Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी एरंडोल तालुक्यात महसूल विभागातील दोन तलाठ्यांनी ३० हजार रुपयांची लाच मागून स्वीकारल्याचा प्रकार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) उघडकीस आणला आहे. नाशिक परिक्षेत्रांतर्गत जळगाव घटकाने राबविलेल्या सापळा कारवाईत दोघांना रंगेहात पकडण्यात आले असून या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. १८/२०२६ दाखल करण्यात आला असून भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ व १२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नरेश भास्कर शिरूड (वय ४१), तलाठी सजा उत्राण अहिर हद्द, ता. एरंडोल व शिवाजी एकनाथ घोलप (वय ४६), तलाठी सजा उत्राण गुजर हद्द, ता. एरंडोल अशी आरोपींची नावे आहेत. तक्रारदाराचा ट्रॅक्टर…

Read More

बारामती : वृत्तसंस्था महाराष्ट्राच्या राजकारणाला जबर धक्का देणारी घटना आज बारामती येथे घडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात त्यांच्या सोबत विमानात असलेले पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर एच.सी. विदिप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, सह-पायलट कॅप्टन शांभवी पाठक आणि फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी यांचाही मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की पाचही जणांचा जागीच अंत झाला. अपघाताच्या काही क्षण आधीची थरारक कहाणी आता समोर येत आहे. प्रत्यक्षदर्शी आणि प्राथमिक माहितीनुसार, विमान कोसळण्यापूर्वी सह-पायलट कॅप्टन शांभवी पाठक यांचे शेवटचे शब्द होते – “ओह शिट… ओह शिट”. त्या वेळी विमानाची धुरा कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांभवी पाठक…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत भावूक शब्दांत श्रद्धांजली वाहिली आहे. “अजित पवार हे महाराष्ट्राचे लोकनेते होते. राज्याच्या कानाकोपऱ्याची माहिती असलेले, महाराष्ट्राच्या प्रश्नांची सखोल जाण असलेले नेतृत्व आज आपल्यातून निघून गेले आहे. अशा प्रकारचे नेतृत्व घडायला अनेक वर्षे लागतात,” अशा शब्दांत फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मुख्यमंत्री म्हणाले की, अजित पवार हे अतिशय संघर्षातून तयार झालेले नेतृत्व होते. कोणत्याही परिस्थितीत न डगमगता पुढे जाणारे, जनसामान्यांमध्ये ज्यांच्याविषयी प्रचंड आस्था होती असे ते व्यक्तिमत्त्व होते. महाराष्ट्राच्या विकासामध्ये त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण होते. अशा काळात त्यांचे जाणे अविश्वसनीय असून मनाला चटका लावणारे आहे. “वैयक्तिक पातळीवर…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी अमळनेर शहरात वाढलेल्या दुचाकी चोरीच्या घटनांचा तपास करताना सीसीटीव्ही फुटेज आणि डम्प डेटाच्या आधारे अमळनेर पोलिसांनी दोन आरोपी निष्पन्न केले आहेत. या कारवाईत धुळे येथील अरबाज शेख साजिद मणियार (वय २८) याला अटक करण्यात आली असून एका अल्पवयीन मुलाला नोटीस देऊन सोडून देण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरात गेल्या काही दिवसांत दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पोलिसांनी सीसीटीव्ही नेटवर्क अधिक सक्रिय करून फुटेजची बारकाईने तपासणी सुरू केली. तपासादरम्यान एक अल्पवयीन मुलगा व एक तरुण मोटारसायकलवर येताना दिसून आला. त्यानंतर अल्पवयीन मुलगा उतरून दुचाकी चोरताना फुटेजमध्ये स्पष्ट दिसले. पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शरद…

Read More

पाचोरा : प्रतिनिधी अवैध वाळू वाहतुकीचे ट्रॅक्टर पाचोरा तहसील कार्यालयात जप्त करीत असताना वाळू माफियांनी पाचोरा तलाठ्यास मारहाण करीत ट्रॅक्टर पकडल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यावरून पाचोरा पोलिसांत तिघाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  तलाठी गंगाधर अण्णाराव सुरनर (२५, पाचोरा) यांच्याकडे अवैध गौण खनिज विरोधी कारवाईसाठी नेमणूक केली असता मंगळवारी सकाळी १० वाजेचे सुमारास अंतुर्ली रोडकडे अवैध वाळूचे भरलेले विनानंबरचे ट्रॅक्टर जाताना दिसले. तात्काळ तलाठी सुरनर यांनी त्यास हटकले असता ओळख पत्र दाखवून ट्रॅक्टर तहसील कार्यालयात घेऊन चल म्हणून चालकास सांगितले. मात्र जप्त केलेले ट्रॅक्टर एका सहकारी तलाठ्यांच्या मदतीने घेऊन येत असताना ट्रॅक्टरसमोर दुचाकी (एमएच१९/डिके०६३७) आडवी करून अडथळा निर्माण…

