मुंबई : प्रतिनिधी मुंबई शहरातून गेल्या ३६ तासांत तब्बल १२ अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये ८ मुलींचा समावेश असून, ही मुले मुंबईतील ७ वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून गायब झाल्याची नोंद आहे. या गंभीर घटनेची दखल घेत मुंबई पोलिसांनी ‘हाय अलर्ट’ जारी केला आहे. दरम्यान, या घटनांमागे मानव तस्करी करणाऱ्या संघटित टोळ्यांचा हात असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३७ (२) अंतर्गत १२ अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, आतापर्यंत कोणत्याही पालकांना खंडणीचे कॉल आलेले नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. बेपत्ता मुलांची नोंद असलेली ठिकाणेशिवाजीनगर – ४,…
Author: editor desk
अमळनेर : प्रतिनिधी शहरातील कसाली मोहल्ल्यात ३० रोजी मध्यरात्रीच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीचे स्वरूप गंभीर असल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, अमळनेर नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या तत्परतेने तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात यश आले. घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक व विद्यमान नगरसेवकांसह स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. फिरोज पठाण, नासीर हाजी, नवीद शेख, नाना धनगर, गुलाम नबी, इमरान शेख, अरमान हलवाई, वसीम पठाण, तय्यब पठाण, रिजवान मनियार, नईम पठाण, छोटू भोई व सुपडू मणियार यांनी घटनास्थळी घाव घेत अग्निशामक दलाला माहिती दिली. अग्नीशमन दलाचे पाण्याचे टँकर उपलब्ध करून देणे तसेच…
आजचे राशिभविष्य दि. २ फेब्रुवारी २०२६ मेष राशी महत्वाच्या समस्येवर उपाय मिळेल. आज इतरांवर जास्त अवलंबून राहणे टाळल्याने तुमची कामगिरी सुधारेल. तुमच्या आवडत्या कामांना प्राधान्य दिल्याने तुम्हाला मानसिक शांती मिळेल. वृषभ राशी तुमच्या मुलांचं यश तुम्हाला आनंद देईल. जर तुम्ही शांतपणे समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला तर सर्व काही ठीक होईल. आज तुम्ही जे काही हाती घ्याल ते नक्कीच पूर्ण होईल. काही योजना गुप्त ठेवा, अन्यथा कोणीतरी त्यांचा गैरफायदा घेऊ शकते. मिथुन राशी जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर आजची सुरुवात अनुकूल आहे. प्रॉपर्टी व्यवसायासाठी परिस्थिती अनुकूल राहील. आज तुम्हाला अधिकृत कामत कीर्ती मिळेल. कर्क राशी आज…
पालकमंत्र्यांचे हस्ते,खान्देश कृषी संस्कृती व पशुप्रदर्शनाचे उद्घाटन : कृषी, संस्कृती व ग्रामीण जीवनाचा संगम जळगावात जळगाव : प्रतिनिधी नव्या पिढीने आधुनिक शेती विषयी नवनवीन माहिती घेऊन आधुनिक शेतीकडे वळणे आवश्यक आहे तसेच शेतीमध्ये “ए आय “या तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे.असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. खान्देशची समृद्ध कृषी परंपरा, लोकसंस्कृती आणि पशुधनाचा वारसा जपणाऱ्या ‘खान्देश कृषी संस्कृती व पशुप्रदर्शन २०२६’ या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन आज राज्याचे पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शिवतीर्थ मैदान, जळगाव येथे झाले त्यावेळी ते बोलत होते. उद्घाटनप्रसंगी आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती…
मुंबई : वृत्तसंस्था केंद्रीय अर्थसंकल्प 2026–27 सादर झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत करत, हा अर्थसंकल्प ‘विकसित भारताकडे एक दमदार पाऊल’ असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले की, या अर्थसंकल्पामुळे देशातील सर्वच क्षेत्रांमध्ये सुधारणा होणार असून, विशेषतः मध्यमवर्ग, शेतकरी, युवक आणि उद्योग क्षेत्रासाठी महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. चालू आर्थिक धोरणे आणि गुंतवणूक वाढविण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे देशाची आर्थिक प्रगती अधिक वेगाने होईल आणि मोठ्या प्रमाणात रोजगारसंधी निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हा अर्थसंकल्प २१व्या शतकातील महत्त्वाचा आणि सर्वसमावेशक अर्थसंकल्प असल्याचे नमूद करत त्यांनी सांगितले की, यामुळे ग्रामीण भागातील परिवर्तन, नागरिककेंद्रीत गुंतवणूक आणि दीर्घकालीन विकासाला…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्र