Author: editor desk

आजचे राशिभविष्य दि.१ फेब्रुवारी २०२६ मेष राशी तुमच्या व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. तुम्ही कोणत्याही नवीन जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडाल. काही कारणांमुळे खर्च वाढू शकतो. तुमच्या जोडीदारासोबत काही गैरसमज होऊ शकतात. वृषभ राशी तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन संधी मिळतील. तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळेल. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांना चांगले यश मिळेल. तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. आर्थिक बाबतीत इतरांवर विश्वास ठेवणे टाळा. मिथुन राशी घरातील मंगल कार्यासाठी खर्च होण्याची शक्यता आहे. तुमच्या व्यवसायात तुम्हाला लक्षणीय सकारात्मक बदल दिसतील, ज्यामुळे तुम्हाला चांगला आर्थिक फायदा होण्याची शक्यता वाढेल. या काळात कोणताही व्यवहार करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. कर्क राशी सौंदर्यप्रसाधनांच्या…

Read More

पालकमंत्र्यांचे तात्काळ पंचनाम्याचे आदेश; शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची केली पाहणी जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून नियमानुसार मदत दिली जाईल. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या असून शासन त्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे आहे. प्रत्येक पात्र शेतकऱ्याला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे, असे जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगितले. गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी आज धरणगाव तालुक्यातील बोरगाव बुद्रुक, गारखेडा, पष्टाने बुद्रुक तसेच जळगाव तालुक्यातील…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या २८ जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. अवघ्या चौथ्याच दिवशी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर या निर्णयावर विरोधी पक्षांकडून टीकेची झोड उठली आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वावर कठोर शब्दांत टीका केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी बैठकांवर बैठका घेतल्याचा संदर्भ देत, राज ठाकरे यांनी थेट प्रफुल्ल पटेल यांना लक्ष्य केले. राज ठाकरे म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेससारख्या अस्सल मराठमोळ्या, रांगड्या आणि मातीतल्या पक्षाचा अध्यक्ष हा मराठी…

Read More

मुंबई :वृत्तसंस्था उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्याबाबत पुन्हा एकदा राजकीय चर्चांना वेग आला आहे. अजित पवारांच्या निधनापूर्वीच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांच्या विलिनीकरणाबाबत हालचाली सुरू होत्या, अशी महत्त्वाची कबुली राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे वरिष्ठ नेते जयंत पाटील यांनी दिली आहे. जयंत पाटील यांच्या या खुलाशामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यामागील पडद्यामागचे प्रयत्न प्रथमच उघड झाले असून, हे विलिनीकरण केवळ राजकीय कारणांमुळे नव्हे तर निवडणूक प्रक्रियेमुळे रखडले, हे स्पष्ट झाले आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना जयंत पाटील म्हणाले, “मी, अजित पवार, शशिकांत शिंदे आणि इतर काही नेते एका बैठकीसाठी एकत्र आलो होतो. या बैठकीत…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्राच्या राजकारणात ऐतिहासिक क्षण घडला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. शनिवारी दुपारी २ वाजता विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्या म्हणून त्यांची अधिकृत निवड करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता राजभवनात पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सुनेत्रा पवार यांची पक्षनेते म्हणून निवड करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्ष व विधानपरिषदेतील सदस्यांची संयुक्त बैठक विधानभवनात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, ज्याला सर्वानुमते मान्यता देण्यात आली. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी आपल्या राज्यसभेतील…