Read More

पुणे : वृत्तसंस्था राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळावर लँडिंग करताना भीषण अपघात झाला आहे, अशी DGCA (नागरिक विमान वाहतूक महानिदेशालय) कडून अधिकृत पुष्टी करण्यात आली आहे. या दुर्घटनेत उपमुख्यमंत्र्यांसह विमानातील सर्व सहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे प्रथमच अधिकृतपणे सांगण्यात आले आहे. आज सकाळी मुंबईहून विशेष विमानाने बारामतीकडे रवाना झालेल्या उपमुख्यमंत्र्यांच्या विमानाने लँडिंग करताना अचानक नियंत्रण गमावल्याची प्राथमिक माहिती आहे आणि त्यामुळे विमान धावपट्टीजवळील शेतात कोसळले. अपघात इतका भयानक होता की विमान जळून राख झाले असून, घटनास्थळावर धुराचा मोठा लोट दिसला. या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. राजकीय वर्तुळातही गंभीर खळबळ पाहायला मिळत आहे. घटनास्थळी प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन आणि…

Read More

बारामती : वृत्तसंस्था बारामती येथे लँडिंगदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अपघातात विमानातील काहीजण जखमी झाल्याचे वृत्त असून, अजित पवार हेही गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. अपघातानंतर संबंधित विमान एका शेतात कोसळले असून त्यातून धुराचे मोठे लोट उठताना दिसून आले. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून बारामतीकडे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी जात असताना बारामती विमानतळावर लँडिंगच्या वेळी हा अपघात झाला. आज बारामती तालुक्यात अजित पवार यांच्या चार प्रचारसभा नियोजित होत्या. मात्र, लँडिंगदरम्यान झालेल्या या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती अजित पवारांचे निकटवर्तीय तसेच पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक रणजीत शिवतारे यांनी…

Read More

नाशिक : प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेसह मालेगाव, धुळे, अहिल्यानगर आणि जळगाव महानगरापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीसाठी दिनांक ६ फेब्रुवारी, २०२६ रोजी सकाळी ११ वाजता तर मालेगाव महापालिका महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता संबंधित महापालिकेच्या सभागृहात विशेष बैठक आयोजित करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिले आहेत. महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी विशेष बैठकीचे पीठासीन अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त किंवा त्यांचा प्रतिनिधी असेल, अशी तरतूद आहे. त्या अनुषंगाने संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. नवनिर्वाचित सदस्यांमधून नाशिक महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर यांच्या निवडीसाठी ६ फेब्रुवारी २०२६…

Read More

आजचे राशिभविष्य दि.२८ जानेवारी २०२६ मेष राशी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप अनुकूल असेल. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी, तुमच्या पालकांचा सल्ला अवश्य घ्या. धर्म आणि अध्यात्मावरील तुमचा विश्वास दृढ राहील, ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल. वृषभ राशी आज तुम्ही मित्रांसोबत मजा करण्यात वेळ घालवाल. तुमच्या घरात काही सजावटीचे काम असेल. आजचा दिवस खूप भाग्यवान ठरेल. तुमच्या व्यवसायातील कामाचे पहिलं मोठं पेमेंट आज मिळू शकतं. ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद आणि उत्साह मिळेल. मिथुन राशी तुमचा संपूर्ण दिवस धावपळीत जाईल. एखाद्या महत्त्वाच्या कामात उशीर होऊ शकतो. जर तुम्ही आज काहीतरी नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल, तर सुरुवात…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजातील अपेक्षांना मोठा दिलासा मिळण्याची तयारी सुरू आहे. मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांनंतर राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियर लागू केले होते. त्यानंतर मराठवाड्यातील अनेक मराठा बांधवांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ मिळू लागला. मात्र, सातारा गॅझेट अद्याप लागू न झाल्यामुळे मराठा समाजात संभ्रम निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर मंत्रालयात पार पडलेल्या मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत आज मोठा निर्णय घेण्यात आला. उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत सातारा गॅझेटियरच्या अंमलबजावणीसह हैदराबाद गॅझेटच्या कार्यप्रणालीवर सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत ठरले आहे की, राज्यातील जिल्हा परिषद…

Read More