आहे. दि. २५ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास लहान मुलांच्या खेळण्याच्या कारणावरुन शेख ओसामा शेख रहेमतुल्ला यांच्यासोबत वाद झाला. वादाचे रुपांतरण हाणामारीत झाले. यावेळी शेख ओसामा यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांनी शेख खलील यांना शिवीगाळ करीत चापटा बुक्क्यांनी मारहाण…