Read More

मुंबई : प्रतिनिधी “निवडणूक जिंकण्यासाठी रेवड्या वाटल्या जात असून त्यामुळे राज्य आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे,” असा गंभीर आरोप करत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती लक्षात न घेता केवळ सत्तेसाठी जनतेच्या पैशांची उधळपट्टी करण्याचा अधिकार सरकारला कोणी दिला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. वडेट्टीवार म्हणाले की, राज्यावर महसुली तुटीचा बोजा सातत्याने वाढत आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’सारख्या लोकानुनयी योजनांमुळे महाराष्ट्र महसुली तुटीत गेला आहे. २९ जानेवारी रोजी सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पातील आर्थिक सर्वेक्षणातही महिला कामगारांच्या श्रमशक्तीतील सहभागावर या योजनांचा नकारात्मक परिणाम झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. ते पुढे म्हणाले…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सत्तासंतुलन व नेतृत्वाबाबत हालचाली तीव्र झाल्या आहेत. मात्र, या प्रक्रियेत शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांना विश्वासात न घेतल्याचे समोर आल्याने पवार कुटुंबात अंतर्गत नाराजी उफाळून आली आहे. शरद पवार यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय घाईगडबडीत घेतल्याचे स्पष्ट केले. “सुनेत्रा पवारांबाबतचा निर्णय एवढ्या घाईने का घेण्यात आला, याची मला माहिती नाही. या संदर्भात माझ्याशी कोणतीही चर्चा झाली नाही,” असे पवार म्हणाले. ते पुढे म्हणाले की, गेल्या चार महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाबाबत चर्चा सुरू…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी धरणगाव शिवारासह तालुक्यातील आनोरे, धानोरे, गारखेडे, पिंप्री, वाघळूद परिसरासह संपूर्ण तालुक्यात मंगळवारी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गहू, मका, ज्वारी व हरभरा ही पिके पूर्णपणे भुईसपाट झाल्याने शेतकरी वर्गावर संकट ओढावले असून तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे. मंगळवारी दुपारी सुमारे चार वाजेच्या सुमारास अचानक वादळाला सुरुवात झाली. काही वेळातच वादळाचा जोर वाढत मुसळधार पावसाने हजेरी लावली. वादळाचा वेग इतका प्रचंड होता की फळधारणेला आलेली रब्बी पिके अक्षरशः जमिनीवर लोळण घेत होती. यावर्षी धरणगाव तालुक्यात मक्याचा पेरा मोठ्या प्रमाणावर करण्यात आला होता. पाटाचे आवर्तन उपलब्ध असल्याने रब्बी हंगामातील…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी  वाहनचोरीच्या वाढत्या प्रकरणांवर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केली आहे. जामनेर व भुसावळ परिसरातील चोरीच्या घटनांचा उलगडा करत पोलिसांनी तीन मोटारसायकली जप्त केल्या आणि दोन तरुणांना ताब्यात घेतले. ही कारवाई पोलिसांच्या सतर्कतेने आणि गोपनीय माहितीनुसार पार पडली. पोलिसांनी जामनेरमधून अनुराग लक्ष्मण सूनगत (वय १९) आणि दर्शन बाप्पू चव्हाण (वय १८) यांना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्यांनी त्यांच्या एका साथीदारासह मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. तपासा दरम्यान जामनेर पोलिस स्टेशनमध्ये दाखल गुन्हां मधील दोन मोटारसायकली आणि भुसावळ पोलिस स्टेशनमध्ये दाखल गुन्हांमधील एक मोटारसायकल असा एकूण तीन मोटारसायकलींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हा मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलिसांच्या ताब्यात…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ शुक्रवारी सकाळी अनियंत्रित ट्रॅक्टर पलटी झाल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार दि. ३० जानेवारी रोजी सकाळी सुमारे १० वाजेच्या सुमारास शेतकऱ्यांचा भाजीपाला उतरवून ट्रॅक्टर (क्र. एमएच १९ बीजी ८४१६) भाजीपाला मार्केटच्या मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर पडत होते. बाजार समितीतून बाहेर आल्यानंतर राष्ट्रीय महामार्गावर वळण घेत असताना चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर अचानक रस्त्यावरच पलटी झाले. घटनेच्या वेळी सकाळची गर्दी असल्याने बाजार समिती परिसरात मोठी वर्दळ होती. ट्रॅक्टर पलटी होताच मोठा आवाज झाल्याने परिसरात एकच धावपळ उडाली. मात्र, या अपघातात चालकासह इतर कोणालाही दुखापत न…

Read More