रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील निंभोरा बु., येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दसनूर फाट्यावर एका चारचाकी वाहनाला अपघात झाला. या अपघातग्रस्त कारमधून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात दीपक विलास चौधरी (वय १९, रा. निंभोरा) हा युवक शेतातील विहिरीत पडला. आणि त्याचा मृत्यू झाला. ही घटना दि. २८ रोजी रात्री ९:३० वाजता घडली. मिळालेल्या माहितीनुसार, वाघोदा ते निंभोरा रस्त्यावरील दसनूर फाटा येथे दीपक चौधरी आणि त्याचे मित्र सावदा येथून कार (एम.एच. १३ बी.एन. ९०९१)ने परत येत होते. त्यावेळी संस्कार प्रकाश चौधरी हा कार चालवत होता. कार अनियंत्रीत होऊन पलटली. त्यानंतर या कारमधून बाहेर येताना दीपक विलास चौधरी याचा शेतातील विहिरीत पडल्याने मृत्यू झाला…
Author: editor desk
आजचे राशिभविष्य दि.३० जानेवारी २०२६ मेष राशी गेल्या काही महिन्यांतील तुमच्या प्रयत्नांचे फळ आज तुम्हाला मिळेल. तुम्हाला लक्षणीय यश मिळू शकते, जे तुम्हाला आनंद देईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही कामासाठी फटकारले जाऊ शकते, ज्यामुळे तुम्ही थोडे गोंधळून जाल. वृषभ राशी आज, तुम्ही एखादे काम वेळेवर आणि सहजपणे पूर्ण करण्याचे नवीन मार्ग विचारात घ्याल. आज संध्याकाळी, तुम्ही वाढदिवसाच्या पार्टीला उपस्थित राहण्याची योजना कराल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल. क्रिएटिव्ह आयडिया सुचतील. मिथुन राशी आज तुम्हाला व्यवसायात नफा मिळवण्यासाठी कोणाच्या तरी मदतीची आवश्यकता असेल. तुमच्या क्षमता दाखवण्याची संधी तुम्हाला मिळेल. व्यावसायिकांना आज चांगला नफा दिसेल, त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल. कर्क राशी आज…
बारामती : वृत्तसंस्था महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय सन्मानात अंत्यसंस्कार करण्यात आले. पुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांनी चितेला मुखाग्नी दिला. अंत्यविधीच्या वेळी उपस्थित हजारो समर्थक, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या डोळ्यांत अश्रू तरळत होते. पत्नी सुनेत्रा पवार यांनी पतीच्या पार्थिवावर गंगाजल अर्पण करून अंतिम निरोप दिला. या अंत्यसंस्काराला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह देशभरातील विविध पक्षांचे नेते उपस्थित होते. महाराष्ट्रासह इतर राज्यांतील नागरिकही मोठ्या संख्येने बारामतीत दाखल झाले होते. मंगळवारी रात्रीपासूनच शहरात गर्दी वाढू लागली होती. सकाळी अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील इद्रप्रस्थ नगर परिसरात देवदर्शनासाठी बाहेर गेलेल्या कुटुंबाच्या बंद घराला चोरट्यांनी लक्ष्य केल्याची घटना समोर आली आहे. अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ५१ हजार ६२६ रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इद्रप्रस्थ नगर परिसरातील रहिवासी प्रतिभा डिगंबर काळे (वय ४९) या आपल्या कुटुंबासह दि. २७ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजता शेगाव येथे देवदर्शनासाठी गेल्या होत्या. घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील दोन लोखंडी कपाटे उघडून त्यातील १ ग्रॅम वजनाचे आठ सोन्याचे मणी, ३…
बारामती : वृत्तसंस्था राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. त्यांचे पार्थिव फुलांनी सजवलेल्या रथातून काटेवाडी येथील निवासस्थानाहून बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानाकडे अखेरच्या प्रवासासाठी नेण्यात येत आहे. रथावर अजित पवारांचा हसरा फोटो लावण्यात आला असून, ‘स्वर्गीय अजितदादा पवार अमर रहे’ असे घोषवाक्य झळकत आहे. अजित पवारांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र आणि राष्ट्रवादी काँग्रेस पोरकी झाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे. काटेवाडी आणि बारामती परिसरात शोकाकुल वातावरण असून, राज्य मंत्रिमंडळातील सदस्य, विविध पक्षांचे नेते तसेच राज्यभरातील कार्यकर्ते अजित पवारांना अखेरचा निरोप देण्यासाठी दाखल झाले आहेत. प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू आणि मनात अपार दुःख दिसून येत आहे. शरद…
अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील अंबारे येथील शेतकरी विलास आप्पा पाटील (वय ५२) यांनी स्वतःच्या राहत्या घरी छताला दोरी बांधून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना दि. २७ जानेवारी रोजी दुपारी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सविस्तर वृत्त असे कि, विलास पाटील हे अमळनेर शहरातील सुंदरनगर भागात वास्तव्यास होते. त्यांची मूळ गावी अंबारे येथे सुमारे सहा बिघे शेती असून, तेथे शेती साहित्य ठेवण्यासाठी घर आहे. दि. २७ रोजी दुपारी अडीच ते तीन वाजेदरम्यान त्यांनी सुंदरनगर येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. घरातून मोबाईल फोनची रिंग वाजत असल्याचा आवाज येत होता; मात्र कोणीही फोन…
जळगाव : प्रतिनिधी भरधाव मालवाहू वाहनाने धडक दिल्यामुळे वाहनाच्या पुढील बाजूस अडकलेल्या पादचाऱ्यास निर्दयीपणे फरपटत नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही अंतरावर दोन जणांनी पादचाऱ्यास रस्त्याच्या बाजूला ठेवून पळ काढल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून समोर आले आहे. या प्रकरणी वाहनचालक व अन्य एकाविरूद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कांचननगरमधील रहिवासी श्यामराव राजाराम कापसे (७९) हे दाणाबाजार परिसरात काम करायचे. ११ जानेवारी रोजी ते मृतावस्थेत आढळले होते. या प्रकरणात पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता श्यामराव कापसे यांना एका मालवाहू वाहनाने धडक दिल्याचे आढळले. धडक दिल्यानंतर ते वाहनाच्या पुढील बाजूस अडकले असता त्यांना सुभाष चौकापासून दाणाबाजारातून कोपऱ्यावरील एका ऑप्टीकल…
जळगाव : प्रतिनिधी शेअर ट्रेडिंगविषयी इंटरनेटवर माहिती शोधली अन् अधिक नफ्याच्या आमिषाला बळी पडल्याने शहरातील एका सेवानिवृत्ताची तब्बल एक कोटी ३५ लाख ८५ हजार १८९ रुपयांमध्ये ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी २७ जानेवारी रोजी सायबर पोलिस ठाण्यात चार अनोळखींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका खासगी कंपनीतून निवृत्त झालेले, तिवारी नगरातील रहिवासी ६१ वर्षीय वृद्धाने ३१ ऑगस्ट रोजी ऑनलाइन शेअर ट्रेडिंगविषयी माहिती शोधली. तेथे दिसलेल्या एका व्हॉट्सअॅप लिंकला त्यांनी क्लिक केले असता एका ग्रुपमध्ये ते जोडले गेले. त्यात त्यांना शेअरविषयी माहिती देण्यात येवू लागली त्यानंतर एका शेअरमधील गुंतवणूकविषयी लिंक पाठविली. त्यावरील सुचनेनुसार पैसे भरुनही नफा तर दूरच मात्र…
आजचे राशिभविष्य दि.२९ जानेवारी २०२६ मेष राशी तुम्ही प्रत्येक बाबतीत सकारात्मक राहिले पाहिजे. धीर आणि नम्रता बाळगा. आज मित्रांसोबत जुन्या समस्यांवर चर्चा केल्याने चांगला उपाय मिळू शकेल. तुमच्या सल्ल्याचा इतरांना फायदा होईल. आर्थिक उत्पन्नाचे नवे स्त्रोत मिळतील. वृषभ राशी आज, कुटुंबातील वडीलधाऱ्यांच्या मदतीने तुमचे महत्त्वाचे काम पूर्ण होईल. तुम्हाला एखाद्या नातेवाईकाकडून चांगली बातमी मिळेल. तुमचा जोडीदार तुम्ही जे काही बोलता ते समजून घेण्याचा प्रयत्न करेल, ज्यामुळे तुमच्या नात्यात ताजेपणा येईल. सामाजिक कारणांना पाठिंबा देऊन तुम्हाला बरे वाटेल. मिथुन राशी आज तुम्ही कौटुंबिक गोष्टींसाठी पैसे गुंतवू शकता. महत्त्वाच्या लोकांशी भेटीगाठी होण्याची शक्यता आहे. आज तुम्ही एक नवीन उपक्रम सुरू करू शकता.…
जळगाव : प्रतिनिधी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते मा. अजितदादा पवार यांच्या विमान अपघाती निधनाने महाराष्ट्राने एक कणखर, अनुभवी आणि विकासाभिमुख नेतृत्व गमावले असल्याची भावना व्यक्त करत पालकमंत्री श्री. गुलाबराव पाटील यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील आपल्या शोक संदेशात म्हणतात की,अजितदादा पवार यांचे निधन ही अत्यंत धक्कादायक, वेदनादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना आहे. वक्तशीरपणा, निर्णयक्षमता आणि प्रशासनावरची मजबूत पकड यासाठी ते ओळखले जात होते. सभागृहातील शिस्तबद्ध वर्तन, सर्वसामान्यांबद्दलची आपुलकी आणि राज्याच्या विकासासाठी असलेली तळमळ हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा स्थायी भाव होता. विरोधकांनाही आदराने वागवणारे अशी ओळख असलेले अजितदादा हे बारामतीचे किल्लेदार म्हणून केवळ आपल्या मतदारसंघापुरते…