सरकारचा अर्थसंकल्प 2026-27 आज (1 फेब्रुवारी) संसदेत सादर करण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग नवव्यांदा लोकसभेत अर्थसंकल्प मांडत आपल्या भाषणाची सुरुवात संत रविदास जयंतीच्या शुभेच्छांनी केली. यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्राला विशेष प्राधान्य देण्यात आले असून, मधुमेह आणि कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांवरील औषधे कमी दरात उपलब्ध करून देण्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे. सर्वसामान्य नागरिकांना उपचारांचा खर्च परवडावा, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले. भारताला जागतिक बायो-फार्मा मॅन्युफॅक्चरिंग हब बनवण्यासाठी सरकारने १०,००० कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे. बायोफार्मा क्षेत्रातील संशोधन, विकास आणि उत्पादनाला चालना देण्याचा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम असून, यामुळे भारत…
मुंबई : प्रतिनिधी दुर्दैवी विमान अपघातात निधन झालेल्या एअर अटेंडंट पिंकी माळी यांच्या कुटुंबाची रोहित पवार यांनी मुंबईत भेट घेऊन त्यांना धीर दिला व सहानुभूती व्यक्त केली. या अपघातात पिंकी माळी यांच्यासह जाधव, पाठक आणि कपूर कुटुंबांवरही दुःखाचा डोंगर कोसळला असून, ही सर्व कुटुंबे सावरण्याचा प्रयत्न करीत आहेत. पिंकी माळी यांचे वडील टॅक्सी चालक असून, मुलीच्या शिक्षणासाठी त्यांनी स्वतःची खोली विकल्याची भावनिक माहिती यावेळी समोर आली. पिंकी मेहनती व जिद्दी स्वभावाची असून एअर अटेंडंट म्हणून काम करत होती. तिचा भाऊ पायलट व्हावा असे तिचे स्वप्न होते. मात्र आवश्यक शैक्षणिक पात्रता नसल्याने सध्या त्याला विमानतळावर ग्राउंड स्टाफची नोकरी मिळवून देण्यासाठी रोहित…
जळगाव : प्रतिनिधी नाशिराबाद येथील मुंजोबा मंदिर परिसरात आज भीषण अपघात घडला. एमएच २८ व्ही ६१५१ क्रमांकाच्या स्कॉर्पिओला जीजे३६ ३३४२ क्रमांकाच्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने स्कॉर्पिओ पलटी झाली. या अपघातात स्कॉर्पिओमधील पार्थ गावंडे (वय १७) हा अल्पवयीन मुलगा जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्कॉर्पिओमधील कुटुंब हे तेल्हारा येथील असून ते देवदर्शनासाठी अमळनेर येथे गेले होते. वाहनात लहान मुले व महिलाही असल्याने अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. अपघातानंतर संबंधित ट्रकचालक ट्रक जागीच सोडून फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. अपघातानंतर स्कॉर्पिओमधील कुटुंब अत्यंत भेदरलेल्या अवस्थेत होते. नातेवाईक येईपर्यंत त्यांची कोणतीही सोय नसल्याने नशिराबाद येथील नगरसेवक प्रदीप…
जळगाव : प्रतिनिधी कामानिमित्त सर्वजण बाहेर गेलेले असताना बंद घरात आग लागून टीव्ही, फॅन, कपडे, भांडे यासह घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती घरमालकाने दिली आहे. ही घटना ३० जानेवारी रोजी तालुक्यातील कुसुंबा येथे घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मजुरी काम करणारे सुनील लहू सोनवणे (वय ४८) यांचे कुसुंबा येथे घर आहे. घरातून धूर येत असल्याचे लक्षात आल्यानंतर आजूबाजूच्या रहिवाशांनी घरमालकास माहिती दिली. आग वाढत जात असल्याने शेजारील मंडळींनीच पाणी मारून ती विझविली. मात्र या आगीत घरातील टीव्ही, सिलिंग व टेबल फॅन, पलंग, भांडे, कपडे यासह घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. या आगीत घरातील सर्वकाही…
भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील वराडसीम शिवारात २३ जानेवारी रोजी विजेच्या खांबावर अडकलेली पतंग काढण्याच्या प्रयत्नात दहा वर्षीय मुलाला विजेचा जोरदार धक्का बसला आणि यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला ही हृदयद्रावक घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, नितीन बिसन बारेला (१०) असे या मृत मुलाचे नाव आहे. २३ रोजी नितीन हा वराडसीम शिवारात पतंग उडवत होता. दरम्यान, त्याची पतंग विजेच्या खांबावर अडकली. ती काढण्यासाठी तो खांबावर चढला. त्याचवेळी त्याला विद्युत तारांचा जोरदार धक्का बसला. या अपघातात नितीन गंभीररीत्या भाजला गेला. घटनेनंतर त्याला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या दिवसापासून नितीनची मृत्यूशी झुंज सुरू होती. उपचार सुरू असतानाच २९ जानेवारी…

